मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धागा धागा जोडित्..(धागा-४)

प्राजु · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
विनायक आणि ऋषिकेश यांच्या सांगण्यावरून.. हा नवा धागा आपल्याला अर्पण.. - प्राजु

वाचने 23018 वाचनखूण प्रतिक्रिया 46

ऋषिकेश Tue, 01/15/2008 - 03:59
धागा ३ मधील विनायकचा शेवटचा धागा: मिटणं म्हणजे प्रेम असंही म्हणता येतं... प्रेमाशिवाय तरी कुठे जिवन हे जगता येतं... : : : पुढे चालू..... प्रेमाचा प्रत्येक रंग मला तुझ्यामधे दिसतोय तुझ्यातील रंगांमुळेच मी प्रेम करायल शिकतोय

प्राजु Tue, 01/15/2008 - 04:09
रंगात रंगूनी तुझीया जाहले मी बावरी कान्हाच्या ओठातील जाहले मी पावरी - प्राजु.

ऋषिकेश Tue, 01/15/2008 - 06:18
जाहलो मी पावरी ... जी वाजे तुझ्याच फुंकरीने सितारही होतो मी... झंकारते मात्र तुझ्याच स्पर्शाने

प्राजु Tue, 01/15/2008 - 20:08
स्पर्श तुझ्या ओठांचा अलगद माझ्या ओठी गुलाब माझ्या मनीचा बहरला तुझ्याच साठी.. - प्राजु

ऋषिकेश Tue, 01/15/2008 - 20:17
बहरला तुझ्याच साठी हा फुलोरा माझिया स्वप्नांचा स्पर्शाने रोचक जाहला सोहळा स्वप्न नव्हे सत्याचा

विसोबा खेचर Tue, 01/15/2008 - 21:05
मराठी संस्थळांच्या मांदियाळीत आहेत दिग्गज दिग्गज स्थळं मिपाने आत्ता कुठे सारवायला घेतलंय खळं! :) तात्या.

राजे Tue, 01/15/2008 - 21:13
ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा नाद तो झाला बाद ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा उपयोग त्याच्या माथी मार फलयोग जो लिहता झाला मिसळीवर त्याच्या नशिबी राज योग राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे Wed, 01/16/2008 - 00:30
"आम्हाला काव्यात्मक लिहिता आले तर शप्पथ" म्हणाणारे तात्या तुम्हीच का? चालू दे,तुमच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळाली तर आमच्यासारख्यांना आणखी चेव येतो. (तात्याचा मावळा) -इनोबा

इनोबा म्हणे Wed, 01/16/2008 - 00:53
का रुसतेस तू माझ्यावर, अशी का तू मूक झाली? 'आपलं' म्हणून हक्काने बोललो, हीच का माझी चूक झाली? (रुसवा सोड सखे...) -इनोबा

ऋषिकेश Wed, 01/16/2008 - 01:35
हीच का माझी चूक झाली? की मी अचानक जाहलो मुका आता हा जिवघेणा अबोला सोडशील का देऊन एक मुका? ;) (प्राची ..गच्ची हे यमक आहे असे मानणारा :) ) ऋषिकेश

प्राजु Wed, 01/16/2008 - 08:33
तात्या, ऋषिकेश, विनायक.. आपण तर एकदम भरारीच मारलित.. जरा कामात होते आज म्हणून नाही जमलं यायला मिपावर. तात्या, तुम्ही उत्तम खोटंही बोलू शकता हे कळंल मला. इतक्या छान चारोळ्या लिहिल्यात इथे आणि पद्यातलं मला कळंत नाही हे असं म्हणंण म्हणजे चारोळी लिहिण्याचा कंटाळा.. असंच आहे ना? असो.. आठवणींचा खेळ हा जीवघेणा असतो.. विचारांचा मेळ तो कधी , का जुळत असतो?? - प्राजु

प्राजु Fri, 01/18/2008 - 01:30
खेळ खेळत चारोळींचा मिपावर कवींची मांदियाळी उभा स्वर्ग मैत्रीचा इथे लिहित एकमेकासाठी चारोळी.. - प्राजु.

