चीनमधील "अकेले अकेले" - आज आहे ११/११
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आज आहे ११/११ - चीन मधील एक महत्वाचा दिवस, आणि बहुतेक जगात इतरत्र कुठेही "साजरा" न होणारा दिवस (निदान चीन मध्ये होतो तितक्या जोरात) !
तुम्हालाही बहुतेक माहीत नसेल आज चीनमध्ये काय धमाल होते आहे - तेव्हा सांगतो.
चीनमधील "अलिबाबा" या अंतर्जालावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या (आणि सेवा देणाऱ्या) उद्योगसमूहाने २००९ साली "११/११" (११ नोव्हेंबर) हा दिवस "single's day" (त्यातील अनेक "१" आकड्यांवर जोर देत) जाहीर करून सर्व एकट्या स्त्री पुरुषांना त्या दिवशी, स्वतः करता, इतर एकट्या स्त्री पुरुषांना भेट देण्याकरता किंवा (एकटे पणातून सुटकेच्या प्रयत्नांत) इतरांना भेट म्हणून अंतर्जालावर खरेदी करण्यास उद्युक्त करून अनेक तऱ्हेच्या - कपडे,खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने तसेच (अर्थात महागाच्या) electronic/electrical वस्तू - आकर्षक योजना आणि मुख्यतः किमतीत कपात जाहीर करून हा दिवस भरघोस खरेदीचा करून टाकला.
आता चीनमध्ये या दिवशी valentine's day पेक्षाही जोरदार विक्री होते हा अनुभव आल्याने या एक दिवसाच्या तयारीत अनेक कंपन्या, वस्तूंचे निर्माते, जाहिरातदार, साठा आणि वाहतूक करणारे असे अनेक हौशे, नवशे आणि गवशे जगभरातून सामील होतात.
अलिबाबा यांचा मागील वर्षीचा अनुभव आणि या वर्षीची तयारी अशी
- २०१४ साली या एका दिवशी अमेरिकन डॉलर ९३० कोटीची एकूण विक्री झाली.
- ही विक्री अमेरिकेतील "cyber Monday" (१) आणि "black Friday" (२) या दोन्हीही दिवशी मिळून होणाऱ्या विक्रीपेक्षा जास्त होती (साधारण चौपट).
- या विक्रीतील ४२.६% व्यवहार mobile device वरून सुरू केला गेला. (२०१३ साली २१ %).
- या विक्रीकरता २७.८ कोटी बटवड्याचे व्यवहार झाले.
- या विक्रीकरता प्रत्येक सेकंदाला ८०,००० मागण्यांची नोंद केली जाऊन त्यांच्याकरता लागणार माल पाठवला गेला आणि पैसे वसूल केले गेले.
- २०१५ साली अमेरिकन डॉलर ११३० ते १२०० कोटीची विक्री अपेक्षित आहे.
- २०१५ साली २५ देशातील ४०,००० उत्पादक त्यांची ६० लाख उत्पादने "अलिबाबा" मार्फत विकत आहेत.
- या विक्रीतील ६५% व्यवहार mobile device वरून अपेक्षित.
- २०१५ साली या एका दिवशी (म्हणजे आज) पहिल्या दहा मिनिटात अमेरिकन डॉलर १०० कोटीची एकूण विक्री झाली.
- २०१४ साली याच विक्रीला तासभर लागला असल्याने कदाचित यावर्षी सगळेच अंदाज चुकीचे ठरून अपेक्षेपेक्षा अधिकच विक्री होणे शक्य.
आता या सगळ्याचे कसे बरे वर्णन करावे - अवाढव्य, अजस्र, अक्राळ विक्राळ की इतर काही ? लौकरच आजचा "अलिबाबा"चा स्कोअर कळेलच आणि मग ठरवा !
जिज्ञासुनी जास्त माहिती करता पाहावे -
http://www.bloomberg.com/news/articles/2015-11-09/why-singles-day-in-china-is-bigger-than-cyber-monday
http://www.bloomberg.com/news/videos/2015-11-11/mobile-shopping-to-lead-single-day-idc
http://www.bloomberg.com/news/videos/2015-11-11/singles-day-shopping-spree-behind-the-numbers
http://www.alibabagroup.com/en/ir/article?news=p151109
(१) "thanksgiving" (नोव्हेंबरमधला चौथा गुरुवार) नंतरचा पहिला सोमवार . या दिवशी अंतर्जालावर होणाऱ्या खरेदीत प्रचंड सूट असते.
(२) "thanksgiving" (नोव्हेंबरमधला चौथा गुरुवार) नंतरचा पहिला शुक्रवार . या दिवसापासून नाताळची खरेदी सुरू होत असल्याने दुकानात "खास किंमत" असते.
या दोन्ही दिवशी खरेदीची झुंबड असते.
प्रतिक्रिया
चीन मध्ये नाहीतर
सिंगल्स डे
मार्केटिंगचे जग आहे हे... आणि
म्या केल शाॅपिंग आज, अता, एक
ताजा कलम