✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'आन्ना' वय वर्ष ४५

अ
अज्ञात यांनी
Sun, 11/08/2015 - 13:25  ·  लेख
लेख
'आन्ना' वय वर्ष ४५ त्याला २मूलं एक मुलगी, मुलगी सर्वात मोठी, लग्न करून सासरी गेलेली. तीच्या लग्नाच्या दिवशी गेलेलो मी आठवतय काहीतरी तसं, त्यानंतर कधी पाहिलं नाही तीला कधी पाहिलं नाही, बाकीची २मुलं उनाड पण आन्नाला मदत करायची, आन्नाच्या सायकल मध्ये २पायपा मधून तंगडं फीरवीत ये जा चालू असायची धाकट्याची, आन्ना बाघावं तेव्हा कधी आंबे, नारळ, फणस काढायला झाडावर, शेण सारवायला गोठ्यात, सरपण गोळा करायला वाडीत, असाच दीसला... काळा वर्ण पांढरी दाढी, पट्टेरि हाप चड्डी, इतर वेळी फूल पांढरा मळका शर्ट, कामाच्या वेळी फूल बनियान, पांढऱ्या निळ्या स्लीपर्स, गळ्यात रुमाल, दात पुढे, आणि त्याची दोन मुलं, सेम टू सेम त्याच्या सारखीच दिसायला आणि वागायला ही, एखादं काम सांगितलं की नाही असं कधी ऐकलच नाही आम्ही. हल्ली जेल लावून (तारे जमीं पर मधल्या आमिर अठवा) कसे 'यो' दीस्तात! तशी सेम हैरस्टाइल होती आन्नाची, फ़क्त जेल ऐवजी चापडून तेल लावयचा, चहा प्यायला पायऱ्यांवर बसला की अक्ख्या गावच्या खबरा सांगत हातातली कपबशी मधला चहा पटापटा संपवायचा भुरके मारत, कोळी स्टाइल कधी कधी लुंगी पण घाटलेला पाहिलाय मी, लांब जाऊन ब्रिस्टल ओढायचा की काम सुरू... हे सगळ वर्णन १९९०च्या अलीकडलं... तेव्हा तो ४५वगैरे चा असणार, आता ६५+ चा नक्कीच, आक्षीचं घर/जागा सर्व विकलं ६-७वर्षापूर्वी, नंतर कधी भेटता आलं नाही, आणि कधी ती वेळ येईल असं वाटत नाही. आन्ना सारखे खुप चेहरे अजुन त्याच 'वयात' फ्रीझ झालेले आहेत, ते तेव्हढेच तरूण आणि मी ही तेव्हढाच लहान आहे अजुन, 'माइचा पोरगा ना रे तू' 'आप्पांचा नातू ना रे तू' अश्या लोकांच्या हाका अजुनही रास्त्यावर जिवंत आहेत, इंदुमतीचं दूकान, बपटांचं घर, चिटणीसांची वाडी, दातारांचा टीव्ही, गणपतीचं देऊळ, त्याच्याच डाव्याबाजूला असलेला फोरिनरनी विकत घेतलेलं घर, त्याचा समोर भीड्यांचं अर्ध पडलेलं/पाडलेलं घर, गोळा वाला राजू भैया, कुल्फी वाला, पोस्टमन काका... हे सगळे अजुन ही दिसतात... सगळे आठवतात! आन्ना त्यांच्या पैकीच एक... वय वर्ष ४५ #सशुश्रीके
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
3661 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

बंधू, थोड विस्ताराने येऊ द्या

बाबा योगिराज
Sun, 11/08/2015 - 14:09 नवीन
बंधू, थोड विस्ताराने येऊ द्या. थोड तुटक तुटक झालय. अजून मस्त खुलवता आल अस्त. पुलेशु.
  • Log in or register to post comments

पुढे सरकत नाही.

