असाहि एक श्रावण बाळ
लेखनविषय (Tags)
प्रवेशद्वारासमोरच माझा कौंटर यायचा ,त्यामुळं बँकेत येणारा प्रत्येक कस्टमर मला ओलांडूनच
पुढं जायचा .ठराविक कस्टमर मात्र कितीही गर्दी असूदे माझ्याइथंच थांबायचे .अविनाश मोडक त्यापैकीच एक .
तो माझ्याच वयाचा ,म्हणजे साधारण ४० च्या आसपासचा असावा .खरं म्हणजे त्याचं मुळात अंकाउंटच,
नव्हतं आमच्या बँकेत ,त्याच्या वडलांचं अंकाउंट होतं. पूर्वी त्याचे वडील यायचे,आता तो येतो. तो येतो,फक्त
माफक हसतो, तोंडातून चकार शब्द नाही ,पासबूक सरकावतो,त्याला ते मांडून हवं असतं,बस्सं एव्हडचं काम.
तो येताना दिसला की ,मी त्याचं अंकाउंट ओपन करून ठेवतो ,त्यात हातखंडा आहे माझा .,त्यामुळं त्याचं काम
अर्ध्या मिंटात होतं ,तो एकदम खूष.कधी पैसे ठेवणं नाही ,काढणंही नाही ,कुठूनतरि अन्य खात्यातून पैसे,
येत असावेत किंवा व्याजाच्या एंट्रीज् त्याला हव्या असाव्यात. पण असं जर म्हटलं तरि,माणूस पास बुक
उघडून बघेल, ते अपडेट झालंय कीं नाही बघेल. एकदाहि नाही! यंत्र मानवासारखा तो काम करायचा.
पास बुक एकदाहि ऊघडून त्यानं बघितलेलं मला आठवत नाही.मला कुतूहलंच होतं या सार्याचं.
आणि एका रविवारी योगायोगाचा भाग ,गावातून जाताना स्कूटर सारखी त्रास द्यायला लागली,म्हणून .
एका मिस्त्रीकडं थांबलो तर अविनाश मोडक अचानक तिथं भेटला.आपण बाजूच्याच बिल्डींग मद्ध्ये राहातो, घरी चला
म्हणून आग्रह करू लागला . जाऊ नका आलोच म्हणून कुठतरि पसार झाला.अविनाश सर एकदम जंटलमन माणूस साहेब,
मिस्त्री बोलला ,औषधाच्या एका कंपनीत असतात साहेब आहेत हे,कुटंकुटं मोट्या कंपनीत बोलावत्यात त्यास्नी
पर दुसर्या गांवाला जावं लागल, मग वडलाला कोन बघणार म्हून नायी गेल्याले.सगळ्या बिल्डींग मधले तेस्नि
श्रावण बाळ म्हणत्यात.
येवढ्यात अविनाश मोडक आलाच.शेजारच्या स्वीट मार्ट मधून कांही पार्सल बहुधा घेतलं होतं.मिस्त्रीकडं,थोडा,वेळच
लागणार होता ,मी चला म्हणालो.आम्ही दोघं त्याच्या प्लॅटपाशि आलो.त्यानं लॅच उघडलं. मला हॉलमध्ये बसवून
आता गेला. वडलाना व्हील चेअरवरून घेवून आला .माझी ओळख करून दिली.जरा,बोलत बसा,म्हणाला,
पुन्हा आंत पळाला.
"बरं कां पाटील साहेब," त्याच्या वडलाना मी मध्येच थांबवलं म्हणालो ",मला नुसतंच पाटील म्हणा ."
"असं कसं खुर्चीचा मान आहे तो ,बरं ते राहूदे, तुमच्याविषयी सांगत असतो अविनाश मला,एका मिनटात तुम्ही,
त्याचं काम करता ते."
" आहो कामच काय असतं त्यांचं?नुसतं पास बुक तर भरून द्यायचं असतं आणि तेही बंद होइल आता, ज्याचं
त्यानं करून घ्यायचं.मशीन बसवायचं चालू आहे जागोजागी ."
