Skip to main content

अंजीर बर्फी

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 12/11/2015 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः सुकामेवा = १ कप सुके अंजीर = १५-२० (४ तास पाण्यात भिजवुन) खजुर = ७-८ तुप = ३ चमचे वेलची पावडर = १ छोटा चमचा जायफळ पावडर = १ छोटा चमचा कृती: १. एका पॅनमधे सुकामेवा मंद गॅसवर परतुन घ्यावा. b1 २. मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे. b2 ३. मिक्सरमधे सुकामेवा बारीक करावा. (खाली फोटोत दाखवल्याप्रमाणे) b3 ४. पॅनमधे ३ चमचे तुप गरम करुन त्यात वाटलेले अंजीर व खजुर परतुन घ्यावे. b4 ५. सर्व मिश्रणाचा गोळा होईपर्यंत परतावे. गोळा तयार झाल्यावर त्यात बारीक केलेला सुकामेवा टाकुन एकत्र करुन घ्यावे. थोडासा सुकामेवा वरुन सजावटीसाठी बाजुला काढुन ठेवावा. b5 ६. एका खोलगट पॅनला तुप लावुन त्यात हा गोळापारुन घ्यावा. ७. वरुन अजुन थोड्या सुक्यामेव्याने सजवुन बर्फी फ्रिजमधे सेट होण्यासाठी ठेवावी. b6 ८. ३-४ तासानी पॅन बाहेर काढुन त्याच्या वड्या पाडुन घ्याव्यात. b7 ९. अंजीर बर्फी खायला तयार आहे. b8 b9 सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

वाचने 9734
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

मिपावर आता मिठाई पार्सल सेवा सुरु करण्यात यावी ! :) मिक्सरमधे भिजवलेले अंजीर आणि खजुर बारीक वाटुन घ्यावे. अंजीर सोलुन मग पाण्यात भिजवलेले दिसत आहेत... पण नक्की किती वेळ भिजत घालावेत ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ किजिए... :- Sanam

In reply to by मदनबाण

नाही..जसे होते तसेच डायरेक्ट गरम पाण्यात भिजवले. ते भिजल्यामुळे पांढरे दिसतायत.

In reply to by Mrunalini

ओह्ह... ओक्के. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आ के तेरी बाहों में, हर शाम लगे सिंदूरी... :- Vansh

देखणी, तोंपासू पाककृती मृ. अंजीर, खजुराचा गोडवा पुरेपुर या पाकृत उतरलाय. साखर अजिबात न घालता पौष्टिक पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद :) मी ती फराळाची प्लेट पळवली आहे ;)

बिनसाखरेच्या पण अतिशय आकर्षक दिसणार्‍या पाककृतीसाठी मनःपूर्वक धन्यवाद. सादरीकरण एकदम खास आहे.