प्रभाकर पेठकर
Sun, 11/08/2015 - 14:59 नवीन
व्यक्तीचित्रण तिथल्यातिथेच पायात घुटमळत राहीलं. पुढे सरकलंच नाही.
  • Log in or register to post comments

+१

आदूबाळ
Sun, 11/08/2015 - 15:13 नवीन
+१ सहमत आहे. "सांगण्यासारखे काही" व्यक्तिचित्रात सापडलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१

आदूबाळ
Sun, 11/08/2015 - 15:13 नवीन
+१ सहमत आहे. "सांगण्यासारखे काही" व्यक्तिचित्रात सापडलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बापट काका

Ea imputo praemitto
Sun, 11/08/2015 - 17:53 नवीन
"सांगण्यासारखे काही" - च - खाली ओतले आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

"सांगण्यासारखे काही" - बापट काका

Ea imputo praemitto
Sun, 11/08/2015 - 15:23 नवीन
बापट काका आमच्या आक्षीच्या घराच्या पुढेच ५मिनिटावर एक शंकराचं मंदिर होतं, घरालाच जोडलेलं असं आणि घरातच पुढचा भाग दुकानात 'एडजस्ट' केलेला... म्हणजे बघा घर-मंदिर-दूकान... हे सगळं एकाच वास्तुत, कमाले नई! इंदुताइंच दूकान म्हणून प्रसिद्ध होतं ते, असो... त्याच वास्तू समोर एक वाडी होती, बहुतेक सर्वांची घरं रस्त्याच्या जवळ होती, पण त्या वाडीतलं घर जरा रस्त्यापेक्षा लांब, आणि जुने ही नव्हते... म्हणजे ८०सालात वगैरे बांधलेले... त्यातल्या त्यात नवीन, कारण गावात आरामात ७०-८०वर्ष जुनी घरं असतात, तर ते घर होतं बापट काकांच, तसे होते ते खुप म्हातारे, पण येणारे जाणारे सर्व बापट काका म्हणून हाक मारायचे, मग मी ही. माझी आजी दूध घेऊन ५-६घरांत जाऊन द्यायची, आमच्या कडे २म्हशी होत्या तेव्हाची गोष्ट, तीन्हीसांजाच्या वेळी, ना धड उजेड ना काळोख... आजीचा हात किंवा पदर धरून जायचो, बापट काकांकडे पण जायचो, रस्त्याच्या लगद नसल्यानी आत पर्यंत जाऊन त्याना हाक मारून तो स्टीलचा डबा द्यायचा मग ते आपल्या घरच्या भांड्यात आतून घेणार... असा दिनकर्म(क्रम)... मला बघुन भुवया उंचावून हसायचे आणि मग आजीकडे माझ्या आईची, मामा, अजोबांची विचारपूस करायचे, त्यांच्या दारात उभे राहिले की त्यांची आतली खोली दीसायची, खुप ग्रन्थ, भिंतीवर सूर्यनमस्कारचे क्रम असलेले पोस्टर, काही साधू संत वगैरेंचे जुने-जीर्ण फोटोज... जमिनीवर वाघाची कातडी (खरी की कार्पेटवाली ते आठवत नाही) आणि रंगांचे डबे, १०किलोवेटचा दीवा बाहेर आणि आत पांढरा शुभ्र ट्यूबचा लक्ख प्रकाश! ते एका जुन्या हिंदी कलवंतासारखे दिसायचे हे आजच मला कळले, नावच आठवेना... शेवटी गूगल वर जरा परिश्रम केले... मिळाले नाव, नाव आहे विनोद नागपाल. 