Skip to main content

एक कविता मनाची.......

लेखक मयुरMK यांनी रविवार, 22/11/2015 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक कविता मनाची एक कविता जनाची मना वाटते, राजा मी व्हावे जन म्हणती, तू रंकचि रहावे- एक कविता स्वप्नाची एक कविता सत्याची स्वप्न म्हणे, गगनात विहरावे सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे - एक कविता नात्याची एक कविता जातीची नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय जात म्हणे, कोण हां परकीय- एक कविता प्रश्नाची एक कविता क्षणाची प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही- ही कविता जीवनाची ही कविता मरणाची जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2486
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

याचा लेखक मी नसून माझे बाबा आहेत त्यांच्याकडून धन्यवाद आपल्याला.

In reply to by मयुरMK

कविता आवडल्याची पोच द्या हो मयुरMK वडीलांना तुमच्या! अवांतर: मयुरMK हे क्रीश्णनअय्यरMA याच्या अगदी जवळ जाणारे वाटते! ;-) धन्यवाद! Sandy

हो नक्की सांगेन सैंडी. तो माझ्या नावाचा शोर्ट फॉर्म आहे मयूर मोहन कदम

छान लिहीली आहे कविता तुमच्या वडीलांनी.

फारच सुरेख. सहज सोपे शब्द आणि मनाला भिडणारा आशय. खरंच छान आहे.