श्रवणयंत्राचा खरंच उपयोग होतो का? माहिती हवी अाहे
माझ्या वडिलांना गेली काही वर्षे हळूहळू ऐकायला कमी येत अाहे. सध्या त्यांचे वय ८१ वर्षे अाहे. अांम्ही त्यांच्यासाठी श्रवणयंत्र घेण्याचा विचार करत अाहोत. अजून ते परीसरात फिरतात, माणसांना भेटतात त्यामुळे ते अावश्यक वाटते. पण इथे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे अांम्हाला अनेकांकडून कळलेली माहिती, अनुभव असा, की त्या श्रवणयंत्राचा फारसा उपयोग होत नाही. पहिले काही अाठवडे ते वापरले जाते, पण नंतर बरेच लोक ते वापरत नाहीत. त्याचा उपयोगापेक्षा त्रासच होतो. तर कृपया खालील बाबतीत अापला सल्ला, अनुभव, माहिती शेअर करावी, ही विनंती:
- श्रवणयंत्राचा खरंच उपयोग होतो का? विशेषत: उतार वयात.
- श्रवणयंत्रामधे बरीच रेंज अाहे. रू ४००० ते १.५ लाख. यात काही चांगला अनुभव, ब्रॅंड, देशी, परदेशी इ. बाबत सल्ला
- एकदा श्रवणयंत्राची सवय झाली (जर नियमित वापरले तर) त्याचा नैसर्गिक ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो का?
- त्यामुळे इतर काही अारोग्याच्या समस्या निर्माण होतात का?
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझे बाबा वापरतात श्रवणयंत्र.
चांगल्या दर्जाचे वापरल्यास
बिघाड कुठे आहे त्यावर अवलंबून
वर वाचक म्हणतात त्यामधे जो
माझे बाबा हे यंत्र अनियमितपणे वापरतात.
बिंधास्त घ्या....
वय झाल्यावर (वय झालं असं साठी
माझं आणि सक्ख्या दोन बहिणींचं
व्य नि
श्रवणयंत्राचा फायदा होतो
खूप चांगली माहिती
हे वाचून पहा बर्याच
उपयुक्त दुवा
स्वानुभव
सविस्तर प्रतिसाद