'हम लोग' नावाच्या सिरिअल मध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे, तर तो कलाकार हुबेहूब बापट काकांसारखा, कुरळे केस, मोठा चश्मा, कायम खाकी चड्डीत... संघाचा पोशाख! हो हो अगदी संघातलेच वाटायचे! जाम भीती वाटायची त्यांना पाहिलं की. एके दिवशी दुपारी जेवण झाल्यावर टायर नी काठी घेऊन उनाडत होतो, बापटांच्या अंगणाचा दरवाजा उघडा दिसला म्हणून घुसलो... त्यांच्या घराचाही दरवाजा उघडा होता! आत डोकावलं... आत ही कोणी नाही, 'खाच खाच' असा आवाज येत होता, मला काही कळेना की आवाज कुठून येतोय, मी आत घुसलो, वाघाच्या खऱ्या कातडीवर पाय पडला... पहिल्यांदाच अनुभवलेले! पण तो 'खाच खाच' असा घावांचा आवाज वाढू लागला, जवळच असलेल्या डीपीचा आवाज पण सतत् त्या आवाजात भलताच सस्पेंस घुसवत होता, २ खोल्यांचं ते घर, त्या २ मिनटात माझी अशी विचित्र अवस्था झालेली, तरीही मी घारतल्या त्या मागच्या दरवाज्यापर्यंत मजल मारली, तो खाच खाच आवाज कुठून येतोय, नक्की काय चालूए याची मला भीती+उत्सुकता , दरवाज्याला लागूनच असलेल्या त्या मोठ्या पायऱ्या उतरून मी त्या प्रचंड हिरव्या गार परिसराच्या स्वाधीन झालो, ही मोठी मोठी नाराळाची झाडी, आंबा, फणस... खूप पाला पाचोळा, एका केळीच्या झाडा मागून येत होता आवाज, अचानक तो आवाज थांबला... त्या आवाजामुळे थरथरणारी केळीची पानं ही स्तब्ध झाली, माझे पाय ही थांबले, पाच सेकंद फक्त डीपीचा तो टीर्र् असा आवाज! कोयता घेऊन एक माणूस त्या झाडांमधुन बाहेर आला.. त्याचे डोळे माझ्यावर स्थिरावणार तितक्यात माझ्यामागे कोणीतरी आहे हे मला त्या माणसाच्या डोळ्यांच्या हालचालीवरून कळाले, मी ही वळून पाहिले, मागे बापट काका उभे होते! मी त्यांना काय झाले ते सांगणार इतक्यात तो माणूस बापट काकांना उद्देशून बोलायला लागला... "९नारल सोल्लून ठवलनीती, लास्टचा रहिलान! मग हीरीचा पंप लौतो" मनात काय काय भलते सलते विचार आलेले क्षणात गायब! तो माणूस इतका वेळ नारळ सोलत होता... त्याचा तो 'खाच खाच' आवाज! बापट काकांनी पंजा दाखवून त्या माणसाला उरलेला नारळ सोलून पुढचे काम करायला सांगितले. माझ्याकडे पहात... 'काय घारू अण्णा, इथे कुठे आज!?' असं म्हणत माझ्या पाठीवर त्यांचा भला मोठा पंज्यानी माझं अक्ख २०-२५किलोचं अंग 180°ने वळवत, घराच्या मागच्या दरवाज्यापाशी नेले, जवळच असलेला हिरवा जाडा पाइप हातात घेऊन पंप चालू केला, दीड इंचाचा त्या पायपातुन जिवंत साप तगड्या हातांत घेतल्यावर जसा तडफडेल अगदी तसाच तो पाइप काकांच्या हातात... पाणी फोर्सनी बाहेर आले, थेट काकांच्या पायावर... पायवारुन समोरच्या झाडांवर, मला विचारलं ( विचारलं म्हणजे काय...