शेअर बाजार – काही IPO कथा
लेखक माल्कम ग्लॅड्वेल यांनी आपल्या 'Outliers' नावाच्या पुस्तकांत '10,000 hours rule' अशी एक संकल्पना मांडली, ज्यानुसार एखाद्याने कोणत्याही गोष्टीकरिता आपले 10,000 तास खर्च केल्याशिवाय त्याला त्या गोष्टीत प्राविण्य मिळत नाही.....या न्यायाने तर मी एव्हाना बाजाराविषयक सर्वज्ञच असावयास हवे, पण ..... मात्र एवढे खरे, की कोणास ज्ञान देणे वा 'यशोकथा' सांगणे नाही, पण उपयुक्त ठरावे असे काही अनुभव सांगण्याची माझी पात्रता असावी असे मी मानतो, आणि प्रसंग व्यक्तीगत स्वरुपाचे आहेत हे मान्य करुनही, त्यातील तर्क महत्वाचे व आजही लागु असल्याने येथे ते देण्याचे धाडस करतो आहे
सन 1991 मधे महाविद्यालयीन शिक्षणाचे निमित्ताने मुंबईत गेल्यावर माझा या जादुई अर्थविश्वाशी संबंध आला. बाजारांत दररोज उलाढाली करणारा सकाळच्या 9.01 च्या फास्ट गोरेगांव लोकल मधील एक समवयस्क गुजराथी तरुणांचा ग्रुप...त्यांच्या मुळे खरे तर मी या वाटेकडे आकर्षित झालो. अर्थात वातावणांत हर्षद मेहता नावाची तगडी चुंबकीय शक्तीही होतीच. मनाचा हिय्या करुन एके दिवशी जीजीभॉय टॉवर्सच्या लिफ्ट्मध्ये शिरलो तेंव्हा 13व्या मजल्याच्या क्रमांकाऐवजी फक्त '--'असे लिहिलेले, ही त्या गर्दीमध्येही मनांत नोंदली गेलेली पहिली गोष्ट.!! पुढे प्रामुख्याने BSES(आत्ताची रिलायन्स इन्फ्रा),SBI, बिनानी झिंक अशा शेअर्सच्या नवीन इश्शुज मधुन फायदा मिळवला. मात्र ह्या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणुन पहायला लागलो ते पुण्याला सुदर्शन केमिकल्स लि. मध्ये नोकरीला लागल्यावरच. सुरवातीस तेथेही निवडक IPO मध्ये सहकार्यांना अर्ज करायला लावणे, हाच माझा प्राधान्यक्रम होता.
1999 मध्ये पुण्याच्याच ‘KPIT Infosystems Ltd’ ने 90 रु. किंमतीने IPO जाहीर केला. मी ही एक चांगली संधी आहे याची खात्री असल्याने सुदर्शन मधील माझ्या वरिष्ठांकडुन अर्ज भरुन घ्यावे या विचारात होतो. दुपारीच आमच्या कंपनीतील 5/6 मॅनेजर्स कॉफी मशीनजवळ गप्पा मारताना मला दिसले. कंपनीतील वातावरण तसे खेळीमेळीचे व अगदी अनौपचारिक असे, मी ही संधी साधुन तेथे पोहोचलो आणि हळुच विषय काढला. आमच्या EDP विभागाचे प्रमुख आणि तीव्र बौद्धिक क्षमता असलेले एक व्यवस्थापकही तेथे होते. त्यांनी मला प्रश्न विचारला "साहेब(?)..