भाव भोळा
लेखनविषय (Tags)
शकू आणि तिची आई दोघी आमच्या अपार्टमेंट मध्ये धूणंभांड्याचं काम करतात.
निदान गेली दहा पंधरा वर्षं .
लग्नानंतर जेमतेम दोन चार वर्षं त्यांना भोगायचं, एक दोन पोरासाठी ती बाई व्याली कि तिला
टाकायचं हा भोग ज्यांच्या नशिबात,दोघीहि मायलेकी त्याच वर्गातल्या.
शकूच्या आईचं जवळजवळ सगळं तर शकूचं निम्मं आयुष्य हे असं कीड्या मकोड्याचं गेलंय.
पण त्यांच्या आयुष्यात एक पर्वणी आता येऊ घातलीय. दोघीनाहि आगीनगाडितुन काशीला,जायला मिळणार आहे.
भूपाल काका सगळ्या झोपडपट्टीला ,त्याच्या खर्चानं काशी विश्वनाथाला नेवून आणणार आहे.ते,पण,आगीनगाडिनं.
शकू तर हारखून गेली होती. काशीतला देव ,सगळ्यात मोटा देव ,तिला कुणीतरी सांगितलं होतं.पण तिला
त्याच्यापेक्षा कौतुक होतं,आगगाडीत बसायला मिळणार याचं.
रविवारी सकाळी सातला त्यांची रेल्वे होती . शनिवारी तिनं आमच्या सगळ्यांचा निरोप घेला.हीनं, तिच्या काकीनं
तिला बर्याच सूचना केल्या,थंडीसाठी शाल, एक बॅग ,किरकोळ पैसेहि दिले
दूसरेदिवशि हीनंच सकाळी आपलं आपलं आवरलं,मीहि तिला थोडीफार मदत केली.आणि दूपारी जरा पडलो तर बेल वाजली.
दार उघडलं पहातो तर दारात शकू उभी ,काय गं, काय झालं?तुझी काशी इथंच ?
नाई काकी मी नी आय दोगि बी गेल्यालो ठेशनावर, मायंदाळ भीड ,सगळं गांव लोटल्यालं डब्यात मुंगी शिराय बी
जागा नाई. मग मी दोन लेकरास्नी घिवुन कसं जानार? आय बी,म्हनली,तू,मागारि जा. म्होरच्या टायमाला,तू
जाशिल म्हनं!
मग?
मग काय आली मागारि.कवा म्होरचा टाइम गावनार कुनालं दकल .मग म्या इक केलं.
काय?
गाडीला हात लाउन आली .आता कवा बसाय मिळंल नाइ मिळंल. गाडीव चांगला गरगरित हात फिरवून आली.
इतनंच देवाला नमस्कार किला.
तिच्या अल्प संतुष्ट पणानं ,भोळेपणानं अचंबित व्हायला झालं होतं . काशी यात्रेच पुण्य इतराना मिळेल नाही मिळेल
शकूला नक्की मिळणार होतं.काशी विश्वेशराच्या गाभार्यात सर्वा आधी शकू पोचल्याचं उगीचचं माझ्या मन:पटलावर
दिसत होतं
प्रतिक्रिया
छान लिहिलंय. मनाला भिडणारी
भेष्ट
शी विश्वेशराच्या गाभार्यात
+१
छान लिहीलय. 'मकोड्याचं' हा
मस्तच
कथा आवडली. शकू आणि तिच्या
+१
-उंबरातले किडे मकोडे
लेखन आवडले.
कथा आवडली .
+१००
आवडली कथा! खूप छान लिहिली आहे
होय
मनाला भिडणारी कथा.