डोळ्यांनी इशारा केला, पाय धुवायचेत का!? ) मी ही काही न बोलतानाच (नकारात्मक) मान हलवली, ते हसले, दरवाज्याच्या जवळच एक फणस ठेवलेला, त्याला बघुन 'खाणार का!?' हे ऐकून मी (सकारात्मक) मान हलवली! तो भला मोठा फणस, अगदी सहज उचलला आणि आम्ही घरात शिरलो, ट्यूबलाइट लावली, १० सेकंद लागले ती ट्यूबलाईट पकपकत लागायला... त्यांच्या घरी त्यादिवशी पहिल्यांदाच असा 'प्रोप्पर' आत गेलेलो! त्या घरात २ खिडक्या, त्या खिडक्या सोडल्यातर क्वचीतच भिंत दिसेल इतकं सामान, पुस्तकं, हार्डवेअरची सामानं, आणि भिंत मोकळी जिथे जिथे पोस्टर्स/फोटोज तिथे तिथे! जळमटं पण होती पण फक्त जीथे हात पोहोचत नसेल तिथेच, स्वयंपाक खोली आणि एक मोठी रूम आणि त्यालाच लागून एक बेड असलेली छोटी रूम, त्यालाच मुख्य दरवाजा. माझं पुस्तकांकडे... एक चित्र-शब्दकोष होता इंग्रजी, चांगले जाडजुड ५भागांचा संग्रह! मस्त जाड पुठ्ठा असलेले मुखपृष्ठ, आकर्षक चित्र आणि ईंग्रजीत A-F, F-K... अशी विभागणी असलेला संच! बापट काका आले जवळ, मला तो संच काढून दिला म्हणाले, "माझ्या नतवंडांसाठी जपून ठेवलेत मी, तू घेऊन जा हो... पण परत आणून दे!" मी त्यांच्याकडे पाहुन हसलो! हातात न मावणारी आणि पेलवणारी तो संच घेऊन घरी आलो! त्या दिवशी उरलेली अक्खी दुपार (नंतर अक्खी उन्हाळ्याची सुट्टी) ती पुस्तकं बघण्यात घलवली, काय मस्त क्वालिटी होती, अप्रतिम चित्रं, नक्कीच खुप महागातली असणार, बापट काकांनी मला बघायला/वाचायला दिली ह्यावर विश्वासच बसेना! संध्याकाळी आजी बरोबर परत गेलो, तेव्हा माझा टायर, काठी, कापलेला फणस आणि बापट काका माझी वाट पहात होते, नेहमी प्रमाणे विचारपुस करून झाली आजीकडे, हे असे रोज चालू असायचे. बापट काका म्हणजे एक मेहनातीचे भण्डारच होतं... बहुदा ते मुंबईत राहत असावेत, पण त्यांचा जीव इथे आक्षीत, इकड्च्या वाडीत, फुलापानांत... त्याची शरीरयष्टीही उत्तम! वयाच्या ७०रीत ही योगसाधना वगैरे त्यामुळे तल्लख बुद्धी... बायको हयात नसेल, नाहीतर दिसली असती कधी ना कधी, मुलं अमेरीकेत, त्यामुळे एकटा जीव सदाशिव! आता कुठे असतील देवास ठाऊक! पुढे नंतर कधी भेट झाली नाही, आजोबा गेले... नंतर आजीही एकटी असल्यानी आक्षीत कमीच असायची, माझं गावाला जाणं जवळपास बंदच झालं, आजी वरल्यानंतर तिथले घर-वाडी दोन्ही विकले, आता तिथे फक्त आठवणी राहतात. मध्ये मी आणि आई गेलेलो... आमच्या घराच्या ठिकाणी एक आलिशान बंगला बांधलाय... पाय नकळत बापट काकांच्या घराकडे वळले. मुख्य फाटकाला कुलुप होते, साफसफाई ही केलेली नव्हती...म्हणजे खुप दिवसात/महिन्यात तिथे कोणाचे वास्तव्य नव्हते हे जाणवत होते. मी स्वतःशीच बडबड करत कुंपणातून आत घुसलो..."कुठे असतील बापट काका?… त्यांनी दिलेला संच परत केलाच नाही!" तितक्यात कोणतरी मागे आहे असे वाटले, म्हणून लगेच वळून पाहिले खरे!… पण कोणीच नव्हते. प्रश्न अजून ही पडतो… परत भेटतील का 'बापट काका'?परत भेटतील का 'बापट काका'? #सशुश्रीके
  • Log in or register to post comments

