Skip to main content

केला नाद होशील बाद

केला नाद होशील बाद

Published on मंगळवार, 10/11/2015 प्रकाशित मुखपृष्ठ
मंडळी सालाबाद्प्रमाने गावच्या चावडीवर होर्डिंग लावले आहे. हे लावन्यासाठी जे कुनी मदत केलेत त्यांचे मंडल लै आभारी आहे. mips_banner एकदाचं आखरीचं डिशक्लेमर डिजीटलवाल्याकडूनः जे फोटो आले, जशे दिले ते लावण्यात आलेले हैत. मागाहून तक्रार चालणार नै. सर्व दादा लोक हितली मजामस्ती सम्जून घ्यायला एक्षपर्ट हायेतच. बाकी दिवाळी असल्याने रागलोभ इसरुन सगळे बोर्ड पाहायला येतील. तेव्हा धन्यवाद. जागेची अन पैशाची टंचाई असलेने उरले सुरले बाकी मेंबर होळीत लावन्यात येतील. (फोटोवाल्यानी आपली रक्कम त्वरीत जमा करावी ही नम्र विनंती)

याद्या 20622
प्रतिक्रिया 66

=))

लैच भारी रे अभ्या. प्र.म. आ. आ. व त.त. या गोष्टींची कमी मात्र जाणवत आहे.

=))

ढग नाही आभाळात पाणि नाही शेतात, आमचे नाखूभाऊ फकस्त गोटीसोडा घेतात.. >> लै मंजे लै ब्येक्कार! http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gifhttp://www.sherv.net/cm/emo/laughing/crying.gif जहाज्,कट्टा प्पा ,म्हैस

=))

आभ्यादादा जंगी पोष्टर एकदम, सर्व पोष्टर बॉईज चे हार्दिकाभिनंदनवसर्वांनादिवाळीच्याईनफायनाइटशुभेच्छा, चला आता दिलाळी अंक वाचायला जातो

वारे गब्रू ! खल्लास पोष्टर ! आणि टीशर्टाच्या पुढच्या लॉटचं काय झालं म्हणे ?

अरे दिवानो मुझे पैछानो कहा से आया मै हु कोन ? ;) अवांतर : माझ्या फोटोकड़े फार टक लावून पाहु नये. धन्यवाद. ;) - दिलीप बिरुटे [खुद गब्बर डीबी ]

एकदम सही. बाकी डॉ.खरे साहेब थोडेफार रॉबर्ट वद्रा सारखे दिसतात हे नमूद करु इच्छितो.!

In reply to by कानडाऊ योगेशु

कुणी मला थोडीशी जमीन द्याल का? जरा हजार एक एकर. म्हणजे निदान वाड्रा सारखा दिसल्याचे सार्थक तरी होईल.

सुड मोड ऑन.. " फोटो जरा ब्लर आलेत , प्रयत्न बर्यापैकी बरा आहे सुधारणेला वाव आहे " ;) सुड मोड ऑफ ;) (पळ्ते म्या )

In reply to by पियुशा

पिशवे/सूडके, मलाबी कळेना ब्लर कामून झालय ते. :( कायतरी लोच्या हाय. उधारी बाकी असणार. ;)

बाब्बो. लै झ्याकं. भेष्ट.

वरुन दुसर्‍या रांगेतल्या सगळ्यांना डोळे आलेत काय? काळे चष्मे घातलंनीत म्हणून म्हटलं हो!! ;) किसनदेवाच्या मिश्या ज्युलियन ब्रह्मेंसारख्या दिसतायेत. बाकी छान!! आपलं चटणीपाकीट ठरलेलं आहे, त्यामुळे 'ज्याची चाय त्याचा न्याय' म्हणीप्रमाणे नावं ठेवायला जागा नाहीये फोटोत. ;)

आवं, ही नुस्ती लक्षुमी न्हाय, तर फ्लेक्स लक्षुमी हाय, फ्लेक्स लक्षुमी...

बगतोस काय उभ्यानं, फ्लेक्स लावलाय अभ्यानं, येकच चित्र- गार मित्र! अभ्याचा पंखा- हाय शंका?

In reply to by बॅटमॅन

अभ्याचा पंखा- हाय शंका? हो हो ! अभ्याला मी लाख वेळा म्हटलं (कोणतीही नशापाणी न करता) की मी तुझा फ्यान आहे, त्याला विश्वासच नै, शंका आहेच त्याच्या मनात. ;) -दिलीप बिरुटे

फ्लेक्स! असावा तर असा! बघतच राहावे वाटते! नै तर गल्ली-बोळातही अस्तातच की, पंगतीला बसायला हाथरुन! (या फ्लेक्सचा "अज्या" कोणंय या विचारात अस्लेला) ;-) Sandy

अभ्या.. एक डोकेबाज कलाकर आहे. एक कट्टा ह्या आणि आधीच्या पोस्टर्ससाठी झालाच पाहिजे...

फलेक्ष ल ई म्हणजे ल ई भारी! बाकी सोताचे फटू का नाय लावले बे? आमाला खालच्या आळीतल्या येशीला अभ्याभाऊ दाखवून माज करायचा होता ना!

बाकी सगळे कोमात.. अभ्या..ची हुशारी, काल पण. आज पण.. उद्या पण... _अखिल मिपा दुर्लक्षित सदस्य मंडळाचे उपसभासद

In reply to by चांदणे संदीप

सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ. रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(

In reply to by अभ्या..

सुक्क्याला दादा, खात्यापित्याला पैलवान अन पैलवानाला हिंदकेसरी म्हणायची आपली स्टैलच है भौ. रोजीरोटीका सवाल सॅन्डीबाबा. :(
आता तर वारलोच! :=)) :=)) :=)) :=)) :=)) :=))

In reply to by अभ्या..

अभ्या, इन जनरल शंका.. "तरुण तडफदार" कोण, "उमदे नेतृत्व" कोण, म्हातारे, आय मीन "प्रेरणास्थान","स्फूर्तिस्थान",कोण, "आद्य" कोण, "यांच्या आशीर्वादाने"वाले कोण वगैरे वगैरे हे नेमकं कसं ओळखता अन ठरवता? की समोरुन पार्टीच सांगते?

In reply to by गवि

तशी शंका रास्त आहे गविराज. नॉर्मली बोर्डाचे काम येताना जे फोटो मोठ्या साईजमध्ये (४बाय६) येतात ते वर नेते म्हणून असतात. छोटे (आयडी/पासपोर्ट साईज) खालची कार्यकर्त्याची फळी असते. मोठ्या फोटोच्या मागे लिहिलेले असते आदरस्थान वगैरे. पार्टीच सांगते सारे. जरा जनरल करायचे तर वय २५ ते ३५ तरुण तडफदार असतात. पैसेवाला/जरा देखणा कँडीडेट उमदे नेत्रुत्व किंवा आधारस्तंभ असतो. सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात. त्यांची पिलावळ हमखास खालच्या गर्दीत असते. बोर्डाचे पैसे देणारा हमखास मधल्या फळीत असतो. वरचे त्याला घेत नसतात. पैसे अस्ल्याने त्याला खाली राहायचे नसते. तसे पाचपन्नास बोर्ड चढवले की त्याला प्रमोशन मिळते दांडगा जनसंपर्क म्हणून. त्याचा फोटो हमखास पेनड्राईव्ह वरुन येतो. फुल्ली फोटोशॉप्ड असतो. बाकी सांगेनच एखाद्या धाग्यात.

In reply to by अभ्या..

सध्या ज्याचे कुणी ऐकत नाही पण बोर्डावर फोटो घेण्याशिवाय पर्याय नाही ते म्हातारे स्फूर्तीस्थान अथवा आशिरवाद असतात.
जबरी.. ह.ह.पु.वा.

In reply to by चांदणे संदीप

फातिमानगर ते लोणी फ्लायओव्हरसाठी करायचे का आंदोलन भिगवण नायतर टेंभूर्णीला? बरं पडल राव.

In reply to by अभ्या..

लोणीच्या. १५ मिनिटात २ किमी रांगा लागल्या नैत तर तिथला टोलनाका बंद करू. (गेल्या महिन्यात बारामतीच्या खासदारतैंनी महागाईच्या विरोधात आंदोलन केलतं त्या टोलनाक्यावर. दोन्ही बाजूंनी लोकांचे २-३ तास फुक्कट गेले. तिकडं लोणीपर्यंत आन् हिकडं जकातनाक्यापर्यंत रांगच रांग.)

In reply to by चांदणे संदीप

या आख्ख्या त्रिकोणात कुठंपण बोलवा. कोणत्यापण ढाब्यावर बसू. (उरूळीचं स्नेहल *चुलीवरच्या मटन-चिकनच्या स्पेशल टेस्टसाठी* , सासवडच्या अल्याड काळेवाडीत मयूर नायतर गारवा, खाली उतरलं तर वडकीच्या अल्याड सह्याद्री)

हे बघीतलच नव्हतं ज्याम म्हणजे ज्याम खतरा काम केलय. बुवांना फेटा का न्हायी मी म्हणतो . आणि "किलबील संघटना आवडली" साफ भुस्काट (झालेला) नाखु