✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घोरणारा आत्मा.........

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
गुरुवार, 11/12/2015 - 19:16  ·  लेख
लेख
घोरणारा आत्मा......... "कांदे पोहे" चा रीतसर कार्यक्रम झाला.. मंदार ला वसुधा पसंत पडली.. मंदारने होकार कळवला व साखरपुडा झाला.. लग्नाची तारीख ठरली व वसु च्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली.. मंदार नगर पालीकेत लीपीक म्हणुन काम करत होता..सरकारी नोकरी.शांत नीवांत जीवन..२ रुमचा स्वत:चा फ्ल्याट होता.. मंदार ला आई वडील नव्हते.. वसु त्याला मना पासुन आवडली होती.. भेटी गाठीत मंदार चा शांत स्वभाव वसुला आवडला. त्याच्या बोलण्यात तीचा जीव गुंतु लागला.... व एक नाजुक प्रेमबंध जमु लागला होता... एकदा फीरायला जात असताना वसुला तीचा जुना शाळकरी मित्र भेटला व वसु त्याच्याशी गप्पा मारु लागली..ब~याच वेळ गप्पा चालल्या होत्या... तिचा गप्पा मारण्यातला मोकळेपणा व देहबोली मंदार ला अस्वस्थ करत होती.. तो गेल्यावर मंदारने वसु जवळ आपली नाराजी व्यक्त केली व लग्नापुर्विची मैत्री नाति संपव असा आग्रह धरला. वसुस मात्र हे रुचत नव्हते..मैत्री वर त्याने घेतलेला आक्षेप तिला खटकत होता... ती बोलायला लागली पण मंदार ने तिला थांबले व स्पष्ट शब्दात सांगीतले कि हे त्याला चालणार नाहि..अशी मैत्री नाति..लग्नानंतर संसारात वादळे निर्माण करतात ..त्या मुळे हे असे नकोच..... बोलताना मंदार च्या आवाजात एक सुप्त जरब व धार होति.. वसु काहि बोलाली नाही.."ठिक आहे" असे म्हणत तिने विषय संपवला... घरी अल्यावर आई जवळ बोलताना आईने सांगीतले की पुरुष काहि दिवस असेच असतात .एक मुल झाले व संसारात रुळली कि सारे ठिक होईल... . १-२ दिवसानी कॉफि पिताना मंदार म्हणाला..माझ्या परवाच्या बोलण्याचे वाईट वाटुन नको घेवुस..तु मला खुप आवडते..मी तुझ्या बाबतित खुप पझेसिव्ह आहे..." वसुधा काहि न बोलता नुसतिच हसली. . लग्न झाले व वसु संसाराला लागली... मध्यरात्रीची वेळ असेल कसल्या तरी आवाजाने तीला जाग आली... शेजारी झोपलेलेला मंदार तारस्वरात घोरत होता..मुळात रुम लहान त्यातुन मंदार चे घोरणे टिपेला पोहोचले होते.. भयानक जोरात घोरत होता तो.. वसुने त्याला गदागदा हलवत उठवले...मंदार अर्धवट झोपेत होता उठला... "अहो तुम्ही किति मोठ्या आवाजात घोरत आहात" ती म्हणाली... हो का?" असे म्हणत मंदार पुन्हा झोपला... श्वासाने लय पकडली अन त्याचे घोरणे पुन्हा सुरु झाले. वसुने ति रात्र जागुन काढली..तीला बाहेरच्या खोलित झोपावेसे वाटत होते..पण तिथ पर्यंत तो आवाज पोहोचत होता.... . सकाळी चहा घेताना वसु ने मंदार जवळ घोरण्याचा विषय काढला... ऐकताच मंदार म्हणाला " खर सांगु..अत्ता पर्यंत मी एकटाच झोपत होतो त्या मुळे मी घोरतो हे कुणी मला सांगीतलेच नाहि..पण आता काय करायचे??वसु मला माफ कर पण मी तरी काय करु? झोपेत मी काय करतो ते मला समजत नाहि..मात्र तुला त्याचा त्रास होतो हे ऐकुन मला ओशाळल्या गत होत आहे" वसु ने त्याचा कडे पाहिले त्याचा बोलण्यात एक निरागस पणा होता... "ओके हरकत नाहि मी बघते काय करायचे ते.." वसु म्हणाली. वसुने हि गोष्ट जवळच्या लोकाना सांगीतली..व तिला क्लु मिळाला. डॉ.स.दा.झोपे.. हे डॉ यावर उपाय करतात असे तिला समजताच तिने डॉ ची ऍपोइंट्मेन्ट घेतली. डॉ मंदार ला तपासले व एक आठवड्याची औषधे दिली... " तुम्ही हि औषधे घ्या बहुतेक गुण येईल पण आला नाहि तर आपल्याला एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल..आणी हो उगीच टेंन्शन घेऊ नका..किरकोळ आजार आहे..सर्वानाच कमी जास्त प्रमाणात हि बिमारी असते" आठवड्यात फारसा गुण आला नाहि व पुढच्या आठवड्यात ऑपरेशन करावयाचे ठरले... . मंदार डॉ कडुन परस्पर कामाला गेला..मंदार ने खळखळ न करता ऑपरेशनला तयारी दाखवल्या मुळे वसु पण खुष होति..आज सायंकाळी तिने " मसाला डोसा" चा बेत ठेवला होता.. मसाला भाजी तयार होति..डोश्याचे बॅटर पण तयार होते वाटीभर लोणी तिने फ्रिज मधे ठवले होते..मंदार आला कि गरमागरम डोसे तयार करायचे असा बेत ठरला होता.. . ५ वाजुन गेले तरी मंदार चा पात्ता नव्हता..