✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इशकजादे – २

म
मांत्रिक यांनी
Sat, 11/21/2015 - 11:40  ·  लेख
लेख
सकाळचे साडेआठ वाजत आलेले होते. रितू कॉलेजला जाण्यासाठी तयार होत होती. रेडिओवर गाणं लागलेलं, ‘हाय वो परदेसी मन में कौन दिशासे आ गया…’ थोडंसं थबकून ती मध्येच ते गाणं लक्षपूर्वक ऐकत होती. आज तिने मुद्दाम कालचाच तो गुलाबी ड्रेस घातलेला होता. उत्सुकता आणि एक हुरहुर! थोडंसं घाबरल्यासारखंच होत होतं तिला आज. एवढ़्यात माई तिची गडबड बघून बाहेर आल्या. ‘काय गं रितू? एवढी कसली गडबड?’ ‘काही नाही गं माई! आज जरा लायब्ररीत जायचंय. उशीर झाला तर पुन्हा रांगा लागतात मग.’ ‘बरं! ठीक आहे.’ रितू श्रीरामपूरमधल्या नाना टाफळेंची कन्या. नाना त्या जिल्ह्यातील एक महत्वाचे राजकारणी म्हणून ओळखले जात. ग्रामपंचायतीपासून सुरुवात करून त्यांनी आता झेड. पी. सदस्यपदापर्यंत मजल मारलेली होती. दर दोन-तीन महिन्यांनी त्यांचे वाढदिवस असल्याचे भले मोठे होर्डींग्ज शहरभर लागत असत. त्यावरुन ते जनतेचा विकास करीत आहेत याची माहिती जनतेला समजून येई. बाकी त्यांची खरी जन्मतारीख सटवाईला पण माहीती नसेल असे लोक खाजगीत कुत्सित टोमणे मारीत. पण टाफळेंना फरक पडत नसे. असे बोर्ड्स लागले रे लागले की नानांच्याकडून कार्यकर्त्यांना साग्रसंगीत पार्ट्या झोडायला मिळत असत. नानाही खूष व कार्यकर्तेही खूष. बाकी नानांविषयी खुद्द त्यांच्या कुटुंबातच कुणाचं मत चांगलं नव्हतं. गावभरच्या कुरापती काढणे व राजकारण करणे यामुळे नाना कधीच कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकले नाहीत. वयात आलेला तरुण पोरगा नको नको त्या सवयी लागून बाद झाला व कमी वयातच गेला. हे दुःख माई कधीच विसरु शकल्या नाहीत. त्यामुळे नानांच्या अपरोक्ष माईंनी रितूमध्ये कायम स्वतंत्र विचार करण्याची वृत्ती निर्माण केली. कधी कधी दोघी खूप वेळ गप्पा मारत बसत. माई अशा वेळीस खूप भावुक होऊन रितूला स्वतंत्र विचारानं जीवन जगण्याचा सल्ला देत. शिकून स्वतःच्या पायावर उभी रहा आणि नानांच्यावर कधीच अवलंबून राहू नकोस हे समजावून सांगत. कधी कधी माई गंमत देखील करत. मध्येच म्हणत ‘रितू तुझ्या नानांचा म्युझिकल स्वभाव मीच काय तो सहन केला बघ.’ रितू लगेच कातावून म्हणणार ‘माई, अगं म्युझिकल नव्हे व्हिम्झिकल’ मग माई म्हणत ‘अगं कधी कधी जड जेवण झालं की होतात ते म्युझिकल’ आणि असंच काहीतरी गंमतीशीर बोलून दोघी हसत बसत. पण आज मात्र रितू माईंसोबत काहीच शेयर करणार नव्हती. हा तिचा स्वतःचा व्यक्तिगत कोपरा होता. इथे अजून तरी कुणालाच प्रवेश मिळणार नव्हता. अगदी जवळच्या मैत्रिणींनासुद्धा ती सांगणार नव्हती. तेवढ्यात बाहेरून मैत्रिणींची हाक आली. ‘रितू चल लवकर.’ ती लगेच घराबाहेर पडली. रस्त्यावर चालत चालत एकमेकींशी गप्पा मारतानासुद्धा तिची नजर हळूच तो कुठे दिसतोय का याचा अंदाज घेत होती. आजूबाजूला नेहमीचे टोळभैरव उभेच होते. आपण असं इकडे तिकडे पाहिलं तर त्यांचा गैरसमज होईल, ही देखील भीति होतीच तिला. पण सुदैवाने तिच्या बापाचा दरारा सगळ्यांना माहीत असल्याने मुळात तिच्याकडे कुणी बघतच नव्हतं. संपूर्ण रस्ता संपला. आता कॉलेजचं गेटपण आलं. तो कुठेच नव्हता. तिला थोडंसं खट्टू झाल्यासारखं वाटलं. गेटमधून त्या सर्वजणी आत आल्या. स्टॅंडला सायकली उभ्या करुन ठेवल्या. आभाळ थोडंसं काळवंडलेलं होतं. हलकासा मंद वारा देखील सुटलेला. तिचे केस खट्याळपणे वा-याबरोबर स्वैर नाचू लागले. ते पुन्हा पुन्हा मागे सारत तिने सहज लायब्ररीकडे पाहिलं. तो तिथे उभा होता. त्याच्या मित्रांशी गप्पा मारत. अचानक त्याचीही नजर तिच्याकडे गेली. त्याने क्षणभरच तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मित्रांशी बोलण्यात मग्न झाला. तिला नकळत थोडं दुखावल्यासारखं झालं. विचाराच्या तिरमिरीत ती क्लासमध्ये कधी येऊन बसली तिला देखील कळलं नाही. आज कुठल्याच विषयात तिचं लक्ष लागत नव्हतं. लेक्चरर येऊन बडबड करुन जात होते. बस तेवढंच कळत होतं. हे काय आहे काय प्रकरण? मेंदूला एखाद्या डिंकासारखं घट्ट चिकटून बसणारं? मी का म्हणून त्याचा इतका विचार करतेय? जितक्या तीव्रतेनं फेकून द्यावं त्याच्या दसपट जोरात माघारी येऊन पुन्हा डोक्यावर बसणारं हे आहे तरी काय? थोड्या वेळाने तो विचार बाजूला ठेवायला तिला थोडं का होईना यश मिळालं. मग जसं मन शांत होऊ लागलं तसं तिच्या लक्षात तिची चूक येऊ लागली. कदाचित आपल्या मनातील खळबळ त्याला कळालेली सुद्धा नसेल. किंवा मग तिच्या वडीलांविषयी त्याला माहिती पडलं असेल का? हा विचार मनात येताच तिला थोडी गंमत वाटली. नानांच्यासमोर तिला मागणी घालायला तो येईल का डेयरींग करुन? काय घडेल अशा वेळीस? इकडे विवेकच्या मनातदेखील थोडी खळबळ चाललेली होती. रितू पुढं गप्पगप्प बसलेली त्याला दिसत होती. त्यानं मघाशी जास्तच भावखाऊपणा केला असं त्याला वाटायला लागलं. पण त्याच्या उत्साही मित्रांनीच त्याला तसा सल्ला दिलेला होता. त्यातूनच प्रेमाची आग पेटत जाते असं डॉ. दिवटेंच्या ‘प्रेमः एक हार्मोनल(Hormonal) भडका’ या संशोधनात्मक पुस्तकात कुणालनं वाचलेलं होतं, आणि त्या पुस्तकात दिलेल्या सल्ल्यांवर त्याची खूप श्रद्धा होती. अनेक ठिकाणी नकारघंटा मिळूनसुद्धा बिचारा त्या लेखकाचा जबरदस्त फॅन होता. अचानक कॉलेज संपल्याची बेल वाजल्यानं त्याचं विचारचक्र थांबलं. प्रत्येकजण भराभर सॅक्स उचलून बाहेर पडायची घाई करीत होता. तो थोडासा थांबला. नकळत रितूदेखील थोडी थांबलेली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आता मुद्दाम काहीतरी कारण काढून मागे थांबणं आलं. पण नाही, रितू तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर पडली. ती त्याच्यासाठी थांबलेली नव्हती. विवेक ती बाहेर पडूपर्यंत तिच्याकडे पहात होता. तिच्यामागे अजून दोन तीन मुली होत्या. एकसलग बडबड चाललेली त्यांची. काहीतरी चुकीचं घडलं हे त्यांच्या कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण विवेकने ते पाहिलं. त्याला ही संधी पाहिजेच होती. तो लगेच खुशीत धावला. एव्हांना त्या सर्वजणी ग्रंथालयापर्यंत पोहोचलेल्या सुद्धा होत्या. रितू आज थोडी रेंगाळत मागेच चालत होती. तो पटकन तिच्यापर्यंत पोहोचला. ‘थांबा जरा कृपया.’ ***** . . . . . (क्रमशः)