आपल्याला काय माहिती आहे या कंपनीचे कामकाज आणि त्याच्या दर्जा बद्दल??" मी चाचरत काहीतरी पुटपुटलो. तो जमानाच असा होता की Information Technology वा Computer याबद्दल मलाच काय, माझ्या वरिष्ठांनाही क्वचितच माहिती होती. झाले..पुढचे 10/15 मिनिटे झाडाझडती होवुन ही कंपनी कशी दुय्यम आणि सुमार दर्जाची कामे करते हे विस्ताराने सांगितले गेले. मी व्दिधा मनाने माझ्या टेबलाशी आलो. मात्र संध्याकाळी सकाळचा प्रसंग आणि माझ्या मनातील घालमेल माझ्या व्यवसायांतील एक जेष्ठ मार्गदर्शक व्यक्तीला सांगितली आणि 'अर्ज करु की नको??" असा सल्ला विचारला. ते हसले आणि म्हणाले "XX सर या विषयांत 'Last word' आहेत या बद्दल वाद नाही, सबब ते म्हणतात हे खरेच असले पाहिजे..पण तुला एक सांगतो, या शेअरला भाव किती मिळायला हवा हे सरांसारखे विद्वान नाही तर तु, मी, तुझे मित्र यांच्यासारखे सामान्य लोक ठरवणार आहेत..जसे हे बघ ना..मी येथे प्रभात रोडला रहातो, अगदी लिज्जत पापड बनविणार्या कारखान्यासमोर, सहाजिकच 'अतिपरिचयामुळे' म्हणा, किंवा तोच तोच गंध सतत आल्याने म्हणा... आम्ही ते पापड कधीही खात नाही. पण म्हणुन कंपनीचा खप कमी झालाय का??..तेंव्हा खुशाल अर्ज कर"..मी आश्वस्त होवुन अर्ज केले. त्यातही नशीबाचा भाग म्हणजे या इश्शुला 40 पट अधिक प्रतिसाद मिळुनही मला हे शेअर्स मिळाले आणि 90 रु. ला मिळालेले शेअर्स 200 रु. च्या पलिकडे विकुन मी घरांतील फर्निचर केले.
2003 मध्ये जेंव्हा 'मारुति लि' चा पब्लीक इश्शु बाजारांत आला तेंव्हा आलेला अनुभव मात्र एकदम उलटा होता. ह्या इश्शुचे फॉर्म्स घेवुन मी काही निवडक क्लायंट्स कडे जायचो आणि 'बघा...चांगली कंपनी आहे' वगैरे पोपट्पंची करायला सुरवात करायचो, तोच ज्या कोणा साहेबांकडे मारुतीची गाडी असायची, ते मलाच उलट ती गाडी किती चांगली चालते, रिलाएबल कशी आहे, कोणताही त्रास नाही ई. गोष्टी सागायचे, '......अर्ज करायलाच हवा' असे म्हणुन फॉर्म भरायचे.
हा प्रकार पाहुन मीही ओढुन ताणुन चंद्रबळ आणले आणि चक्क ओव्हरड्राफ्ट वापरुन मोठ्या रकमेचा अर्ज भरला. सांगावयास आनंद वाटतो की मारुति 800 नव्हे पण एखादी उत्तम टु व्हीलर घेता येइल एवढा फायदा महिनाभरांतच झाला.
(केवळ माहितीसाठी - त्या वेळी अर्ज केलेल्या जवळपास प्रत्येकाला मारुतिचे शेअर्स फक्त रु 125 मध्ये मिळाले होते. मध्यंतरीचा भाव रु. 4700+ होता.)
IPO पुराणामधीलच मला हटकून आठवणारी आणखी एक गोष्ट सांगतो.....
