एका बोक्याची गोष्ट -१
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आमच्याकडे तीन वर्षापूर्वी मार्जार घराण्यातील एका राजपुत्राचे आगमन झाले.
शुभ्र पांढरा रंग आणि पाठीवर व शेपटीवर केशरी रंग.
फोटो टाकायचा आहे पण कसा टाकू ते समजत नाहीय.
असो...
तर या राजपुत्राचे म्हणजे आमच्या बोक्याचे स्वभाव वैशिष्ट्य जरा वेगळे आहे.
म्हणूनच मी सुरूवातीला त्याचा राजपुत्र असा उल्लेख केला.
त्याचा मूड सारखा बदलत असतो.
खाणे-पिणे, झोपणे, खेळणे, लाडात येणे या सगळ्याच बाबतीत त्याचं वागणं हे इतर मांजरांपेक्षा खूप वेगळं आहे..म्हणूनच ते तुम्हाला सांगावं असं वाटतयं..
चला तर मग सुरूवात करूया...
१. लहानपणी आमचा हा राजपुत्र दूध पित नसे...तर नुसती भाकरी खात असे... फक्त भाकरीआणि पाणी.
याचं कारण म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्याने दूध प्यायले होते तेव्हा त्याला उलटी झाली होते.
आपल्याला ज्या गोष्टी पचत नाहीत त्या न खाण्याचे उपजत ज्ञान त्या पिल्लाकडे होते. जवळजवळ ६ महिने त्याने दुधाला तोंड लावले नाही.
अजून बरेच लिहायचे आहे.. पण बोक्याला भूक लागली आहे.गेलच पाहिजे...
प्रतिक्रिया
वाचन खुण साठवली आहे.
वा!
घरातलेच कोणी आले असेल परत....
धन्यवाद
हा आमचा गुड्डू ......
पुणेरी भाव आहेत चेहर्यावर =))
ख्या ख्या ख्या...
कसला मस्त बोका आहे. एक नंबर
या आमच्या बोक्याला सोमवारी
पुढील भागाच्या प्रतीक्षेत...
हि माझी माऊ
अजून लहान आहे..पण मस्त आहे ..
;)
मला आधी वाटलं की ....
काय बगितल्यावर?
अश्लील अश्लील
माझ्याकडे पण २ राजकन्या आहेत