Skip to main content

स्वागत दीपावलीचे...

स्वागत दीपावलीचे...

Published on 26/10/2015 - 16:21 प्रकाशित मुखपृष्ठ
. . a सांज ती तेजाळलेली हासली लाजून वदली डोंगराच्या पायथ्याशी उजळला अंधार आहे चंद्र सजला चांदण्याने मुग्ध सारी रात्र झाली छेडलेला राग कोमल धुंद तो गंधार आहे मेघतोरण बांधलेले, स्वागता आकाश नटले नभधरेच्या संगमाचा आगळा शृंगार आहे वृक्षगर्भी दाटलेले ओज ओसंडून न्हाले या धरेने अन नभाने गायला मल्हार आहे देखणी ती सोनपुष्पे, रातराणी अन बहावे पारिजाताच्या सवे बघ रंगला मंदार आहे स्वार जलदांच्या रथावर जाहला आनंद आता तेज आले अंगणी आनंदला परिवार आहे विशाल कुलकर्णी .

याद्या 28113
प्रतिक्रिया 34
दिवाळी अंक वर्ष

"तेज आले अंगणी आनंदला परिवार आहे" आमचे मिपा आणि मिपा-परिवार, पण असाच आहे....

दिवाळीचे स्वागत छानच! सर्वांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! स्वाती

अरे मी कवितादालनातच शोधत राहिले तुझी कविता ! असो. अप्रतिम कविता ! खूप आवडली. शुभ दीपावली !

थोडी शब्दकळा आम्हाला दे, आमची (कल्पना) दारीद्र्य रेशा काही जाईना !!! ट ला ट जोडवून कवीतांचे पीठ पाडणार्या अखिल मिपा गिरणी मालक चालक संघाच्या "सुरनळी" या अनियतकालीकात पाठविलेल्या लेखातून साभार

क्या बात है.. स्वागत-गीत बघितले होते, आज स्वागत-गझल वाचली.. सुंदर, विशालदा..

धन्यवाद चिगो. पण कृपया लक्षात घ्या की ही गझल नसून कविता आहे. गझलेत दोन दोन ओळीचे शेर असतात. मतल्यात (पहिल्या शेरात) दोन्ही ओळीत काफिया असतो, तसे इथे नाहीये. ही अक्षरगण वृत्तातलीच कविता आहे. असो पुनश्च सर्वांचे मन:पूर्वक आभार !

अंकाची प्रतिक्रिया इथे दिली तर चालेल असं समजून देत आहे. मुख्यपृष्ठ तर मस्त आहेच पण अनुक्रमणीकेवरून कल्पना येतेय की आता थँक्सगिव्हींग आणि ख्रिसमसच्या सुट्टीत वाचायला भरपूर मटेरियल आहे. पुन्हा एकदा संपादक मंडळ आणि मिपाचे आभार :)