Skip to main content

शोध

लेखक मयुरMK यांनी शनिवार, 21/11/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र उमदा मी एक अश्व करीत पादाक्रांत हे विश्व करावयाचा आहे शोध घ्यावयाचा आहे बोध .....................मृत्यूचा! बाळगुन मनाशी जिद्द चपल तनुत एक उमेद नजरेत एकाच ध्येय धावणार मी असाच आहे ......................सुसाट! माझिया जन्मानेच मला जीवन्मंत्र आहे दिला येणार ना मरण तुला .....................कधीही पण,मनी ती एक आस भेटावयाचे मरणास संपणार कधी हा प्रवास एकचि ध्यास तो खास ....................अंतरात आणि अशाच एका दिनी यश प्राप्तिले प्रयत्नानी पाहिले मरणाचे रूप ते तर होते प्रतिरूप ....................जन्माचे! मृत्युस त्या भेटता तत्क्षणी टोल माझा खोल जाऊनी भावना,वेदना लोपल्या नव्हत्याच आत्ता कोठल्या ........................जाणिवा! परतून पुन्हा होतो जन्मत तोच मी,आत्माही तोच बदलली केवळ काया नव्या रुपात आता कराया ...........................मार्गक्रमण! फ़क्त गाडी ती बदलीत या गाडीतून त्या गाडित पुन्हा एकदा तोच प्रवास तोच मार्ग शोधण्याचा ........................मृत्युस.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2124
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडली. थोड्या टाईपिंगच्या चुका झाल्या आहेत. त्या टाळता आले तर बरे. बाकी नवीन आहात का? स्वागत!

मी नवीनच आहे इथे आणि ह्या क्षेत्रात सुद्धा आणि लहान पण आहे मार्गदर्शन करा :)

In reply to by मयुरMK

त्यापेक्षा नवीन विषय, भाव असलेली कविता लिहायला घ्या आणि त्यात मात्रीकभाऊंनी केलेली सूचना प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करा.