Skip to main content

मदत हवी आहे- बांबूच्या कामट्या/ काड्यांचा कंदील

Published on शनीवार, 07/11/2015
नमस्कार मिपाकरहो, या वर्षी सालाबाद प्रमाणे कंदील आणि चायनीज माळा विकत न घेता बांबूच्या कामट्यापासून कंदील करण्याची लहर आली आहे. (राजकारणी लोक जसा चौकात लावतात तसा पण एवढा मोठा नाही मिडीयम साईझचा) त्यासाठी हा शनिवार रविवार खर्ची घालायचा आहे. यु tube वर काही विडीओज आहेत पण त्यात मूळ सांगाडा कसा तयार करावा यासाठीचे मार्गदर्शन नाही. तरी हौशी मिपाकरांनी यासाठी मार्गदर्शन करावे हि विनंती. माझ्या आजोबांच्या काळात फिरते कंदील बनवायचे ज्यात पणती ठेवली जायची आणि गरम हवेच्या दबावाने कंदील गोल फिरायचा - याबाबत काही माहिती आहे का?

वाचन संख्या 3682
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

बांबुच्या कामट्यांचा आकाशकंदिल करता येतो. सुईने कामट्यांना भोकं पाडुन त्यामधुन दोरा ओवुन घेउन फ्रेम तयार करता येते. त्यावर मग घोटीव कागद, जिलेटिन पेपर वगैरे वापरुन करता येतो आकाशकंदिल तयार. अगदी तीन वर्ष अलिकडे पर्यंत माझे बाबा घरी बनवायचे आकाशकंदिल असा.

वरील प्रकार छान आहे , पण त्याही पेक्षा सोपा आकाश कंदील आम्ही आमच्या लहानपणी बनवीत असू. बांबुच्या कामट्या वर लिहिल्याप्रमाणे तयार करावयाच्या. ठरावीक लांबीच्या म्हणजे आपल्याला हव्या तेव्हढ्या आकाराच्या घेवुन, चार त्रिकोण बनवायचे. म्हणजे सुरवातीला तीन कामट्यांचा एक त्रिकोण , असे एकुण दोन त्रिकोणांचा एक स्टार म्हणजे सहा टोके असलेली चांदणी तयार करावयाची. आपापसातील सर्व जॉइंटस , त्याच पुडीच्या धाग्याने पक्के बांधुन घेणे. अशा दोन चांदण्या तयार केल्यावर, दोन्ही चान्दण्या एकमेकांशी टोकावर घट्ट बांधुन घ्यावयाच्या. आतील जॉइंटस वर छोट्या आडव्या लहान लांबीच्या कामट्या जोडुन, फुगीरपणा आणवयाचा. बाहेरुन रंगीत कागद डकवायचा. आतमध्ये लहान बल्ब लावायचा. मला फोटो टाकणे अथवा आकृती काढणे जमत नाही. .

ताबडतोब सविस्तर प्रतिसाद लिहिणं कठीण आहे. जयन्त बा शिम्पि यांनी कृती दिलेली आहेच. trikon बांबूचे दोन समभुज त्रिकोण पुडीच्या दोऱ्याने जोडून वरच्या चांदणीसारखा आकार करा. अशा दोन चांदण्या बनवा. आता त्रिकोण एकमेकांना छेदतात तिथे बारक्या काड्या लावून या दोन चांदण्या जोडा. हे जॉईंट्स मजबूत करा, पुडीचा दोरा, क्विकगम वगैरे वापरून. मी दोरा आणि गोंद दोन्ही वापरत असे. नंतर चांदण्यांची टोकं, बांबू वाकवून एकत्र करा. बाहेरून पतंगाचा कागद लावला की चांदणी तयार. हवंतर टोकांना झिरमिळ्या लावा किंवा लावू नका. पसंद अपनी अपनी. षटकोनी कंदील बनवायचा असेल तरीही असंच करता येतं. (सध्या आकृत्या वगैरे काढायला टाईम इल्ला.) करंज्यांचा कंदील बनवणं आणखी सोपं आहे. समान आकाराचे, पुठ्ठ्याची दोन वर्तुळं बनवायची. ती तीन-चार उभ्या पुठ्ठ्याच्या रेघांनी जोडायची. पतंगाच्या कागदाचे चौरस बनवायचे. चौरसांचा डायगोनल उभ्या पुठ्ठ्यांच्या एवढा पाहिजे. या चौरसांच्या करंज्या कातरून पुठ्ठ्याला सगळ्या बाजूंनी लावायच्या. झिरमिळ्या लावायच्या. कंदील तयार.

मी सुद्धा गेल्यावर्षी घरीच कंदील बनवला होता.यावर्षीही घरीच बनवणार आहे. बरीच मेहनत करावी लागते. त्यामध्ये पण वेगळाच आनंद मिळतो.

सर्वांना धन्यवाद आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!! कंदील बनवला आहे नंतर फोटो टाकतो.

याआधी असा घरी कंदील केला होता, त्याला सहज वीस एक वर्ष होऊन गेली असतील. यंदाही घरीच कंदील करावा असा विषय निघाल्यावर कामांच्या भाऊगर्दीत तो बारगळल्यातच जमा होता. आपल्या धाग्याने आणि परीकथेतील राजकुमार यांच्या त्वरीत सहाय्याने आणि ऑफ कोर्स ऋशिकेष यांच्या मार्गदर्शक धाग्याने ह्या विषयाला पुन्हा चालना मिळाली. आपले सर्वांचे धन्यवाद!! रवीवारचा संपूर्ण दिवस घेऊन, सोमवारी सकाळी दहा वाजता आमचा कंदील स्थानापन्न झाला- .

हा यावर्षी मी पेपर क्विलिंग ने बनवलेला कंदील!!