ति मंदार ची वाट पहात बसली ६ वाजले अन वसु अस्वस्थ झाली तिने मंदार ला फोन लावला पण लागला नाहि.. बहुतेक काम असेल असा तिने विचार केला.... तेव्हढात फोन ची रिंग वाजली तिने फोन घेतला व फोन वर एक अनोळखी आवाज आला तो म्हणत होता कि "तुम्हा मंदाच्या घरचे आहात का? हो मी मंदार चा बायको बोलत आहे" वसु उत्तरली. मग ऐका मंदार ला अपघात झाला आहे त्याना ट्रक ने ऊडवले आहे..आम्हि त्याना "सिटी दवाखान्यात" आणले आहे व ते रुम नं १०५ ला ऍडमिट आहेत.." बातमी ऐकताच वसुच्या पायातले बळ गेले..तिने आइला फोन केला व त्या दोघीजणी दवाखान्यात पोहोचल्या.. मंदार बेशुद्ध अवस्थेत होता..सलाईन प्राणवायू..रक्ताच्या नळ्या लावलेल्या दिसत होत्या..अंगावर ब्यांडेज दिसत होते.. चौकशी करता कळाले मंदार ला एका ट्रक ने उडवले होते..डॉ म्हणाले आत खुप जखमा झाल्या आहेत..आत रक्तस्त्राव चालु आहे.. देवाची प्रार्थना करत वसु रुम च्या समोर असलेल्या खुर्चीवर बसली.. . रात्रीचे १२ वाजायला आले होते..शारिरीक धावपळ..मानसिक ताण या मुळे वसु थकली होति.. व तिचा डोळा लागला... "ताई ऊठा असे नर्स म्हणत असल्याचे तिला वाटले व ति पटकन उठली..समोर नर्स उभी होती..ती सांगत होती..."पेशटला वाचवु शकलो नाहि..आता पेशट आपल्यात नाहि" वसु ची झोप खाडकन उडाली..समोरच्या रुमच्या काचेच्या खिडकित वॉर्ड बॉय मंदार च्या शरीरातुन सुया बाहेर काढत असल्याचे तिने पाहिले...खेळ संपला होता.. तिने आईला फोन लावला आई व ईतर जण आले..कागद पत्रांची पुर्तता केली बिल भरले व मंदार ची बॉडी ताब्यात मीळाली.. . क्रीयाकर्मे आटोपली व वसु माहेरी रहावयास आली..मंदार च्या खोलिला कुलुप लागले होते... . काळ पुढे सरकत होता..वसु पण भानावर आलेली होति.. आईने संधी साधत वसु जवळ लग्नाचा प्रस्ताव ठेवला.. वसु काहिच बोलली नाहि व तिचे मौन हीच संमती समजत आईने स्थळे पहाण्यास सुरवात केली शेखर बिजवर होता... कंपनित नोकरी होति..व त्याला वसु पसंत पडली. लग्न झाले अन वसु सासरी नांदु लागली. शेखरच्या घरात भाऊ बहिणी भाऊ सासरे असे मोठे खटले होते.. सासुचा स्वभाव विचित्र होता..तिचे अन वसुचे जमेना..शेजारी गप्पा मारताना वसु स समजले कि मृत सुनेला पण हिने खुप छळले होते.. वसु ने शेखर शी बोलताना त्याला सारे सांगीतले..त्याला हि आईचे वागणे खटकत होते.. वसुने जुन्या मंदार च्या घरी रहाण्याबद्दल शेखर ला सुचवले..व त्याने पण प्रस्ताव मान्य केला.... सासुला तर असे हवेच होते.."सुंठी वाचुन खोकला गेला होता... . वसु शेखर चा संसार सुरळीत सुरु झाला. त्या रात्री शेखर लवकर झोपी गेला होता वसु वाचत बसली होति.. शेखरचा मंद श्वास चालु होता घोरणे अजिबात नव्हते.. वाचन झाल्यावर वसुने दिवा मालवला अन ति पण झोपी गेली . रात्री साधारण १२-१२.३० चा सुमार असेल.. तिला प्रचंड गारवा जाणवु लगला.. वसु उठली अन तिने खिडकी उघडी आहे का पहाण्यासाठी नाईट ल्यांप लावला. खिडकी बंद होति.. वळताच तिला एक भयाण आकृति समोर दिसली बेडच्या आगदी जवळ... तिने दिवा लावला अन समोर मंदार उभा होता. त्याचा चेहरा रक्ताने माखला होता जखमातुन रक्त गळत होते.. तो म्हणाला " वसु मी जरी जगात नसलो तरी माझा आत्मा तुझ्या भोवति घुटमळत आहे..तुझ्या शिवाय मी राहु शकत नाहि..माझा आत्मा मुक्त होणार नाहि..तुझा सहवास लाभावा म्हणुन मी शेखरच्या शरीरात आपला आत्मा प्रवेशत आहे.." वसुची पाचावर धारण बसली..मंदार चे ते भेसुर रुप पाहुन .... तिने पाहिले मंदार रडत होता..डोळ्यातुन रक्ताचा पुर वहात होता.. "मी शेखर च्या देहात जात आहे" असे म्हणत ति आकृति नाहिशी झाली. . तिने घाबरलेल्या स्थितित शेखर कडे पाहिले तो शांत झोपला होता.. क्षणात शेखर किंचाळुन उठला..व परत झोपी गेला. वसु ने ओळखले की मंदारच्या आत्माने शेखर च्या शरीराचा ताबा घेतला आहे.. ति शेखर कडे पहात होती..हलकेच श्वासाची लय वाढल्याचे तिच्या ध्यानात आले व शेखर घोरु लागला. काहि क्षणंआत त्याच्या घोरण्याचा आवाज टिपेला पोहोचला.. वसु ला काय करावे ते समजेना.तश्या आवस्थेत पण तिला डॉ.झोपे ची आठवण आली.. पण तिला उमगले शेखरच्या शरीरात काहिच दोष नाहि.. घोरण्याचा आवाज मंदार चा आत्मा काढत होता...अन आत्म्याचे ऑपरेशन कसे करणार... ह्या विचारने वसु कोसळली..व हवालदिल झाली..तिला रडु फुटले मात्र बाजुस झोपलेला शेखर तारस्वरात घोरत होता..आवाजाने खोली दणाणुन गेली होती .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
10577 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

अकु,तुम्ही सिक्वेल लिहयला

नूतन सावंत
Fri, 11/13/2015 - 18:14 नवीन
अकु,तुम्ही सिक्वेल लिहयला घ्याच.पण मिपावर टाकण्याआधी पूर्वपरीक्षण करा. शुद्ध्लेखनाकडे लक्ष द्या प्लीज.डोळे फार ठेचा लागतात हो.
  • Log in or register to post comments

ओके

अविनाशकुलकर्णी
Fri, 11/13/2015 - 18:29 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

कशांस बदनाम करितां आत्म्यांस बरें ...!

गामा पैलवान
Fri, 11/13/2015 - 18:26 नवीन
कथा वाचून वाटलं की आत्मा ज्याम बदनाम शब्द झालाय. खरंतर भूत, पिशाच्च, लिंगदेह, वासनादेह असे अनेक पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. आत्मा हा शब्द उगीच वापरलेला वाटतो. आत्मा उपाधीविरहित आहे. तो इकडून तिकडे जात बित नसतो. ज्याचं संक्रमण होतं त्याला लिंगदेह म्हणतात. आत्मा नव्हे. -गा.पै.
  • Log in or register to post comments

'भयरसाचिया घरी हास्यरस आलासे

सायकलस्वार
Fri, 11/13/2015 - 19:05 नवीन
'भयरसाचिया घरी हास्यरस आलासे पाहुणेरा' अशा या क्रांतिकारी धाग्यावर मिपाकरांनी दिलेले बालिश प्रतिसाद वाचून मिपाकरांचे मानसिक वय कमी आहे याची पुन्हा खात्री पटली. डिस्क्लेमर - हा प्रतिसाद मी दिलेला नसून भुस्कुटेबाईंच्या आत्म्याने माझ्या शरीरात शिरून लिहिला आहे.
  • Log in or register to post comments

तार्किक प्रश्न

मित्रहो
Fri, 11/13/2015 - 19:21 नवीन
जर मंदारचा आत्मा शेखरच्या शरीरात गेला तर शेखरचा आत्मा कुठे गेला.त्या लोण्याच्या गोळ्यात दडून फ्रिजमधे तर नाही बसला. उद्या मुलबाळ झाली तर कुणाचे आडनाव लावनार. बहुतेक शेखरचे कारण आत्म्याला मुल होत नाही असे ऐकले. रक्तबंबाळ आत्मा शेखरच्या शरीरात गेला, जर आत्म्याला शरीर नसते तर रक्त कसे. शेखर आणि मंदार यांचा रक्तगट एकच होता का.
  • Log in or register to post comments

baki सगळा जाऊ द्या

सागरकदम
Fri, 11/13/2015 - 20:46 नवीन
मसाले डोसे एकदाचे बनवून टाका ,खराब होईल naahiter
  • Log in or register to post comments

रामसेपटांची आठवण आली..

Maharani
Fri, 11/13/2015 - 21:05 नवीन
रामसेपटांची आठवण आली..
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

गामा पैलवान
Sat, 11/14/2015 - 03:35 नवीन
रामसेपटांची पटकथा थोडक्यात आटोपल्यासारखी वाटते आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Maharani

अकुंचा आयडी आत्म्याने हायजॅक

मदनबाण
Fri, 11/13/2015 - 21:06 नवीन
अकुंचा आयडी आत्म्याने हायजॅक केलेले आहे, अकु २-४ ओळी आणि प्रश्नमंजुषा करण्या पलिकडे जात नाहीत ! हे बहुतेक हा लेख पाडणार्‍या आणि आयडी हायजॅक करणार्‍या आत्म्याला ठावूक नसावे ! हा ;- ५० वा बरं का मंडळी. ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh
  • Log in or register to post comments

:))))

शिव कन्या
Fri, 11/13/2015 - 23:49 नवीन
:))))
  • Log in or register to post comments

भन्नट

चिरोटा
Sat, 11/14/2015 - 00:25 नवीन
भन्नाट.कथा वाचताना शाळकरी मित्र ट्रकवाला असेल असे वाटले होते.
  • Log in or register to post comments

बाकी ६.०० वजता घोरनारा..

पीके
Sat, 11/14/2015 - 00:39 नवीन
आत्मा अत्रूप्तच असनार..
  • Log in or register to post comments

अश्लील अश्लील

सागरकदम
Mon, 11/23/2015 - 20:38 नवीन
अश्लील अश्लील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीके

बेष्ट...

पीके
Sat, 11/14/2015 - 00:47 नवीन
हेच म्हनलोतो..
  • Log in or register to post comments

अकुंना

नाखु
Mon, 11/16/2015 - 16:00 नवीन
हा अभिप्राय आम्च्याकडून. बाकी सध्या आत्माबदल योजना कशी चालू आहे,ग्रुप बुकींगला काही सवलत वगैरे आहे काय.
  • Log in or register to post comments

नशीब की मंदारला फक्त

प्रसाद गोडबोले
Mon, 11/16/2015 - 16:24 नवीन
नशीब की मंदारला फक्त घोरायचाच त्रास होता =))))
  • Log in or register to post comments

विनोदी कथा आवडली.

अभिजीत अवलिया
Mon, 11/23/2015 - 21:22 नवीन
विनोदी कथा आवडली.
  • Log in or register to post comments

बाकी आत्मा अत्रूप्तच असनार..

शित्रेउमेश
Tue, 11/24/2015 - 11:56 नवीन
बाकी आत्मा अत्रूप्तच असनार..
  • Log in or register to post comments

मला ही कथा लय म्हणजे लयच

मृत्युन्जय
Tue, 11/24/2015 - 12:23 नवीन
मला ही कथा लय म्हणजे लयच आवडली. मी किमान मिनिटभर तरी पोट धरधरुन हसत होतो. शेवटचा पंच काय भारी जमलाय. आधी अकुंची कथा म्हणुन मी सोडुन द्यायचा विचार करत होतो पण शेवटपर्यंत वाचल्याचे चीज झाले. ही कथा एकदम खतरनाक विनोदी आहे
  • Log in or register to post comments

अकुंनी मोजी लेव्हल गाठली..

बाळ सप्रे
Tue, 11/24/2015 - 14:39 नवीन
अकुंनी मोजी लेव्हल गाठली..
  • Log in or register to post comments

ओ अकु, मलापण बर्‍याच

खटपट्या
Tue, 11/24/2015 - 15:41 नवीन
ओ अकु, मलापण बर्‍याच लोकांच्या शरीरात जायचे हाय. कसे जायचे?
  • Log in or register to post comments

रात्री ? लबाद्ड

सागरकदम
Tue, 11/24/2015 - 16:41 नवीन
रात्री ? लबाद्ड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा