"सचीन शतकांसाठीच खेळायचा" कपील पा जी म्हणाला,"त्याच्यातल्या क्षमतेला अल्पसंतुष्टवृत्तीमुळे न्याय मिळाला नाही".
मी वेगळाच विचार करत होतो.
बंगाली साहित्यातून सुंदर नावं आली आहेत,मूळ शची +इंद्र =शचींद्र असावे ,मग उच्चाराला सोपे करण्यासाठी जसा देवेंद्रचा देवेन होतो तसा शचींद्रचा शचीन व पुढे सचीन झाला असावा. (दोन्ही सचीन नी, मैदानावरचा आणि पडद्यावरचा, कर्तृत्वाने आपल्या नावाचे विशेषण तयार केले तो वेगळा विषय !)
पेशवाईत आनंदीबाईने राघोबादादाला पेशवाईची गादी मिळण्यासाठी नारायणास 'धरावे ' या हुकूमपत्रात 'ध' चा 'मा' केला होता अशी गोष्ट प्रसिध्द आहे.लहानपणी मी वाचलेल्या दुस-या गोष्टीतील राजा ,शेजारील राज्यातील राजपुत्र हेरगिरी करण्यासाठी आपल्या राज्यात आलाय हे ओळखतो व त्याला टपकवण्यासाठी प्रधानाला तात्काळ कारवाईसाठी एक पत्र पाठवतो आणि यात आपला हात नाही हे भासवण्यासाठी लगेच शिकारीला निघून जातो. ते पत्र दूताकरवी प्रधानाकडे जात असतांना चाणाक्ष राजकन्या 'विषया' क्षणभरच मिळवते व असे काही 'एडीट' करते की राजा शिकारीहून परत यायच्या आत ,प्रधान ती राजकन्या आणि तो राजपुत्र यांचं शुभमंगल करून मोकळा होतो. (त्या राजपुत्रास विष यासी द्यावे या आदेशातील दोन शब्द तीने आपल्या डोळ्यातील काजळ नखावर घेऊन जोडल्यामुळे 'विष' 'यासी' चा 'विषयासी' झाला.(!)
ही झाली केलेली गोष्ट पण नकळतही शब्दांमध्ये कसे बदल घडतात याच मला फार कुतूहल वाटतं.
काही अपभ्रंश नैसर्गीक आहेत.संस्कृतमधून प्राकृतात येतांना शब्द उच्चाराला सोपे झाले असणार. कृष्नाचा किसना,चक्र चाकवक्र वाकडे ,ग्राम गाव ज्ञान ग्यान,योगी जोगी,गावाकडचा बिगीबिगी हा वेगे (वेगाने) चा अपभ्रंश असावा,युवान चा जवान झाला,शहरी कवींनी त्या पुढे जावून ज्वानी असे ग्रामीण रूप तयार केले.
बुध्दीबळ हा खेळ भारतातून अरब ,पर्शीया मध्ये गेला .या खेळाचे मूळ नाव चतुरंग (चतूर् +अंग ,चार अंग किंवा सैन्याचे विभाग) पणअरबीमध्ये 'च' चा 'श' होतो (चाय =शाय) आणिग चा ज झाला,त्यामुळे चतुरंग शतरंज म्हणून प्रसिध्द झाला.
मला वाटतं तामिळ लोकांना ह च्या जागीग उच्चार करायची सवय आहे,एकदा मी क्लब मध्ये सहारा टिव्ही चॅनेल पहात होतो,तिकडून मोहन आला व म्हणाला,
"काय,सगारा टिव्ही पहातोस?
मी म्हणालो, "येस,मोगन"
यावर तो चिडल्यावर मी हडबडीने......आपलं......गडबडीने विषय बदलला.
त्यांच्यात 'फ' सुध्दा नाहीये,'प' वर कसंबसं भागवतात.
केरळी लोकांच्या उच्चारात क चा गहोतो म्हणून प्रकाश होतो प्रगाश,तसेच त चा द होतो म्हणून सतीश होतो सदीश.
क्रिकेटमुळे शारजाह प्रसिध्द झालं पण त्याचं स्पेलींग शारका ,उच्चारतांना अरबी उच्चार शारगा .इंग्लिशमध्ये येतांनाकसं शारजाह झालं कुणास ठाऊकपण ते हार जा शी चांगलं जुळलं.
अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली मराठी उच्चारावर आधारीत असल्याने बहुतेक सर्वभाषेतल्या शब्दांचे उच्चार जसे असतील तसे करू शकतो ,याचं गोष्टीचा योग्य उपयोग करून आपण मराठी माध्यमातील मुलांना इंग्लीश शिकवतांना भाषातज्ज्ञ अविनाश बिनीवाले म्हणतात तसे सरळ शब्दांचे मूळ उच्चार का शिकवू नयेत,
उदा. खॅन यू गिव्ह मी द बुक आॅन द ठेबल?
बिंदास (मूळ बिनधास्त) काय हरकत आहे?
काही नावं इंग्लीश मध्ये जावून भ्रष्ट होऊन पुन्हामराठीत आलीत, शीव...सायन.
इजिप्शीयन लोकांची ज चा उच्चार ग करायची (अपवाद इजिप्त) पध्दत असते, मौजूद च्या ऐवजी मौगूद वगैरे.
त्यांनी राजेश चा रागेश केला (राग नाही येवू द्यायचा नाहीतर नाव सार्थ ठरायचं) जावू दे,त्यांचं काहीतरी व्याकरण असेल.
मला आपलं कळतं नाही तर दुस-याभाषेतलं काय कळणार? हिन्दीत र आणि ड यांची का अदलाबदली होते, सिनेमा अनाडी असेल र इंग्लीशमधे अनारी लिहीलेले असते.चोपडा चोप्रा,रबर रबड काही कळत नाही,बहूदा हिन्दीच्या त्या तासाला मी हजर नव्हतो.
शेवटी ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो तो हिंदू हा शब्द आला सिंधूसंकृतीमधून,सिंधू नदीच्या काठावर वसलेल्या संस्कृतीतून.
कालांतराने 'स' चा 'ह' झाला जो आमच्या हृदयात जावून बसला.
वाटतं.... सांगावं पुन्हा एकदा निवडक ठिकाणी 'ग चा 'स' करून काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत रहाण्या-या,
"सर्व से कहो हम हिंदू है "
टिप: हा लेख हे एक वरवरचं साधं निरिक्षण आहे, यात गंभीर कोणतचं मतप्रदर्शन नाही
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
आमच्या भागात (कोल्हापूर
आमच्या भागात (कोल्हापूर साईडला) ग्रामीण ,शेतकरी लोक
रविवार व गुरुवार ला अनुक्रमे ऐतवार व बेस्तरवार म्हणतात ,
खरं म्हणजे जरी अपभ्रंश असला तरी दोन्ही शब्द जास्त अचूक
आहेत.ऐतवार हा आदित्य वारापासून तर बेस्तरवार हा ब्रुहस्पती वारापासून आलेला आहे.
रवी पेक्षा आदित्य व गुरुपेक्षा ब्रुहस्पती हे शब्द जास्त अर्थवाही आहेत,भले ते अपभ्रंशी असतील
असं मला वाटतं.
मघा लिहायचे राहिले
मघा लिहायचे राहिले
शीर्षक थोडे गंडलेले आहे,निरीक्षण शब्द अखेरीस असता तर योग्य ठरते
च ची भाषा असते तशी स ची भाषा असेल तर
सर्व से कहो सब सिंधू है आणि हे सूक पण नाही ना
छान (चहा आण चा अपभ्रंश)!!
छान (चहा आण चा अपभ्रंश)!!
लोल !
In reply to छान (चहा आण चा अपभ्रंश)!! by जव्हेरगंज
लोल !
रच्याकने हैद्राबादला असताना सुरूवातीला उच्चार अगदी विचित्र वाटत होते .oracle -आर्कल, individual - इंडीव्हुडल इत्यादी . बाकी मराठी नावाचा तर अशा प्रकारे उद्धार करतील की बस !
+१ linux - लायनक्स
In reply to लोल ! by उगा काहितरीच
+१
linux - लायनक्स
सचिन
सचिन ची व्युत्पत्ती बरोबर वाटते. मी बहुधा पंजाबीत ही सचिंदरसिंग वगैरे पाहिलेले आहे आणि त्यांचे रोजच्या वापरातील नाव सचिन म्ह्णूनच ऐकलेले आहे. बाय द वे - सचिन तेंडुलकर चे नाव त्याच्या आई की वडिलांच्या एस्डी बर्मन च्या आवडीमुळेच तसे ठेवले होते असे वाटले.
मात्र
खॅन यू गिव्ह मी द बुक आॅन द ठेबल? >>> हे बरोबर नाही. कारण हा अमेरिकन उच्चार आहे. भारतीय इंग्रजी उच्चार असा नाही.
ब्रिटिश इंग्लिशमध्ये
In reply to सचिन by फारएन्ड
होत असावा. पु.लं.च्या अपूर्वाई मध्ये तिथल्या रेल्वे बुकिंग क्लार्कने पिकॅडिलीचा उच्चार फिख्याडली असा केल्याचा उल्लेख आहे. ते सुद्धा पु.लं.नी त्याला Piccadilly असं लिहून दिल्यावर.