महाराष्ट्रात निसर्ग भरभरुन आहे. याची कल्पना जबाबदार सत्ताधारी किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कधी घेईल तो दिवस तमाम जनतेचा सोन्याचा दिवस.
मध्यंतरी एक आकडेवारी जमाकरुन मी चकीत झालो. अवघ्या २० वर्षात अनेक पर्यटन विषयक प्रकल्प राबवुन केरळ राज्याने त्यांच्या राज्यातील तरुण परराज्यात जाणे थांबवले आहे. केरळ मधील आयुर्वेदीक उपचार पर्यटन असो की बॅक वॉटरवर आधारीत पर्यटन असो. निसर्गाने दिलेल देण त्यांच्या कल्पकतेने सुरेख लेण चढवुन परत जनतेला रोजगाराच्या निर्मीतीसाठी परत आल आहे.
काल मी महाडहुन भोर मार्गाने जेव्हा पुण्याला आलो तेव्हा जाणवले की वरंधा घाटातला किमान २० किलोमीटर लांबीचा रस्ता त्या धरणाच्या बॅक वॉटरची सोबत करतो.
थोडाश्या उन्हात पाणी चमकत होत. पण ना कुठे रिसोर्ट्स ना कुठे बोटींगचे स्पॉट्स. मनात आणल तर इथे हॉउसबोटीवर दोन दिवस रहाता येईल इतकी छान व्यवस्था होण्यासाठी निसर्ग वाट पहातोय.
जरा आजुबाजुचे डोंगर थोडे उघडे - बोडके दिसतात त्यासाठी काही वर्ष द्यावी लागतील. पण हा निसर्ग कुठेही कमी नाही.
ही हाक कुणी पोचवेल का त्या जबाबदार व्यक्तीकडे /संस्थांकडे /सरकार दरबारी ?
वाचने
7560
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहे तसे राहुदे हो.. त्या
असंच म्हणतो.
In reply to आहे तसे राहुदे हो.. त्या by मोदक
याचाच अर्थ
In reply to असंच म्हणतो. by आदूबाळ
अजुन हे कोणाला कळाले नाहीये
हल्ली जरा चार लोकांना
ते धरणात 'पाउस' पडणार्यांनी
तिथे कल्पक लोक हवेत.
असाच विचार कोणाच्या तरी मनात
कुणाला माहित नाही हेच छान आहे
केरळ राज्या
अहो धरित्रीमाय अजुन व्हर्जिन
असल्या पिकनिकबाज नजरा
आमेन! आजकाल असल्या जागा कुणास
In reply to असल्या पिकनिकबाज नजरा by भटकंती अनलिमिटेड
आता विषय निघाला आहे म्हणून...
मुख्य धारेवर असलेला वरंधा घाट
In reply to आता विषय निघाला आहे म्हणून... by मोदक
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!!! :
In reply to मुख्य धारेवर असलेला वरंधा घाट by प्रचेतस
बरोबर
In reply to मुख्य धारेवर असलेला वरंधा घाट by प्रचेतस
मागे माकडाचे
जन्तु राजा
महाराष्ट्रालाच का भिती ?
प्रश्न धोरणाचा आहे म्हणूनच
In reply to महाराष्ट्रालाच का भिती ? by नितीनचंद्र
प्रश्न धोरणाचा आहे म्हणूनच
या नैसर्गीक साधनसंप्पतीचा
In reply to प्रश्न धोरणाचा आहे म्हणूनच by नितीनचंद्र
या नैसर्गीक साधनसंप्पतीचा वापर ( डोळसपणे ) करायला काय हरकत आहे ?ओके. या नैसर्गीक साधनसंप्पतीचा डोळसपणे वापर झाल्याचे एखादे उदाहरण आहे का?+१
In reply to या नैसर्गीक साधनसंप्पतीचा by मोदक
हे बघा आणखी एक उदाहरण.