Skip to main content

बेसन पोळा / पिझ्झा काहीही ......

लेखक पियुशा यांनी मंगळवार, 24/11/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
राम्राम मिपाकर्स , सध्या पावसाळा परत सुरु झालाय ;) आमच्याकडे शिळ्या पोळ्या उरल्या की नेहमीच त्याचा तिखट चुरा नाही तर तुप गुळ घालुन गोड मलिदा बनवतात. पण काल धो - धो पाउस कैतरी चमचमीत करावे असे राहुन राहुन वाटत होते पण भजी / वडे तेलकट पदार्थ नकोसे वाट्त होते. काय क्रावे बरे ? असा विचार करता करता आहे त्या साहित्यात ही रेसेपी सुचली न प्रयत्न सगळ्याना आवडला देखील म्हणुन इथे हा रेसेपी प्रपंच :) पदार्थ झालाय पण बारस कै जमल नै आपल्याला :) साहित्य : १ )शिळ्या पोळ्यांचे तुकडे. २ ) बेसन एक वाटी. ३) जिर आणी ओवा प्रत्येकी १ छोटा चमचा. ४ ) मुठभर मेथीपाने चिरुन न धुवुन ( कांदापात /पालक किंवा कुठलीही , तुमची आवड ) ५ ) मिठ चविनुसार. ६ ) हिरवी मिरची + लसुन पेस्ट - १ चमचा. (तुम्हाला झेपेल तितकी ) क्रुती : वरिल सर्व मिश्रण ( पोळ्यांचे तुकडे सोडून ) भज्याला कालवतो तसेच कालवून घ्या. त्यात पोळीचा तुकडा बुडवून मिश्रण चांगले लावून घ्या. A C तव्यावर थोड तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्या. बरोबर सॉस / चटणी / लोणच जे काही हाती लागेल ,सापडेल ते , नसले तरी हरकत इल्ले :) B आत पोळी असल्याने कमी तेलात हे प्रकरण होत शिवाय तव्याला चिकटत नाही सहज उलटल जात ह्यासाठी नॉन स्टिकची गरज नाही :) E D चमचमीत न कमी तेलातल गावरान पिझ्झा / पोळी नक्की आवडेल तुम्हाला :) (मनीच्या बाता : " फोटु जरा असे तसेच आलेत खाण्याची घाई , सुड ह्या आयडीची जाम भीती वाटायलिय " ) ;)

वाचने 15146
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

आयडीया आवडण्यात आली, नक्की करून पाहीन, टोमॅटो प्युरी अ‍ॅडवूनही पहावी म्हणतोय कदाचीत टोमॅटो ऑम्लेट सारखे लागू शकेल.

असलं काहीतरी चटकमटक खाती अन कॅल्शम कमी पडते. नखे पाहा जरा. ;) . एनीवे छान आहे रेसिपी. अंडे वगैरे ट्राय करायला हरकत नै शिळ्य चपातीसोबत.

अंड्याच्या बॅटरमध्ये पाव बुडवून, तव्यावर किंचित तेल टाकून, चरचरीत भाजून घेतले की त्याला 'फ्रेंच टोस्ट' म्हणतात तसेच ह्याला 'इंडीयन टोस्ट' (विदाऊट एग) का म्हणू नये? करून पाहण्यात येईलच.

In reply to by सूड

आमच्याकडचा बदल असा की पोळी दोन्ही बाजूनी शेकवून झाली, की मग त्यावर हे डाळीचं बॅटर पातळ पसरवायचं आणि उलटवून फक्त ती बाजू तेलावर खरपूस भाजून घ्यायची.

असलं कायतरी पोळ्या करायला शिकले तेव्हा माहिती हवं होतं गं पिवशे.. बरीच इज्जत वाचली असती..किचनातले अपमान अजून ठसठसतात.. :-P

अरेवा! मस्त रेसिपी. रच्याकने, आम्ही पोळ्या व्यवस्थित करत असल्याने शिळी पोळी कशी खपवायची हा प्रश्नच अम्हांस लागू होत नाही. ;)

आज सकाळीच करुन पाहिलं. माझ्याकडे दुधी भोपळा होता म्हणुन तो किसुन टाकला. मस्त झालं!! आणि महत्वाचं म्हणजे झटपट! पोळीच्या एकाच साईडला मिश्रण लावण्याचे वेरिएशनप पण केले. तेही छान झाले होते!! फारच उपयुक्त रेसेपी हां पिवशे! किप इट अप!