दौलतजादा
सरपटत येणाऱ्या हुंदक्यांचे
नाक चोंदुन पायबंध घालताना
फोडणीच्या भातावर
लिंबु पिळुन खाताना
तुळशीपत्राचे वृंदावन
लाथेने उडवताना
डबल बॅरल काढुन
रानडुक्कर टिपताना
मरतुकड्या बामणाला
दगड फेकुन घालताना
विसरु नकोस
हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय
अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन
रुळलेली वाट वाकडी करताना
°°°°°°°°°°°
थरारनाट्याचा दुसरा अंक लिहीला जातो
निसरड्या बाहुपाशात श्वास गुदमरुन जातो
समुद्राची भिती काळजात घुसत जाते
बेफिकीर वटवाघुळ केविलवाणे तडफडतं
जेव्हा कुठुणशी एक कुणकुण कानावर येते
आणि आता ही तलवार सरकन मागे फिरवताना
विसरु नकोस
हा दौलतजादा तुझ्या बापजाद्यानं कमावलाय
अंधारवाड्यातील भयकिंकाळ्या ऐकुन
रुळलेली वाट वाकडी करताना
गूढ लिहिलंय राव!
जव्हेर भौ
धन्यवाद संदिप, बाबाजी!