Book traversal links for इशकजादे – २

  • ‹ इशकजादे – १
  • Up
  • इशकजादे – ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण

प्रतिक्रिया द्या
5861 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

नका हो नका थांबवू

नाखु
Sat, 11/21/2015 - 12:20 नवीन
पुढचा भाग येऊ द्या... आणि जरा मोठे भाग टाका. राकु धुराळीने हा खाली जाऊ नये हीच आकाशातल्या बाप्पाकडे प्रार्थना. पुभाप्र
  • Log in or register to post comments

वो मांत्रिक भौ

बाबा योगिराज
Sat, 11/21/2015 - 12:32 नवीन
अस णै ना करु. ज़रा मोठे भाग येऊ द्या की वो. पुलडा भाग लवकर येऊ द्या.
  • Log in or register to post comments

संपवून टाका राव

चांदणे संदीप
Sat, 11/21/2015 - 13:10 नवीन
एक घाव दोन तुकडे, अर्धे इकडे अर्धे तिकडे! अवांतर : नाना टाफळेंवरून 'नानासाहेब नेफळे' असा काहीतरी आयडी मिपावर पाहिल्याचे आठवले! ('अवधूत'चीही वाट पहात आहे!) Sandy
  • Log in or register to post comments

केवळ गंमतीने नाव ठेवलंय. नाना

मांत्रिक
Sat, 11/21/2015 - 18:31 नवीन
केवळ गंमतीने नाव ठेवलंय. नाना - माई जोडी सध्या हिट आहे नं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

वाचतेय. पुभाप्र.

रातराणी
Sat, 11/21/2015 - 13:11 नवीन
वाचतेय. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

डॉ. दिवटेंच्या ‘प्रेमः एक

शिव कन्या
Sat, 11/21/2015 - 14:26 नवीन
डॉ. दिवटेंच्या ‘प्रेमः एक हार्मोनल(Harmonal) भडका’ :):):) पुभाप्र.
  • Log in or register to post comments

चांगली चाललीय

एक एकटा एकटाच
Sat, 11/21/2015 - 18:55 नवीन
चांगली चाललीय
  • Log in or register to post comments

पोचली गाडी ओळखीपर्यंत! बरं

अजया
Sat, 11/21/2015 - 19:12 नवीन
पोचली गाडी ओळखीपर्यंत! बरं झालं :)पुभाप्र.
  • Log in or register to post comments

या बात! यव द्या लौकर.

आदूबाळ
Sat, 11/21/2015 - 19:33 नवीन
या बात! यव द्या लौकर.
  • Log in or register to post comments

Pls someone help me to upload

मांत्रिक
Sat, 11/21/2015 - 19:42 नवीन
Pls someone help me to upload youtube video of a very romantic song: Hi woh perdesi man mein... I have tried a lot but could not do it...
  • Log in or register to post comments

क्या बात है

अमृत
Sat, 11/21/2015 - 19:52 नवीन
रम्य ते कॉलेजचे दिवस!
  • Log in or register to post comments

आयला नानाच्या पोटी..

बाबा पाटील
Sat, 11/21/2015 - 21:16 नवीन
म्हणजे शक्ती कपुरच्या पोटी श्रद्धा कपुरच म्हणा की हो
  • Log in or register to post comments

हा हा! झक्कास विनोद!!!

मांत्रिक
Sun, 11/22/2015 - 21:00 नवीन
हा हा! झक्कास विनोद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

दोन्हीही भाग छान जमले आहेत.

पद्मावति
Sat, 11/21/2015 - 22:02 नवीन
दोन्हीही भाग छान जमले आहेत. पु.भा.प्र. अवधूतची सुद्धा वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments

हा पण भाग छानच

जातवेद
Sat, 11/21/2015 - 23:49 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

एक सूचना

अमृत
Sun, 11/22/2015 - 07:46 नवीन
कथा कॉलेज जिवनावर असल्याने विशेष आवडतेय. एक सूचना देऊ एछितो कृपया राग मानू नका. लिखाणात जर थोडं पात्रांच वर्णनसुध्हा टाकलत तर अजुन चित्रस्पर्शी होईल उदा - तिचे निळे डोळे,कुरळे/ लांबसडक केसं किंवा त्याची ६ फूट उंच भारदस्त शरीरयश्टी वगैरे वगैरे. तसच थोडं कॉलेज परीसराचं वर्णन उदा - विस्तृत मैदान, जुनी काळ्या दगडांची इमारत.जमल्यास कॉलेज रस्त्याविशयी थोडं. तुम्ही हे करू शकता हा विश्वास आहे म्हणूनच मागणी करतोय. ही केवळ सूचना ऐकावीच हा अट्ठास नाही. पुलेशु व पुभाप्र.
  • Log in or register to post comments

गोड गोड प्रेम कथा

इडली डोसा
Sun, 11/22/2015 - 07:56 नवीन
नेहमीच्या वळणाने जाणारी सुखद प्रेमकथा वाचायला मिळणार असे दिसते. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

छान ...मनमोहक

माहीराज
Mon, 11/23/2015 - 10:09 नवीन
छान ...मनमोहक
  • Log in or register to post comments

लिहा पटापट

पैसा
Mon, 11/23/2015 - 16:32 नवीन
लिहा पटापट!
  • Log in or register to post comments

अगोदरच्या भागाची लिंक टाकत

उगा काहितरीच
Mon, 11/23/2015 - 17:25 नवीन
अगोदरच्या भागाची लिंक टाकत चला . -एक नम्र सुचना!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा