Skip to main content

पॅरिस हल्ला

लेखक DEADPOOL यांनी रविवार, 15/11/2015 09:58 या दिवशी प्रकाशित केले.
चार्ली हेब्दो हल्ला ही फक्त सूचना होती! १३ तारीख ही फ्रांस च्या इतिहासातील सर्वात काळी तारीख म्हणून मानली जाईल. २००च्या वर म्रुत्यू आणि अनेक जखमी. 'धिस टाइम इट्स वार!' भारतावर सुद्धा असा हल्ला होऊ शकतो. क्रुपया आपले मत मांडा.

वाचने 33671
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

In reply to by प्रदीप

प्रदिपजी, चर्चेबद्दल धन्यवाद! तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांशी सहमत आहे. तुम्ही आता जे म्हटलंय की "जशा बातम्या येत आहेत त्यावरून पासपोर्टबद्दल ठामपणे काही म्हणता येत नाही" ते आता हळू हळू बातम्या दुसर्‍या-तिसर्‍या पानावर गेल्यानंतर येतात. पण हल्ल्याच्या दिवशी ठळक अक्षरात जिकडे तिकडे पहिल्या पानावर सिरिअन पास्पोर्ट सापडल्याची बातमी मोठ्या जनसमुदायावर मोठा मानसशास्त्रिय परिणाम करणारी असते. आता तो पासपोर्ट आणी त्याची खरी कथा हळू हळु मागे पडून जाईल. पण हा परिणाम पुसल्याजात नाही. वर्तमानपत्रे 'मालकांच्या आदेशानुसार' बरंच काही छापतात. त्याबद्दल हा मुद्दा होता.

In reply to by संदीप डांगे

वर्तमानपत्रे 'मालकांच्या आदेशानुसार' बरंच काही छापतात. त्याबद्दल हा मुद्दा होता. अगदी डाव्या विचारसरणीच्या, आणि ज्यांना माझ्यासारखे काहीजण 'ब्लीडींग हार्ट्स' म्हणतात, अशा वर्तमानपत्रांनीही तो उल्लेख तसाच केला होता. मला वाटते (नक्की ठाऊक नाही, पाहिलेले नाही, एक शक्यता केवळ) त्या सर्वांनी तो उल्लेख एकाद्या न्यूज एजन्सीने प्रसृत केलेल्या बातमीवरून केलेला असावा.

जेव्हा मुम्बई वर हल्ला झाला होता, तेव्हा एकही पश्चिमी देशाने पाकिस्तानवर कड़क कारवाईची मागणी केली नव्हती. यांचा दुटप्पीपणाच आज यांना घातक ठरतोय

In reply to by DEADPOOL

जेव्हा मुम्बई वर हल्ला झाला होता, तेव्हा एकही पश्चिमी देशाने पाकिस्तानवर कड़क कारवाईची मागणी केली नव्हती. यांचा दुटप्पीपणाच आज यांना घातक ठरतोय
हल्ला भारतावर झाला ना, मग भारतानी काय ती कारवाई करायला हवी होती. पश्चिमी देश कशाला काही करतील. उलट ते म्हणत असतील की भारताला च काही करायचे नाही तर आम्ही तरी कशाला काही करु?

