संपादक मंडळ पुनर्रचना बाबत माहिती

नीलकांत's picture
नीलकांत in घोषणा
23 Nov 2015 - 1:22 pm

नमस्कार,

दर वेळे प्रमाणे यावेळीसुध्दा मिसळपावच्या संपादक मंडळात बदल करणे अपेक्षीत आहेत. सध्या असलेल्या संपादक मंडळाने अतिशय उत्तम काम केले आहे. विशेषत: गेल्या काळात मी अन्य कामांत व्यस्त असल्यामुळे किंवा अन्य कारणाने मिपास पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. अश्या वेळी मिसळपावची अतिशय उत्तम काळजी संपादक मंडळानी घेतली. खरं तर त्यांचे आभार प्रदर्शन करून त्यांना परकं न करता मी कायम त्यांचा स्नेह व मार्गदर्शन व्यक्तिश: मला मिळत रहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आज दि. २२/११/२०१५ रोजी सध्या अस्तीत्वात असलेले संपादक सदस्यं व एकूणच संपादक मंडळ आपल्या कामातून थांबतेय. यापुढे येते काही दिवस मिसळपाव वर प्रशांत आणि मी असे संपादक असू. त्यामुळे सर्व सदस्यांना सहकार्याची विशेष विनंती आहे. याकाळात सदस्यांशी संवाद साधण्यात जरा अडचण येऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी मिपाच्या धोरणाप्रमाने वागणुक ठेवावी व कारवाई टाळावी अशी विनंती आहे.

काही अडचण आल्यास मला किंवा प्रशांतला व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा.

प्रतिक्रिया

माहितीबद्दल धन्यवाद रे नीलकांता..!! :)

प्रसाद१९७१'s picture

23 Nov 2015 - 1:31 pm | प्रसाद१९७१

हा राकु इफेक्ट तर नाही ना?

नीलकांत's picture

23 Nov 2015 - 1:53 pm | नीलकांत

राजेश कुलकर्णी यांना सुध्दा काही काळासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यांनी वापरलेली भाषा मुळीच योग्य नव्हती. त्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केल्यास आणि त्यांचे वर्तन सुधारण्यास वाव असल्यास त्यांना परत प्रवेश देण्यास हरकत नाही. आपण जेव्हा सामाजिक संकेतस्थळावर जातो तेव्हा तेथील काही संकेत असतील ते आधी समजून घ्यावेत आणि मग पुढे जावे असा एक साधा संकेत आहे. प्रत्येक संकेतस्थळाची आपली एक प्रकृती आहे. तशी ती मिपाची सुध्दा आहे. ती समजून घ्यायला हवी अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे.

मिसळपाव संपादक मंडळात आपण दर काही महिन्यांनी बदल करत असतोच. मात्र एकूणच सर्वच संपादकांना थांबवावे हे नवीन आहे. मला सुध्दा न पटलेला हा निर्णय आहे. तरी सुध्दा मिपासाठी हा निर्णय जो की दिवाळीच्या आधिच घेतलाय. तो आता प्रत्यक्ष राबवतोय.

सोबतच अन्य सदस्यांना सुध्दा अगदी साध्या शब्दात एक विनंती करतोय की मिपावर मूळात कमीच असलेले जे नियम आहेत त्यांचे पालन करावे. मला किंवा प्रशांतला तांत्रीक आणि संपादकीय अशी दुहेरी भूमिकापार पाडताना कारवाई समजावून सांगण्याचा वेळ मिळेलच असे नाही. कारवाई मात्र तातडीने होईल.

- नीलकांत

बाळ सप्रे's picture

23 Nov 2015 - 2:15 pm | बाळ सप्रे

मला सुध्दा न पटलेला हा निर्णय आहे

ते कसं काय??

नीलकांत's picture

23 Nov 2015 - 2:47 pm | नीलकांत

माझ्या मते मिसळपावच्या संपादक मंडळाची रचना ही राज्यसभेसारखी असावी. म्हणजे त्यातील काही लोक जावेत आणि काही लोक येत रहावेत. त्यामुळे संपादनाची जी रचना आहे ती तशीच पुढे कायम रहावी. त्यासाठी काही जेष्ठ संपादकांनी काही काळ कायम रहावे असे मला वाटत होते. मात्र संपादक मंडळातील बहुतेकांनी सध्या थांबावे असे सुचवले होते. संपादकांनी केलेली सुचना महिन्याभरानी सुध्दा कायम होती म्हणून त्यांच्या विनंतीला मान दिला. मला ते पटलेले नाही एवढंच. पण माझ्या मनाविरुध्द आहे असे नाही.

आता नव्याने मांडणी करतानासुध्दा माझी संकल्पना कायमच आहे. नवीन लोकांना एकदम जम बसत नाही. त्यासाठी काही जून्या लोकांनी काही काळ संपादनात रहावं असे माझे मत आहे. बघुया काय होतंय ते. जे होईल ते सर्वांना कळवेनच.

अन्नू's picture

24 Nov 2015 - 1:52 am | अन्नू

नवीन लोकांना एकदम जम बसत नाही. त्यासाठी काही जून्या लोकांनी काही काळ संपादनात रहावं असे माझे मत आहे.

अ‍ॅग्रीड. :)
माजी संपादक मंडळाचे आभार आणि नविन (होणार्‍या) संपादकीय मंडळाला आगाऊ शुभेच्छा.

बाळ सप्रे's picture

24 Nov 2015 - 12:09 pm | बाळ सप्रे

ओक्के!! पारदर्शकतेबद्दल धन्यवाद.

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2015 - 1:32 pm | प्रभाकर पेठकर

नोंद घेतली आहे. धन्यवाद, निलकांत.

मृत्युन्जय's picture

23 Nov 2015 - 1:37 pm | मृत्युन्जय

नोंद घेतली गेली आहे. सर्व संपादक उत्तम काम करत होते आणि आहेत असे नमूद करु इच्छितो.

उगा काहितरीच's picture

23 Nov 2015 - 4:51 pm | उगा काहितरीच

+१

नीलकांत's picture

23 Nov 2015 - 5:58 pm | नीलकांत

संपादक उत्तम काम करत होते यात शंकाच नाही. मात्र काही काळानंतर बदल व्हायला हवा म्हणून केवळ बदल.

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 1:45 pm | भाऊंचे भाऊ

नोंद घेतली आहे. धन्यवाद.

तुम्ही म्हणता तर सर्व संपादक उत्तम काम करत होते तर होय. ते नक्किच करत होते, कारण इतर कोणालाही त्यांच्या कार्य-अनुभवाची माहिती जाहीर नाही आणी तुमावर अविश्वास दावाय्चा प्रश्नही येत नाही.पण सदरील संपादकांच्या कार्यकालात संपादकंच्या निपक्षपातीपणा बद्दल शंका निर्माण होतील अथवा त्यांच्या न्यायबुध्दी व विवेकपध्दतीबाबत सारासार प्रश्न निर्माण होतील असे किस्स्से घडलेले कोणी नाकारु शकत नाही. अर्थात ते उकरायची अजिबात गरज नाही.

नवीन संपादक नेमले जाणार आहेत का ? उत्तर हो असेल तर त्यांचा वयोगट हा १८ ते २८ इतकाच असावा असे मला प्रकर्शाने वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2015 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर

>>>त्यांचा वयोगट हा १८ ते २८ इतकाच असावा.

१८ च्या खालील आणि २९ च्या वरचे सदस्य अपरिपक्व असतात असा अर्थ काढावा काय?
नविन संपादक मंडळ येईल तेंव्हा त्यांच्या नांवासमोर त्यांचे वय सुद्धा जाहिर करणार का?

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 5:03 pm | भाऊंचे भाऊ

अ‍ॅज फार अ‍ॅज आय नो १८ च्या वर वय असणे आवश्यक आहे मिपा सदस्य बनण्यासाठी. म्हणून किमान मर्यादा १८.

२९ च्या वरचे सदस्य हे बरेच शिस्तप्रिय, अनुभवी, मिपा साहीत्य समृध्द करु शकणारे असल्याने उगा संपादक बनवुन त्यांच्या लिखाण स्वातंत्र्यावर दडपण आणने योग्य नाही. अन्यथा त्यांचे संस्थळाशी असलेले वैचारीक काँट्रीब्युशन कमालीचे खालावते जो सामान्य वाचकांवर अन्याय आहे. अशांना साहित्य संपादक अथवा सल्लागर मंडळात नेमणुक देणे वगैरे उज्वल दर्जाची कामे व पदे मिपावरती नक्किच उपलब्ध्द आहेत.

नविन संपादक मंडळ येईल तेंव्हा त्यांच्या नांवासमोर त्यांचे वय सुद्धा जाहिर करणार का?

जर का अनाहीता प्रवेषासाठी सदस्यांना त्यांचे नेमके लिंग जाहीर करणे बंधनकारक आहे तर संपादक मंडळातील सदस्य नेमके वय नको पण किमान ते १८ ते २८ वयोगटातीलच आहे याची जाहीर हमी द्यायला कोणाला त्रास वाटेल ?

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2015 - 9:37 pm | प्रभाकर पेठकर

>>>> शिस्तप्रिय, अनुभवी, मिपा साहीत्य समृध्द करु शकणारे

म्हणजे हे गुण संपादकांमध्ये नको म्हणताय का?

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 9:41 pm | भाऊंचे भाऊ

प्रभाकर पेठकर's picture

24 Nov 2015 - 1:35 am | प्रभाकर पेठकर

असहमत. कुठल्याही संस्थळाच्या यशस्वी वाटचालीत शिस्तप्रिय, अनुभवी, साहीत्य समृध्द करु शकणारे संपादकच हातभार लावित असतात. असो.

अनेक धन्यवाद! नवीन संपादकांना शुभेच्छा!

अभ्या..'s picture

23 Nov 2015 - 2:00 pm | अभ्या..

पारदर्शक माहीतीबद्दल अन घेतलेल्या निर्णयाबद्दल अनेकानेक धन्यवाद मालक.
आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा.

नाखु's picture

23 Nov 2015 - 2:05 pm | नाखु

मी अभ्याच्या बॅनर शब्दाबाहेर नाही...
पुढील संपादकांना शुभेच्छा !!!!

ता.क.अभ्या पुढील टी शर्ट कधी ???

अभ्या..'s picture

24 Nov 2015 - 1:00 pm | अभ्या..

अभ्या पुढील टी शर्ट कधी ???

येणार नाहीत. ऑर्डर कॅन्सल.
.
मनासारखे नवीन संपादक आले तर कदाचित फेरविचार करण्यात येईल. ;)

पीके's picture

24 Nov 2015 - 11:13 pm | पीके

यालाच म्हणतात....
आपल्या मनाविरुद्धा जरा काहि झाले की असहिंश्नुता म्हणून ..
बरं असो.. टि शर्ट वापसी कधी पासून चालू करूयत?

पीके's picture

24 Nov 2015 - 11:19 pm | पीके

ह. घे.

कपिलमुनी's picture

23 Nov 2015 - 2:03 pm | कपिलमुनी

मिपाच्या हितासाठीचा निर्णय !
पुढील संपादकांना शुभेच्छा !
या ट्रान्झिशन काळात सर्वतोपरी सहकार्य राहील.

पिलीयन रायडर's picture

23 Nov 2015 - 2:10 pm | पिलीयन रायडर

असेच म्हणते.

गॅरी ट्रुमन's picture

23 Nov 2015 - 2:20 pm | गॅरी ट्रुमन

या ट्रान्झिशन काळात सर्वतोपरी सहकार्य राहील.

या ट्रान्झिशन काळात आणि नंतरही कायमच सर्वतोपरी सहकार्य राहिलच :)

नवे संपादकमंडळ जेव्हा केव्हा नेमले जाईल तेव्हा त्यांना आधीच शुभेच्छा देऊन ठेवतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Nov 2015 - 2:13 pm | बिपिन कार्यकर्ते

ऑल द बेस्ट!

पैसा's picture

23 Nov 2015 - 2:14 pm | पैसा

मिपासाठी इतकी वर्षे काही काम करू दिल्याबद्दल नीलकांतला खूप धन्यवाद! मिपा आणि मिपाकरांनाही खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा! यापुढेही नीलकांतच्या कोणत्याही निर्णयाला संपूर्ण पाठिंबा आणि शक्य ती मदत नक्कीच असेल.

मिपाकरांना खास धन्यवाद! कधी काही अप्रिय घटना कामाचा अपरिहार्य भाग म्हणून घडल्या असतील त्यासाठी क्षमस्व. त्यात कधीही वैयक्तिक रागलोभ नव्हता. इथे भेटत राहूच!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Nov 2015 - 8:17 pm | निनाद मुक्काम प...

आपली तर बुआ सुरवातीपासून एकच भूमिका आहे
एक मिपाकर म्हणून संपादक मंडळ व मालकांच्या निर्णयांचा मान राखणे.
आणि मिपावर आपला सकारात्मक सक्रीय सहभाग देणे.

प्रसाद१९७१'s picture

24 Nov 2015 - 2:02 pm | प्रसाद१९७१

आपली तर बुआ सुरवातीपासून एकच भूमिका आहे

असे नाही चालणार निनाद. तुम्ही "माझी भुमिका" असा एक धागाच काढला पाहिजे. असे प्रतिक्रियेत २ ओळी लिहुन नाही चालणार.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Nov 2015 - 3:11 pm | निनाद मुक्काम प...

आपण माझे सुरवातीपासून चे लेख चाळा , म्हणजे वाचले तरी चालतील
त्यातील प्रतिसाद त्यावरील वाद हे सुरवातीच्या वर्षात झाले तेव्हा माझी भूमिका मी सविस्तर मांडली आहे.

प्रसाद१९७१'s picture

25 Nov 2015 - 9:27 am | प्रसाद१९७१

निनाद - माझा पॉईंटर यनावालांच्या "माझी भुमिका" ह्या धाग्याकडे होता. चेष्टेत लिहीले होते.

यशोधरा's picture

23 Nov 2015 - 2:19 pm | यशोधरा

नोंद घेतली आहे.

जेपी's picture

23 Nov 2015 - 2:21 pm | जेपी

नोंद घेतली आहे.

चळवळकरांना करा संपादक.होऊ द्या हौस पुरी.बाकी नावं सुचवा असं ठरवलं असेल तर -
१) जेपी,
२) नादखुळा
३) खटपट्या
४) यशोधरा
५) प्रगो
यांना विचारा.श्रीरंग_जोशी अगोदरच साहित्य मदत मंडळात आहेत.

१) नादखुळा,
२) परिकथेतील राजकुमार
३) यनावाला
४) विवेक पटाइत
५) प्रगो
६) अतिवास
७) पिशी अबोली
८) पिलीअन रायडर

शलभ's picture

23 Nov 2015 - 5:44 pm | शलभ

आता तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे नवीन नावं ही १८-२८ मधली सुचवायची की.
बाकी नाही माहीत पण हे २ तरी ह्य वयोगटात नाहीत. :)
३) यनावाला
४) विवेक पटाइत

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 5:51 pm | भाऊंचे भाऊ

माहित होतं एकजण तरी हा प्रश्न विचारणार. तरीही मी वयोगट न विचारात घेता नावे सुचवली कारण मला माहीत आहे १८ ते २८ वयोगट मान्य करण्याची हिम्मत बहुसंख्यांमधे* नाही ( अवांतर :- माझी तिशी केंव्हाच उलटली आहे )

* १८-२८ वयोगटातील सदस्य इथे अल्पसंख्यांक आहेत.

चिंतामणी's picture

27 Nov 2015 - 11:47 pm | चिंतामणी

एखादा अनिवासी सुद्धा संपादक मंडळात असावा.

धमाल मुलगा तसेच प्रभाकर पेठकर इत्यादी अनुभवी (अर्थात मिपाच्या संदर्भात जास्त) सभासद आहेत. त्यांचा विचार व्हावा.

खटपट्या's picture

24 Nov 2015 - 3:03 pm | खटपट्या

काका, एवढी पण नका खेचू!!

नोंद घेतली आहे, सहकार्य राहील.

मितान's picture

23 Nov 2015 - 2:37 pm | मितान

नोंद घेतली आहे.

जव्हेरगंज's picture

23 Nov 2015 - 2:54 pm | जव्हेरगंज

note

स्वाती दिनेश's picture

23 Nov 2015 - 2:56 pm | स्वाती दिनेश

घेतली आहे, सहकार्य आहेच, ते कायमच राहिल.
स्वाती

मधुरा देशपांडे's picture

23 Nov 2015 - 2:59 pm | मधुरा देशपांडे

नोंद घेतली आहे.

प्रभाकर पेठकर's picture

23 Nov 2015 - 3:01 pm | प्रभाकर पेठकर

अजून तरी संपादक मंडळाबदल कांही गैर अनुभव नाही. भविष्यातही नसेल अशी अपेक्षा.

अरुण मनोहर's picture

23 Nov 2015 - 3:08 pm | अरुण मनोहर

संपूर्ण संपादक मंडळ एकसाथ बरखास्त करण्यात नीलकांत ची जी काही कारणे असतील, ती असोत. पण हा निर्णय मिपा साठी चांगला नाही असे मला वाटते. संपादक मंडळाला मी आभार देऊ इच्छितो . त्यानी खूप कठीण काम व्यवस्थित पार पडले आहे. हे एक thankless काम आहे. ते उत्तम केल्यासाठी सलाम!
बाकी वयाची अट घालून संपादक निवडणे हे discriminatory आहे. वय, लिंग वा जाती अशी कुठलीही अट नको, please !
फक्त कामाची योग्यता !

परिकथेतील राजकुमार's picture

23 Nov 2015 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार

अवघडच झाले की हे!
आता आम्ही अरण्यरूदन कोणाच्या नावाने करायचे? ;)

ज्यांनी आजवर ही जबाबदारी सांभाळली त्यांचे खरंच धन्यवाद. माझ्यासारखे सभासद सांभाळणे म्हणजे खरंच अवघड असते.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Nov 2015 - 12:43 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

तुलाच संपादक मंडळात घ्यावे अशी विनंती नीलकांतला करावी म्हणतो.
वर्गातल्या सगळयात वांड मुलालाच मॉनीटर करतात ना तसं :P

महासंग्राम's picture

24 Nov 2015 - 3:51 pm | महासंग्राम

+++११११११ अगदी असेच म्हणतो मी