"पायाकडून अधु झालो मी. आता कुठं बाहेर जाऊ शकत नाही मी. अविनाश आणि अर्चना,मला दोन,मुलं.
अर्चना डॉक्टर, आहे .अमेरिकेत असते ती. दोन वर्ष झाली,ही गेली. अचानकच. आता सगळं एकट्या अविनाश
नवरा बायकोवरच पडलंय.सुनहि माझी फारच चांगली आहे ,सून कसली दूसरी मुलगीच ती. नुकतीच ती पण सध्या
अमेरिकेला गेलीय, नातवाच्या पदवीदान समारंभासाठी. नातू तिकडंच एम्.एस्. झाला. दोघानाहि बोलावत होता तो,
पण अविनाश नाही म्हणाला.माझ्याकडं कोण बघेल? म्हणाला.माझ्यात सारखा जीव अडकतो त्याचा .
अर्चना स्वत: चांगले पैसे मिळवते, त्यामुळं ती अधूनमधून इकडं पैसे पाठविते. कष्टानं तिला शक्य नाही,
म्हणून ती थोडा आर्थिक बोजा उचलायचा प्रयत्न करते. पण तिच्याच काय माझ्याही स्वत:च्या (तुटपुंज्याचं खरं,)
पैशाकडं अविनाश बघत नाही. माझी जबाबदारी तो एकट्याची मानतो.
आईची सेवा करायलाच मिळाली नाही,वडलांच्या सेवेत आपण कमी पडता नये असा,निग्रह त्यानं केलाय.
माझी वाणी तेव्हडि देवानं शाबूत ठेवलीय बाकी माझ्या शरिराला गलितगात्र करून टाकलंय आणि अविनाश त्याची सेवा ,मदर तेरेसा सारखी करतोय.मला नको वाटतय हे,सारं.
घरातले सर्व देव त्यानं खुंटाळ्ला,अडकवून ठेवलेत ,जिवंत देवाची,सेवा,करायची आहे असं तो,म्हणतो.
बाहेर सेवाश्रमी संस्था आहे तिथं मी स्वत:ही जायची तयारी केली तरी हा कबुल होत नाही.
नोकरी आणि हे,सर्व करायचं यात त्याची ससेहोलपट होते पण त्याची तक्रार नाही.
लोकं,त्याला श्रावण बाळ म्हणून हिणवायाचा प्रयत्न करतात पण त्याचा त्याला अभिमान आहे.
आणि त्याच्या तत्वनिष्ठेत ते,बसत,नाही,पण तो,माझ्या आग्रहा खातर फ़क्त तुमच्याकडून तो,पास,बुक
भरून आणतो पण ना स्वत: उघडून, तो ते पाहतो,न मला,सांगतो.इतकं सगळं,बोलताना त्याना धाप लागली,पण
एव्हाना अविनाश त्यानं आणलेलं,स्नॅक्स घेउन आला होता . मी फक्त ते उष्टावल्यासारखे,केले,आणि तिथून
उठलोच.अविनाशनं पास बुक न ऊघडून बघायचा उलगडा मला झाला होता.हे एक,मनस्वी व्रत होतं.
आश्वथामा जर चिंरजीवि असू शकतो तर श्रावण बाळ परकाया प्रवेश्यातुन भले असेल पण का, चिंरजीवि
असू शकत नाही.मी,मनोमन,विचार करतो.
आई वडलाना S. T. स्टँडवर सोडून पसार व्हायच्या या जमान्यात,व्रृद्धाश्रम ओसंडून व्हायच्या या युगात
एखादा तरी अविनाश असतो ,एखादा तरी श्रावण बाळ पुन: जन्म घेता असतो हे,बघून भरून आलं,मला,
मनोमन मी त्याला,अभिवादन केलं आणि पायर्या उतरू लागलो.
Created using Quillpad Touch
Sent from my iPad
प्रतिक्रिया
छान लेख
इतक्या चांगल्या लेखात
छान लेख
आवडले !
ऐसा श्रावनबाळ प्रत्येक घरात