✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"वैनी, पोरगं रडतयं"

ज
जव्हेरगंज यांनी
Sat, 11/14/2015 - 23:08  ·  लेख
लेख
"वैनी, पोरगं रडतयं" "आरं बसकी थोडं खेळवत त्येला, यीवढी भांडी घासुन हु दी माजी" "आवं पण म्या कायचं क्येलं नाय, तरीबी रडतयं" "तसच करतयं रं, आण की थोडं फिरवुन" "बाला, खुलकुला दीव का तुला" "ई~या, ई~या" "मोठ्या आय पशी न्हीवुन दी रय" "मोठ्या आयं, बाळ रडतयं" "हा~ड, तेव्हड कुत्रं हाण रं, मगाधरनं दारात बसलयं" "च्तु च्तु च्तु, छौ छौ" 'काय जालं आमच्या बालाला, आगं व्हयं, आगं व्हयं, पाजलयं कागं ह्येला? आरं हा~ड की" 'मुंगी बिंगी आसल तर बगावयं कुटं" "काय बाई, ह्या बायांचं आजिबात ध्यान नसतयं गय" "ई~या, ई~या" "भया, आण्णा हायतं का बघ रं कुटं, त्येंच्याकडं गेल्यावर ऱ्हायलतरी" "आण्णा, बाळ रडतयं" "आरं त्येला जरा मोकळ्या पटांगणातनं फिरवा रं, कदीपस्न सांगतुय, बाया आयकतचं न्हायत्या" "आणा की मग तुमीच फिरवुन" "माणुस बसलयं त्यला बसु बी द्यायचं न्हाय, ये भया, आण रं त्यला फिरवुन" "ऊं, लय जड हाय" "ई~या, ई~या" "ये भया ह्येज्या आयलाच बुलीव रं, न्हाय ऱ्हायचं आसं" "आणा हिकडं, काय देवा, काय कालवा लावलाय ह्येनं, कुणासठाव" "आयवं, तुमाला बगीतलं की लगीच गप बसलं बगा" "व्हय त्येला सारखी आयच लागती" 'भया तीवढी सतरंजी हातरं रं, झोप लागलीय बग ह्येला, हितच झोपवती आता" "सावलीत टाक गय त्येला, तोंडावर पांघरुन नगु घालू" "वैनी, मी जावका खेळाय?" "आरं बसकी ह्येज्याजवळ, माश्या बसत्या त्या रं तोंडावर, आलीच मी यीवढी भांडी धुन" . . . . . "उ~...उ~" "य्या~...." "अीही ~ अीही ~ अीही..." "ई~या, ई~या, ई~या" "वैनी, पोरगं रडतयं"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
3245 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

हहपु झाली.:))

शिव कन्या
Sat, 11/14/2015 - 23:26 नवीन
हहपु झाली.:)) तंतोतंत चित्र उभे केलेत. आवडले.
  • Log in or register to post comments

हा हा!

पैसा
Sat, 11/14/2015 - 23:52 नवीन
छान लिहिलंय!
  • Log in or register to post comments

मस्त जव्हेरगंजभौ!

मांत्रिक
Sun, 11/15/2015 - 11:36 नवीन
मस्त जव्हेरगंजभौ! लहान मूल खेळत असेल तर प्रत्येकजण लगेच घेतो, पण रडू लागल्यावर मात्र आईच घेते त्याला.
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Sun, 11/15/2015 - 11:40 नवीन
:)
  • Log in or register to post comments

घरोघरी मातीच्या चूली....

मुक्त विहारि
Sun, 11/15/2015 - 11:43 नवीन
मांत्रिक म्हणाले, त्याला अनुमोदन... "लहान मूल खेळत असेल तर प्रत्येकजण लगेच घेतो, पण रडू लागल्यावर मात्र आईच घेते त्याला."
  • Log in or register to post comments

:)

नाव आडनाव
Sun, 11/15/2015 - 11:45 नवीन
:)
  • Log in or register to post comments

.

जव्हेरगंज
Sun, 11/15/2015 - 12:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जव्हेर भौ

बाबा योगिराज
Sun, 11/15/2015 - 13:16 नवीन
परत एकदा, मान गए उस्ताद. भेष्टच लिव्लै. असच लिवत रावा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा