Skip to main content

सा रे ग म लिटील champs ही स्पर्धा कोण जिन्केल?

लेखक गीत
मंगळवार, 16/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 2674
प्रतिक्रिया 56

प्रतिक्रिया

अवंती, कार्तिकी, शाल्मली, रोहित यांना का वगळले? -(गोंधळलेला) ऋषिकेश

इतर हा पर्याय का ठेवला नाही? मी हा कार्यक्रम बघत नाही / बघू शकत नाही, म्हणून मी मतदानापासून वंचित रहावे काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सा रे ग म लिटील champs ही स्पर्धा कोण जिन्केल?
ज्याच्या पंचम स्थानी गुरू .. अष्टकात चंद्र असेल .. बुध जोरजोरात उड्या मारत असेल .. आणि शनी-मंगळ यांची नुकतीच युती होउन ते सरकार स्थापण करणार असतील ... तोच्च ही स्पर्धा जिंकेल ! - रॉकीपंत मै जिंदगी का साथ निभाता चला गया ! हर फ़िक्र को धुए में उडाता चला गया !!

In reply to by टारझन

१. कौल आवडला २. मस्त लिहीलंय ३. पु.कौ.शू. ४. चौथा ऑप्शन आवडला ५. फारच मार्मिक लिहीलंय ६. आपल्या कौलात स.ग. दिसले ७. मागील कौलांपेक्षा हा कौल उत्तम जमला आहे ८. ह्म्म्म .. मस्त भट्टी जमलीये ... येउन द्या अजून ९. कौल छानच आहे... आत्ता काढतो मीपण घरी जाऊन १०. कौल के व ळ अ प्र ति म ११. दरवेळी कौलाची स्तुती करून बोटं दुखली १२. कसं काय सुचतं बुआ आपल्याला एवढे भारी कौलायला ? आम्हाला आपला जाम हेवा वाटतो १३. फारच विचार करायला लावणारा कौल आहे ... आतापर्यंतच्या कौलां मधला बेष्ट. १४. जिंकलंस मित्रा ... तोडलंस .. पार चेंदामेंदा केलास ... १५. सहमत , +१ , असेच म्हणतो .

In reply to by टारझन

आता घराला आन गोठ्याला कौल लावावे कि पत्रा? मला वाटत स्लॅब लईच महाग पर्याय आहे. पत्रा आपला स्वस्त. प्रकाश घाटपांडे

प्रथमेशने जिंकावे असे वाटत आहे. अर्थात बाकीची मुलेही कमी नाहीत. पण प्रथमेशचे अवघे गरजे पंढरपूर आणि मागच्या भागात म्हटलेला नामदेवांचा अभंग फार थोर होते. (येथे कार्तिकीला का वगळते ते कळत नाही. मला ती प्रथमेशइतकीच प्रॉमिसिंग वाटते आहे. ) आर्यानेही 'अहो सजणा.... दूर व्हा ना... दूर व्हा ना.... जाऊ द्या' काय म्हटले होते. आपला, (सांगितिक) आजानुकर्ण मंगेशकर

In reply to by आजानुकर्ण

आर्याने गायलेल्या (पल्लवीच्या भाषेत 'म्हटलेल्या') अवघा रंग एक झाला आणि रोहितने गायलेल्या (पल्लवीच्या भाषेत 'म्हटलेल्या') अबीर गुलाल उधळीत रंग या रांगिक अभंगांमुळे स्पर्धेला वेगळाच रंग येत आहे व ही स्पर्धा एकतर्फी होणार नाही असे वाटू लागले आहे. आपला (रंगीत) तौफिक आजानुकर्ण

कार्तिकीलाही वाव आहे. मी प्रथमेशला मत दिले आहे. टारझना, तुझ्या १५ पर्यायामध्ये "कौलात 'इतर' पर्याय नाही" हा पर्याय नाही की रे!

In reply to by कवटी

एकदम खरा / सत्य प्रतिसाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

१)प्रथमेश लघाटे (मुग्धा वैशपायन चा पंखा) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

मला वाटते प्रथमेश लघाटे स्पर्धा जिंकेल. पं. हृदयनाथ मंगेशकरांकडून ’वरचा ग’ मिळवणारा प्रथमेश एकटाच. बाकी मला आणि हिलरीला आमच्या पुण्याची आर्या आवडते पण असे वाटते की अंतिम फेरीत आर्या आणि प्रथमेश यांच्यात सामना होऊन प्रथमेश पहिला येईल. अर्थात हे आमचे मत झाले. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

एसएमएसमुळेच स्पर्धेतील ख-या,गुणी कलाकाराला अनपेक्षित "निकाला"ला सामोरे जावे लागणार.अन्यथा मुग्धा व प्रथमेश - दोघेही बाजी मारण्यास लायक .

स्पर्धा वाढलीये. कार्तिकी, राधिका आणि शाल्मली परत आल्यात शेवटच्या फेरीला. रेवती

प्रथमेश किंवा आर्या ... दोघेही तुल्यबळ आहेत.

खर तर स्पर्धा गायकीवर अवल॑बुन आहे की एसमएस वर? त्यावर कोण जि॑केल ते ठरेल.

त्याने म्हणलेले " काळ देहासि आला ..." (मूळ गायक - सुरेश वाडकर) ऐका ...

In reply to by मनीषा

मात्र मला विचाराल तर अवघे गरजे पंढरपूर आणि संत भार पंढरीत ही दोन फारच सुरेख. आपला (भक्तिगीतप्रेमी) आजानुकर्ण तुकाराम

मत प्रथमेशला दिले आहे पण प्रथमेश, आर्या आणि शाल्मली तिघेही जिंकावे असे वाटतेय. :( बिपिन कार्यकर्ते

हा जो कोणी गीत आहे त्या साठी एकदा जोरदार टाळ्या होउन जाउ द्यात......प.जो.

In reply to by अविनाशकुलकर्णी

एक नंबर प्रतिक्रिया! या प्रतिक्रियेसाठी टाळ्या होऊन जाऊ देत एकदा! (प.) अदिती जोशी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

लहान मुलाना अन्यायानं बाहेर काढनारी ही स्पर्धा आता मी पाहतचं नाही. मला फार फार राग आलेलं आहे.

हार जीत कसली घेऊन बसायचे राव ? अनेक गाणी ऐकली. या प्रौढ, निबर वयात कधी कुणी डोळ्यात पाणी आणेलसे कधी वाटले नव्हते. ही पोरे पोरे ते करतात. विशेषतः तो प्रथमेश. तो फार क्रूर आहे. काळजावरून सुरी चालवतो.

In reply to by मुक्तसुनीत

प्रथमेशचे संत भार पंढरीत ऐकले आहे का. आणि काळ देहासी आला खाऊ हे देखील अप्रतिम. फारच गुणी मुलगा आहे हा. अप्रतिम गातो. सध्या त्याचं आवडलेलं गाणं म्हणजे 'अगं मैना गं मैना गं तुझी हौसं पुरवीन" ... मस्तच.... आपला (प्रथमेशप्रेमी) पल्लवी आजानुकर्ण जोशी :)

In reply to by आजानुकर्ण

प्रथमेशने गायलेले गाणे , बाळासाहेबांनी दिलेली दाद , त्यांनी सांगितलेला खळ्यांचा किस्सा.. ..आमच्यासारख्या बाप्यांनाही पाझर फुटावा अशा गोष्टी. फारच सुंदर एपिसोड होता तो. बाय द वे , खळे-वाडेकर हे अतिशय डेड्ली काँबिनेशन आहे . चालींचा अनवटपणा एकवेळ राहू द्या. खळ्यानी वाडकरांकरता दिलेल्या गाण्यातली लय ही भानगड भीषण असते ! "लय भारी" !! (मंगेशकर आणि वाडकर दोघांनीही लयीचा मुद्दा कार्यक्रमात सांगितला आहे ) काही उदाहरणे देतो म्हणजे स्पष्ट होईल : - काळ देहासी आला खाऊ - जेव्हा तुझ्या बटांना , उधळी मुजोर वारा -धरिला वृथा छंद एकेक गाण्याचा ताल समजून घेताना गाफा !!!:-)

दोघांपैकी कोणीही आलं तरी स्वानन्दी आनन्द होईल :) मुग्धा ची स्वरांवरची पकड ( आणि तीही या वयात ! ) पाहून चकीत व्हयला होतं.

मुग्धा ची या ईतक्या लहान वयातील प्रगती पाहून थक्क व्हायला होते. काय मस्त गाते ती. प्रथमेश ही खूपच मस्त गातो. त्यामुळे दोघात कोणीही आले तरी चालेल.

आता स्पर्धेत कोण कोण शिल्लक राहिले आहे. मागे कार्तिकी बाहेर गेल्याचे कळले आणि कॉलबॅक मध्ये परत आल्याचेही कळले. नक्की कोण शिल्लक आहे हे कोणी मिपाकर सांगू शकेल काय? आपला (मिपाप्रेमी) आजानुकर्ण शेवटच्या टप्प्यात एसेमेसांनी गोंधळ घालायला सुरवात केली आहे हे पाहून वाईट वाटते. या चांगल्या कार्यक्रमाला एसेमेसांचे गालबोट नको. लोकांनी आपली बोटे रिमोटवरच ठेवावीत मोबाईलवर नकोत असे करायला हवे. या संदर्भात खालील लेख चांगला आहे. लेखकाचा पर्याय उत्तम आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3868118.cms आपला (मटाप्रेमी) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

शेवटच्या टप्प्यात एसेमेसांनी गोंधळ घालायला सुरवात केली आहे हे पाहून वाईट वाटते. या चांगल्या कार्यक्रमाला एसेमेसांचे गालबोट नको. हे आम्ही फार पूर्वीपासून सांगत आलेलो आहोत. एस एम एस ची ही कीड संगीताला घातक आहे! असो..! तात्या.

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा सतत चालूच राहणार आहे... ....प्रत्येक वेळी चार लोक शिल्लक राहिले की पुन्हा कॉलबॅक एपिसोड...... पुन्हा सगळ्यांना आत घ्यायचे .... की फायनल ५ आठवडे दूर जाते..... ... मग भरपूर एसएमेस येतात.. टीअरपी मजबूत वाढतो...... स्पर्धा वेळेत संपवायच्या कल्पना म्हणजे : झी मराठीने सोन्याचे अंडे देणारी कोंबडी गमावणे... ती त्यांची इच्छा नाही त्यामुळे मुले शाळेत नापास व्हायच्या भीतीने स्पर्धा सोडून जायच्या वेळेपर्यंत स्पर्धा चालूच राहणार. त्यामुळे यशवंत देवांना बोलवून जो कॉलबॅक एपिसोड घेतला ( आणि त्यांना तिघांना आत घ्यायला लावले )तेव्हापासून आम्ही झीच्या स्पर्धेला कंटाळलो आहोत. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

कॉलबॅक एपिसोड मध्ये काही स्पर्धक आलेच नाहीत. अमूक अमूक पैसे दिलेत तरच कॉलबॅक एपिसोडकरता बोलावू असे त्यांना सांगितले गेले! "आजवर प्रथमेश सतत आघाडीवर राहिला, त्याचे कौतुकही बरेच झाले! आता या पुढेही त्याला स्पर्धेत आघाडीवर रहायचे असेल तर तुम्हाला अमूक अमूक रक्कम द्यावी लागेल..!" असे प्रथमेशच्या आईवडिलांना सांगितले गेले. "आम्ही येथपर्यंत येण्याकरता खूप खर्च केला आहे. अगदी आमची गुरेढोरेही विकली आहेत. तेव्हा आता याहून अधिक खर्च करणे आम्हाला जमणार नाही!" असे त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते! असो.. आम्हाला संगीतातले आणि एकूणच संगीताच्या दुनियेत सध्या जे काही चालले आहे त्यातले फारसे काही कळत नाही. तेव्हा या विषयात अधिक काही बोलणे फारसे शहाणपणाचे होणार नाही! (ख्यालसंगीताचा एक ढ विद्यार्थी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

हे असे आहे तर , तरीच बाकीचे स्पर्धक कॉलबॅक ला आले नाहित

In reply to by गीत

हे असे आहे तर , तरीच बाकीचे स्पर्धक कॉलबॅक ला आले नाहित असो! बोललो की तात्या बोलतो म्हणतात! परंतु हे सर्व राजकारण मी खूप जवळून पाहिले आहे/पाहात आहे! मी स्वत: ख्याल संगीताशी जास्त निगडित आहे परंतु चित्र व भावसंगीतातलीही बरीच मंडळी माझ्या ओळखीची आहेत, परिचयाची आहेत, माझ्या बैठकीतली आहेत! त्यांच्यामुळेच मला अंदरकी बात, पैशांचे राजकारण, गटबाजी, हेवेदावे इत्यादी अनेक गोष्टी समजतात! असो.. परंतु ही जीवघेणी स्पर्धा, एस एम एसच्या पैशांच्या राजकारणात गुणी कलाकारचा बळी जाणार, सापशिडी काय, प्रत्येक गाण्यावर चर्चा काय, वयाच्या मानाने आवाच्या सवा प्रसिद्धी काय, लतादिदीसोबत फोटो काय, रायगडभूषण काय! जे चाललं आहे ते सगळं ठीकच आहे म्हणायचं..! परंतु या सगळ्यात कला ही कुठेतरी घुसमटतच जाणार आहे, जाईल! तसे होऊ नये एवढीच आमची कळकळ! ती सर्व मुलं गुणी आहेत हे निर्विवाद परंतु तात्पुरतं यश, एस एम एसचे छाती फोडणारे पैशाचे राजकारण आणि त्यातले जयपराजय, इत्यादी गदारोळात त्या मुलांचंच गाणं कुठेतरी हरवेल की काय अशी भिती वाटते. अपयश पचवणे खूप सोपे असते परंतु वयाच्या मनाने वारेमाप यश, प्रसिद्धी इत्यादी गोष्टी पुढेमागे त्या गुणी मुलांना पचवणे जड जाईल, लॉगटर्मचा विचार करता ते त्यांच्या गाण्याकरताच धोक्याचे ठरेल/ठरू शकेल असा माझा अनुभव सांगतो..! असो, आपण काय बोलत नाय बा! बोललो की तात्या बोलतो म्हणतात, त्याला काय कळत नाय म्हणतात! सदर धागा हा, "सा रे ग म लिटील champs ही स्पर्धा कोण जिन्केल"" या संबंधात आहे. कुणीही जिंको, त्या स्पर्धकाचे मी आत्ताच हार्दिक अभिनंदन करतो..आणि त्याला/तिला त्याच्या/तिच्या पुढील कारकीर्दीकरता सुयश चिंतितो..! आपला, (गाण्यायले फारसे काही न कळणारा, व ऑर्थोडॉक्स विचारांचा!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

ही दुसरी बाजु उघड करण्याबद्दल धन्यवाद . नाहीतर सर्व काही छान छान आणि आलबेल आहे असे वाटत होते. ह्यापुढे हा कार्यक्रम अधिक "डोळस" पणे पाहीन.

In reply to by विसोबा खेचर

परंतु ही जीवघेणी स्पर्धा, एस एम एसच्या पैशांच्या राजकारणात गुणी कलाकारचा बळी जाणार, सापशिडी काय, प्रत्येक गाण्यावर चर्चा काय, वयाच्या मानाने आवाच्या सवा प्रसिद्धी काय, लतादिदीसोबत फोटो काय, रायगडभूषण काय! इतक्या लहान वयात हे सगळं पचवता आलं पाहिजे या मुलांना... मी एके ठिकाणी त्या गोडुल्या मुग्धा ची मुलाखत वाचली होती.... तिचे म्हणे "सा रे ग म "मधे सिलेक्शन झाल्यावर तिनं तिच्या आई बाबांना विचारलं होतं की "रीऍलिटी शो" म्हणजे काय असतं.... इतक्या छोट्या मुलीला पुरस्कार वगैरे कस बरं कळणार ... असो.... पण सगळी पोरं गातात फार छान ... मला शमिका जिंकावी असं वाटत होतं..ती कॉलबॅकला नक्की परत येइल असा वाटलं होतं..पण पैशापुढे कला हारत असावी बहुदा.. असो..सध्या आर्या जिन्कावी असे वाटत आहे ( शेवटी काय ते पुण्याचे पाणी आहे ...:-) आणि शिवाय ती आमच्या "तानाजी मालुसरे"(सिंहगड रोड) रस्त्यावर वर राहाते ना ) -स्मिता

In reply to by विसोबा खेचर

तात्या जी, आपल्या वरील विधानाशी सहमत! १०८ % सहमत! पैसे न दिल्यामुळेच "शमिका भिडे" ला बाहेर जावं लागलं आणि "अवन्ती पटेल" मात्र आत राहिली. (कॉलबॅक'ला पण शमिकाला बोलावले नाही. :( ) असो... भ्रष्टाचार ही काय नवीन गोष्ट आहे का? :-? श्रीराम श्रीराम! :)

In reply to by विसोबा खेचर

प्रथमेश लघाटे आजपर्यंत एस एम एस पेक्षा परीक्षकांनी दिलेल्या मार्कांच्या जोरावरच आघाडीवर राहिला आहे. पण आज त्याच्या गाण्यानंतर "तू यापेक्षा चांगलं गाऊ शकला असतास" असे परीक्षिकाबाई म्हणाल्या - हे म्हणजे (या नंतर) त्याचे मार्क कमी करण्याचे सूतोवाच असू शकते. असेच याआधी काही चांगले स्पर्धक त्यांनी बाहेर काढले होते, आणि सुमार गाणार्‍या मुलांना एकतर पुढे नेले किंवा कॉलबॅकच्या निमिताने परत बोलावले. या स्पर्धेच्या गुणदान पद्धतीत एकूण संशयाला बरीच जागा आहे! -अमित

In reply to by अमित.कुलकर्णी

स्पर्धेच्या गुणदान पद्धतीत एकूण संशयाला बरीच जागा आहे! आम्ही ज्या गोष्टींबद्दल फार पूर्वी आरडाओरड केली होती, निषेध व्यक्त केला होता, त्या गोष्टी आत्ता आत्ता लोकांच्या ध्यानात येऊ लागलेल्या आहेत! असो, हेही नसे थोडके..! चालू द्या.. (झी किंवा कुणाच्याही एस एम एस चे मिंधे न होता, उपासमार करून तावून सुलाखून निघलेल्या बाबूजी/भीमसेनांचा भक्त) तात्या.

आता ही स्पर्धा म्हाणुन उरलीच नाही आहे ... सब ईक से बढकर ई़क है ! रोहित राउत खरच ल्म्बे रेस का घोडा ...वाट्तोय He is technically very sound and may come up as a musician some or other time in his life..Inshaa-Allah ! ~ वाहीदा

दुसरी बाजू इतकी भयानक असेल असे वाटले नव्हते. निष्पाप पोरांच्या मनावर काय हे संस्कार? ( आता कार्यक्रम पहावा की नाही या संभ्रमात ) मोहन

कॉलबॅक एपिसोड हे ऐनवेळी सुचलेले खूळ नसून त्याचा अंतर्भाव नियमावलीत पहिल्यापासून करण्यात आला आहे. दुवा. नियम काळजीपूर्वक न वाचल्याने किंवा एकंदर स्पर्धेबाबत भ्रमनिरास झाल्याने/पुन्हा बोलावतील याची खात्री नसल्याने बाहेर गेलेल्या स्पर्धकांनी इतरत्र कार्यक्रम स्वीकारले व त्यामुळे कॉलबॅकमध्ये येणे शक्य झाले नाही असे म्हटले आहे. दुवा प्रथमेशकडून पैसे मागितले/घेण्यात आले हा आरोप चुकीचा वाटतो. वर म्हटल्याप्रमाणे ही मुले झी साठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहेत. प्रथमेशच्या वतीने हा प्रकार जाहीर करण्यात आला तर झी टीव्हीची काशी होईल. आपला, (सारेगमप्रेमी) आजानुकर्ण वैद्य

In reply to by आजानुकर्ण

पुन्हा बोलावतील याची खात्री नसल्याने बाहेर गेलेल्या स्पर्धकांनी इतरत्र कार्यक्रम स्वीकारले व त्यामुळे कॉलबॅकमध्ये येणे शक्य झाले नाही असे म्हटले आहे. हे खोटे आहे! त्यांच्याकडे पैसे मागितले गेले असे वादकांच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळते..! आपला, (गाण्याबजावंण्यातला) तात्या. प्रथमेशकडून पैसे मागितले/घेण्यात आले हा आरोप चुकीचा वाटतो. वाटणे आणि असणे यात फरक आहे! प्रथमेशच्या वतीने हा प्रकार जाहीर करण्यात आला तर झी टीव्हीची काशी होईल. नक्कीच होईल..! प्रथमेशच्या आईवडिलांसमोर अद्याप हा ऑप्शन ओपन आहे असे आतल्या गोटाकडून खात्रीलायकरित्या समजते! झी वाल्यांच्यात अन् प्रथमेशच्या आईवडिलात देवांनी अन् वाडकरांनी तूर्तास मांडवली केली आहे असेही आमच्या खास सांगितिक गोटातून समजते..! त्या मुलांना साथसंगत करणारे बरेचसे वादकही सुदैवाने आमचे चांगले स्नेही आहेत! असो, आपल्याला एस एम एसच्या मिंध्या असलेल्या संगीतातले फारसे काही कळत नाही! बाकी चालू द्या..! आपला, (ख्याल संगीताच्या दुनियेतला एक विद्यार्थी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्या तुमच्यावर अविश्वास नाही. पण जो सर्वोत्तम गायक आहे त्याची अशी पैशासाठी अडवणूक होईल असं वाटत नाही. म्हणजे तो झी चा मूर्ख पणा म्हटला पाहिजे. तसा रोहित राउत हा कोणाचा तरी सॉलिड वरदहस्त घेउन आल्यासारखा वाटतो. की जो केव्हाच बाहेर गेला असता तरी अजून टिकून आहे आणि कधितरि बरा गायला की तुझा ग्राफ चढता आहे असं त्याचं कौतुक होतं म्हणजेच तो सुधारला आहे. आर्या, प्रथमेश यांना स्पर्धा करण्याच्या दर्जाचा नाही हे खरं. अवंती का कुणास ठाउक सरळ मुलगी वाटते. ती पैसे देउन आत राहिली असेल असं वाटत नाही. अगदी चांगली गाणारी अवंती अचानक खराब कशी गायला लागली आणि एकदम सगळे जण तिच्या बाबतीत उगाच खार खाउन असतात असं वाटतं. तसं असेल तर शमिका बाहेर जाऊन शाल्मली परत येणं वादग्रस्त वाटतं. मुग्धा गोड आहे आणि चांगली गातेही तिच्या वयाच्या मानाने पण त्याचा अति फायदा मिळतो आहे तिला विशेषतः एस एम एस मध्ये. त्यामुळे शेवटी पुण्याची आर्या एस एम एस कमी पडले म्हणून मुग्धाच्या मागे पडेल की काय असं वाटतं. ते गुण मोजताना एक प्लस आणि मायनस साइन ही सरळ सरळ ऍडजस्ट्मेंट वाटते सोयीस्कर. गुण मोजायला साप आणि शिडी कसली ! मुलं खुप छान गातात हे चतुरंगांचं म्हणणंच खरं... अवांतर: तात्या छोट्या गोड मुलांचं सुगम गायन आणि पन्नास साठ वर्षापूर्वीची पंडितजींची साधना हा ऍपल मँगो संबंध वाटतो.

तसे असेल तर त्याला वाचा फोडायलाच हवी. सर्व मुले-मुली सुरेखच गात आहेत. ह्या वयात गाण्याची त्यांची समज वाखाणण्याजोगी आहे. आता अंतिम टप्प्यात आल्यावर काहीवेळा स्पर्धेतल्या ताणाने सगळेच थोडे बावरुन गेल्यासारखे आणि क्वचितच नैसर्गिकपणे गात नसल्याचे जाणवते. व्यक्तिशः मला कार्तिकी अजूनही ह्या ताणाला चांगली सामोरी जात आहे असे वाटते. कोणीही जिंको ह्या मुलांनी मला भरभरुन आनंद दिलाय ह्यात शंका नाही! चतुरंग

पटेल आडनावाची मुलगी एसेमेसच्या जोरावर जिन्केल! :) आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

>>>>>"आजवर प्रथमेश सतत आघाडीवर राहिला, त्याचे कौतुकही बरेच झाले! आता या पुढेही त्याला स्पर्धेत आघाडीवर रहायचे असेल तर तुम्हाला अमूक अमूक रक्कम द्यावी लागेल..!" असे प्रथमेशच्या आईवडिलांना सांगितले गेले. हे वरील मत्/माहिती/उद्गार जे काय असेल ते, अन परवा परवा सिमेण्ट्घोटाळाफेम अन्तुलेन्नी करकरेन्च्या मृत्युबद्दलच्या चौकशीची केलेली मागणी यात दर्जानुसार काही फरक वाटतो का?????? :D आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

Avinash सा रे ग म प लिटिल चॅम्प सा रे ग म प लिटिल चॅम्प आता शेवटच्या टप्प्यावर आला आहे .. १..प्रथमेश २-मुग्धा ३-शाल्मलि ४..रोहित राऊत ५...कर्तिकि ६आर्या अम्बेकर हे सारे आता स्पर्धक राहिले आहेत.. आता महा गायक/गायिका कोण होणार? हि ऊत्सुकत्ता सा~यानाच आहे.. पैकी मुग्धा व कार्तिकि ह्या वयाने लहान आहेत त्या मुळे त्यांच्या मर्यादा पण समोर आल्या आहेत..मुग्धा एकसुरी गाते...वय लहान असल्याने शब्दांचे भाव गाण्यात निट उतरु शकत नाहित...कार्तिकिचा आवाज भजनाला ठिक आहे.पण तो चांगला चढतो..त्या मुळे त्या दोघिंना चान्स व संधि मर्यादित आहे..अर्थात ह्या दोघिहि ज्युनिअर लिटिल चॅम्प असल्याने.दोघिपैकी एकिला जुनिअर लिटिल चॅम्प महागायीका म्हणुन निवडायला हरकत नाहि... शाल्मलिचि गायकि साधारण असुन तिने दिलिप प्रभावळकर यांना गुरुस्थानि मानुन नकलात करियर करावे.. रोहित राऊत तर खर शाल्मलि च्या आधिच आउट व्हायचा पण काय चमत्कार झाला अन तो राहिला व शाल्मलि गेली..याचि गायकि पण सुमार आहे..तो इथपर्यंत आला हे सारे श्रेय त्याच्या मतदारांना. आर्या अप्रतिम गाते तिचा आवाज वरच्या व खालच्या पट्टित झकास लागतो..पण ति थोडि नाकात गाति असे वाटते...मुलि मधे तिचे पारडे जड आहे..व तिच्यात महा गायिका होण्याचे गुण आहेत. प्रथमेश हा खरा अप्रतिम गायक आहे..त्याचि बैठक पक्कि आहे..सुराच त्याला ज्ञान आहे आवाज मधुर आहे त्या मुळे तो ख~या अर्थाने महा गायक ह्या पदविस पात्र आहे असे वाटते. अर्थात शेवटि मतदारच आपलि मते कोणाच्या पारड्यात टाकतिल हे सांगणे कठिण पण आज वरच्या वाटचालि वरुन हे मत मांडले आहे

अंतिम निकाल बहुतेक रोहित राऊत प्रथमेश ला हरवुन जिंकेल..कारण कोकणा पेक्षा मराठवाड्याच पारड जड आहे....... अविनाश..ऊर्फ पनिर माखनवाला

प्रथमेश प्रथम्,तरीही रोहितचे गाणे वऐवैध्यपूर्ण वाटते. आणि मला ते जास्त भावते.

तात्या म्हणतात ते खरं असेल तर मात्र बोलणंच खुंटलं! इतका बाजारू पणा! एस एम एस , जाहिराती यातून मिळणारा पैसा पण यांना कमी पडू लागला की काय? म्हणजे इथे अगदी स्वच्छ कारभार चालतो असं नक्कीच वाटत नव्हतं मला. पण जी काही चालूगिरी चालते ती परीक्षकांची असं वाटयचं. म्हणजे एखाद्याला नुसतं चांगलं म्हणायचं आणि म्मर्क मात्र कमी द्यायचे; आणि तरीही तो एसेमेस च्या जोरावर येतोय असं दिसलं की हळूहळू ' तू आज बरा नाही गायलास्/गायलीस' वगैरे शेरे मारयला चालू करायचं या स्वरूपातच ते असतं असं वाटत होतं. पण जर स्पर्धकाकडेच जर पैशाची मागणी होत असेल तर मग सगळंच शून्य म्हणायचं! अर्थात रिऍलिटी शो बघणे मी फार पूर्वीच सोडून दिलंय, एस एम एस करणं तर दूरचीच गोष्ट; पण तरीही मराठी कार्यक्रमात कुठेतरी एक सौजन्य जाणवतं आणि 'ते त्यान्च्यापेक्षा वेगळे' असं आपलं वाटायचं.... आसो... बाकी आता कोणीही येवो.... आपल्याला काय त्याचं.... शिवटी पैसाच जिंकतोय ना हो! पडद्यामागची कथा समजली त्याचाच आनन्द!