उर्वरीत समाजसेवकां विषयी
समाजसेवकांच्या बाबतीत सरळसरळ दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येते. एक जेन्युइन चांगले समाजसेवक दुसरे उर्वरीत सर्व समाजसेवक. महाराष्ट्रीयन उदाहरणं घेतली तर या समाजसेवेच्या क्षेत्रात काही अतीशय आदरणीय सकारात्मक कार्य करणारे असे महान समाजसेवक लोकं आहेत. उदा. बंग दाम्पत्य , डॉ. कोल्हे , नाडकर्णी, इ. या सर्व अत्यंत संवेदनशील तळमळीने काम करणार्या व्यक्ती आहेत ज्यांचे कार्य खरोखर अजोड आहे.अर्थातच अशी माणसं संख्येने फ़ारच कमी आहेत. आता बाकी लेख इतर उर्वरीत समाजसेवकांच्या संदर्भात आहे त्यामुळे जे वरील प्रमाणे जेन्युइन चांगली लोकं आहेत त्यांचा अर्थातच या लेखात व्यक्त झालेल्या विचारांशी दुरान्वयानेही संबध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आता सर्वसाधारण उर्वरीत जे समाजसेवक दिसतात यापुढे त्यांचा उल्लेख उर्वरीत समाजसेवक (उस) असा संक्षिप्त करतो उस चा वापर यासाठी की त्याने जेन्युइन समाजसेवक हे वेगळे आहेत /असतात याची जाणीव कायम राहावी. कृपया खालील चर्चेत वरच्या चांगल्या प्रकारातल्या जेन्युइन समाजसेवकांना विनाकारण ओढु नये ही नम्र विनंती.
तर उस हे एक रोचक प्रकरण आहे. सर्वप्रथम पात्रता य़ा क्षेत्रात काम करणारे अनेक जण पात्रता या निकषावर खरे उतरत नाहीत. म्हणजे सोशल वर्क चे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत प्रशिक्षण आहेत पण ते केलेलेच लोक यात काम करतात अस काही फ़ारस आढळून येत नाही. सर्वसाधारण निरीक्षण असे दाखवते की जे सध्याच्या युगाच्या कठोर स्पर्धेत कुठेतरी मागे पडलेले असतात, त्यांच्या अपुर्ण शिक्षणामुळे, वा त्याच्या अभावामुळे अथवा व्यक्तीगत क्षमता /कॅलीबर नसलेले वा गुणवत्तेच्या अभावाने जे कुठेतरी मुळ प्रवाहातुन बाहेर फ़ेकले गेलेले असतात वा मुळातच कमकुवत असल्याने शिरण्यात असमर्थ असतात अशांचाच सर्वाधिक ओढा समाजसेवेकडे असतो. अशा बहुतांश अपात्रांचा च या क्षेत्रात भरणा दिसुन येतो. यामुळे या क्षेत्रात आढळणारा सर्वात मोठा स्वभावविशेष म्हणजे न्युनगंड व या न्युनगंडातुन येणारा एक विशिष्ट उद्धटपणा जो तुम्हाला अगदी गोलापांगरी बुद्रुक ते दिल्ली मेट्रो पर्यंतच्या उस मध्ये सहसा आढळुन येतो. इथे काम करायला मुळात पात्रता प्रशिक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटतच नाही. माझी तळमळ वा मळमळ हीच माझी पात्रता आहे अशा भ्रमात उस वावरतात. त्यासाठी ज्या समस्येवर आपण काम करतो आहे त्याचा आपला काही अभ्यास आहे की नाही तीच्या सोडवणूकीची पातत्रा आहे की नाही याचा विचारही त्यांना शिवत नाही.
यांची बोलण्याची शैली ही कायम शिक्षकासारखी असते. उस कायम तुम्हाला साध्या बोलण्यातुनही काहीना काही शिकवणार सकळ जन शहाणे करुन सोडतोच आता असा एक टीपीकल पवित्रा उस मध्ये असतो. आणि दुसरा म्हणजे इतरांना गिल्टी फ़िल करुन देणं सातत्याने. हा उस यांचा आवडता उपक्रम असतो. तुम्ही दिवाळीचा आनंद घेत आहात फ़टाके फ़ोडत आहात उस तुमचा गळा धरेल तुम्ही कसे आत्ममग्न आहात पाड्यावर दिवाळी नाही यंदा , तुम्हाला काही कस वाटत नाही तुमच्या संवेदना बधिर कशा झालेल्या आहेत इ. इ. ह्रेटॉरीक्स उस कडे ह्रेटॉरीक्स ची कमतरता नसते. ते तुम्हाला तुमच्या कोणत्याही नैसर्गिक आनंदापासुन कृत्यापासुन वंचित करुन तुम्ही कसे चुकीचे संवेदनाशुन्य व पापी आहात व तुमच्यावर कुठल्या तरी पाड्यातल्या आदिवासींची जबाबदारी बांधिलकी इ. कशी आहेच व ती निभवण्यात तुम्ही कसे कमी पडलात इ.इ.पटवुन देण्यात ते तरबेज असतात.
उस यांची व्यक्तीगत नैतिकता हा तर अत्यंत कळीचा विषय आहे. अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी मध्ये एक अत्यंत संवेदनशील असा उपक्रम होता. त्यांच्या गावात जी व्यक्ती दारु पिते म्हणजेच पाप करते त्या व्यक्तीला अण्णा आणि कार्यकर्ते खांबाला बांधुन फ़टके मारीत असत. यावर पत्रकारांनी छेडल असता गांधीवादी अहिंसावादी अण्णा यांनी उस यांच प्रातिनीधीक ठराव अस उत्तर दिलेल आहे. ते म्हणतात हे मी त्यांच्या च (अल्कोहोलीक्स ) च्या भल्यासाठीच हे करत आहे. त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत (जीझस स्टाइल ) म्हणून त्यांना याची जाणीव करुन देण्यासाठीच त्यांच्याच कल्याणासाठी हे आहे. हा युक्तिवाद स्वयमेव अतिशय बोलका आहे. प्रत्येक उस यांचा पवित्रा साधारण थोड्याफ़ार फ़रकाने असाच असतो. ( आठवा नुकतचं चार हजार महावीद्यालयीन युवा शिथीलांग रसिकांसमोर असाच एक काव्यगत न्याय केलेला.. जाहीररीतीने करण्या/बघण्यातला आनंद काही वेगळाच असतो नाही ?)
एकदा विदर्भातल्या एका तालुक्याच्या गावातल्या मुलींच्या अनाथश्रमात काही कारणाने गेलो होतो. तिथे त्या मुलींना बघितल्यावर एक विसंगती ठळक लक्षात आली ती म्हणजे हेअरस्टाइल मुली अत्यंत गरीब अगदी एका बाजुच्या गावात आणि हेअरस्टाइल अगदी डोळ्यात खुपावी अशी भिन्न विचीत्र म्हणजे त्यांच्या बाकी अवताराला कुठेच न जुळणारी. थोडी विचारणा केल्यावर उत्तर मिळालं की एक शहरातल्या पार्लरवाल्या बाई त्यांच्या नवशिक्या विद्यार्थ्यांना घेऊन येत असतात व या मुलींची मोफ़त कट करुन देतात, नवशिक्यांचा विचीत्र प्रभाव दर्शनीय होता..मग तुम्ही प्रॉपर न्हावी का बोलवत नाही ? आ? यांना कशाला पाहीजे प्रॉपर न्हावी त्यांना काय हिरोइन बनवायचयं अहो इतकं बिचार्या त्या बाई मदत करतात सोशल वर्क म्हणुन हेच कीत्ती कौतुकास्पद.
गिनीपिग असतात जी बिचारी लोकं अशा आश्रमांमध्ये जेल मध्ये राहतात ती सर्व एक प्रकारची गिनीपीग म्हणून वागवली जातात. जेल मध्ये प्रत्येक स्पीरीच्युअल क्लब चे सभासद नेहमी जात असतात. त्यांना मंत्रोच्चार पासुन ते ध्यान प्रवचन सर्व अगदी सर्व गोष्टींचा एकतर्फ़ी मारा केला जातो. त्यांना ते मुळात हवं की नको हा प्रश्न तर दुरच. मुळात तुम्ही अध:पतित आहात आम्ही विसाव्या मजल्यावर आहोत आम्ही स्वार्थत्याग करुन पदरमोड करुन तुमचं कल्याण च करत आहोत जे कळण्याची तुमची पात्रताच नाही. आणि हा सर्व ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहेच. त्यात प्रश्नच नाही. मागे एक छोटीशी बातमी होती इंडियन एक्सप्रेस मध्ये एकेठीकाणी एका कैद्याने एका अशाच शिबीराला फ़ार जोरदार विरोध केलेला. मात्र अशा बातम्या व अस काही क्वचितच बाहेर येत असत. पडद्यामागे अजुन काय होत असेल माहीत नाही. मुळात चोर जेल मध्ये येतो मोजके जातिवंत गुन्हेगार सोडुन द्या बाकी सहसा तो एका चुकीच्या सामाजिक व्यवस्थेचा परीणामच असतो ना . जिथे साधनांची कमतरता विषमता अन्याय आहे जगणं वैध मार्गाने मुष्कील झालेलं त्यानेच तर माणुस गुन्हेगारीकडे वळतो त्या मुळ व्यवस्थेच्या विरोधात काहीच मुलगामी बदल न करता ही वरवरची मलमपट्टी जी मुळात त्या विषम व्यवस्थेलाच पुरक असे काम करते.. जेल ही उस यांची एक आवडती प्रयोगशाळाच असते. स्टाइल वर अण्णाहजारेइश उद्दाम "वुइ ओन्ली नो व्हॉट इज बेटर फ़ॉर हीम ".
