Skip to main content

विव्हळतं तळ...

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 24/12/2008 00:36 या दिवशी प्रकाशित केले.

विव्हळतं तळ...
==================
.
.
नखातली डोक्यात..
झणझण जाते कळ...!
डोळ्यातलं ओठात..
विव्हळतं तळ...!
.
टीप टीप वेदनेत..
कट्यारीची धार...!
थेंब थेंब ओघळात..
तेजाब आर-पार...!
.
फसफस जाळत..
खोल खोल जाते घळ...!
भसभस उफाळत..
रसरसता ये जाळ...!
.
.
==================
स्वाती फडणीस..... २३-१२-२००८

लेखनविषय:

वाचने 1344
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया