Skip to main content

मंत्रसामर्थ्य

लेखक यनावाला यांनी शनिवार, 14/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे. आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही. ** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?. **थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही. **" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते. अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:-
:--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।"
लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:-
:---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।"
असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे. अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल." असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।"
हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. .......................................................................................

वाचने 142547
प्रतिक्रिया 233

प्रतिक्रिया

१९७० च्या आसपासची गोष्ट,मंत्रोचारानं अग्नि निर्माण करतो,हा एकाचा दावा. (पुणे सोडून हे अन्यत्र कुठे असणार ?)त्यानी होम कुंडं प्रत्यक्षात पेटवून दाखवली.नियत कालीकं याला जबरदस्त प्रसिध्दि देत.श्री साप्ताहिक व त्यातले अरुण ताम्हणकर हे हिरीरीनं कव्हर करीत.उलट सूलट चर्चा वेदात हे कसं तपशीलवार आहे पासून त्या ग्रुहस्थाचं उच्चारण कसं सदोष आहे, पासून ही भंपकगिरी आहे पर्यंत सर्व कांही.हे चर्चा चर्वण अनेक दिवस चालू होतं.अनेक अतिरथी महारथी त्यात उतरले होते. आणि शेवटी त्याचा फुगा असा फुटला कि मंत्रोचारण वगैरे सर्व बकवास होतं,होमात समिधा वगैरे जे कांही ते महाशय टाकायचे त्यात फॉस्फरस असं काही होतं,आणि त्या महाशयाना याचं तपशीलवार ज्ञान होतं कारणं ते पूर्वी विम्को(काड्यापेटी)कंपनीत कामाला होते. अशा तर्हेने मंत्रोचारणानं कधीच न पेटलोला तो अग्नि शामक दलाशिवायच विझला. त्यात दरम्यान अहमदनगरला मंत्रोचारणानं पाऊस पाडतो असा दावा केला होता. आणि या लोकांचं नशीब असं बलवत्तर कि त्या पावसाचे चार शिंतोडे पडलेहि होते पण खरतर बिरबलाच्या खिचडी पकवण्याचा तो प्रकार होता.जमिनीवर चार काड्या पेटवून तोंडातल्या तोडांत कांहीं पुटपुटून वरून जर पाऊस पाडता आला असता तर आणखी काय पाहिजे होतं?

दिवाकर कुलकर्णी, फॉस्फोरस की काहीतरी म्हणजे नक्की काय? कुठला ज्वालाग्राही पदार्थ वापरलेला? आणि तो प्रतिपक्षाच्या नजरेतून सुटलाच कसा? तुम्हाला इथे प.वि.वर्तकांचा प्रयोग अभिप्रेत होता का? पण त्यावेळी अग्नीकुंडासाठी लागणारी सर्व सामुग्री पूर्वपक्षाने प्रतिपक्षाद्वारे कुंडवर्तुळात पाठवायची अशी अट पाळली होती. आ.न., -गा.पै.

वालावकर सेठ, लेख आवडला. आपण जितके शिकू तितके अधिक अंश्रद्धाळु होऊ असे वाटते. शिक्षणाने विवेक जागृत व्हावा पण ते दिसत नाही. आपला लेख आवडलाच, साती, मारवा यांचे प्रतिसादही आवडले. काथ्याकुट आणि वाद वाचायला मजा आली. यनावालासेठ लिहित राहा. -दिलीप बिरुटे

** तानसेन का अजून कोणी महान गायक मेघमल्हार गाऊन पाऊस पडायचा म्हणे. आधुनिक कृत्रिम पाऊस यंत्रणाची काय गरज म्हणतो. मी !

लेख आवडला. बरेच जणांनी तावातावाने लेख शेवटापर्यत वाचायचे कष्ट घेतलेले नाहीत की काय असं प्रतिक्रिया बघून वाटले कारण ...
सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे
. असं म्हटलय.

अस्स सगळं झालं तर!

निबंध ठाकठीक आहे. काही नवं दिसलंं नाही. त्यामुळे यात शंभर प्रतिसाद चर्चा करण्याजोगं काय आहे हे मात्र समजलं नाही. असो.

In reply to by आतिवास

सौ सुनारकी और एक अतिवास की !

श्री.भाऊंचे भाऊ यांनी प्रश्न विचारला अहे, "वैज्ञानिक सत्य म्हणजे काय ?" या प्रश्नाचे माझ्या (समजुतीप्रमाणे) उत्तर:-- ..या विश्वाचे नियमन निसर्गनियमांनुसार होते. ते नियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे. वैज्ञानिकांनी अनेक निसर्गनियम शोधले आहेत. त्या नियमांची सत्यता तपासली आहे. त्या नियमांवर आधारित तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याने मानवी जीवन अधिक सुखसुविधापूर्ण आणि सुरक्षित झाले आहे. *चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. ते कोणालाही कालत्रयीं शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. समजा एका मोकळ्या मैदानावर उभे राहून हाताने एक चेंडू उंच फेकला. तर थोड्या वेळाने तो चेंडू खाली येऊन पडेल. हे वैज्ञानिक सत्य आहे. चेंडू खाली पडू नये म्हणून कितीही मंत्र म्हटले, मैदानावर यज्ञकुंडे रचून होम-हवन केले, इंद्राची स्तुती केली, "हे इंद्रा तू सर्वशक्तिमान आहेस. ऊर्ध्वदिशेने प्रक्षेपित केलेल्या या कंदुकाचे अधांतरी स्तंभन करण्यास केवळ तूच समर्थ आहेस. तरी त्याचे अध:पतन होणार नाही असे कर. तुला अतिप्रिय असलेल्या सोमरसाचे आम्ही हवन करतो."अशा अर्थाचे कितीही ऋचागायन केले तरी चेंडू खाली पडणारच. हे वैज्ञानिक सत्य आहे. (एक गरुडपक्षी उडत आला.चोचीत चेंडू घेऊन गेला. असल्या कल्पना लढवू नयेत. तो चेंडू हवेत तरंगत आहे असे दिसले पाहिजे.) *अपारदर्शक कागदाच्या एका जाड लखोट्यात हजार रु.ची नोट ठेवली. लखोटा सील बंद केला. एका सिद्ध योग्याच्या हाती तो लखोटा दिला. त्याने तो लखोटा न उघडता आपल्या योगसामर्थ्याने ,दिव्य दृष्टीने तो क्रमांक सांगावयाचा आहे. त्या योग्याने कितीही डोळे फाड-फाडून लखोट्याकडे पाहिले, ध्यान लावले,लक्ष एकाग्र केले तरी त्याला लखोट्यातील नोटेचा अचूक क्रमांक सांगता येणे शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे.

In reply to by यनावाला

दिव्य दृष्टीने तो क्रमांक सांगावयाचा आहे. त्या योग्याने कितीही डोळे फाड-फाडून लखोट्याकडे पाहिले, ध्यान लावले,लक्ष एकाग्र केले तरी त्याला लखोट्यातील नोटेचा अचूक क्रमांक सांगता येणे शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे.
पुण्यात मगरपट्टा परीसरात रहाणारे श्री वनारसे अशा प्रकारचे ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग घेतलेली मुले डोळे बांधुनसुद्धा नोटेचा नंबर सांगु शकतात. तुमच्या मोबाईलमधला एस एम एस वाचू शकतात. वनारसे याचे प्रयोग देखील करतात. त्यामागील शास्त्रीय तत्व शिकवतात. त्यात कोणताही चमत्कार नाही असेच ते सांगतात.

In reply to by यनावाला

यनावाला, >> चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. ते कोणालाही कालत्रयीं शक्य नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. यालाच तुम्ही चमत्कार म्हणत असाल तर मी तुम्हाला एक चमत्कार करून दाखवतो. खरंतर तुम्ही स्वत:च करून पाहू शकाल. तुमच्या घरी दूरचित्रक (=टीव्ही) असेल. तो सुरू करा. आता त्याचा दूरनियंत्रक (=रिमोट) घ्या. आणि वाहिनी (=च्यानेल) बदला. बदललं गेलं तर आपला चमत्कार यशस्वी झाला आहे. याला चमत्कार का म्हणायचं ते सांगतो. दूरनियंत्रकात संदेश पाठवण्यासाठी अतिरक्त (=इन्फ्रारेड) दिवा असतो. तर असा प्रक्षेपित केलेला संदेश ग्रहण करण्यासाठी दूरचित्रकावर संवेदक (=सेन्सर) असतो. दूरनियंत्रकात जो संदेशप्रक्षेपक दिवा असतो त्याची संरचना (=डिझाईन) हे 'प्रकाश लहरींप्रमाणे वातावरणात पसरतो' या तत्त्वानुसार केलेलं असतं. हा निसर्गनियम आहे. मात्र दूरस्थ संवेदकाची संरचना 'प्रकाश हा फवाऱ्याप्रमाणे कणांचा बनलेला आहे' या तत्त्वावर आधारित असते. हे वरील निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे. एकाच प्रसंगात निसर्गनियमांच्या बाजूने आणि विरुद्ध दोन्ही वर्तने पाहता येतात. म्हणून सोफ्यावर बसून रिमोटने टीव्हीचं च्यानेल बदलणे हा चमत्कार आहे. बोला गामाबाबाकी जय! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आता त्याचा दूरनियंत्रक घ्या. आणि वाहिनी बदला. ....मी चुकून `वहिनी बदला' वाचलं. भलताच चमत्कार व्ह्यायचा !

In reply to by यनावाला

तर प्रथम वाक्यात काही अपरीपुर्णता नक्किच आहे म्हणून शंका विचारुन ती दुर करुन घेतो म्हणजे तुमेचे नियम मला निसर्ग नियमाप्रमाणेच शोधुन व समजुन घेउन त्यावर आधारीत तत्वज्ञान मला विकसीत करता येइल. कारण आपण म्हणत तसे निसर्गाने ही क्षमता मला दिलेली आहे. असो नमनाला जास्त तेल न घालवता पहिली शंका विचारतो आशा आहे प्रांजळ उत्तराने समधान करालच.
या विश्वाचे नियमन निसर्गनियमांनुसार होते. ते नियम शोधून काढण्याची क्षमता मानवी बुद्धीत आहे.
ते सर्व नियम शोधुन काढायची क्षमता मानवी बुद्धीत आहे का ?

In reply to by भाऊंचे भाऊ

खिक्क! बाहुबली, ते उत्तर देणारच नाहीत. त्याऐवजी दुसरा काहीतरी टुकार रेफरन्स काढून वाद घालत बसणार. काय तुम्ही पण राव अपेक्षा करता? आजची स्वाक्षरी: पाहुनी विज्ञानाच्या बला! सांगा कोण भ्रमिष्ट झाला!!!

In reply to by यनावाला

बाकी मला कशावरही बोलायचे नाही. फक्त एका वाक्यावर एक पिंक टाकतो -
"चमत्कार करणे म्हणजे निसर्गनियमाचे उल्लंघन करणे. "
चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचे उल्लंघन नव्हे, तर चमत्कार म्हणजे प्रचलित निसर्गनियमांचे उल्लंघन.

In reply to by आनन्दा

अजून एक पिंक टाकतो चमत्कार म्हणजे निसर्गनियमांचे उल्लंघन नव्हे, तर चमत्कार म्हणजे आजमितीस अज्ञात असलेल्या निसर्गनियमांचे पालन.

In reply to by प्रकाश घाटपांडे

हे हे, :-) आफ्रिकेच्या जंगलात जाउन 'अज्ञात' आदिवासींवर टॉर्चचा प्रकाश पाडणे 'चमत्कारच'

हे इंद्रा तू सर्वशक्तिमान आहेस. ऊर्ध्वदिशेने प्रक्षेपित केलेल्या या कंदुकाचे अधांतरी स्तंभन करण्यास कंदुक हा मुळ संस्कृत शब्द आहे का ? कुठे या शब्दाचा उल्लेख आलेला आहे एक मराठी शब्दही बनतो का या शब्दाच्या च मुळापासुन ?

In reply to by बोका-ए-आझम

छान नविनच शब्द आहे कुठेतरी वाचलेला आठवतोय तेव्हाही अर्थ कळलेला नव्हता. शोधुन काढतो आता एकदा व्युत्पत्ती सुद्धा.

In reply to by मारवा

"रत्नकंदुका जागी हाती, मातीची खेळणी" - हे गदिमांनी लव कुशांच्या अवस्थेचे केलेले वर्णन "दैव जाणिले कुणी" या (येथील चर्चेच्या दृष्टीने अत्यंत विसंगत अशा नावाच्या) गाण्यात ऐकले असेल बहुधा :)

शिर्षक वाचून हे काहीतरी कर्मकांड वगैरे असेल असं वाटलं होतं. पण हे तर भलतंच निघालं! Smiley एकदम जबराट.. अजुनही डोकं गरगरतंय!
"ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो."आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो. असा आहे या मंत्राचा प्रभाव!
Smiley

लेखाचा उद्देश जरी चांगला असला तरी लोकांना जर आपले म्हणणे पटवून द्यायचे असेल तर नुसती टीका करून उपयोग नाही असे वाटले. म्हणजे समजा एखाद्याची बायको जाड(समस्त स्त्री वर्गाची माफी मागून!) आहे. त्याला ते दिसतंय पण बायको ऐकणार नाही हे त्याला माहितीये(किंवा स्पष्टपणे सांगितल्यावर त्याचा उलट परिणाम होईल असे त्याला वाटतंय) तरीपण तो "तू फारच जाडी झालीयेस, जरा कमी खात जा!" हे सांगेल का? अश्याने भांडणच होणार ना!! शिवाय ती बारीक पण होणार नाही! म्हणजे डबल लॉस... या ऐवजी तिला लठ्ठपणाचे दुष्परिणाम सांगून "मला तुझी काळजी वाटते" असे गोड बोलून काही फरक पडतो का बघता येऊ शकतो ना! आता हा लेख वाचून जे लोक अनुमोदन देत आहेत ते बहुतांशी आधीपासूनच या विचारांचे आहेत. पण ज्यांच्यासाठी हा लेख असू शकतो (टार्गेट ओडियन्स) त्यांच्यात कसा फरक पडेल? कसा पडेल हे मला पण माहिती नाही पण टीका करून दरी कमी होण्या ऐवजी वाढतच जाइल असे वाटते... बाकी तुम्ही जास्त अनुभवी आहात... पुलेशु

'७८६' आणि 'होली वॉटर' चे बुरखे फाडणार्‍या पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

..खवचट वैट्ट वैट्ट प्रतिसाद. पण मुद्दयात साला मार्मिकपणा असला लाजवाब आहे की आम्हाला दाद देण्यावाचून पर्याय नाही.. हा तुमचा (जुनाच) हलकटपणा आहे पराषेट..

In reply to by गवि

हा हा हा धन्यवाद. पण आमचे जागृत मन जे बोलले ते आम्ही शब्दात उतरवले बघा. आता हे धाडस लेखक करेल तर आमचा मानाचा मुजरा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अशा माणसांची नास्तिकता ही सिलेक्टीव्ह असते. उत्तर मिळणारच नाही तुम्हाला. त्याऐवजी पुन्हा पुन्हा १) अध्यात्मशक्तीने चेंडू हवेत अधांतरी ठेवा. २) मंत्राच्या बळावर डास मारुन दाखवा. ३) ध्यानसामर्थ्याने बंद पाकिटातील नोट ओळखून दाखवा. असले निरर्थक प्रश्न मांडले जातील. साहजिक आहे. त्यांना अध्यात्म तर सोडाच, विज्ञान सुद्धा कळालेलं नाही. अध्यात्माकडून असल्या फालतू अपेक्षा एकतर ज्याचा असल्या गोष्टींच्या मागे धावून दारुण अपेक्षाभंग झालाय असाच व्यक्ती करतो नाहीतर अगदी निरक्षर अडाणी माणूस!

In reply to by स्पा

जोर फक्त प्रतिकार न करणार्‍यांवरच दाखवला जातो सर. ;) 'पलिकडे' जायचे म्हणले की नाडी सुटते.

In reply to by बॅटमॅन

असं सगळ उघड करू नये, मग आडून आडून सगळ्या सश्रद्धांना "नरबळी" देणार्यांच्या+जारण मारण लाईनीत बसविणार्यांची पंचाईत होते ना राव! माझ्या देव-पुजेचा कुणालाही त्रास होणार नाही याची (आणि फक्त इतकीच) सदा काळजी घेणारा नाखुस अडाण@@

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओम मणि पद्मे हूम आणि णमोकारादि मंत्रावरच्या लेखाच्या प्रतिक्षेत...

अमुक साबु लावल्याने करियर उजळते! मुलीचे कर्तृत्व हे अमुक मलम लावून रंग उजळल्यानेच विकसीत होते! अमुक फवारा मारल्याने तमाम स्त्रिया मागे लागतात! अमुक पोषक घेतल्याने पहिला क्र्मांक येतो! अमुक मीठ खाल्ल्याने कलेक्टर होता येतं! अमुक सॅनिटरी नॅपकिन वापरल्याने मुलगी महान पत्रकार होते! हे आणि असे असंख्य मंत्र 'एमेन्स्नी' पंथाचे अनेक महामांत्रिक दिवसरात्र उच्चारत असतात आणि त्यांना या मंत्रपठणाने नित्यनियमाने करोडोंचा नफा मिळतो. या महामांत्रिकांचे काय?

दाद देणारे सुद्धा त्याच रांगेत आहेत. मंत्र या शब्दाचा अर्थ मन + तंत्र असा आहे. तो मनावर काम करतो. लेखकानं उर्जेची व्याख्या अशी केली आहे : कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत. मंत्र मानसिक उर्जा देतो. लेखक अत्यंत बालीश विधान करतात : आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने ? ॐ मुळे अणु विभाजन होत नाही , ती भौतिक घटना आहे त्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम लागू होतात. तद्वत एका सदस्येनं पॅरासिटॅमॉलचं उदाहरण दिलं आहे ते देखिल लेखकाच्या विचारसरणी सारखं आहे. शरीरशास्त्राचे नियम शारीरिक आजाराला लागू होतील फॉर्म्युला पठण नाही ही उघड गोष्ट आहे. मंत्र मनावर काम करतो की नाही हा व्यक्तिगत अनुभव आहे, तरीही ॐ सारखा मंत्र मन एकसंध करण्याचं काम निश्चितच करतो कारण मनाचा अत्यंत मोठा भाग ध्वनी निर्मित आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे एकप्रकारे मंत्रशास्त्रच आहे. उदा. यमन राग हा विशिष्ठ ध्वनींचं संयोजन आहे. त्यामुळे तो गाणार्‍याचं मन तर एकसंध करतोच शिवाय ऐकणार्‍यांचं मनही प्रसन्न करतो. थोडक्यात, मल्हार रागानं वर्षा होईल किंवा दिपरागानं दिपप्रज्वलन होईल हा तसा प्रचार करणार्‍यांचा निर्बुद्धपणा आहे त्याचप्रमाणे असे चमत्कार घडत नाहीत म्हणून मंत्रशास्त्रच व्यर्थ आहे किंवा त्याचा मनावर परिणामच होऊ शकत नाही म्हणणं अज्ञानाचं आहे. मंत्र म्हणून भौतिक घटना घडण्याची किंवा गायत्री जपानं डास मरण्याची शक्यता नाही ही साधी गोष्ट न कळल्यानं लेखकानं लेखन प्रपंच केला आहे आणि समविचारींनी टाळ्या पिटल्या आहेत. शेवटी लेखकानं म्हटलंय : सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे. मंत्र मनाचं संयोजन करतो हे लेखकाच्या शेवटी तरी लक्षात आलं आहे असं दिसतंय. आणि एकसंध मन हा उर्जेचा स्त्रोत आहे.

In reply to by मांत्रिक

माझा हा वरील प्रतिसाद विवेक ठाकूर यांच्या विवेचनाला दिलेला होता. सं.मं. कृपया बदल कराल का?

In reply to by स्वप्नांची राणी

तुम्हास मुद्दा समजलेला नाही. लेख खरंच फुटकळ असल्यानं त्याला फुटकळ म्हटलं आहे. काय म्हटलं सांगा? आणि 100 वेळा म्हणा देखील. शब्दात अशीही ताकद नसतेच. आवड नावडीचा प्रश्न येतोच कुठे?

अरे वा! मागच्या लेखातले मी विचारलेले प्रश्न सरांनी ऑप्शनला टाकलेले दिसतायत! आणि आता नवीन /तेच ते प्रबोधन!! आता या लेखावर मी प्रश्न विचारू की नको? तरी विचारतेच, बद्धमूलासन म्हणजेनक्की काय?

देव अध्यात्म, कर्मकाण्ड , उपचार ( थेरपी या अर्थाने) देश भाषा अन्क ई गोष्ट्री निसर्ग निर्मित नाहीत. तर मानवाच्या मानसिक विकासाचे ( की भ्रमाचे ) ते परिपाक आहेत. विश्वातील सर्वच घटना अगदी सर्वार्थाने फिजिक्स पातळीवर घडत नाहीत कारण॑ मन असलेले सजिव व मन नसलेले जड यांच्या दोघांच्याही धर्माचा मिलाफ ( अट्रीब्युट या अर्थाने ) वैश्विक घटनात होत असतो.याचाच अर्थ प्लसिबो हा अस्तित्वात असतोच कारण मन हे जीवमात्रात असतेच. सबब एखाद्याला एखाद्या मंत्राचा फायदा झाला तर तो मंत्राचा गुण नव्हे तर ऐकणार्‍याचा आहे. म्हणूनच खंडोबा कोकणस्थांच्या अंगात येत नाही कारण्॑अ कोकणस्थात॑ ते दैवत नसल्यामुळे प्लसिबो निर्माण होत नाही. मारवा हा राग औदासिन्य निर्माण करतो का हे ब्रिटीश माणसाला विचारले तर तो फार वेगळे उत्तर देण्याची शक्यता जास्त. कोणी सफेद रंग विरक्तीचा मानतील तर कोणी शरणागतीचा . असा फरक जड वस्तू करणार नाहीत. ( एका अर्थाने त्यांच्यात अक्कल कमी व भ्रमही )

In reply to by चौकटराजा

प्लासिबो म्हणजे नक्की काय? जर का प्लासिबो या तंत्राचा उपयोग होतो तर महागडी टेक्निक्स कशासाठी वापरायची?

लिमा उजेट प्रश्न करतात, "बद्धमूलासन म्हणजे काय ?" उत्तर: या आसनाला मूळबंधासन ,वज्रासन अशीही नांवे आहेत. "अर्जुना हे मुख्य जाण ।मूळबंधाचे लक्षण ।वज्रासन गौण । नाम एयाचे ॥१९९॥[ज्ञाने.अ.६वा] बद्धमूलासन (मूळबंधासन) कसे घालावे याचे सविस्तर वर्णन ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओव्या १९३ ते १९९ , यांत आहे. पुढे कुंडलिनी जागी होऊन काय काय करते ते सांगितले आहे. नंतर संपूर्ण कायाकल्प झालेल्या योग्याचे वर्णन आहे.(ओ.२५८-२९२)...."निडाराचेनि कोंधाटे। मोतियें नावरती संपुटे । मग सिवणी जैसी उतटे शुक्तिपल्लवांची ॥तैसे पातियांत न सामाये । दिठी जाकळोनि निगो पाहे।आधिलीच परी होये।गगनाकळिती ॥२६७॥..... हे सर्व वर्णन अवश्य वाचावे.

In reply to by यनावाला

बद्धमूलासन नावाचे कुठलेच आसन नाही. हां, वज्रासन घातल्यावर गुदद्वाराचे आत श्वास खेचून आकुंचन करणे याला मूलबंध प्राणायाम म्हणतात. त्याच्यायोगे कुंडलिनी शक्ती वर सुषुम्नामार्गे सहस्राराकडे खेचली जाते. हा अतिशय अवघड प्रकार आहे व तज्ञ्याच्या मार्गदर्शनाखालीच करतात. बाकी तुम्हाला प्रतिसाद द्यायची इच्छा नव्हती पण तुम्ही कोणतीही माहीती नसताना बिनधास्त काहीही ठोकून देता. त्यातून या विद्येविषयी गैरसमज पसरतात. म्हणून बोलावे लागते.

In reply to by मांत्रिक

मूळबंध, मूळबद्ध, बंधमूळ, बद्धमूळ तसेच मूलबंध, मूलबद्ध, बंधमूल, बद्धमूल या सर्व सामासिक शब्दांचा व्यकरणदृष्ट्या अर्थ एकच आहे. कारण,मूळ==मूल तसेच बंध = बद्ध (बांधलेले.) बद्धपद्मासनाला कमलबंधासन म्हटले तरी अर्थहानी होत नाही.

In reply to by यनावाला

तीन वेगवेगळे बंध आहेतः १) उड्डीयान, २) मूल व ३) जालंदर. यांचा आसन व प्राणायामाशी काहीही संबंध नाही. आसन करून मग प्राणायाम केल्यानंतर यापैकी आपणांस आवश्यक ते बंध गुरुने सांगितलेल्या क्रमाने करायचे असतात. प्रत्येक बंधाचे शारीरीक व मानसिक प्रभाव वेगवेगळे आहेत.

In reply to by मांत्रिक

अहो कोणाला आणि कशाला सांगताय. अज्ञानात सुख असते असू द्यावे. आपल्याला अनुभव असेल तर घ्यावा. अनुभवाशिवाय सगळे बुडबुडेच आहेत. (आशा आहे की हा प्रतिसाद तुम्ही योग्य अर्थानी घ्याल).

In reply to by मांत्रिक

.....ज्ञानेश्वरी, सहाव्या अध्यायात १९९ वी ओवी आहे,"
अर्जुना हे मुख्य जाण । मूळबंधाचे लक्षण । वज्रासन गौण । नाम येयाचे ॥" याचा स्पष्ट अर्थ असा की वज्रासन हे या मूळबंधाचे (बद्धमूळाचे) गौण (कमी महत्त्वाचे)नाव आहे.
तत्पूर्वी ओवी क्र.१९४ ते १९८ पर्यंत हे आसन कसे घालावे याचे सविस्तर वर्णन आहे.

In reply to by यनावाला

आसन, प्राणायाम व बंध या अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कदाचित वज्रासनात मूलबंध घालणे सोपे जात असावे म्हणून त्यांनी तशी सांगड घातली असावी. कारण वज्रासन घातले तर मूलाधार चक्र अगदी आरामात राहते. तसेही आसन घालून प्राण आत शरीरात कोंडून मग बंध केले जातात. त्यामुळे या गोष्टी त्यांनी एकत्रच गृहीत धरलेल्या असाव्यात. बाकी तुम्हाला २००च करायचेत का? बाकी सदस्यांनी पण नवीन लेख टाकलेत. तिकडे वळू देत जरा पब्लिक. पुन्हा सांगतो बंध म्हणजे आसन नव्हे. तुमच्या माझेच बरोबर हे सिद्ध करायच्या हेक्यासाठी त्या महात्म्याला वेठीस धरू नका. तुम्हाला लाल रंग देऊ पाहिजे तर. ज्ञानेश्वरीतील केवळ हीच वचने तुम्हाला चिंतनीय वाटली म्हणजे आमचे परममित्र प्रगोअण्णा व प्यारेबुवा म्हटले तसे ते गोचिड, गाईचे आचळ, रक्त वगैरे वगैरे...

In reply to by यनावाला

अगदी अगदी....सोडीयम क्लोराईड म्हणले काय अन क्लोरीयम सोडाईड म्हणले काय... सारखेच. खारट ते खारटच राहाणार ना. गोड थोडीच होणार? अज्ञानी जनांना कळतच नाही बघा. (बाय द वे, प्रत्येक Body Of Knowledgeची स्वत:ची अशी टर्मिनॉलॉजी असते हो. व्याकरणदृष्ट्या सेम असलं तरी तुम्हाला त्या Body Of Knowledgeवर काही टीका करायची असली तरी त्याच टर्मिनॉलॉजीचा आधार घ्यावा लागतो हो. उगा वाट्टेल ते शब्द स्वतःच उभे करून कसे चालावे?) (बाय द वे १, मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा आठवला. लो. टिळक असे लिहिताना लो. म्हणजे लोकमान्यचा शॉर्टफॉर्म असा लिहिला जातो हे कळल्यावर माझ्या एका (पुढे खूपच उत्तम शिक्षण घेतलेल्या) वर्गमैत्रिणीने पेपरात वेळ पुरला नाही म्हणून शेवटच्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना ते आख्खे उत्तर शॉर्टफॉर्ममध्ये लिहिले. म्हणजे, 'शिवाजी महाराजांनी गडावर पोचल्यावर तोफा उडवल्या' असे लिहायच्या ऐवजी 'शि. म. ग. पो. तो. उ.' असं लिहिलं. .... तेव्हाही ती बाईंना हेच बोलली होती... 'समजून घ्या ना हो बाई. वेळ नव्हता पूर्ण लिहायला.')

वज्रासन वेगळे, मूलबंध वेगळा आणि बद्ध पद्मासन वेगळे. तिनहीचे शरीरावर होणारे परिणामही वेगळे. शिवाय या तिनहीचा मंत्रान्शी काही सम्बन्ध नाही. एकन्दरीत आसनांचा आरोग्यशी मात्र निश्चितच सम्बन्ध आहे.

मला वातते धागाकर्ते यनावाला यानी लेख चुकीच्या संस्थळावर टाकला आहे... अशा नास्तिक चर्चान्साठी "प्रगतिशील सुधारक " संस्थळ उपलब्ध आहे हे माहित नाही का तुम्हांस ? ;)

मंत्र-विज्ञानाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण असे मिळू शकेल ---= १. मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो २. ब्रेनवेव्ह साऊंड थेरपी नुसार विशिष्ट ध्वनिलहरी वर मन एकाग्र झाल्यास मेंदूच्या अवस्था बदलतात , म्हणजे १-४ हर्ट्झ डेल्टा,/ ५- ८ हर्ट्झ थिटा / ९-१२ हर्ट्झ अल्फा /१३-१६ हर्ट्झ बीटा .........इ.या मेंदूच्या अवस्थांचा मूड्स आणि स्वभावाशी जवळचा संबंध आहे . ३. मंत्र निर्माण करताना वरील ध्वनिलहरी शास्त्र /स्पंदन शक्ती आणि त्याचा मेंदूवरील परिणाम याचा अभ्यास केला गेलेला असावा. ५. मंत्राजपा बरोबरच संकल्प आणि उद्देश यांचाही विचार होतो. मंत्रजपा नंतर मन अधिक शक्तिशाली/ शांत व सूक्ष्म होते असा अनुभव आहे ,अशा सूक्ष्म मनाने ईश्वरी शक्तीशी लवकर तादात्म्य /तल्लीनता//तद्रूपता होऊ शकते . ६. सूक्ष्म आणि शक्तिमान मनातून निघणारे विचार प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त असते ,संदर्भ -C W LEADBEATER- THOUGHT POWER ७. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत , अधिक सखोल आणि सर्वंकष शास्त्रीय संशोधन होण्याची आवश्यकता आहे .

