पहिली आठवण अन पहिला क्षण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
पहिली आठवण अन पहिला क्षण
पहिला दिवस, प्रत्येक वेळी हा पहिला दिवस फार संस्मरणीय असतो ना!!!
शाळेतला पहिला दिवस तसा नाही आठवणार आता, पण थोडे काही दिवस आठवत आहेत, अगदी सुरवातीला जेव्हा लहान गट मध्ये गेले तेव्हाचा युनिफोर्म चा रंग आठवतो आहे, पण गम्मत अशी कि लहानगट मधेच शाळा बदलेली आणि सांगलीला नव्या शाळेत घातले त्यावेळचे म्हणजे म्हणजे कोणत्या रंगाची waterbag होती आणि कंपास box हे मात्र आठवतंय. इतकाच काय, ज्या रस्ता वरून आईचा हात धरून चालत यायचे, त्या वाटेवर खूप सारी बोगनवेल होते हे पण आठवतंय आणि त्याचे रंग सुद्धा, विलीग्डन कॉलेज सांगली मधून जायचा तो रस्ता., नंतर मी त्या कॉलेज मध्ये ११ आणि १२ वि ला होते , पण पहिली स्मृती हीच . मी स्वतःच त्या फुलांचे नाव पण ठेवले होती "पेपर ची फुले ", बोगनवेल हे नाव मला फार नंतर कळाले
त्या नंतर शाळा बदलली तेव्हाचे पहिले दिवस मात्र स्पष्ट आठवत आहेत, नवी जागा, नवे सवंगडी, नवीन शिक्षक , हुरुहूर तर होतीच पण भीती कधिच नाही वाटली
कॉलेज मधले पहिले दिवस पण असेच होते, excited ,
आयुष्यात होस्टेल वर राहण्याची वेळ मात्र engg नंतर आली . पण तो दिवस मात्र अगदी स्पष्ट आठवतोय . थोडे टेन्शन तर नक्की होते. ह्या सगळ्या दिवसांच्या घटन किंवा क्रम नाही आठवत पण ती पहिल्या दिवसाची हुरहूर नक्कीच आठवतीय हे मात्र नक्की
काही काही दिवस मात्र उगाचच लक्षात आहेत, जसे कि मी पहिल्यांदा " सांगली नगर वाचनालय" पहिले तो दिवस, इयत्ता पहिली, कोणती तरी संस्कृत श्लोक पठण स्पर्धा होती, तेव्हा वाचनालय किती मोठे आहे त्याची कल्पना नाही आली , पण हे भारी आहे असे वाटले होते आणि त्या नंतर, मी ५ इयत्ते मध्ये असताना एकदा वाचनालय निवांतपणे पाहिण्याचा योग आला आणि जीव हरखून गेला. असे वाटले मोठे पाणी इथेच नोकरी करावी , भरपूर पुस्तके + पगार आणि हवे ते पुस्तक हवे तेव्हा आपल्याला मिळणार. त्या नंतर किती तरी वेळा मी तिथे गेले असेन , सभासद म्हणून , पण तो पहिला दिवस अगदी स्मरणात आहे आणि ते विचार सुद्धा
अशीच एक आठवण म्हणजे, इयत्ता चौथी मध्ये असताना , आकाशवाणी वर जाण्याचा आलेला योग, त्या नंतर हि आकाशवाणीवर गेले असले तरी , तो पहिलाच दिवस माझ्या लक्षात आहे. गम्मत म्हणजे मला आवडलेली गोष्ट म्हणजे , माईक , मला उगाचच तो माईक मध्याच्या पोळ्यासारखा वाटला, नेहमी सवय असलेल्या माईक पेक्षा लई भारी वाटले तिकडचे रेकॉर्डिंग रूम चे माईक !!!
पहिली कविता कधी लिहिली, किंवा लिहावी लागली त्याची गम्मत औरच आहे. खर तर मी त्या आधी खूप वेळा स्पर्धे साठी निबंध , भाषणे लिहिली होती , स्वतःची स्वतःच लिहायची, पालकांनी लिहून दिली तर काय उपयोग, बक्षीस नाही मिळाले तरी चालेल असा काही तरी अलिखित नियम होता घरात आमच्या . तर सांगायचे म्हणजे, या व्यतरिक्त सातवी मध्ये एकदा एक गोष्ट लिहायचा प्रयत्न झाला होता, त्या नंतर " मी माझा;', नावाचे पुस्तक वाचनात आले आणि मग चारोळी ला सुरवात केली , कारण शाळेच्या हस्तलिखित मध्ये एक पान भरून काढायचे होते . खर तर काही हि स्फूर्ती वगैरे नसताना , कारण परत्वे कविता उर्फ चारोळी लिहिली गेली, आज दुर्दैवानी (किंवा सुदैवानी), ती कविता आणि गोष्ट या दोन्ही पैकी माझ्या कडे काहीच नाहीये आणि काय लिहिले होते ते पण आठवत नाहीये smile emoticon, पण या दोन्ही गोष्टी मी शाळेच्या पायरीवर बसून लिहिल्या, एकदा स्कॉलरशिप क्लासला अचानक सुट्टी मिळाली म्हणून आणि चारोळी, दोन तासांच्या मध्ये smile emoticon. नंतर अश्या अनेक कविता, Engg ला असताना तसा सुरु असताना लिहिल्या, हा भाग वेगळा smile emoticon
आणि अश्या बऱ्याच पहिल्या वहिल्या आठवणी आहेत मनात, अगदी अलीकडची म्हणजे, सागरला (माझे कुंकू), वाचायला दिलेली पहिली कविता, (instant ), ऑफिस मध्ये ७. ३० नंतर बसून केलेली, हाच असेल कदाचित तो पहिला क्षण प्रेमात पडण्याचा smile emoticon. त्या नंतर आधी like आणि मग वाचणे असा त्याचा क्रम असला तरी, तो क्षण एखादाच नाही का smile emoticon
अश्या अनेक गोष्टी मनात आहेत साठलेल्या, पहिल्या वहिल्या आठवणी, पण मनस्वी मनाचे सगळे कप्पे एकदम थोडी न उघडता येतात. प्रत्येकाच्या मनामध्ये अश्या आठवणी साठलेल्या असतील, गरज आहेत फक्त थोडा वेळ काढून , आत डोकावून पाहण्याची आणि मग काय माहित एखादा खजिनाच हाती लागला आहे असे वाटेल. मनाची कवाडे थोडी उघडली पाहिजेत , म्हणजे आनंद हि मिळेल आणि स्वछ आणि निर्मळ हवा खेळती राहील मनामध्ये सुद्धा. मग जरा मनाची पण साफसफाई करायची का या दिवाळीला आणि उडवायचा का बार या पहिल्या वहिल्या आठवणीचा
- शीतल जोशी
प्रतिक्रिया
छान लिहिले आहे....
हे बराय! आम्ही, 'मी पयला'
तो मुविंचा कॉपिराईट आहे :)
मग याला पर्याय एकच, नाव बदलून
मी दुसरा.. पुलेशु
छान लिहिले आहे....
.
:)
मला मात्र माझ्या शाळेचे
:-))
मला शाळेत सोडायला आई + काकु +
धन्यवाद
छान सहजपणे लिहिलंय... पुलेशु
छान लिहीलीय