अशा अपात्र उस कडुन जे समाजकार्य होते ते अतिउत्साहात नवशिक्या पोहोणारा कसेही हातपाय मारतो त्यासारखे होते. त्यात संबंधितांचे नुकसानही अनेकदा होत असते.एकदा परुळेकरांच्य्या मुलाखतीत एका चांगल्या समाजसेवकाने उस विषयी एक सांगितलेल आठवतय. ते म्हणाले जिथे पुरासारखी आपत्ती येते तिथे सर्वात महत्वाची प्रथम क्रमांकाची गरज असते प्लास्टीकच्या ताडपत्री ची ( त्यांचा अनुभव /अभ्यास आधारीत मत ) पण उस भलत्याच काहीच्या काही वस्तु आणुन टाकतात. हे अपात्रता, अपुरी समज, अपुरे प्रशिक्षण इ. मुळे होत असत. परत आम्ही मदत करतोय म्हणजे मुळात एका वरच्या पातळीला आपसुकच पोहोचतो असा भाव असतो.
उस कमालीचे अहंकारी आणि प्रसिद्धीलोलुप असतात मागे एकदा बाबा आमटे यांच्या संदर्भात एका लहान मुलाचा हात त्यांनी जोपर्यंत फ़ोटो काढला गेला नाही तोपर्यंत घट्ट धरुन ठेवलेला अस एक वाचलेल आठवतय. उस तुमच्या ग्रुप मध्ये बसलेला आहे आणि तुम्ही अगदी कुठलाही अगदी तुम्ही क्रॉकरी या विषयावरही बोलत आहात तरी तो तुम्हाला हळुहळु त्याच्या समाजसेवेच्या विषयाकडे वळवणारचं. तुम्ही कुठुनही चर्चेला सुरुवात केली तरी ते तुम्हाला सोशल वर्कच्या ते करत असलेल्या कार्यापर्यंत आणुन सोडतात. अॅमवे ,चेन मार्केटींग ,विमाएजंट नंतरची ही अत्यंत बोरींग अशी लोक असतात. त्यांच्यात एक तरल अहंकार असतो. ते कायम विसाव्या मजल्यावरुन खाली तुच्छतेने बघत असल्यासारखी बोलतात. सी सॉ च्या खेळामध्ये आपण वरती असतो दुसरा खाली तेव्हा कसा आनंद होतो तसा समाजसेवक कायम वरचढ वरती असहाय पिडीत कायम खालीच या खेळात अहंकाराची फ़ार मोठी तृप्ती होत असते. या ओढीने अनेक इगोइस्टीक्स याकडे मोठ्या उत्साहात वळतात.
लोकांनी उदारतेने दिलेल्या निधी चा गैरवापर करणारे तर समाजसेवेच्या सर्वच पातळीवर काम करणार्यात आढळुन येतात.अगदी प्रख्यात नावे, शहरात काम करणार्या संस्था त्यातलेही गैरवापर करण्यात मागे नसतात. एक स्वानुभवपण आहे सांगण्यासारखा आमच्या कंपनीने एक सीएसआर च्या संबंधित एक फ़ंड समाजकार्य करणार्या संस्थेला द्यायची एक योजना होती. त्याच्या समितीवर माझी नेमणूक इतर काही जणांबरोबर केलेली होती. मी सर्वात अपात्र व्यक्ती कंपनीने बहुधा संख्यापुर्तीसाठी मला निवडलेल होत. तर मी नुसताच बसायचो मला आर्थिक व्यवहारात फ़ारशी गती नाही. आमचे इतर दिग्गज मित्र हाताळायचे आणी मी नुसता एक सोबतीला होतो. एक पर्यावरणसंबंधित उस आमच्याकडे आला. त्याने मला संबोधुन अगोदर त्याची योजना मांडली. तो इतका प्रभावी वक्ता होता मी गुंग होऊन त्याच बोलणं ऐकतच राहीलो.भारावुन गेलो.. त्याच्या प्रत्येक वाक्यावर मी सहमत उत्तेजीत...... मग आमच्या सी.ए. मित्राचा टर्न त्याने अत्यंत कोरडेपणाने उस ला काही कागदपत्रांची विचारणा केली ते त्याच्याकडे नव्हते मग ते घेउन या पुढच्या वेळेस या म्हणुन सी.ए. ने कोरडेपणाने त्याला कटवला. मी चकीत मी त्याला दोस्ताने मे जाब विचारला काय खडुस रे तु किती चांगला माणुस काय सुंदर काम करतोय आपण मदत केली पाहीजे इ.इ. त्यावर तो शांतपणे म्हणाला बघ गंमत आता पुढच्या मीटींग मध्ये.
पुन्हा पुढच्यावेळेस तो कागदपत्रांसहीत हजर आणि मग आमच्या व्यावहारीक चतुर मित्राने जी उलटतपासणी सुरु केली तर त्या उस ला एकही उत्तर धड देण मुष्कील. ... आर्थिक व्यवहारात अत्यंत संशयास्पद काही अनियमीतता होत्या. पुढच्या वेळेस कागदपत्रं आणतो म्हणाला अन काहीसा नाराजीनेच तो निघुन गेला .
आता काही दिवसांनी परत मीटींग तर उस ने एकदम पवित्रा बदललेला..... यावेळेस त्याने ज्या व्हाइट कॉलर अतिशय सोफ़ेस्टीकेटेड शैलीत जशी धमकी आम्हाला दिली ती म्हणजे एक शैलीचा अभ्यासच होता,,,, जर मला डोनेशन नाही मिळालं तर तुमच्या कंपनीच्या पोल्युशन संबंधित अमुक अमुक अनियमितता मी बाहेर काढेन तुम्हाला महागात पडेल वगैरे... तो अनुभव भारीच होता. तो अनुभव मग दुनियादारी च्या फ़ोल्डर मध्ये सेव्ह करुन ठेवला.
मुळात समाजसेवक अस्तित्वात असणं हेच समाजाच्या अधोगतीचं निदर्शक आहे. समाजात काही ना काही न्युन विकृती वाईट आहे ज्याच्या उपायासाठी वा पुर्ति साठी समाजसेवका ची गरज आहे. एक विचार येतो जर समाज खरोखर आदर्श अवस्थेत यदाकदाचित पोहोचलाच तर सर्वात अगोदर बेकारीची कुर्हाड कोणावर कोसळेल ? अर्थातच समाजसेवकावर हे कामच एक मुळात अ-सर्जनशील आहे. चांगल्या आदर्श समाजात जिथे सर्व लोक स्वयंपुर्ण स्वतंत्र सक्षम आहेत तिथे तर माणुस काहीतरी चांगल्या क्रीएटीव्ह कामात वेळ व्यतीत करेल. समाजकार्याची प्रेरणाच कशी एका नकारात्मकतेतुन सुरु होते कुठेतरी कोणी आजारी आहे पतित आहे उपाशी आहे पिडीत कुठेतरी काही घाण आहे न्युन आहे चला आता स्वच्छतेस निघु या.
तर तुमचे काय मत आहे ? याकडे तुम्ही कसे बघता ?
वाचने
14311
वाचनखूण
प्रतिक्रिया
96
मुद्द्यामुद्द्याशी सहमत.
In reply to मुद्द्यामुद्द्याशी सहमत. by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरे आहे हे चिमणराव, याबद्दल
हम्म
'खंउस'
काही साशंकता
In reply to काही साशंकता by माहितगार
छान लेख आहे. पूर्णत: सहमत. पण
आणखी एक शंका म्हणजे, तुमची माझी प्रत्येकाची इच्छा या क्षेत्रात दिसणारी प्रत्येक व्यक्ती आदर्श संतच असावी अशी असते का ? अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे तिही तुमच्या माझ्यासारखी मंडळी आहेत, त्यांनी एखादे छायाचित्र काढून मागितले तर हा अगदीच न पुरवता येण्यासारखा समाजाला न परवडणारा हट्ट नसावा.या एका गोष्टीमुळे बाबांच्या आयुष्यभराच्या समर्पणाची किंमत शून्य होते का? आपलं सगळं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहिलेल्या बाबांवर हां अन्याय नाही का होणार? बाक़ी एनजीओ वाल्यांनी आर्थिक बाबी सुद्धा पाहायला हव्यातच की. त्यांची वृत्ती जरी समाजसेवकाची असली तरी प्रकृती जपन्यासाठी त्यांनाही पैसे लागतातच की. मग समाजकारणा बरोबर ते करण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक बळ उभे कराण्यासाठी थोड़े अर्थकारणही साधले तर बिघडले कुठे?छान माहिती
In reply to छान माहिती by अनिरुद्ध.वैद्य
अनिरुद्ध जी मी त्यासाठी एकदम अयोग्य अपात्र व्यक्ती आहे.
In reply to अनिरुद्ध जी मी त्यासाठी एकदम अयोग्य अपात्र व्यक्ती आहे. by मारवा
धन्यवाद !
उस...
पण तरीही उर्वरीत हा शब्द
In reply to पण तरीही उर्वरीत हा शब्द by सुबोध खरे
अगदी सहमत आहे डॉक्टरसाहेब.
In reply to पण तरीही उर्वरीत हा शब्द by सुबोध खरे
सहमत आहे.सब घोडे 'बारात'के
In reply to सहमत आहे.सब घोडे 'बारात'के by प्रकाश घाटपांडे
टके. टक्के नव्हे.
In reply to पण तरीही उर्वरीत हा शब्द by सुबोध खरे
मारवा साहेब
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
वरील प्रतिसादकर्त्याशी
मस्त लेख. एका वेगळ्या विषयाची
मिसळपाववर हल्ली फारसा येत
In reply to मिसळपाववर हल्ली फारसा येत by नितिन थत्ते
थत्ते साहेब
In reply to थत्ते साहेब by माहितगार
ज्जे ब्बात माहितगारभौ !
In reply to मिसळपाववर हल्ली फारसा येत by नितिन थत्ते
कशा स्वरूपाचे लेख आले
आवडला.
In reply to आवडला. by राही
आपला प्रतिसादही आवडला
In reply to आवडला. by राही
अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत
In reply to अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत by बोका-ए-आझम
+११
समाजसेवा - शिक्षण, डिग्री,
लेखातील बर्याच मुद्द्यांशी
In reply to लेखातील बर्याच मुद्द्यांशी by मनीषा
सहमत
चर्चेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद !
अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे
In reply to अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे by DEADPOOL
सेल्फि काढल्याने माणूस लहान
उस कमालीचे अहंकारी आणि
बाबा आमटेंना आपण आपल्या
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
:)
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
सहमत..
In reply to सहमत.. by संदीप डांगे
तुमच्या अनेक लेखांतून इतर
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
कृष्ण ?
त्यातून अगदी कृष्ण, ज्ञानदेव यांनाही आपण सोडलेले नाहीत.कृष्ण ? मी आजपर्यंत कृष्णावर एकही लेख वा प्रतिसादातही काहीही लिहील्याच मला तरी स्मरत नाहीये. तरी आपण कुठे वाचलं त्याच कुतुहुल वाटल असोIn reply to कृष्ण ? by मारवा
माझ्याकडनं थोडी मदत- स्मरण
In reply to माझ्याकडनं थोडी मदत- स्मरण by असंका
अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य
In reply to अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य by मारवा
का नाही? कधीपण सांगा.
In reply to अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य by मारवा
वरील विधानावर १०० % टक्के
In reply to वरील विधानावर १०० % टक्के by माहितगार
माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे
मारवाजी ते ठिक, कुणी तार्कीक विसंगती दाखवली आणि आपण मोकळेपणाने मत बदलल अशी उदाहरणे असतीलच ना !माहीतगारजी आहेत ना अशी उदाहरणे पुर्वी एकेकाळी मला हीप्पींची क्रांतीकारी स्वरुपाची विचारसरणी फार आवडायची जणु त्यात सर्वंच आलं असं वाटत असे. कालांतराने हळूहळु इतर विचारसरणींचा परीचय अनुभव चिंतन वाद संवाद झाल्यानंतर त्यातील फोलपणाचा त्यातील नकारात्मक बाजु लक्षात आली. मी कुठे चुकत होतो ते लक्षात आलं. आज त्यातील फार थोडा भाग फार सुंदर असा थोडासाच भाग मला महत्वपुर्ण असा वाटतो. बाकी बहुतांश आता पटत नाही. एकेकाळी रुढी कर्मकांड एक निरुपद्रवी रीच्युअल्स आहेत झाल अस वाटायचं याने काय मोठा फरक पडतो. इ. आता त्यामागची श्रुंखला हितसंबंध इ. स्पष्टपणे जाणवतात व ते सर्व इतकं निरुपद्रवी दुरस्थ नसुन आयुष्यावर मुलगामी गहन परीणाम करणारी बाब असते अस लक्षात आलय. त्यामागचा हजारो वर्षांचा प्रभाव कीती आतपर्यंत असतो हे कळल एकेकाळी कम्युनिझम ग्रेट वाटायचा सापडलीच सर्व उत्तर अस वाटायचं आता अजिबात तस वाटत नाही. त्यातल्या असंख्य बकवास बाबी अपुर्णता मुर्खता आता स्वच्छ दिसते. तरीही इतिहासाच्या अन्वेषणा बाबतीतली त्यांची मेथड अजुनही