एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती....
कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही."
कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो."
अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात."
वगैरे, वगैरे...
बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं,
"क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?"
बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं,
"जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है. इनमेंसे हरएक हातियार खुद अपनेमें बुलंद है.
लेकिन मेरी मानो तो हुजुर, आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है."
बादशहाला बिरबलाचं हे अनपेक्षित उत्तर आवडलं नाही.
"नही बिरबल, हम नही मानते ये बात. आखिर कौनसा तो हातियार सबसे बुलंद तो होना ही चाहिये!"
"आप नही मानते तो छोड दीजिये जहांपन्हां", बिरबलाने उत्तर दिलं, "मैं तो यही बात मानता हूं."
बादशहाला आणि त्याच्या इतर दरबार्यांना हे उत्तर जरा उद्धटपणाचं वाटलं...
........
एके दिवशी बिरबल त्याच्या नेहमीच्या रस्त्याने देवळात चालला होता. गेली कित्येक वर्षे तो याच रस्त्याने, एका छोट्या गल्लीतून त्याच्या त्या विविक्षित देवळाकडे जात असे.
आजही नेहमीप्रमाणे तो ती चिंचोळी गल्ली अर्धी चालून आला आणि बघतो तर काय, समोरून एक महाकाय हत्ती आक्रंदत, जो समोर येईल त्याला पायाखाली तुडवत, सोंडेनं फेकून देत धावत येत होता...
बिरबलाला स्वतःवरच्या संकटाची जाणीव झाली. पण देवळातच जायचे असल्याने तो नि:शस्त्र होता....
काय करावे ते त्याला सुचेना. हत्ती तर दर क्षणी जवळ जवळ येत चालला होता....
बिरबलाने इकडेतिकडे पाहिलं....
आणि त्याला जवळच एक मरतुकडं कुत्रं दिसलं...
बिरबलाने क्षणभर मनाशी विचार केला आणि मग पुढे होऊन झट्ट्कन ते कुत्रं उचललं. त्या कुत्र्याचे मागचे दोन पाय हातात धरून ते दोनदा गरागरा हवेत फिरवलं. ते कुत्रं बिचारं घाबरून किंचाळायला लागलं....
हत्ती फेकीच्या टप्प्यात येताच बिरबलाने ते किंचाळणारं कुत्रं त्या आक्रमक हत्तीच्या रोखाने फेकलं...
ते बरोबर जाऊन नेमकं त्या हत्तीच्या गंडस्थळावर आपटलं!!!!
हत्तीला हे नेमकं आपल्यावर काय येऊन आदळलं ते कळेना! तो बिचकला आणि अबाऊट टर्न करून विरूद्ध दिशेला पळत सुटला...
बिरबलाने सुटकेचा निश्वास टाकला...
गर्दीत असलेल्या बादशहाच्या हेरांनीही ही सगळी हकीकत बादशाहाच्या कानावर घातली...
"आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!"
.....
.....
.....
हे सगळं आताच आठवायचं काय कारण?
काल चांदणी रात्र होती...
चांदणी रात्र असली की रात्री जेवण झाल्यावर झोप येईपर्यंत माझ्या घरामागल्या आवारात खाट टाकून पडायचं आणि त्या पिठूर चांदण्याचा आनंद घ्यायचा ही माझी नेहमीची सवय. त्याप्रमाणे काल रात्रीही तसाच पडलो होतो...
झोप अनावर झाली की नेहमी मी उठून घरात जाऊन झोपतो...
पण काल खूप बागकाम केल्यामुळे थकवा जरा जास्त आला होता म्हणा किंवा काही अन्य कारणामुळे म्हणा, तिथेच बाहेर खाटेवर कधी डोळा लागला ते कळलंच नाही...
सुमारे अडीच-तीनच्या सुमारास एका प्रकारच्या कूऽऽच-कूऽऽच अशा आवाजाने आणि कसल्याश्या अनामिक प्रेझेन्सने मला दचकून जाग आली....
झटक्यात उठून सभोवार पाहिलं तर काहीच दिसेना. तोवर चंद्र ढळला होता आणि त्यामुळे सर्वत्र मिट्ट काळोख होता...
इकडे तिकडे बघतांना सहज नजर बॅकयार्डाच्या कुंपणाबाहेर गेली आणि बघतो तर,
चकाकणार्या गोलांच्या दहा-बारा जोड्या!
जमिनीपासून सुमारे दोन-तीन फूट उंचावर!!!
ओ माय गॉड, हे तर कायोडीज्!! (लांडगे)
माझ्या बॅकयार्डाच्या टोकाला कुंपण आहे आणि मग तिथून पुढे काही मैल संरक्षित जंगल आहे. तिथे नवीन डेव्हलपमेंट करायला परवानगी नाही, तो संरक्षित वन्य एरिया आहे. त्या भागात अनेक लांडगे, कोल्हे, ससे वगैरे प्राणी रहातात, वेळप्रसंगी एखाददुसरे दृष्टीलाही पडतात. पण इथे तर दहा-बारा लांडगे एकदम आले होते....
मला उठून बसलेला पाहून आणि मी एकटाच आहे हे पाहून आता त्यातले दोघे-तिघे कुंपणावर चढून आत यायचा प्रयत्न करत होते!!!
हे असं का करताहेत तेच मला क्षणभर कळेना. आणि मग डोक्यात लख्ख प्रकाश पडला!!
त्या दिवशी दुपारी बागेत काम करतांना काही काटेरी झुडुपं साफ केली होती. त्यांच्या काट्यांनी हातापायावर विलक्षण ओरखाडे उठले होते. त्या जखमा अजून ओल्या होत्या.
आणि त्या रक्ताचा वास त्या लांडग्यांना लागला असावा!!!
लांडगे आणि अस्वलं यांना रक्ताचा वास फार दूरवरून येतो....
त्या माझ्या रक्ताच्या वासाने बहुदा ते इथे गोळा झाले होते...
आणि आता मला एकटाच पाहून, व्हल्नरेबल समजून, आक्रमण करण्यासाठी कुंपण चढून आत यायचा प्रय्रत्न करत होते!!!
काय करावं ते मला समजेना! आमच्यामध्ये अंतर पंधरा-वीस फुटांचं आणि मध्ये फक्त ते कुंपण!
माझं हत्यार घरात आतमध्ये राहिलं होतं...
तसा मला ताबडतोब धोका नसला तरी ह्यांना आता हाकून कसं लावावं ते समजेना...
मग अचानक एक आयडिया सुचली!
बॅकयार्डमध्ये बागेला पाणी द्यायचा होज पाईप होता. तो मोकळा केला, होज 'फायर स्ट्रीम' वर अॅडजेस्ट केला आणि नळ सुरू केला...
प्रेशर बिल्ड झाल्यावर पहिला नेम एका कुंपणावर अर्धवट चढलेल्या लांडग्याच्या चेहर्यावर धरला आणि होज ऑन केला...
माझ्या नशिबाने पाण्याचा झोत सरळ त्याच्या दोन्ही डोळ्यांवर आणि कपाळावर बरोबर मध्ये जाऊन आदळला!!!
त्या अनपेक्षित धक्क्याने तो कुंपणावरून खाली फेकला गेला आणि क्यँऽऽक क्यँऽऽक आवाज काढत जमिनीवर जाऊन पडला!!!
हे बघताक्षणी बाकीचा सगळा लांडग्यांचा कळप सैन्याची एखादी प्रशिक्षित तुकडी एकदम एकसाथ मागे सरावी तसा एक पाच दहा फूट मागे सरला. सगळे एकाच वेळी, एका दमात, सारखं अंतर!!
तशा प्रसंगातही मला त्यांचं कौतुक वाटलं. आणि आता माझ्या हातात हत्यार आलेलं असल्यामुळे आत्मविश्वासही वाढला...
मग काय,
नेम धरून पाच सहा लांडग्यांवर तसेच पाण्याचे झोत टाकले...
शेवटी हार मानून क्यँऽऽक क्यँऽऽक आवाज काढत (ह्या बहुदा माझ्या निषेधाच्या घोषणा असाव्यात!!) सगळा कळप रानाच्या दिशेने धावत सुटला....
मला मात्र नंतर सकाळपर्यंत झोप आली नाही.
तिथेच खाटल्यावर पडून मला राहून राहून ती अकबर-बिरबलाची गोष्ट आठवत राहिली!!
"आपत्कालमें जो भी हातियार हातमें आवें, वोही सबसे बुलंद है!"
:)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
19762
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
चायचा , बेक्कार किस्सा केलात
+१०००० ऐसाइच बोलनेका था..
In reply to चायचा , बेक्कार किस्सा केलात by स्पा
+१
In reply to चायचा , बेक्कार किस्सा केलात by स्पा
बापरे !
बाप्रे!
बापरे!!!!!!!!!!!!
प्रसंगावधानाचे कौतुक आहे.
बापरे!
आयला. डेंजर किस्सा. यापुढे
बापरे! आपल्या प्रसंगावधानाचे
जबरदस्त
आईशपथ !
बापरे !!
पिडाकाकांचं अवघड झालं ब्व्वा
जबरदस्त
सहमत
In reply to जबरदस्त by तिमा
हम्म
सहमत आहे. गायत्री मंत्रपण
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ते लांडगे तेव्हा वदनी कवळ
In reply to सहमत आहे. गायत्री मंत्रपण by अनुप ढेरे
वदनी
In reply to ते लांडगे तेव्हा वदनी कवळ by टवाळ कार्टा
जबरी किस्सा. काळजी घ्या.
ब्राव्हो!
भारीच किस्सा, काका..
हा.हा.हा... बिरबल कथा
खतरनाक अनुभव आणि प्रसंगवधान
पिडां लांडग्यांच्या तावडीतून
पिवळया मोगलीला भेटायला आले
बापरे
बापरे!! :)
जब्राट किस्सा .
अकबर - बिरबलाच्या अशा बर्याच
प्रसंगावधानाची दाद द्यायला
बघा...
अरे बापरे!
रोचक
सह्हीच.
रोचक किस्सा.....
काळजी घ्या
जबरी किस्सा!
बापरे..
वा!
बाब्बो !!!
अरे वा!!! ही जंगलकथा आवडली बॉ
बापरे...भयानकच अनुभव...
भारी :)
भन्नाट किस्सा आहे!
भयानक
एकदम जबराट प्रसंगावधान ....
_/\_
बाप रे ! काय प्रसंगावधान
बापरे...!!
हायला, शक्तिमानच हाव की
भारीच
घराबाहेरच
आता ह्यो मेन परश्न हाय खरा.
In reply to घराबाहेरच by कपिलमुनी
प्रसंगावधानासाठी दाद..
जय डांबिसमती! जय यलो नॉटी!
छे छे.
एखादी दंबूक घेउनच टाका अता
पण
मग मिपावर लेख कसा ल्हिला
In reply to पण by सुज्ञ
लेखन आवडले
चांदणी रात्रीचा आनंद जोडीनी
धन्यवाद
मस्त
बापरे, तुमच्या प्रसंगावधानाचे