आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे...
कधी रीकामं पाहिलच नाही, त्यात मध्येच १जण असा यायचा जो नंबर लाउन गेलेला असायचा, अजुन चीडचीड, असो, जुनी गाणी ठीक लागली/लावली तर ठीक, पण ९०ची कुमार शानू हिट्स लागले/लावले की माझं डोकं फीरायचं/फीरतं! मग वेळ जायचा पोस्टर्स पाहण्यात, वेगवेगळ्या फालतू चेहर्यांचा मस्तकावरचे विविध ढंगाच्या चित्रविचित्र केश-रंजना, बापरे विचारू नका, असले आउट ऑफ़ घीस वर्ल्ड वाले कट्स! त्यांकडे बघुन झालं की मग निरनीराळ्या तेलाच्या, क्रीमांच्या... बाटल्या! तिथून नजर जायची, अरश्याकडे... ते अरश्यासमोर आरसा आणि त्यातले इंफीनाइट प्रतिबिंब... १० तुम्ही आणि बाकीचे १०... डोळे आणि डोकं गरगरायचया आत मी दुसरीकडे बघणार तर कोणीतरी काखेचा खजाना दाखवत डोके वर करुन उभा... मग ते बघुन न बघितल्या सारखं करत 'माझा नंबर कधी येणार!?' ह्याची खात्री करण्यासाठी विचारायचं... की तो बोलणार 'बसा की निवांत काय घाई!?' इतक्या आरामत ते केस कापणं चालू असतं काही विचारू नका... जसं काही हां त्याच्या आयुष्यातला शेवटचा 'कष्टम्बर' आहे!
असो... माझी वेळ आली बसायची की, ठरल्याप्रमाणे मी संगायचो, मागे स्लोप, लाइन नको... बाकी मिडियम, मग मान वर खली अड्जस्ट वगैरे करून, अंगावर ते काळं नीळं कपड़ं पांघरून, जी काही स्टीरियो कचकच सुरु व्हायची, माझे डोळे बंद, अजुबाजुला काय घडतय ह्याचा विसर पडायचा, पण तो कुमार शानू डब्डं(शौचालयातलं) घेऊन अखंड गायचा (गायचा!?) ह्याचा अतीप्रचंड त्रास होऊन मी 'त्याला वाइट वाटू दे' ह्या पातळी वर येऊन गाणं बदलवायला भाग पाडायचो! आणि ह्या सर्व प्रसंगात बाजुचा माणूस केस कापून घेत असताना घोरतांना पाहिलय मी, बाकीचे इकडे बघ तिकडे बघ, सगळी कड़े बघुन झालं की मग स्वतःकड़े बघ! मग तो उस्तरा घेऊन यायचा. ब्लेड चेंज, मग कानावरचे केस उडवत आणि कल्ले तोडत अखेरचा टप्पा, मालिश, कट काट कूट, डोळे तीरळे, एक पंखा दसऱ्यात घुसल्याचा जादूप्रयोग व्हायचा, महाभारतातला तो खुप अवतरांमधला सीन दीसायचा (कारण पंख्याच्या खालेच्याच् बाजूला होती ती फ्रेम)
ते सुखदायक रणांगण सोडून त्या सिंहासनावरून रजा घेताना जड़ अतःकरणाने हा जीव बाहेरच्या जगात पाउल टाकायचा, तो कुमार शानू सोडला तर बैस्ट होता आमचा 'बार्बर'
#सशुश्रीके
#सशुश्रीके
वाचने
6544
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाव वाचून बसणे या क्रियापदाशी
शीर्षक वाचून,
In reply to नाव वाचून बसणे या क्रियापदाशी by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to शीर्षक वाचून, by पगला गजोधर
नकुल आणि सहदेव मधे धाकटा कोण?
In reply to शीर्षक वाचून, by पगला गजोधर
हेटाळणी आवडली नाही
In reply to शीर्षक वाचून, by पगला गजोधर
वा काय विषय आहे धाग्याचा
दादा
In reply to वा काय विषय आहे धाग्याचा by दिपक.कुवेत
हे तुम्हाला कसे म्हैत =))
In reply to दादा by नाखु
त्ये
In reply to हे तुम्हाला कसे म्हैत =)) by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to त्ये by नाखु
कठिण कठिण कठिण किती
अरे कुठं नेवून ठेवलाय मिपा
आत घुसलो की आधीच ३-४जण असायचे
रोशनी
वाटलच होतं मला
पुरावा द्या
In reply to वाटलच होतं मला by जातवेद
हातच्या धाग्याला पुरावा कशाला
In reply to पुरावा द्या by टवाळ कार्टा
वाट्लेच होते...पुरावा द्या
In reply to हातच्या धाग्याला पुरावा कशाला by जातवेद
"कस्सा राव थांबू" ची अठवण
केतकरा ओळखलेस का रे?
बाबौ .
नंतर मी पुण्यात शिफ्ट झालो
पुण्यात शनिवार वाड्यावर जाता
In reply to नंतर मी पुण्यात शिफ्ट झालो by ज्ञानोबाचे पैजार
मला वाटलं कोणालातरी
हसून मेलो
फोटो झॅक आलाय बरका!!!!
'हजामत' हे शीर्षक कसं वाटतंय?
जातीवाचक धागा.....!
कुमार शानू डब्डं(शौचालयातलं)