इथे आपण अमेरिका , युरोप , इस्रैल ची राजकीय धोरणं ह्यांची फ्रांस च्या हल्ल्याच्या अनुषंगाने चर्चा करतोय पण खुद्द इसीस ने ह्या हल्ल्याचं जे कारण सांगितलं त्यावर कोणीच बोलत नाहीये . "व्याभिचार्यांचा खात्मा " हे कारण त्यांनी दिलेलं आहे . कुरण , हदीस , शरियत चे नियम न पाळणार्यांना इस्लाम विरोधी समजलं जातं. व्यभिचारी समजलं जातं .त्याप्रमाणे न वागणार्यांना शिरच्छेद , हातपाय तोडणे , बलात्कार अश्या शिक्षा दिल्या जातात . म्हणून तर थोडी चूक झाली तर आपल्याच मुस्लिम बांधवांना हे लोक संपवत आहेत . आणि मुक्त जीवन जगणार्यांना नास्तिक , व्यभिचारी समजून त्यांच्यावर हल्ले होतायेत .
अल्पसंख्यकाना वाइट वाटेल म्हणून ही ऑफर नाकारण्यात आली.
हेच तर दुर्दैव आहे ह्या देशाचं. अल्पसंख्यकाना काय आवडत काय नाही ह्याची किती काळजी घेतली जाते . तरी असहिष्णुता म्हणून बोंबा चालूच आहेत . आता बहुसंख्यांकांनी ह्यांच्या घरचं धुनी भांडी करावं अशी अपेक्षा असावी . मला तरी वाटतं भारताला इसीस चा धोका एवढ्या लवकर नाहीये . पण तरीही जम्मू काश्मीर मध्ये मधून मधून फडकणारे इसीस चे झेंडे बघता धोक्याची शक्यता नाकारता येत नाह. इस्राइल बद्दल बोलायचं झाल्यास इस्रैल आणि प्यालेस्टीन ची निर्मिती एकाच वेळी झाली आहे . पण आज इस्राइल कुठल्या कुठे गेलं आहे आणि प्यालेस्टीन कुठ आहे . भारत पाक ची निर्मिती सुधा एकाच वेळी झाली . पण आज भारताने पाक च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रगती केली आहे . आणि पाक भारताचा शेजारी नसता तर आपण सुधा बरेच पुढे गेलो असतो . असो . ज्यूंवर ख्रिश्चन , मुस्लिम आणि रोमनांनी खूप अत्याचार केलेत . पण मुस्लिम सोडून इतरांनी इतिहासाला मागे टाकून स्वताही प्रगती केली आणि दुसर्यालाही करू दिली . ज्यू असो किवा पारशी किवा शीख ,भारतीयांनी कधीही इतर धर्मियांवर अन्याय केला नाही. ज्यांनी ज्यांनी वाईट काळामध्ये आश्रय मागितला अश्यांना सामावून घेतलंय.

In reply to by तुडतुडी

पण आज भारताने पाक च्या तुलनेत कितीतरी अधिक प्रगती केली आहे असा म्हणू नका ! पिछले ६० साल मे क्या किया ? असा विचारत जगभर हिंडणारे तोंडघशी पडतील

अमेरिकन असल्याचे (असला म्हणजे गोळा बारूद) चे ब्लॅक मार्केटिंग ह्याचा रस्ता सेंट्रल अन साउथ अमेरिकन ड्रग कार्टेल्स थ्रू किंवा अलास्का थ्रू असतो >>> हे नीटसे कळले नाहि. अमेरिकन अस्त्रे काळ्या बाजारात कशी पोहचतात? कुठल्याही सस्त्रात्रे बनवणार्याला त्यान्चे ऑडिट देणे बन्धन कारक असेल ना. म्हणजे अमेरिकन कम्पनीने बनवले तर त्या कम्पनीला अमेरिकन सरकारला सान्गावे लागत असेल ना अमुक इतके बनवलेत, इतके विकलेत इतके स्टॉक मध्ये आहेत वगैरे. मग काळ्या बाजारात कशी पोहचतात ही शस्त्रे? सरकारच्या छुप्या पाठिम्ब्याने का? जेन्युइन ली प्रश्न पडलाय. प्लीज जरा विस्ताराने सांगणार का सोन्याबापु?

In reply to by कालिंदी

जसे धीरूभाई एका मील मधे ४ मशीन्स आहेत असं दाखवून ८ मशीन्स लाऊन कापड विकायचे, मशीन आणतानाची ड्यूटी टाळण्यासाठी स्पेअर पार्ट्स आणून अख्खी मशीन इथे उभी करायचे त्यातलाच हा प्रकार.

In reply to by आदिजोशी

जसे धीरूभाई एका मील मधे ४ मशीन्स आहेत असं दाखवून ८ मशीन्स लाऊन कापड विकायचे, मशीन आणतानाची ड्यूटी टाळण्यासाठी स्पेअर पार्ट्स आणून अख्खी मशीन इथे उभी करायचे त्यातलाच हा प्रकार. >>>>>>>१

मला खरच धाग्याचि प्रस्तावना नीट जमली नव्हती. परंतु येथील माहितीत भर टाकणारे प्रतिसाद बघून धागा काढला याचे समाधान वाटते!

१००

In reply to by बॅटमॅन

हो पहिलाच धागा १००री पार. मनःपूर्वक आभार!

त्यांनी जरी उद्युक्त केलं, शस्त्रास्त्र पुरवली तरी शेवटी हत्याकांड करणाऱ्या लोकांची जबाबदारी कमी होत नाही. शेवटी हत्याकांड करणं न करणं हे त्यांच्याच हातात आहे. का स्वतःहून बळीचे बकरे बनत आहेत? यांच्या कथित नेत्यांना किंवा त्यांच्या धर्मातील बाकी लोकांना बाकीचे देश कसे यांना दहशतवादासाठी प्रवृत्त करत आहेत हे सांगता येईल, तसं कोणीच काही सांगत नाही. ज्यू लोक या सगळ्याच्या मागे आहेत हे जर अतीच होतंय. याचा दुसरा अर्थ असा पण होतो की अमेरिका, युरोप, रशिया ई सर्व देश ज्यूंच्या सांगण्यावर चालतात. आयसीसने इस्रायल वर हल्ला करण्यामागे भीती हे पण कारण असू शकेल. इस्रायलचं आत्तापर्यंतची कीर्ती अशी आहे की ते एखाद्याच्या मागे लागले तर समूळ नायनाट करतात.

In reply to by ट्रेड मार्क

वेस्ट बँक अन गाज़ा प्रश्न का भिजत पडला मग? तिकड़े का नाही होऊ शकला समूळ नायनाट वगैरे ?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हे आहे बापू की वेस्ट बँकमध्ये फताह (Fatah) ची सत्ता आहे आणि गाझामध्ये हमास (Hamas) ची. फताहने इझराईलला मान्यता दिलेली आहे (जी अजून इजिप्त सोडला तर कुठल्याही अरब देशाने दिलेली नाही.) हमास इझराईलला मानत नाही आणि मानायला तयार नाही. इझराईलच्या लेखी हमास ही दहशतवादी संघटना आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियन यांनीही जोपर्यंत हमास इझराईलला स्वीकारत नाही तोपर्यंत हमासला दहशतवादी संघटना मानायचं असं ठरवलेलं आहे. नकाशा

In reply to by बोका-ए-आझम

जी अजून इजिप्त सोडला तर कुठल्याही अरब देशाने दिलेली नाही.
जॉर्डननेही इस्राएलला मान्यता दिली आहे. १९९३ मध्ये इस्राएल आणि पॅलेस्टाईन यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये शांतीकरारावर सह्या झाल्यानंतर १९९४ मध्ये जॉर्डननेही इस्राएलला मान्यता दिली होती.

In reply to by गॅरी ट्रुमन

जाॅर्डनचं माहित नव्हतं. पण माझ्यामते इझराईलची वकिलात आणि दूतावास (Consulate and Embassy )असलेला इजिप्त हा एकमेव अरब देश आहे. जाॅर्डनमध्ये अजून इझराईलचं राजनैतिक मिशन नाहीये. चूभूद्याघ्या.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दहशतवादी हल्ला आणि गाझा/ वेस्ट बँक हे दोन्ही पूर्णतः वेगळे आहेत हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे का? माझ्या समजूतीप्रमाणे (अकादमी वाचल्यामुळे) तुम्ही सैन्यात आहात त्यामुळे तुम्हाला या सगळ्याबद्दल जास्त माहिती असावी असं मला वाटतं. बाकी सगळा प्रतिसाद सोडून फक्त शेवटच्या वाक्यावर टिपण्णी झाली. याचा अर्थ तुम्ही माझ्या उर्वरित मताशी सहमत आहात असं वाटतंय.

In reply to by ट्रेड मार्क

अहो मला जेन्युइन प्रश्न होता ते विचारले मी (क्रॉस चेक करुन खुटा बळकट करण्याची घाण सवय समजा)त्याशिवाय काही बाकी मोटिव नाही कारण जे कळत नाही त्यात जाणून घेऊन बदल करण्यात मला काहीच कमीपणा नाही अन तसेही तुमच्या बाकी मुद्द्यांबद्दल काहीच म्हणणे नाहीये :)

च्यामारी १५० भी पार!!!!!!! होऊ द्या खर्च !!!!!

Pak-origin couple blamed for X'mas party shooting in at least 14 people were killed and 17 others injured today when a heavily-armed young Pakistani-origin couple opened indiscriminate fire during a Christmas party at a centre for people with disabilities in California, the deadliest shooting in the US since 2012. PTI

In reply to by DEADPOOL

ह्या लोकांच्या मनात आहे तरी काय? हेच कळत नाही.