मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुंदर रूपाचं चांदणं....! (भारत उपासनी)

दिवाळी अंक · · दिवाळी अंक
. . तुझ्या रूपाचं चांदणं पोरी जपून ठेवावं आणि नक्षत्राचं दान त्यात ओतून ठेवावं //१// असं टिपूर पडलं तुझ्या रूपाचं चांदणं तुला कसं गं सुचलं माझ्या नावाचं गोंदणं //२// तुझ्या रूपाचं चांदणं माझ्या नावाचं गोंदणं तुझा मेंदीचा गं हात माझं नक्षीचं कोरणं //३// तुझ्या हातावर नक्षी माझ्या नावाची कोरली चंद्रकोर आकाशीची उगा स्वतःशी लाजली //४// कशापायी लाजली गं चंद्रकोर आकाशीची मिठी पडली पृथ्वीची दूरवर क्षितिजाची //५// माझ्या काळजाच्या पोटी तुझी पृथ्वी किती मोठी तुझ्या रूपाचं चांदणं त्याला क्षितिजाची मिठी //६// 1 . . (चित्रः पियुशा) . . कवि : भरत उपासनी शारदाकुंज,एन थ्री एल २४,सिडको कॉलनी,पहिली स्कीम,नाशिक ४२२००९. भ्रमणध्वनी : ८०५५८५२९७८. .
दिवाळी अंक वर्ष

वाचने 10023 वाचनखूण प्रतिक्रिया 10

एस Fri, 11/13/2015 - 12:36
सुंदर कविता! एकात एक गुंतलेली कडवी आवडली! ह्या कवितेच्या फक्त शीर्षकावरून सुलेखन केले होते. कविता कशी आहे हे माहीत नव्हतं, आत्ता लक्षात कविता वाचल्यानंतर आलं की सुलेखनातही शब्द एकमेकांत गुंफल्यासारखे आले आहेत. :-) फार छान कविता. मागच्या अंकातही तुम्ही कविता दिल्या होतात ते आठवलं.

पुनवेचा चन्द्र गुरुवार, 11/26/2015 - 14:50
खुपच छान. तुझ्या हातावर नक्षी....माझ्या नावाची कोरली....चंद्रकोर आकाशीची....उगा स्वतःशी लाजली..... माझ्या काळजाच्या पोटी...तुझी पृथ्वी किती मोठी...तुझ्या रूपाचं चांदणं....त्याला क्षितिजाची मिठी अप्रतिम रचना!!!! शब्द छान गुन्तवले आहेत एकमेकात