वाह

बाबा योगिराज
Sun, 11/08/2015 - 17:19 नवीन
सूंदर लिहिलय. ऐसा और भी आने देओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

धन्यवाद बाबा साहेब

Ea imputo praemitto
Sun, 11/08/2015 - 17:52 नवीन
धन्यवाद बाबा साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज

चांगल लिहीत आहात.

जेपी
Sun, 11/08/2015 - 17:26 नवीन
चांगल लिहीत आहात. हळुहळु कामथे काका पर्यंत पोहचाल.
  • Log in or register to post comments

आता हे कामथे काका कोण!

Ea imputo praemitto
Sun, 11/08/2015 - 17:52 नवीन
आता हे कामथे काका कोण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

कामथे काका कोण?

जेपी
Sun, 11/08/2015 - 17:58 नवीन
कामथे काका कोण? कामथे काका कोण??? . . . . . . . . . काय नाय गंमत केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

जेपी भौ

बाबा योगिराज
Mon, 11/09/2015 - 00:03 नवीन
ख्या ख्या ख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

अक्षीचे गधेगाळ तुम्ही पाहिले

प्रचेतस
Sun, 11/08/2015 - 17:57 नवीन
अक्षीचे गधेगाळ तुम्ही पाहिले का हो?
  • Log in or register to post comments

गधेगाळ?

Ea imputo praemitto
Sun, 11/08/2015 - 19:27 नवीन
गधेगाळ? ते काय अस्तं बुआ!?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अक्षीचे असून तुम्हाला नाही

प्रचेतस
Sun, 11/08/2015 - 20:02 नवीन
अक्षीचे असून तुम्हाला नाही माहीत का? अक्षीच्या मुख्य रस्त्यावरील मंदिराच्या जवळच असलेल्या सरकारी कचेरीच्या पुढ्यात एक शिळा आहे. त्यावर कोकणचक्रवर्ती, पश्चिमसमुद्राधिपती केशिदेवराय शिलाहार ह्याचा महाप्रधान भईजू सेणुई याने देवीच्या बोडणासाठी नऊ कवली धान्य मोजून दिले हे दान जो मोडिल त्यास महालक्ष्मीची आण घातलेली आहे. हा गधेगाळ डॉ. तुळपुळे यांचे मते महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन मराठी लेख मानण्यात येतो. तर दुसऱ्या गधेगाळाची शिळा मंदिराचे उजवी बाजूस रस्त्याच्या पलीकडे गटारावर असून त्यावर रामदेवराय यादवाचा सेवक श्रीजाईदेव याचा पुत्र इश्वरदेव क्षत्रिय याने अक्षी गावातील देवी श्रीकालिकादेवी हिच्या ब्राह्मणास १ गद्याण दिला ह्याच्या उल्लेखाचा आहे. व खाली शापवचन आहे. गद्याण म्हणजे ४८ गुंजांच्या भाराचे सोन्याचे नाणे. उपरोक्त शिलालेख इ.स. १२९१ चा आहे. तर आधीचा केशिदेवाचा लेख इ.स.१०३९ चा मानण्यात येते. ह्या व्यतिरिक्तही नागाव येथील भीमेश्वर देवळाचे पायरीचे बाजूस कोकणाधिप हंबिररावाचा इस. १३४० चा शिलालेख आहे. हयात विविध दानांचा उल्लेख आहे. ह्यातली काही दाने ही मुसलमानांनाही दिलेली आहेत हे विशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ea imputo praemitto

यात कुठेही गधेगाळ म्हणजे काय

टवाळ कार्टा
Sun, 11/08/2015 - 20:08 नवीन
यात कुठेही गधेगाळ म्हणजे काय याचा उल्लेख नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तू गप रंव रे. वशाड मेलो.

प्रचेतस
Sun, 11/08/2015 - 20:10 नवीन
तू गप रंव रे. वशाड मेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

घ्या बोलून...तुम्च्या

टवाळ कार्टा
Sun, 11/08/2015 - 20:17 नवीन
घ्या बोलून...तुम्च्या मुस्क्या आवळ्ळ्याजाण्याचे दिवस दूर नैत अता =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्च्या मुस्क्या आवळ्ळ्याजाण्याचे दिवस दूर नैत अता

मुक्त विहारि
Sun, 11/08/2015 - 23:40 नवीन
ह्या एकोळी लेखात, बर्‍याच गोष्टी सामावलेल्या दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

शीलालेख

Ea imputo praemitto
Tue, 11/10/2015 - 11:47 नवीन
शीलालेख
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हो हो... शिळा माहीत आहे पन

Ea imputo praemitto
Mon, 11/09/2015 - 11:51 नवीन
हो हो... शिळा माहीत आहे पन त्यचे नाव नव्हते माहीत! आइचे गाव ते, लहानपणी उन्हाळयाच्या सुट्टीत आजि आजोबांकडे हुन्दाडायला जाणे! इत्काच उद्देश असायचा! अक्षी बद्दल एक लेख लिहिलाय... टाकतोय आत्ता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा