Skip to main content

पुणे भेट

लेखक अद्द्या यांनी बुधवार, 11/11/2015 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी सुट्टी असून सुद्धा काम देतात च्यायला . लाज लज्जा शरम सगळं विकून आलेत हे लोक. कॉम्प ऑफ आणि एक्स्ट्रा पे ची लालूच दाखवून काम करवून घेतात . आणि आम्ही त्याला बळी पडलो . पण जाऊदे . संपलीच दिवाळी . तर , मुद्दा असा कि लैच कटाळा येतोय . आणि कोकणात जाण्यास सोबती मिळत नाहीये . पण बेळगावातून बाहेर पडायचं आहे , आणि पुण्याशिवाय दुसरी जागा सुचत नाहीये . त्यामुळे , पुढल्या रविवारी(म्हणजे २२ नोवेंबर ला ) पुण्यात येणे होईल . होऊन जाऊद्या एक कट्टा . काय म्हणता ?? वेळ :- सकाळी ५ - ६ दरम्यान पोचेन . आणि रात्री ९.३० ला "ऐरावत" आहे बेळगाव साठी स्वारगेट होऊन , यामधल्या वेळात कधीही भेटण्याचे ठरवावे . स्थळ :- नदीच्या अल्याड पल्याड कुठेही चालेल , जिथे कुठे बस / रिक्षा सहज पोचू शकेल अशी कोणतीही जागा . कार्य :- भरमसाठ गप्पागोष्टी आणि नंतर जेवण (शाकाहार मांसाहार काहीही चालतो ) काही ठरत असेल तर कळवा लोक्स . . टीप : नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुण्यात होणाऱ्या कट्ट्या साठी कमीत कमीत ३ धागे काढावेत अशी सूचना होती . पण ती पाळली जाणार नाही . मला कोणीच फारसं ओळखत नाही . पण सगळ्यांना भेटण्याची लैच इच्छा आहे मला . सो वेळ काढा

वाचने 8871
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

२२ तारखेला तसाही पुणे कट्टा होणार आहेच. टिळक स्मारकला ओरिगामी कलाप्रदर्शन आहे. मुंबईहून नूलकर काका येत आहेत. त्यामुळे पुणेकर मंडळी भेटतीलच.

In reply to by पीके

कुंदाला ? नको . .लग्न झालाय तीच आता . मारेल घो तिचा =]]

मी येईन....मुंबैहून कोणी गाडीवाले जाणार अस्तील तर माझे पार्सल उचला मधे* :) *आणि परत आणून पण पोचवा :D

बरबेक अनूत्तेन.. यल्ली अदु हेळ्लबेकु.म

आमच्या दत्तक मुलीच्या, (लिलीच्या), मित्र-मैत्रीणींचे स्नेह-संमेमी, डोंबोलीला, असल्याने, मी येवू शकत नाही. नुलकर येत असल्याने, ओरिगामी कट्टा जोरदार होणार... कट्ट्याचा वृत्तांत टाकालच आणि तो फोटोसहितच असेल ही खात्री आहे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पन्नास पर्यंत पोचला नाही आणि तुला दुस्रयाची काळजी !!! अद्याने काहीतरी भव्य"दिव्य"केले तर आणि तरच तो तिसर्या धाग्यापर्यंत पोहोचेल.
बाराच्या गावात चौदावाला नाखु

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

हे असं करतात इथले जुने लोक . नाव लेखकांना एक धागा पण नीट पाडू देत नाहीत . . आणि त्यातली सूचना न वाचताच "दुसऱ्याची" मागणी करतात

ह्या धाग्याचे औचित्य साधून पुढ्ल्या महिन्यात आमची भारतवारी नक्की झाली आहे. ह्यावेळी खास पुण्यात येउन मिपाकर दोस्त मंडळींच्या सोबत कट्टा करायला बेत आहे. तारीख लवकरच कळवेल, तारखांचे दोन पर्याय तरी नक्की सुचवेल ,आम्ही त्यावेळी रिकामटेकडे असणार असल्याने पुणेकरांच्या सोयीनुसार स्थान व वेळ नक्की करू.भारतात आलो कि जन्म गावी डोंबिवली मध्ये येणे मस्ट तेव्हा एक कट्टा तेथे तर तिसरा कट्टा ठाणे किंवा मुंबई कुठेही मिपाकरांच्या सोयीनुसार करूया. आपण कुठेही येउन काहीही खायला पायाला तयार असतो. खाणे पिणे जगणे हा आमच्या व्यवसायाचा भाग म्हटले तर जीवनशैलीचा भाग आहे. आगामी पुणे कट्यासाठी आगामी शुभेच्छा

लेका हा धागा पन्नास प्रतिसादी करता येईना आणि कसला कट्टा करतो,चिमण बघ किमान ५० च्या खाली एकही धागा टाकत नाही. मला शिक्रेट नाही तुला सांगीतले तर बघ जरा. बाकी कट्ट्याला शुभेच्छा !!!!!