In reply to by मंदार कात्रे

मंत्र हा मन,बुद्धी आणि त्यापेक्षा तरल अशा सूक्ष्मदेहांवर कार्य करतो सुक्ष्मदेहांवर ? कृपया आपल्याला नेमके काय म्हणावयाचे आहे विस्तार करावा म्हणून मंत्राशाक्तीचे दिव्य अनुभव येत असावेत उदा. कुठले दिव्य अनुभव कसे कोणाला ? कृपया अधिक विस्तार करावा.

In reply to by मारवा

हे दिव्य अनुभव ऐकायला व त्यापेक्शाही अनुभवायला मी उत्सुक आहेच. बाकी नास्तिक याचा रूढ अर्थ देवाच्या अस्तित्वावर विश्वास नसणारा असा आहे ना ? शाळेत असताना अर्ध्या मार्कासाठी असाच अर्थ पाठ केल्याचे आठवतेय. मग मंत्र सामर्थ्य याला आव्हानात्मक विरोध व देव यान्चा काय संबंध ? एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. जप केल्याने माझ्या कोणत्याही मित्राला वा आप्ताला मनोविकारावर ताबा मिळाल्याचे दिसत नाही. धर्म पाळणारा माणूस नास्तिक असू शकतो. असे जर मी विधान केले तर इथे त्याला कुणाचा विरोध आहे का ? असल्यास कळवा मग पुन्हा कळफलक बडवायला मोकळा मी .

In reply to by चौकटराजा

एकूणच भारतीय लोकानी अस्तिकपणा, अध्यात्म , जप मंत्र कृपा, धर्म यांचा एकमेकाशी विनाकारण संबंध आणून गोंधळच घातलेला दिसतो. यासाठी चौराकाकांशी बाडीस,

नव्या बाटलीमधल्या जुन्या दारूला एव्ढा ट्यारपी मिळाल्याचे पाहून बाकीचे व्हेक-नॉन व्हेज , हे वि ते विषय नव्या वेष्टणात गुंडाळायला सुरुवात केली आहे

परवा एका कार्यक्रमात एक उच्चशिक्षित अध्यात्मवादी म्हणाले, "ॐ या शब्दात प्रचंड शक्ती आहे. विज्ञानाने हे सिद्ध केले आहे.” या विधानात काही तथ्य आहे काय ? ॐ ऊर्जेचा प्रत्यय कधी,कोणाला, कोठे, कसा आला ? या प्रचंड ऊर्जेचे अस्तित्व विज्ञानाने कोणत्या पद्धतीने सिद्ध केले? भर सभेत असली विधाने करायला अध्यात्मवादी कसे धजावतात? अर्थात सभेतील अनेक गलिबलांना (भोळसटांना) ती महान सत्ये वाटतात . ते स्वबुद्धीने विचार न करता माना डोलावतात,"वा! काय विद्वत्ता आहे!" असे म्हणतात , हे खरे.
आजकाल असे मनगढंत ठोकून देणारे व त्यांचे ऐकून घेणारे सुशिक्षित फारच बोकाळले आहेत. वैज्ञानिक पद्धतीचे शिक्षण वयाची पहिली वीस वर्षेपर्यंत घेऊनही एवढ्या मोठ्या लोकसंख्येत मागच्या साठ वर्षात वैज्ञानिक दृष्टिकोण रुजलेला नाही. म्हणजे खरंच 'खरंखुरं विज्ञान' शाळांमधे शिकवले गेले आहे काय? नसेल तर असे गावंढळ राहणार्‍या सुशिक्षितांचा नक्की काय प्रॉब्लेम असावा?
आरोह-अवरोहांसह नाका-तोंडातून शास्त्रशुद्ध सानुनासिक (गेंगाणा) स्वर काढून ॐ-गुंजन करणारे एक्स्पर्टस् आजसुद्धा देशात आहेत.मग आपण अणुभट्टी का उभारतो? ॐ- उच्चारणातील प्रचंड ऊर्जेने टर्बाइने फिरवून विद्युत् निर्मिती का करत नाही? असे करणे शक्य नसेल तर ॐ मध्ये प्रचंड शक्ती असते असे म्हणतात ते कोणत्या अर्थाने? "कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा " अशी ऊर्जेची व्याख्या आहे. ऊर्जा आणि शक्ती हे शब्द समानार्थी आहेत.
पुन्हा चुकलात. त्या येड्याने ओमशब्दात शक्ती आहे असे म्हटले म्हणजे लगेच अणुभट्टीचे उदाहरण (प्रत्यक्ष वैज्ञानिक-छाप वाटते म्हणून) द्यायचे? शक्ती-उर्जा हे समानार्थी आहेत हे खरे. वर दिलेली व्याख्याही बरोबर आहे. पण मला एक प्रश्न पडलाय. मला क्लायंटने शंभर टक्के अ‍ॅडव्हान्स पैसे दिले की त्याचे काम करायची प्रचंड उर्जा शरिरात येते, तेच एखाद्याने नंतर पैसे देतो असे म्हटले की जेवून-खाऊनसुद्धा अंगात त्राणच नाहीत असे वाटत राहते. असे का होत असावे?
हां! अखंड अकरा तास बद्धमूलासन घालून ॐ-जप करणार्‍या व्यक्तीला वाटू शकेल की, " ..आता माझी कुंडलिनी जागृत होत आहे...तिने अर्धे वेटोळे सोडले...दीड उलगडले...साडे तीन वेटोळी संपली...बघा! आता तिने फणा उभारला...सुषुम्णा मार्गाने कुंडलिनी वर वर चालली आहे...ती पाहा...आता ती चंद्र तळ्यातले सतरावीचे अमृतस्तन्य प्राशन करीत आहे...घट्..घट्..घुट्..संपले....आता ती ब्रह्मरंध्र भेदित आहे....फट्.. फट् ..फाट्... फोडले....माझी कुंडलिनी चिदाकाशात विलीन झाली...मी देहातीत झालो... जीवन्मुक्त झालो.. ब्रह्मरूप झालो...आनंद...आनंद...सच्चिदानंद...ब्रह्मानंद!" हे सगळे व्यक्तिगत भ्रम आहेत. त्यांत वैज्ञानिक सत्याचा लवलेश नाही.
ओम जप घातल्याने कुंडलिनी जागृत होते? यनावाला, तुम्हाला खरंच कोणी सांगितले हे? कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. सिद्धपुरुष कधीही कोणताही जप करत नाहीत. ते अंतर्बाह्य शांत असतात. आपणास भलतेच भ्रम झालेत वा कोण्या सोम्यागोम्या मासिकांमधे 'साधकांचे अनुभव' सदराखाली आलेली कपोलकल्पित मनोरंजनात्मक पत्रे वाचली की काय?
** भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. त्यावेळी या प्रचंड ओम् ऊर्जेच्या योगाने कोणी कधी प्रतिकार केल्याची एक तरी ऐतिहासिक नोंद आहे का? मूर्तिभंजकांनी सोरटीच्या सोमनाथाची शकले पाडली. तेव्हा ते अविवेकी कृत्य या ॐ-शक्तीच्या आधारे कोणीच कसे रोखले नाही? अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली (१३ वे शतक) तेव्हा चांगदेवांसारखे अनेक सिद्धयोगी दूर नव्हते. त्यातील कोणी ॐ-ऊर्जातज्ज्ञ रामदेवरायाच्या सहाय्याला का गेला नाही? देवगिरीचे दौलताबद का होऊं दिले?.
तेव्हा विज्ञान नव्हते ना... म्हणून. विज्ञानाने ओममधे शक्ती आहे असे 'आता' सिद्ध केलंय ना त्या अतिशिक्षित विद्वानांच्या हवाल्यानुसार? चांगदेव वा इतर कोणीही समकालिन सिद्धपुरुष यांना कधीच कोण्याच राजा/बादशाहा/आक्रमक यांनी त्रास दिलेला वाचलेले आठवत नाही. जे गाजलेले योगी आहेत ते सर्व समाधीअवस्थेत सद्गतीस प्राप्त झालेत. कुणी मुस्लिम आक्रमकाने कुठल्या सिद्धयोग्याची कत्तल केली असल्याचे ऐतिहासिक संदर्भ असल्याचे कुणास ठावूक असल्यास येथे देणे. योगी वा अध्यात्मिक व्यक्ति खरंच कुठल्याही धर्माचा नसतो, तो समाजाचा कधीच नसतो. तो केवळ एकटा असतो. धर्मकार्य, धर्मरक्षा, समाजातल्या लोकांची रक्षा असली अनुत्पादक कामे खरे योगी कधीच करत नाहीत. त्यांना त्यांचे कार्य व ध्येय समजलेले असते. बुडते हे जन देखवे न डोळा वैगेरे तुकारामांनी व्यक्त केले ते वेगळ्या संदर्भात, जीव वाचण्याच्या संदर्भात नाही. त्यांच्या लेखी सर्वच जन हे बुडते जन आहे, त्यात हिंदु-मुस्लिम, आक्रमक-शोषित, राजा-रंक असा भेद नाही. तर मग रामदेवरायास मदतीस जाण्यात काय पॉईंट आहे? आणि खिल्जीस विरोध करूनही काय उपयोग आहे? शासनव्यवस्था, समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, राज्यव्यवस्था वैगेरे गोष्टींमधे कुणीही सिद्धयोगी गुंतलेला आढळून येतो काय?
**थोरले माधवराव पेशवे कर्तृत्ववान होते. दुर्दैवाने तरुणपणी त्यांना क्षय रोगाने ग्रासले. अनेक आयुर्वेदाचाचार्यांच्या उपचारांनी गुण आला नाही. अंतिम समयीं मृत्युंजयमंत्रपठणासाठी वेदशास्त्रसंपन्न अशा शेकडो ब्रह्मणांना नियुक्त केले. पण हा महामंत्रजागर निष्फळ ठरला. पेशव्यांचा अकाली मृत्यू टळला नाही.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात. मंत्र हे मनावरच्या परिणामासाठी आहेत. मन शरिरावर परिणाम करतं हेही वैज्ञानिक सत्य आहे (खरंच आहे का ते तपासून सांगा डॉक्टरसाहेब). त्यामुळे मनावर परिणाम झाला तर त्या वाढलेल्या मनोबलाचा शरिरावरही परिणाम होईल या भावनेतून मंत्रोपचाराचा उपाय करून बघितला जातो. वैद्यकिय विश्वात अश्या अनेक केसेस असतील जिथे रुग्ण शरीर साथ देत नसतांना फक्त मनोबलावर जिवंत राहिलेले दिसतात.
**" माझा प्रवास"या पुस्तकात विष्णुभट गोडसे यांनी पुढील वर्णन लिहिले आहे:--(हे गोडसे १८५७ साली उत्तर हिंदुस्थानात प्रवासाला गेले होते.) "शत्रूचा नि:पात होऊन राज्य सुरक्षित राहावे म्हणून झाशीच्या राणीने अनेक अनुष्ठाने केली, मंत्रजप केले. अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. पेशव्यांकडून त्वरित मदत यावी म्हणून शंभर ब्राह्मण विशेष मंत्रजपास बसविले. पण गोरे लोक शहरात शिरून नरसंहार करू लागले. देवाघरचा न्याय मोठा चमत्कारिक. निरपराध लोकांना केवढी मोठी शिक्षा! झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप मोठे. सर्व मंत्रजप व्यर्थ ठरले. भटांस मात्र सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा मिळाली."--- ब्राह्मणांचे शास्त्रोक्त मंत्रजप व्यर्थ गेले याचे कारण झाशीवासीयांचे गतजन्मीचे पाप असे गोडसे भटजी म्हणतात.पण हा कार्य-कारण भाव चुकीचा आहे. मंत्रांत काही सामर्थ्य नसते. म्हणून मंत्रजप व्यर्थ गेले. सुग्रास भोजन आणि भरपूर दक्षिणा या गोष्टींचा लाभ घेणार्‍यांत विष्णुभट हेही एक होते.
पेशवे वा तत्कालिन हिंदू राजे राज्य चालवायचे म्हणजे केवळ होम-हवन-जप-जाप्यच करायचे असे तर काही आपण समजत नसाल अशी अपेक्षा करतो. म्हणजे युद्धाला जायचे तर शस्त्र, घोडे, फौजा नको. बस मूठ मारणारे शंभर मांत्रिक घेतले की झाले. त्यांनी शत्रूचे नाव घेऊन थुंकले की झाली लाखाची सेना गारद. युद्धकाळात शंभर उलाढाली सुरू असतात. त्यात शकून-अपशकून आदि मनोबल खचवणार्‍या गोष्टी घडू नये, सैन्याला, भाबड्या जनतेला धैर्यशील ठेवण्यास जमेल तो उपाय करणे राजास आवश्यक असते. त्यासाठी पुजा-होम-हवन हाही एक पार्ट अ‍ॅण्ड पार्सल ऑफ द डील आहे. खरं बळ तलवारीत, मनगटात व मनात आहे हे खरा सेनापती जाणून असतो. मनात बळ नसेल तर तलवारी, मनगट काही कामाचे नाही हेही त्यास ठावूक असते. आता तुम्ही म्हणाल इंग्रज त्यांचे सैनिकांचे मनोबल उंचावण्यास कुठे असे मंत्रजाप येडेचाळे करत? तर बंधो, त्यांचे उपाय त्यांना ठावूक.
अग्निपुराणात मंत्रसामर्थ्याचा अगाध गौरव आहे. त्यातील संग्रामविजय मंत्र:- :--"ॐ-र्‍हीं चामुण्डे।स्मशानवासिनी किलि किलि हुम् फट्।ॐ-मारय।ॐ-दण्डेन ताडय।ॐ-त्रिशुलेन छेदय।ॐ-चामुण्डे।किलि किलि हुम् फट् स्वाहा।" लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा मंत्र:- :---"ॐ श्रीं र्‍हीं र्‍हीं क्लीं क्लीं ऐं कमलवासिन्यै नम:।" असले हे मंत्र खरे मानणारे लोक पूर्वी होते. आज एकविसाव्या शतकातही आहेत! कुठल्याही मंत्रामध्ये कसलेही दैवी सामर्थ्य नसते. मंत्राने काही साध्य होत नाही.चमत्कार घडू शकत नाही. पूर्वी कधीही घडलेला नाही. भविष्यात कधी होण्याचा संभव नाही. हे वैज्ञानिक सत्य आहे. वरील ऐतिहासिक सत्य घटनांवरून याला पुष्टी मिळते. मंत्रात सामर्थ्य असते ही अज्ञानमूलक, खुळचट कल्पना आहे. मंत्रसामर्थ्याने चमत्कार घडतात ते केवळ पुराणे,परीकथा,बालसाहित्य यांतील काल्पनिक गोष्टींत .हे सर्व तथाकथित शक्तिशाली मंत्र आणि "ओले मंतर फू: मंतर कोले मंतर छू: मंतर" तसेच "आबरा का डाबरा" मंतर यांत मूलत: काही भेद नाही.सर्व सारखेच. निरुपयोगी. असे माझे मत आहे.
काही अत्याधुनिक गॅजेट्समधे मालकाच्या आवाजात विशिष्ट कमांड दिल्यासच ते कार्यान्वित होते. आता समजा यनावाला यांनी असे गॅजेट बनवले जे यनावाला यांना कुठेही घेऊन जाऊ शकते, पण ते फक्त त्यांच्याच आवाजाला प्रतिसाद देणार. पण झाले असे की यनावाला निर्वतल्यावर पाचशे वर्षांनी ते गॅजेट संदिप डांगे यांच्या हाती सापडले. त्याच्यासोबत लिहून ठेवलेल्या इंस्ट्रक्शनस ही सापडल्या. संदिप डांगे मोठमोठ्याने ओरडून 'कबुतर जा जा' ही यनावाला यांनी गॅजेटसाठी लिहिलेली कमांड देऊ लागले. पण ते गॅजेट जागचे ढीम्म हलत नव्हते. संदिप डांगे यांनी आपल्या नोंदवहीत नोंद केली. "यनावाला यांचे एक कपोलकल्पित गॅजेट. निरुपयोगी. असे माझे मत आहे." वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. शास्त्र म्हटल्यावर अंगावर यायचं काम नाही. पाकशास्त्र, अर्थशास्त्र ही वैज्ञानिक नसली तरी शास्त्रे आहेत. कुठल्याही अर्थतज्ञाला पुढे मंदी येणार का तेजी याचे भाकित करता येत नाही. तसे असते तर जगात मंदी-तेजी आलीच नसती. कुठल्याही पाककृतीची स्टेपबायस्टेप कॉपी मारुन सेम टू सेम पदार्थ बनवता येत नाही. म्हणून खलबत्त्यात कुटावे असे लाडू होतात. पाककृतीबरहुकूम आहे म्हणजे पदार्थ उत्तम असे नसते. वर मंत्र लिहिलेला म्हटला अन् प्रभाव जाणवला नाही तर मंत्रात चूक आहे हे कसे? तांत्रिक-मांत्रिक कठोर तपस्या साधना करतात, तशी साधना सर्वसाधारण मनुष्यास शक्यच नाही. ते शब्द योग्य पद्धतीने, योग्य सुरात, योग्य वेळी उच्चारणे आवश्यक असते. र्‍हीं क्लिं हे मनःपटलावर आघात करणारे शब्द आहेत. रोजच्या व्यवहारातले नाहीत. पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, त्याच्यापासून कारखानदारी व्यावसायिक फायदा नाही हे खरे पाश्चात्त्य लोकांचे दुखणे आहे. काही लोक हे विश्लेषण मान्य करणार नाहीत. त्यांच्याशी मला वाद घालायचा नाहीच. त्यांच्याही मताचा आदर आहे. हे अमान्यकर्ते त्या अनुभवांचे मालक नाहीत. दॅट्स इट. आयुष्यात कधी वाळवंट न पाहिलेला समुद्रावरचा माणूस, आणि कधीही समुद्र न पाहिलेला वाळवंटातला माणूस एकमेकांना आपल्या आयुष्य, राहणीमानाबद्दल सांगतांना कसे सांगतील, दुसर्‍याचे यांना कसे समजेल? जन्मापासून अनाथ, गरिब असलेल्याचे दु:ख गर्भश्रीमंत, सनाथ मुलास कसे इमॅजिन करता येईल? तेव्हा असो. तुम्ही खरंच सुखी आहात. आनंद व्यक्त करा. तुम्ही अध्यात्मिक अनुभूतीच्या जवळपास पोचत आहात. बस अजून काही हजार जन्म जातील.
अध्यात्मप्रेमी व्यक्ती गायत्री मंत्राचे अफाट गुणगान करतात. "हा मंत्र संपूर्ण विश्वाचा मूलाधार आहे. (म्हणजे काय ?) या मंत्राचे गायन केले की त्याचे ध्वनी-प्रतिध्वनी अनंत अवकाशात दुमदुमतात. जगभर गायत्री मंत्राचा जप केल्यास पृथ्वी भोवतीचे सर्व वातावरण प्रदूषणमुक्त, शुद्ध आणि पवित्र होईल."
हा तद्दन येडेपणा आहे. गायत्रीमंत्रच काय आजकाल प्रत्येक धार्मिक गोष्टीचे भयंकर अर्थ लावणारे सनातनी पिसाट जागोजागी उगवलेत. धोतर घालण्यापासून कपाळावर कुंकू लावण्यापर्यंत प्रत्येक बाबतीत 'विश्वाच्या तरंगलहरी प्रभावित' होतात असा त्यांचा दावा असतो. जास्त विचार करण्यास वेळ नसलेली जनता 'आपल्या धर्माचं' म्हणून भुलते आणि ह्या धर्मगुरुंवर विश्वास ठेवते. बाकी लोकंही काही कमी नसतात म्हाराजा... मुंहमे राम बगल में छुरी. लोकांस दाखवण्यास उच्च्स्वरात गायत्री वा तत्सम मंत्राने वातावरण शुद्ध व पवित्र करण्याचा संकल्प, अंतर्गत वेगळेच कलह. असो. हे सगळं गुणगान, अभिमान, दिखावा सर्व एक अनामिक भावना रेटण्यासाठी असते. त्यात वैज्ञानिक असे काहीच नाही. बोलणार्‍यास बरे वाटते, ऐकणार्‍यास आपण करतोय ते काही तरी महान आहे असा भ्रम होतो. बाकी, जग सुशेगाद चालतंय..
असले काही ऐकले की आध्यात्मिक श्रद्धावंत हुरळतो. मग सी.डी.लावून "ॐ भूर्भुवस्व:। तत्सवितुर्वरेण्यम्।भर्गो देवस्य धीमहि।धियो यो न: प्रचोदयात्।" हा मंत्र ऐकत बसतो. खिडकी उघडी. डास आत येतात.पायांना चावतात.एवढ्या विश्वप्रभावी मंत्राचा डासांवर काहीच परिणाम होत नाही. पायावर चापट्या मारतो. डास मरत नाही. डासाच्या चाव्याने वैतागतो.मंत्राच्या त्याच त्या ओळींचे दळण ऐकून कंटाळतो. "आता राहूं दे. नंतर बघू" असे म्हणून मंत्र बंद करतो. दिवा लावून डास शोधायला लागतो.
हा अध्यात्मिक श्रद्धावंत कुठे भेटला आपणांस? जरा आम्हीपण भेट घेऊ म्हणतो. डास घालवायला गायत्री मंत्र? अचाट कल्पकता आहे श्रद्धाळूंचा अपमान करायची. एवढी निंदानालस्ती करून यनावाला आपल्याला नक्की काय अघोरी समाधान मिळत असावे? काय किक बसत असावी?
असा आहे या मंत्राचा प्रभाव! कुठल्याही मंत्रात कसलीही ऊर्जा नसते. असले मंत्र म्हणू नये असे नाही. सकाळी स्नान करून,शुचिर्भूत होऊन, मंत्र म्हटल्याने पवित्र झाल्यासारखे वाटत असेल, मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल, तर तेही नसे थोडके. म्हणून मंत्रजप अवश्य करावा.पण त्याचा उपयोग तेवढाच हे वास्तव जाणावे.
एकाच पॅरात दोन विरुद्धार्थी वाक्ये? कुठल्याही मंत्रात कसलीही उर्जा नसते. व मनाला उभारी मिळत असेल, उत्साहवर्धन होत असेल तर तेही नसे थोडके. व्वा. नक्की एक काय ते ठरवा? उत्साहवर्धन करायला ढीगभर औषधं आहेत ना विज्ञानाने शोधलेली. मग ते का नाही प्रिस्क्राईब करायची? धादांत अशास्त्रिय व अवैज्ञानिक असत्य प्रत्यक्ष यनावाला इथे या धाग्यावर सांगत आहेत. मंत्रपठणाने, जपजाप्याने मनाला उभारी येते हेच वास्तव आहे असे अशास्त्रिय विधान का बरे करावे?

In reply to by संदीप डांगे

१- -कुंडलिनी जागृती ही कुठलाही जपाच्या फार फार प्रचंड नंतरची स्टेप आहे. कुणीही असे आसन घालून ओम ओम जपत कुंडलिनि जागृत करू शकत नाही. २-वर उल्लेखित मंत्राचे एक शास्त्र आहे. पद्धत आहे. ३-पुर्वसूरींनी ध्वनिंवर संशोधन करून हे शब्द सिद्ध केले आहेत. ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, वरील विधान क्र.१ मध्ये जे मांडलेल आहे त्या संदर्भात तसेच जो विधान क्रं २ आणि विधान क्रं ३ मध्ये जो दावा आहे या संदर्भात कोणी व्यक्ती विचारणा करेल की कुंडलिनी म्हणजे मुळात नेमकं काय ? ती जागी करतात म्हणजे नेमकं काय करतात ? ती जागी करण्याची रीत कोणती ? हे सिद्ध करता येऊ शकते का ? त्याचा परीणाम मोजता सिद्ध करता येतो का ? विधान क्रं २ व ३ संदर्भात --- कुठले संशोधन करुन ? त्यात नेमके कुठले प्रयोग करुन ? कुठले निष्कर्ष क्र.१,२,३ इ. त्यातुन काढलेले आहेत. त्या निष्कर्षांचा जसा वैज्ञानिक प्रयोगांच्या निर्ष्कर्षांचा जगात कोणालाही त्या रीतीने गेल्यावर पडताळा घेता येत असतो. तसा त्यातुन काढलेल्या निष्कर्षांचा पडताळा घेता येऊ शकतो का ? या सर्व प्रश्नांची ज्रर एखादा वैज्ञानिक असेल व त्याला त्याच्या एका प्रयोगा निष्कर्षांसंदर्भात असे विचारले तर तो उपस्थित प्रश्नांवर कुठलाही आक्षेप न घेता उलट चिकीत्सेचे स्वागत करुन सहजतेने उत्तर देत असतो. हे वैज्ञानिक जगात नित्य रोज सहज घडत असते. एखादा वैज्ञानिक मूळात नविन शोध लावल्यावर स्वतःहुन ते इतर वैज्ञानिकांसमोर सादर करुन त्यावरील आक्षेपांना उत्सुकतेने सामोरा जात असतो त्यात त्यांना भय लज्जा काहीही नसते कारण त्यांनी ते स्वत" सिद्ध करुन बघितलेले असते व त्यांच्यात तो आत्मविश्वास असतो त्यांच्यात खुलेपणा असतो. प्रश्न विचारणारा हा तुच्छ नसतो उलट तो एक प्रकारे वैज्ञानिक सत्य एस्टॅब्लीश होण्यास पुरक अशी मदतच करत असतो. विज्ञानात क्रीटीसीझम हा कनस्ट्र्क्टीव्ह मानला जातो. मात्र हेच सर्व एक आध्यात्मिक कसे टाळतो त्यावर काय भुमिका घेतो तर या वरील सर्व चिकीत्सेच्या अत्यंत सामान्य प्रश्नांना अध्यात्मिक उत्तर कसे असते. ते असे असते या टाइपचे ४-त्याचे डॉक्युमेंटेशन आणि कुणाही सोम्यागोम्याला ते सहज वापरायला मिळत नाहीत, या अगोदर श्री, संदीप डांगे चे कमोदीनी धाग्यावर एक विधान होते लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो या अनुसार तर्क अमान्य आणि वाद चिकीत्सा अहंकार आहेत. यानंतर अजुन एक स्टेप असते आम्ही काय बाबा आम्ही अशेच इ. अभिनिवेष या सर्व चिकीत्सेला सामोरे जाणे टाळण्याचे बहाणे आहेत. कारण आपले दावे त्यासमोर टीकणार नाहीत ही भीती हे खरे कारण. ही जी अध्यात्मिकांची वैज्ञानिक चिकीत्सेला सामोरे जाण्याची भीती हीच फार बोलकी आहे. अंनिस च्या प्रयोगांना सामोरं जायला त्यांच्या पारीतोषीका ला आजपर्यंत कुठलाही चमत्कारी आजपर्यंत मिळवु शकलेला नाही हे एक याचेच उदाहरण आहे. एका अक्षय कुमारच्या चित्रपटात हात बांधलेला अक्षय हा खलनायका समोर उभा असतो त्याला तो म्हणतो जे वेगळ्या संदर्भात आहे मात्र माझ्या वरील म्हणण्याचा आशय अधिक उत्तमपणे व्यक्त करते त्यात तो म्हणतो ये जो डर है ये जो डर है तुम्हारे अंदर ये अच्छा है जरुरी है. ही जी भीती आहे आध्यात्मिकांना चिकीत्सेची तीच त्यांना त्यामधील फोलपणाची टोचणी करुन देत असते. त्यांना माहीत असते की आपली सर्व विधाने दावे चिकीत्सेच्या प्रयोगांच्या उलटतपासणी च्या आघाताने कोलमडुन पडतील. आणि म्हणुन ते चिकीत्सेला सामोरे जात नाहीत त्याऐवजी प्रश्न उपस्थित करणाराच नीच अयोग्य तुच्छा इ. इ. अ‍ॅड होमेनीम. वैज्ञानिक द्रुष्टीकोणाचा एक सुपरीणाम असा की प्रत्येक बाबाला प्रवचनात ये सायन्स ने भी माना है ही पुरवणी सतत जोडावी लागते. त्यांचा श्रोताही या पुरवणी शिवाय त्यांचे म्हणणे ऐकत नाही. हा एक प्रकारचा विज्ञानाचा मोठा विजय आहे. ही भीती नकारात्मक नाही हा एक चांगला विधायक वचक विज्ञानाने अशा प्रकारच्या वल्गनांवर (ज्या कधीही सिद्ध क रता येत नाहीत ) बसवलेला आहे.
यावर कुणीतरी (बहुधा डॉक्टर खरेंनीच) अनुभव सांगितला आहे. की आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारेही अंतिम समयी अनाकलनीय कारणाने देव ह्या संकल्पनेस शरण जातात
डॉ. खरेंनी अशी माणस असतात ( कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे इतकेच ) असे ही म्हटलेले आहे. त्यासाठी त्यांनी बर्ट्रांड रसेल आयुष्यभर वैज्ञानिक विचारसरणी ठेवणारा याचे उज्वल उदाहरण ही दिलेले आहे. डॉ. खरेंचा संदीपजींनी कदाचित मिस केलेला प्रतिसादातला भाग असा तुम्ही म्हणता तसे विवेकी आणि कणखर लोक मीही पहिले आहेत किंवा पाहतो परंतु असे लोक १०० पैकी फारतर १ असतात बाकी ९९ नाहीत. आपला मृत्यू समीप आला असतानाही आपला बुद्धी प्रामाण्यवाद स्पष्टपणे व्यक्त करणारा बर्ट्रांड रसेल सारखा माणूस विरळाच. त्याच्याच पुढच्या प्रतिसादात संदीपजींनी कदाचित मिस केलेला गुलाम यांचा प्रतिसाद ज्यात नास्तिक भगतसिंग चे मृत्युला धैर्याने नास्तिकता अबाधिक कायम ठेउन सामोर जाण्याचे उदाहरण व लिंक श्री गुलाम यांनी दिलेली आहे. ती लिंक अशी http://www.shahidbhagatsingh.org/index.asp?link=atheist