अत्यंत वैज्ञानिक अशीच आहे असे मानतो. बाकी विचार मते आदि बदलत असतात कालची बाद होउन आजची नवी येत असतात. अस होण हेच जिवंत विकसीत होत असल्याच लक्षण आहे असे प्रामाणिकपणे वाटते. इतकच कशाला आत्ता एक विनयकुमार रामचंद्रन या महान न्युरोसायंटीस्ट यांची दोन पुस्तक वाचतोय आणि एक अगदी कालपरवाच देरीदा नावाच्या विचारवंताचा नविन परीचय तुम्ही वाचला असेल शेजारी एक लेख आहे फार चांगला आलेला त्यातुन परीचय झाला त्याच ही थोड थोड घेतलय आता हे दोन्ही फार मोठा नविन विचार देणार अस दिसतय. आतापर्यंतच काय काय मोडुन पडतय माहीत नाही. दुसर तुम्ही म्हणता प्रत्युत्तर एक तर मुळ धागा विषय कोणाचाही असो सहसा मी त्याच्या अवांतर प्रतिसाद देत नाही वाहवतो मीही कधी कधी अवांतर करतो मात्र भान येताक्षणीच तात्काळ थांबतो. आता मुळ लेखक एक भुमिका मांडतो ती त्याच्या लेखातुनच पुरेशी स्पष्ट असावी हे खरय ती मी ठेवतो त्यावर चर्चा अपेक्षीत असते मुळ लेखक एका अवांतर करुन घेऊन गेला तर बाब वेगळी पण ती फिरवुन भलतीकडेच अगदी व्यक्तीगत आणि पुर्ण पुर्वग्रहदुषित पण अगदी चौकटी ताणुनच कोणी मुद्दा फिरवतोय वा चाक रुतवुन ठेवतोय जो अनुभव अनेकदा येतो मग ते चिवडण्यात खरच अर्थ वाटत नाही. आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे जो मी स्वतः विसरुन गेलो तो मुद्दा डोक्यात ठेऊन मग हा आजचा लेख वाचताय हे फ्रेश निष्पक्ष वाचन असु शकत का ? एक प्रतिमा काहीतरी डोक्यात घट्ट आहे अरे हा हा आहे म्हणजे आता अस अस लिहीणार . मी आत्ता वाचल तिथे त्या धाग्यावर एक विस्तृत प्रतिसाद मी दिलेला तिथे ते म्हणता देखील की हो आता कळल मला तुमच म्हणण आता इथे परत तुम्ही कृष्ण ज्ञानेश्वर सोडत नाही ? आता याला काय म्हणाव ? एकतर आपल्याकडे इंडिव्हीज्युअलीझम ची फार धास्ती एकट एकट समोर येतच नाही चार काय म्हणताय अस का तर अस पहीला प्रतिसाद शक्यतो ८० % रीपीट होतो. कॉलींग अमुक कॉलींग मग +१ +१०० आकडीबाज प्रतिसाद विचार काहीच नाही वरचा म्हणाला तो मी असो. सर्वात अर्थहीन काही असेल तर आकडी प्रतिसाद मी जुने लेख वर काढतांना देत होतो फक्त कारण तो एक रेकॉर्ड पटकन सापडावा असा व्हावा यासाठी. चर्चा सघन वन टु वन बेसीस वर डीपर लेव्हल ला जातच नाही सहसा. मुख्य म्हणजे त्याने कोणाचाच काहीच फायदा होत नाही ना लेखकाचा ना वाचकांचा. अमुल्य बॅन्डविड्थ वेस्ट जाते फक्त. असोचIn reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
आपण मनमोकळेपणाने विचार बदलू
In reply to आपण मनमोकळेपणाने विचार बदलू by माहितगार
धन्यवाद माहीतगार जी
दुसरेतर वेळेचा अभाव असल्यामुळे त्रोटक संक्षीप्त संवाद हे सध्याच्या काळाचे सर्वसाधारण लक्षण/संस्कृती असावी ती कुठेतरी आहे तशी स्विकारावी लागते.आहे तशी स्वीकारलेलीच आहे. असो.In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
एकतर आपल्याकडे
In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
सर्वात अर्थहीन काही असेल तर
In reply to सर्वात अर्थहीन काही असेल तर by सुबोध खरे
बाडीस (हे हे, बघा बघा, मी
In reply to माहीतगार जी आहेत ना अशी उदाहरणे by मारवा
आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे
In reply to आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे by असंका
अकौंटट महोदय
कुठलीही लॉजिकल कारणे न देता आपण आपल्या मनाला येइल तसे आरोप करत जाता याची मी उदाहरणे देत आहे.मी त्या राष्ट्रवाद धाग्यावर तुम्हाला एक विस्तृत ७ कलमी प्रतिसाद दिलेला होता. त्यावर तुम्ही मला खालील प्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे. हा तुमचाच प्रतिसाद आहे ना ? की मी चुकीचा टाकलाय ? की मॅनिप्युलेट केलाय ? आता यात तुम्ही म्हणताय आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळल परत ते तुम्ही सारांश रुपाने मांडुन देखील दाखवलय स्पष्ट सहमती देखील दर्शवताय समारोपाच्या शैलीत एक श्लोक ही तुम्हीच दिलाय. आता खरच जर यानंतर तुमची काही शंका शिल्लक होती कृष्ण संदर्भात तर तुम्ही तिथे ती विचारलीच असती. पण तिथे तर तुम्ही काहीच न विचारता समारोप केलेला दिसतोय, धन्यवाद ही दिलेले दिसताय मला, मला कळलय देखील म्हणता मुद्देसुद ही म्हणताय. हे सर्व झाल्यावर आज पुन्हा आता परत वरील तेच सर्व प्रश्न तुम्ही अगदी मी त्या गावचाच नाही अशा शैलीत व जणु आपला हा संवाद झालेलाच नाही अशा इनोसंटली नव्याने विचारताय ज्यावर तुम्ही खालील प्रतिसाद दिलाय ? मग ज्ञानेश्वर हा उल्लेख तुम्ही करता तिथे तर या वेळेस मी बघितल मला तुमचा त्या धाग्यावर एकही प्रश्न प्रतिसाद दिसला नाही आता परत मदत मागतो तुमची तिथे ज्ञानेश्वरी वर तुम्ही मला कोणता प्रतिसाद दिलेला कोणता प्रश्न विचारलेला कृपया निदर्शनास आणावे असेल तर. नाही तर विचारावा पुन्हा नव्यानेच मला तरी दिसला नाही. इथे मात्र आवर्जुन तुम्ही उल्लेख केलात यात खरोखरच काहीच विसंगती तुम्हास दिसत नाही काय ? मग मला तुमचा प्रश्न अप्रामाणिक, सीरीयसली न विचारलेला मान्य करुन पुन्हा अमान्य करणारा, दांंभिक वाटला किंवा तुम्हाला विचारांशी खरोखर काही अगत्य आहे का अशी शंका वाटली तर ती गैर कशी ? इथे तुम्ही ज्या इनोसंटली प्रश्न विचारता तो इनोसन्स मला दांभिक वाटला तर ते गैर कसे ?आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळलं. मला आपलं म्हणणं असं आहे असं वाटतं- १. एकसंध मानवसमाज हे आपले दीर्घकालीन उद्दीष्ट/स्वप्न हवे. त्यात राष्ट्र ही संकल्पना हा एक अडथळा आहे/ठरेल. मूळात राष्ट्र ह्या संकल्पनेत काहीही दैवी नसल्याने त्याविरुद्ध जाणे हे शक्य आहे. तसेच त्या संकल्पनेत निसर्गाच्या नियमांचा काहीही सहभाग नसल्याने, ही संकल्पना जेव्हा मानवसमाज सोडेल, तेव्हा ते अनैसर्गिक असणार नाही. २. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सद्ध्याच्या व्यवस्थेतील तोटे/दोष यांची यादी आपण दिली आहे. हा लेख चांगला मुद्देसूद आणि भावनांना कमीत कमी उत्तेजित करणारा असा होता. सारांश : अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम| उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम...|| (बघा आम्ही भारतीय किती श्रेष्ठ- पूर्वीपासूनच हेच सांगत नव्हतो? ;-) ) (या दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!)In reply to अकौंटट महोदय by मारवा
बाबा आमटेंचा विषय चालू होता.
In reply to बाबा आमटेंचा विषय चालू होता. by असंका
खुलासा:
In reply to अकौंटट महोदय धन्यवाद मान्य आहे माझच विधान आहे १०० % मान्य by मारवा
इतके चांगले ट्रॅक ठेवणारे
In reply to बाबा आमटेंना आपण आपल्या by असंका
+१
In reply to +१ by नाव आडनाव
+१
मारवा,
लेख वाचायला घेतला आणि बंग /
खरे तर सरकार कडे इतका प्रचंड
१. समाजसेवक पेड असतात.
In reply to १. समाजसेवक पेड असतात. by नितिन थत्ते
बर मग ?
In reply to बर मग ? by सुबोध खरे
ते काय म्हणतात तिकडे काही
In reply to ते काय म्हणतात तिकडे काही by नितिन थत्ते
अच्छा
In reply to अच्छा by सुबोध खरे
म्हणजे ओके कि टाटा!
अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी
In reply to अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी by चिनार
चिनार, अण्णा हजारे सैन्यातून
In reply to चिनार, अण्णा हजारे सैन्यातून by माहितगार
माहीतगारजी काही आक्षेप आहेत
In reply to माहीतगारजी काही आक्षेप आहेत by मारवा
एका व्यक्तीला दारु पिणे हा
In reply to एका व्यक्तीला दारु पिणे हा by सुबोध खरे
जाता जाता --आपले सर्व मुद्दे
In reply to जाता जाता --आपले सर्व मुद्दे by सुबोध खरे
सुबोध जी
In reply to सुबोध जी by मारवा
मारवा साहेब,
In reply to मारवा साहेब, by सुबोध खरे
जाऊ द्या डाॅक! त्यांना फक्त
In reply to माहीतगारजी काही आक्षेप आहेत by मारवा
अण्णा हजारेंच्या बाबतीत
In reply to अण्णा हजारेंच्या बाबतीत by माहितगार
माहीतगारजी
तुम्ही वरून कायदा काय लादू इच्छिता हे मला एक समाजसेवक म्हणून मी काळजी करणार नाही मी कायदा मला हवा तसा घडेल हेच बघेन. वेळ प्रसंगी त्यासाठी कायदा हातात घ्यावा लागला तरीही.वरील मत आश्चर्यजनक वाटले म्हणुन काही चुकत तर नाही ना यासाठी परत एकदा विचारतो तुमच्या वरील मतावर तुम्ही पुर्णपणे नक्कीच ठाम आहात का ? तुम्हाला जो ध्वनित होत आहे तोच अर्थ अपेक्षीत आहे का ?हे खरे आहे
"Drunkards" who broke the ban on alcohol were brought to the village square, tied to a telegraph pole covered with barbed wire and personally whipped by Mr Hazare with his canvas army belt."There were 40 liquor units working. Some stopped on advice and some did not listen to him. So the youths went and destroyed the units. They were tied against the pole and were beaten by Anna Hazare personally. It happened to about ten to 15 people," he said. He told aides only he could administer the beatings because only those who, like him, had served the people "like a mother" had the right to punish them. Those thrashed by Mr Hazare eventually came to worship him, said Mr Raut. "When they went to the temple, they prayed first to Annaji and then to God," he said. Mr Hazare has admitted the punishments in earlier interviews.In reply to हे खरे आहे by मारवा
टाइम्स ऑफ इंडिया चा संदर्भ
माझा मागचा प्रश्न आपण
लेख रोचक आहे. उर्वरीत सगळेच
बाबा आमटे
In reply to बाबा आमटे by तिमा
एक लक्षात घेतले पाहिजे की
In reply to एक लक्षात घेतले पाहिजे की by मृत्युन्जय
+१
In reply to एक लक्षात घेतले पाहिजे की by मृत्युन्जय
तिमाजींचे स्नेही कुठे कमी पडले असावे बरे ?
In reply to तिमाजींचे स्नेही कुठे कमी पडले असावे बरे ? by मारवा
मारवा साहेब
In reply to मारवा साहेब by सुबोध खरे
सुबोध जी
In reply to सुबोध जी by मारवा
जाऊ द्या हो मारवा साहेब
In reply to जाऊ द्या हो मारवा साहेब by सुबोध खरे
सुबोध जी धन्यवाद !
In reply to जाऊ द्या हो मारवा साहेब by सुबोध खरे
खिक्क! सुबोधजी चांगली लगावलीत
In reply to खिक्क! सुबोधजी चांगली लगावलीत by मांत्रिक
श्री. मांत्रिक यांचा या धाग्याला दिलेला प्रथम प्रतिसाद
In reply to श्री. मांत्रिक यांचा या धाग्याला दिलेला प्रथम प्रतिसाद by मारवा
मला वाटतं, तुमच्या
In reply to श्री. मांत्रिक यांचा या धाग्याला दिलेला प्रथम प्रतिसाद by मारवा
मारवा साहेब, वाचकांचे
In reply to सुबोध जी by मारवा
मी जरा घाईगडबडीच्या विरोधी
In reply to मी जरा घाईगडबडीच्या विरोधी by असंका
अकौंटट जी तुम्ही अजुनही घाइ करत आहात
हा लेख प्रकाशित करायची घाईगडबड कुणी केली होती? वाचकांनी? तुम्हीच गडबडीने लेख प्रकाशित केलात वर आता तुम्हीच वाचकांना सांगताय की मी घाईगडबडीच्या विरोधात आहे?अकौटंट जी मी सुबोधजींना केवळ जो प्रतिसाद दिलाय नीट वाचा पुन्हा एकदा त्यात मी वाचकांना काहीही सांगितलेल नाही. तुम्ही वरील प्रतिसाद नीट वाचा परत एकदा शांतपणे. तो घाइगडबडीचा उल्लेख कशा संदर्भात आहे समजुन घ्या. सुबोधजींना माझी आर्ग्युमेंट ची जी शैली आहे त्यावीषयी केवळ ते विधान आहे. हा मी त्यांच्याशी संवाद साधत होतो. त्यात क्रमाने मुद्दे मांडत होतो त्या संदर्भात आपण ( मी व सुबोध जी ) एक एक करुन पुढे सरकु या यात आपल्या चर्चेत ( मी व सुबोध जी ) घाइगडबड नको इ.In reply to अकौंटट जी तुम्ही अजुनही घाइ करत आहात by मारवा
तुमचं वाक्य विचारांच्या
In reply to तिमाजींचे स्नेही कुठे कमी पडले असावे बरे ? by मारवा
एक व्यक्ती जिचा स्वतःचा या
सहज आठवले:
या उस चा त्रास डॉक्टर
खीक
दांभिक लेखाकाचा दांभिक लेख!