29 जुलै हा उद्योगक्षेत्रांतील ध्रुवतारा भारतरत्न श्री. जे. आर. डी टाटांचा जन्मदिवस,आणि माझ्या कन्येचाही... सन 2004 मध्ये हा मुहुर्त साधून टाटा समुहातील सर्वात मोठी कंपनी TCS ने आपला बहुचर्चित पब्लिक इश्शु बाजारंत आणला. मी माझी, कुटुंबातील सदस्यांचे वाढ्दिवशी खरेदी करावयाची, पद्धत म्हणुन TCS साठी दोन वेगळे अर्ज भरले. त्याच बरोबर व्यवसायाचा एक भाग म्हणुन पुण्यांतील एक यशस्वी व्यावसयिक म्हणुन नामांकित असलेल्या माझ्या 'एक्स-बॉस'कडेही पोहोचलो. "या...प्रसाद या, इकडे कसे काय?? कसे काय चाललेय??".. सरांनी मिठ्ठासपणे चौकशी केली.(सर कधीच कोणाचाही उल्लेख एकेरीने करित नसत, अगदी ज्युनियरचाही) मी लगेच TCS च्या फॉर्म्सचे भेंडोळे काढुन त्यांना अर्ज करण्याची विनंती केली. थोडेसे विचारमग्न झाल्याचे दाखवत साहेबांनी विचारले..' किती रुपयाला आहे हो एक शेअर??'..'900ला सर" - मी..."10रु.चा एक शेअर 900 घ्यायचा.??"- साहेब, "नाही सर, शेअर 10 रु चा नाही,...01 रु.चा आहे"… मी मध्येच त्यांचा गैरसमज दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला (खरे तर मार्केटिंग कसे करु नये याचा उत्तम नमुनाच सादर केला !!!) "अहो, काय सांगताय काय?? इथे आम्ही नेहमीपेक्षा 2/5रु जास्त नफा घ्यायला गेलो तर बाजारांत कोलाहल होतो आणि कोण घेणार हो 01 रु. चा शेअर 900ला ??..असे सल्ले देताना नीट अभ्यास केला आहे् ना तुम्ही?? लक्षांत ठेवा, नवीनच आहात तुमच्या व्यवसायांत अजुन.. एवढ्या महाग किंमतीला या शेअरसाठी अर्ज करण्याचा माझा बिलकुल विचार नाही. आणि तुम्हीही जरा सावधपणेच करा..." "साहेबांनी माझ्याबद्दलच्या काळजीपोटीच सल्ला दिला.
अर्थात मी 'बाबा वाक्यं..बॉसं वाक्य प्रमाणम..' विचारसरणी मानणारा नसल्याने 02 अर्ज केलेच आणि मला 35 शेअर्सही मिळाले. 850 रु ला मिळालेल्या या शेअरने पहिल्याच दिवशी बाजारांत जवळपास 1200 रु चा भाव दाखवला. नंतर मिळालेला एकास एक बोनस लक्षांत घेता 2004 साली गुंतविलेल्या उण्यापुर्या 30,000 रुपयांचे कालचे बाजारमुल्य रु 3,50,000 पेक्षा अधिक आहे. आणखी एक सांगावयाची गोष्ट म्हणजे गेल्या 05 वर्षांत या कंपनीने कधीही 2000% पेक्षा कमी (होय 2000% च) डिव्हीडंड दिलेला नाही.
अर्थात केवळ IPO च्याच माध्यमातुन फायदा मिळवता येतो असे मात्र बिलकुलच नाही. किंबहुना 'वाट पाहीन पण IPO नेच कमवीन" असे असण्याचे अजिबात कारण नाही....
मध्यंतरी सोशल मिडियात विप्रो कंपनीचे 1980 साली घेतलेले 100 शेअर्स बोनस व स्प्लिट्स मुळे 96,00,000 एवढे वाढुन मुळ 10,000 रु. गुंतवणुकीचे मुल्य 30 वर्षात(2010 साली) 455 कोटी झाले असा एक पोस्ट फिरत होता…… आणि ही अन्य अनेक पोस्टप्रमाणे अफवा वा अतिशयोक्ती नव्हती तर वस्तुस्थिती होती. !!
कॅस्ट्रॉल या (आता डीलिस्ट झालेल्या) कंपनीने 1990-2012 दरम्यान तब्बल 10 वेळा बोनस दिले, 'मदरसन सुमी लि.' ही अशीच एक कंपनी...जिने 1997-2015 या काळांत 07 वेळा बोनस शेअर्स वाटले. ईन्फोसिसनेही बोनसवाटपाची अशीच चमकदार कामगिरी आजपर्यत 07 वेळा केली आहे. ITC ने 1978 पासुन 07 वेळा तर कोलगेट(ई)ने 1982 पासुन 06 वेळा बोनस शेअरची भेट दिली, आणी या प्रत्येकाने याशिवाय दरवर्षीच्या घसघसीत लाभांश दिलाच आहे.
जाता जाता....'एशियन पेंटस'च्या ताज्या वार्षिक अहवालात लिहिल्याप्रमाणे 1983 साली घेतलेल्या एका शेअरचे आता 184 शेअर्स झाले आहेत. आणि या कालांत गुतवलेल्या 1000 रु.चे मुल्य 31 मार्च 2015 रोजी रुपये 65,00,000 च्या आसपास आहे……. यादी खुप मोठी आहे विस्तारभयास्तव आटोपतो.
….एकदा एका भल्या पहाटे एक निरिश्वरवादी तरुण गौतम बुद्धांची भेट घ्यायला आला. त्याला पहाताक्षणीच बुद्धांनी तो काय विचारणार हे ओळखलेच होते, त्याने बुद्धांना 'तो' नेहमीचा प्रश्न विचारलाच ‘..ईश्वर खरेच आहे का?" "होय,आहे"..उपासनामग्न बुद्ध शांतपणे उत्तरले. तो निघुन गेला. नंतर एके दिवशी एक पापभिरु सज्जन बुद्धांना नेमका हाच प्रश्न विचारते झाले 'खरेच ईश्वर आहे का?" यावेळी मात्र बुद्धांनी तितक्याच तटस्थपणे उत्तर दिले - "नाही" .....हे सज्जनही विचारमग्न होवुन निघुन गेले. पुढे काही दिवसांनी आणखी एक भाविक बुद्धांना म्हणाला "महात्मन, मी गोंधळुन गेलो आहे, अनेक जण असे मानतात की परमेश्वर नाहीच मुळी, उलट बरेच लोक परमेश्वरावरच प्रगाढ विश्वास ठेवतात. आपल्याला काय वाटते ?? तो आहे की नाही?? कृपया मला मार्गदर्शन करावे."....यावर भगवान बुद्धांनी आपल्या अर्धोन्मेलित डोळ्यांतुन त्या साधकाकडे पहात एक प्रसन्न मंद्स्मित केले, आशिर्वाद दिला आणि काहीही न बोलता ते दुसर्या भिक्षुकडे वळले...बुद्धांनी उच्चारलेला शब्द-नी-शब्द लक्षपुर्वक ऐकणार्या त्यांचा एका पट्टशिष्याला मात्र रहावले नाही आणि सावकाशीने ह्या तीनही प्रसंगांची आठवण बुद्धांना देत त्याने विचारले "भगवान, तीन साधकांना तीन वेगळी उत्तरे?? आपण असे का केलेत ??".....यावर हसुन भगवान म्हणाले "अरे, मी काहीही वेगळे केलेले नाही. उत्तरांचे बाह्य स्वरुप वेगळे असेलही पण हेतु एकच आहे, प्रत्येकाला त्यांच्या कोषांतुन बाहेर काढुन विचा्र करण्यास प्रवृत्त करणे, जेणे करुन ते माझ्यासारख्या त्रयस्थाऐवजी स्वतःच सत्याचा अनुभव घेवु शकतील..
सांगावयाचा मुद्दा हा, तुम्ही भगवान बुद्ध असा की माझ्यासारखा सामान्य पामर, काही प्रश्नच असे असतात की जे तुम्हाला वारंवार विचारले जातात..रोज प्रातःसमयी अतिव प्रेमाने विचारला जाणार्या "ईतका वेळ त्या पेपरांत डोळे खुपसुन काय वाचतोयस ?? अशा केवळ दुर्लक्षिण्यायोग्य प्रश्नांबरोबरच व्यवसायानिमित्ताने "शेअर बाजारातुन चांगले रिटर्न्स मिळतील का?? 'बाजारांत गुंतवणुक करावी का?? असे प्रश्न मला वारंवार विचारले जातात. मी भगवान बुद्धांएवढा स्थितप्रज्ञ व तत्वचिंतक नसल्याने कधी हसुन तर कधी वैतागुन उत्तर देत असतो आणि तेही वेगवेगळे नव्हे तर एक आणि एकच. ते म्हणजे……….. "होय, दीर्घकालीन गुंतवणुकीकरीता शेअरबाजारास पर्याय नाही!!!'