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 01:38
चारोळी फक्त निमीत्त आहे, हितगूज करण्यासाठी इतक्या दूरूनही तुझी मैत्री जपण्यासाठी... (मैत्र...जपणारा) -इनोबा

प्राजु Fri, 01/18/2008 - 01:40
दूर दूर अथांग दुनिया तरी मैत्रीचा धागा जुळतो विद्युत पानात मन हरवतं आणि छंद जिवाला मिळतो - प्राजु

इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 01:52
काही असले तरीही मैत्रीच जगणे शिकवते नवा विश्वास नवी उमेद मनात या जागवते... (खरंच...) -इनोबा

प्राजु Fri, 01/18/2008 - 01:54
मैत्री ही मैत्रीच असते तिला दुसरे नाव नाही होरपळ जरी असे यात आप्-पर भाव नाही.. - प्राजु

प्राजु Fri, 01/18/2008 - 02:00
विश्वासाच्या पायावर उभी असतात नाती प्रेम असो वा मैत्री घट्ट होते माती.. - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 02:05
विश्वास असतो तोपर्यंत आयुष्याला अर्थ असतो, विश्वास एकदा ढळला की श्वास ही व्यर्थ असतो... (....) -इनोबा

प्राजु Fri, 01/18/2008 - 02:08
कवितेत दडलेला अर्थ तू मला सांगितलास का म्हणून कसे विचारू तू जगण्याचा अर्थ सांगितलास.. - प्राजु

प्राजु Fri, 01/18/2008 - 02:23
नतमस्तक मी विठ्ठलाचे द्वारी कृपा राहो अशीच त्याची आम्हावरी.. - प्राजु

प्राजु Fri, 01/18/2008 - 02:44
अंतरी उमटे भाव तरंग मनीचे गूज नयन बोलती ही पाखरे उडून जाऊनी तुझ्या मनी रूंजी घालती.. - प्राजु

प्राजु Fri, 01/18/2008 - 02:54
घे भरारी आकाशी नभ हे व्यापून जाऊदे पाखरण अस्तित्वाची विश्वरूप होऊन राहूदे - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Fri, 01/18/2008 - 03:05
राहू दे आठवण या मैत्रीची जरी असे आस संसाराची अशी अमूल्य ही नाती-गोती साथ लाभू दे जन्मो-जन्माची (मित्र) -इनोबा

प्राजु Fri, 01/18/2008 - 09:38
जन्म आणि मृत्यू या दोन अवस्था आहेत मैत्री आणि मित्र त्यामधील आनंदाची व्यवस्था आहे.. - प्राजु. ( फारच फालतू झाली ही चारोळी)

ऋषिकेश Fri, 01/18/2008 - 21:25
नदी काठची संध्या तू संध्येचा आनंदही तू आनंदाची राणी तू संध्येची आनंदवाणी तू

प्राजु Sat, 01/19/2008 - 00:46
प्रेमात गीत गाते राधा होऊनी बावरी वृंदावनी धुंद कान्हा राधा त्याला सावरी.. - प्राजु.

सुनील Sat, 01/19/2008 - 01:06
जमतं कसं तुम्हाला फक्त चार ओळीत सांगायला? (अचंबित) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Sat, 01/19/2008 - 01:13
सुन्या,अरे खोलवर विचार केल्यास कधी कधी असे आढळते की,ज्या गोष्टी आपण चार ओळीत सांगू शकत होतो त्या साठी आपण विनाकारण शंभर ओळी वाया घालवल्या. इंग्रजीत एक म्हण आहे की, "व्हेन अ वर्ड इस इनफ्,डोंट युज दि अनदर वर्ड." (चारोळीत रमलेला) -इनोबा

प्राजु Sat, 01/19/2008 - 01:15
रंग बरसूनी ती गेली पण हा रंग वेगळा राधेचा रंग गोरा कान्हाचाच हा सावळा.. - प्राजु.

विसोबा खेचर Sat, 01/19/2008 - 01:30
अरे जरा बर्‍या चारोळ्या लिहा रे! :) नाही, चारोळ्यांचा उपक्रम छानच आहे, परंतु जरा बर्‍या चारोळ्या लिहा रे. वरील बर्‍याचश्या चारोळ्या उगीच आपल्या पाडायच्या म्हणून पाडल्यासारख्या वाटतात! :) छ्या...! आपला, (कामचलाऊ चारोळ्यांनी हैराण!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मी चारोळ्या लिहीन बंद केलय्....नाहीतर 'अतिपरिचयात अवज्ञा' होण्याचा संभव आहे...कसे? आपला, (जरासा बोअर झालेला) छोटी टिंगी