✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने

श
श्रीरंग_जोशी यांनी
Sat, 06/16/2012 - 10:07  ·  लेख
लेख
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात. जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते. पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात. आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार? यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये. मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
66103 वाचन

💬 प्रतिसाद (155)

प्रतिक्रिया

अबु आझमी

भंकस बाबा
Sat, 11/21/2015 - 08:23 नवीन
या माणसाचे नाव घेतले की हसायला येते राव! जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करताना अबू आझमीं ने तोडलेले तारे! इस प्रोजेक्ट को हर एक मुसलमान को विरोध करना चाहिए। कयोकि ये प्रोजेक्ट बना कौन रहा है? अरेवा कंपनी। अरेवा कंपनी किधर की है? फ़्रांस की। ये फ़्रांस ऐसा देश है जिसने मुसलमानो को बुरक़ा पेहन्नेपर पाबन्दी लगाईं है। तो सब मुसलमान भाइयो को इस प्रोजेक्ट का विरोध करना चाहिये।
  • Log in or register to post comments

दादा कोंडके

भंकस बाबा
Sat, 11/21/2015 - 08:31 नवीन
शिवसेनेच्या दसरा मेळावा, " हे कॉंग्रेसवाले सेनेला उखडून टाकायची भाषा करतात, साले हे कॉंग्रेसचे उपटू शकले नाय तर आमचे काय उपटणार" एक छोटासा पॉज, मोठा हसा प्रेक्षकातुन. नंतर दादा बोलले " गवत हो"
  • Log in or register to post comments

दादा..

योगी९००
Sun, 11/22/2015 - 11:30 नवीन
दादा कोंडके या माणसाविषयी थोडाफार आदर आहे. पण त्याची शिवसेनेच्या प्रचाराच्या वेळची केलेली भाषणे फारच खालच्या लेवलची होती. कोल्हापुर येथे भाषणात "बाळासाहेबांना पकडणार म्हणजे त्यांचे काय पकडणार?" असे बोलण्यापर्यंत मजल गेली होती. (नंतर लगेच "संपुर्ण बाळासाहेब तुम्हाला कधीच सापडणार नाही" असे बोलून टाळ्या घेण्याचा प्रयत्न केला होता). अर्थात दादांच्या या भाषणाला कोल्हापुरकरांनी हशा दिला आणि टाळ्या वाजवल्या याचे जास्त वाईट वाटले. एकदा शंकरराव चव्हाण यांच्याविषयी दादांनी असे उद्गार काढले होते. "शंकरराव आणि त्यांच्या पत्नी आतमध्ये आहेत आणि त्यांच्या पत्नी XXXX पहात आहेत". त्या काळात ना.धो. ताम्हनकराचा मानसपुत्रावर आलेली गिरीश घाणेकर दिग्दर्शित एक सिरीयल खूपच प्रसिद्ध होती. XXXX च्या जागी दादांनी त्या सिरीयलचे नाव घेतले होते त्यामुळे भलताच अर्थ निघत होता. अशा त्यांच्या बोलण्यावर शंकररावांनी टिका केली असता खुद्द बाळासाहेबानी दादांची खरडपट्टी काढली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

ना.धो. ताम्हनकराचा

योगी९००
Sun, 11/22/2015 - 11:33 नवीन
"ना.धो. ताम्हनकराचा" ऐवजी "ना.धो. ताम्हनकरांच्या" असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

आरपीआयचे खासदार रामदास आठवले

पामर
Mon, 11/23/2015 - 09:47 नवीन
आरपीआयचे खासदार रामदास आठवले अटलजींवर कवितेतुन टिका करताना
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा