ना गावही तो राहिला ठाम पहिल्यासारखा
ना काळही भासे अता उद्दाम पहिल्यासारखा
त्या वादळाला सांग ना थांबायला आता जरा
प्रगतीस नाही वेग तो बेफाम पहिल्यासारखा
आता पुन्हा मिरवेन मी बुरखा जुना, समजा जुन्या
नाही जमाना राहिला बदनाम पहिल्यासारखा
झालो अता बघ मोकळा वागायला मजसारखा
ना राहिलो माझ्यात मी सुतराम पहिल्यासारखा
जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो
भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा
विशाल
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4104
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास
आता पुन्हा मिरवेन मी बुरखा
'समज' म्हटले असते तर 'जुने'
In reply to आता पुन्हा मिरवेन मी बुरखा by एस
अगदी बरोबर शिव कन्या !
In reply to 'समज' म्हटले असते तर 'जुने' by शिव कन्या
धन्यवाद एस. मला असे वाटतेय की
In reply to आता पुन्हा मिरवेन मी बुरखा by एस
एक समज
In reply to धन्यवाद एस. मला असे वाटतेय की by विशाल कुलकर्णी
वाह्ह...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahiraवा!
मख्खन में गर्म छुरी जमले आहे
छान गझल
वा!!!
धन्यवाद मंडळी _/\_
व्वा रे वाह
अरे वा! मस्तच!
बहोत अच्छे।
सुरेख!
धन्यवाद मंडळी
कालगंगा वृत्ताआधी एक गुरु जास्त आहे.