अर्थात पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे मी स्वतःला गुंतवणुक क्षेत्रातील तज्ञ वगैरे अजिबातच समजत नाही मात्र माझ्यापुरत्या आखलेल्या भविष्यदिशा थोड्क्यांत पुढीलप्रमाणे सांगता येतील. - (१) Will not Invest for Short Term. Will not Save for Long Term...(२) बाजारांत नियमितपणाने गुंतवणुक करेन (३) शेअरबाजारांत गुंतवणुकीची सुरवात करणेपुर्वी किमान 06 महिने पुरेल एवढा आणिबाणी निधी बाजुला ठेवेन (४) केवळ पुर्ण माहितीवर आधारित निर्णयच घेइन, भावनावश होवुन वा घाई गडबडीने व्यवहार करणार नाही (५) उपलब्ध पर्यांयांची सखोल माहिती घेइन. उदा. फिक्स डीपॉझिट ऐवजी लिक्विड फंड्स वा टॅक्स वाचविण्याकरिता ELSS....
चार्ल्स डार्विनने म्हटले आहे की ‘It is NOT the strongest of the species that survives, NOR the most intelligent, but the ones most responsive to change …’ तेंव्हा बद्ल घडविणे अपरिहार्य्च आहे तर उशीर कशाला?? चला, येत्या नव्या संवतापासुनच बदलाला सामोरे जावुया !!!
वाचने
70410
वाचनखूण
प्रतिक्रिया
128
छान लेख.
In reply to छान लेख. by एस
एस भौ शी सहमत...
In reply to छान लेख. by एस
धन्यवाद.प्रयत्न नक्कीच करेन..
In reply to छान लेख. by एस
काही दुवे
In reply to छान लेख. by एस
नमस्कार,
In reply to नमस्कार, by सुरेन्द्र फातक
फाट्क साहेब, मातोश्रींना माझा
फारच छान
होय, दीर्घकालीन
Reliance power च्या IPO बद्दल
In reply to Reliance power च्या IPO बद्दल by जेपी
सहमत
In reply to सहमत by तुषार काळभोर
पावर ऑन . मार्केट गॉन
In reply to Reliance power च्या IPO बद्दल by जेपी
जसे प्रत्येक रागाचा एक स्वभाव
म्युच्युअल फंड..
मस्तं लेख ! नेहमीप्रमाणेच ...
Of 178 firms that have listed
In reply to Of 178 firms that have listed by सुबोध खरे
तेंव्हा आय पी ओ मध्ये
फँटॅस्टिक लिहिलंयत भौ !
भागवत साहेब, तुमची उदाहरणे
In reply to भागवत साहेब, तुमची उदाहरणे by प्रसाद१९७१
प्रसादराव मी अर्ज करण्यास
In reply to प्रसादराव मी अर्ज करण्यास by प्रसाद भागवत
तेच होतय ना, जे चांगले आहेत
In reply to तेच होतय ना, जे चांगले आहेत by प्रसाद१९७१
माझे म्हणणे थोडे वेगळे आहे,..
ग्रामीण भागातील लोक अजूनही
तुमचे ह्या विषयातील लेख
इंट्रेस्टींग!
इंट्रेस्टींग!
आता दोन आय पी ओ आहेत
In reply to आता दोन आय पी ओ आहेत by मोगा
शेअरबाजार आणि अनुषंगिक ताज्या
मस्त लिहिताय भागवत साहेब
प्रतिसाद क्र. १ शी सहमत
भागवत सर
सध्याची भांडवलशाही व्यवस्था,
In reply to सध्याची भांडवलशाही व्यवस्था, by पथिक
एकीकडे तुम्हाला शेयर ट्रेडिंग
रच्याकने-
In reply to रच्याकने- by सुबोध खरे
नाही. Ecology चा अभ्यास करतोय
In reply to नाही. Ecology चा अभ्यास करतोय by पथिक
मोठमोठ्या कंपन्या स्वत्तःच्या
In reply to मोठमोठ्या कंपन्या स्वत्तःच्या by प्रसाद१९७१
मोठ्या मोठ्या कंपन्या
In reply to मोठ्या मोठ्या कंपन्या by पथिक
डिव्हाईन डीस्पेअर (दिव्य/
In reply to डिव्हाईन डीस्पेअर (दिव्य/ by सुबोध खरे
:-)
छान लेख.
चांगला
येथील कोणीतरी मित्राने ( नाव
In reply to येथील कोणीतरी मित्राने ( नाव by प्रसाद भागवत
प्रतिक्रिया पण वाचा
Thyrocare Technologies च्या
In reply to Thyrocare Technologies च्या by प्रसाद भागवत
आयपीओ कधी ओपन होतोय महानगर
In reply to आयपीओ कधी ओपन होतोय महानगर by काळा पहाड
Date not yet decided.. But it
In reply to आयपीओ कधी ओपन होतोय महानगर by काळा पहाड
Date not yet decided.. But it
In reply to Date not yet decided.. But it by प्रसाद भागवत
धन्यवाद
ह्ल्ली प्रत्येक IPO करिता
In reply to ह्ल्ली प्रत्येक IPO करिता by प्रसाद भागवत
भागवतजी,
महानगर गॅस चा ,
धन्यवाद.
Mahanagar Gas Limited IPO
In reply to Mahanagar Gas Limited IPO by प्रसाद भागवत
हा आय पी ओ का घ्यावा आणि का
In reply to हा आय पी ओ का घ्यावा आणि का by माझीही शॅम्पेन
हा आय पी ओ का घ्यावा ...
Mahanagar Gas Limited IPO
L & T इन्फोटेक IPO
In reply to L & T इन्फोटेक IPO by विअर्ड विक्स
काही विषिष्ट ठिकाणीच IPO ची
महानगर गॅस आयपीओ साठी ३
In reply to महानगर गॅस आयपीओ साठी ३ by वेदांत
अरेरे कधी अलॉटमेंट झाली ? ४
In reply to अरेरे कधी अलॉटमेंट झाली ? ४ by माझीही शॅम्पेन
जरा धीर धरा साहेब.. फक्त
In reply to महानगर गॅस आयपीओ साठी ३ by वेदांत
Oh..better luck next time..
In reply to महानगर गॅस आयपीओ साठी ३ by वेदांत
क्षमस्व.. आपले प्रतिसादाचे
In reply to महानगर गॅस आयपीओ साठी ३ by वेदांत
क्षमस्व.. आपले प्रतिसादाचे
उद्या लिस्टींग आहे. अलॉटमेंट
अलॉटमेंट झाली बहुतेक
In reply to अलॉटमेंट झाली बहुतेक by शुभां म.
शुभां म...आपल्याला शुभेच्छा !
भागवतांचे लेख
In reply to भागवतांचे लेख by खाबुडकांदा
धन्यवाद..कांदासाहेब.
अलॉट्मेंटचे मेसेज येत आहेत.
In reply to अलॉट्मेंटचे मेसेज येत आहेत. by मोहन
basis of allotment is 21/83.
महानगर गॅस च्या,
In reply to महानगर गॅस च्या, by भंकस बाबा
Oh..better luck next time..
In reply to Oh..better luck next time.. by प्रसाद भागवत
भागवतजी,
In reply to भागवतजी, by भंकस बाबा
बाबाश्री..एका डीमैट अकाउंटवर
In reply to बाबाश्री..एका डीमैट अकाउंटवर by प्रसाद भागवत
बेनामी व्यवहार
In reply to बेनामी व्यवहार by शाम भागवत
मी तज्ञ नाही पण तरीही ...
In reply to मी तज्ञ नाही पण तरीही ... by प्रसाद भागवत
:))
ईंटरेस्ट निर्माण होत आहे...
...मार्गदर्शन अपेक्षित
५४० ला लिस्ट झाला. ५२८ भाव
In reply to ५४० ला लिस्ट झाला. ५२८ भाव by मोहन
.....मिळाल्यास आपले सगळे वा
L & T इन्फोटेक IPO ११ जुलैला
In reply to L & T इन्फोटेक IPO ११ जुलैला by मराठी_माणूस
L & T इन्फोटेक IPO
In reply to L & T इन्फोटेक IPO by वेदांत
धन्यवाद
L&T Infotech IPO - Updates
In reply to L&T Infotech IPO - Updates by प्रसाद भागवत
माझेसुद्धा हेच मत .... विप्रो
In reply to L&T Infotech IPO - Updates by प्रसाद भागवत
हा कधी लीस्ट होईल ?
In reply to हा कधी लीस्ट होईल ? by मराठी_माणूस
Now a days.. It takes 8/10
प्रमाणित वैयक्तिक आर्थिक सल्लागार
In reply to प्रमाणित वैयक्तिक आर्थिक सल्लागार by खोबाजी
मी पुणेस्थित असलो तरी
IPO update : Advanced Enzyme
IPO update : Advanced Enzyme
L & T infotech IPO कधी लिस्ट
In reply to L & T infotech IPO कधी लिस्ट by मोहन
http://www
My post before the L&T
In reply to My post before the L&T by प्रसाद भागवत
नक्की काय म्हणायचे आहे?
In reply to नक्की काय म्हणायचे आहे? by मराठी_माणूस
काहीच नाही साहेब. 'मराठी
In reply to काहीच नाही साहेब. 'मराठी by प्रसाद भागवत
आत्ता ७०६ आहे
In reply to काहीच नाही साहेब. 'मराठी by प्रसाद भागवत
अस झाला का बर झाल जास्त नाही
आरबीएल
In reply to आरबीएल by ray
या IPO बद्दल बोलायचे तर मी
In reply to या IPO बद्दल बोलायचे तर मी by प्रसाद भागवत
धन्यवाद
मी सध्या निवृत्त आहे. मला
In reply to मी सध्या निवृत्त आहे. मला by कायरा
मार्गदर्शन वगैरे शब्द फारच
सुनो, सुनो, सुनो, बा-अदब, बा
लक्ष ठेवून आहे.
लक्ष ठेवून आहे.
L&T technologies चा IPO आलाय,
श्री. सुखी साहेब, L&T
In reply to श्री. सुखी साहेब, L&T by प्रसाद भागवत
प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद..
In reply to श्री. सुखी साहेब, L&T by प्रसाद भागवत
ICICIPru Life चे लिस्टींग
In reply to ICICIPru Life चे लिस्टींग by मराठी_माणूस
दुर्दैवाने हो.. या बाबत मी WA
गेल्या काही वर्षांपासून आयपीओ
In reply to गेल्या काही वर्षांपासून आयपीओ by श्रीगुरुजी
+१
बाकी मुद्द्यांवर लिहित नाही
कोल इंडिया
In reply to कोल इंडिया by मोहन
अगदी हाच प्रश्न मला पडला आहे
In reply to अगदी हाच प्रश्न मला पडला आहे by माझीही शॅम्पेन
सर्वसाधारणतः असे बायबॅक हे
In reply to सर्वसाधारणतः असे बायबॅक हे by प्रसाद भागवत
खूप धन्यवाद !! म्हणजे मी
धन्यवाद प्रसाद सर !
*Upcoming IPO*
In reply to *Upcoming IPO* by प्रसाद भागवत
८००-८५० म्हणजे हा शेअर महाग आहे का?
बाजारात सर्वाधिक महत्वाचे
बाजारांत येणारे IPOs याबद्दल
In reply to बाजारांत येणारे IPOs याबद्दल by प्रसाद भागवत
त्यामुळे मध्यस्थाची
Diluted शेअर्स चे मूल्य
आपण एखाद्या कंपनीचा शेअर १००
धन्यवाद