✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गांधी.

क
कलंत्री यांनी
Sun, 12/14/2008 - 23:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14692 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

क
कलंत्री Fri, 12/19/2008 - 20:01 नवीन

अहो तसे नाही.

मनोगतवाल्यांनी संघाची मुस्कटबाजी केली होती. उलट गांधीविचाराच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वांनाच मदत केली होती. संघावरची स्वातंत्र्तानंतरची चौथी बंदी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Fri, 12/19/2008 - 20:03 नवीन

होय होय.. ते

होय होय.. ते समजले.. मला मनोगत- गांधी- संघ- मुस्कटदाबी-वगैरे .. असे म्हणायचे होते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
क
कोलबेर Fri, 12/19/2008 - 20:23 नवीन

असहमत

मनोगतवाल्यांनी संघाची मुस्कटबाजी केली होती. उलट गांधीविचाराच्या प्रचारासाठी त्यांनी सर्वांनाच मदत केली होती. संघावरची स्वातंत्र्तानंतरची चौथी बंदी असेल.
मनोगतावर ओव्हरऑलच मुस्क्टदाबी केली जायची. अर्थात हे सगळ्याच संकेतस्थळांवर चालते पण मनोगतावर जरा विशेषच होते. संघाशी निगडीत लेखांचा मारा कमी व्हावा आणि मनोगत हे संघाचे मुखपत्र वाटू नये म्हणून त्यांनी नंतर काहिशी ही भूमिका घेतल्याचे आठवते आहे. (अर्थात हे योग्य की अयोग्य ठरवणारा मी नाही, संकेतस्थळ मालक ह्या नात्याने ते ठरवण्याचा हक्क फक्त मालकांना असतो कारण लोकशाही हा प्रकार मराठी संकेतस्थळावर शक्य नाही) पण मनोगतावर संघाविषयी जितके गोडवे गायले गेले ते अजुन तरी मिपावर बघीतलेले नाहीत. मनोगतावर फक्त संघा विषयि माहिती देणारे प्रचारकी थाटाचे लेख टाकण्या विषयी बंदी घातली होती की जसेकी 'संघ नावाचा वटवृक्ष' हा केंडेंचा लेख ज्यावरुन सगळा गदारोळ झाला होता. संघ हा विषय चर्चा करण्यास बंदी अजीबात नव्हती. उलट गांधीं विषयी कसलीही चर्चा करण्यास देखिल मनाई होती. तसेच सर्वसाक्षींचे लेख अजुनही मनोगतावर येतात आणि त्यांनी क्रांतीकारकांवर मनोगतावर जेवढे लिखाण केले आहे तेवढे कु़णीच आतापर्यंत कुठल्याही मराठी साईटवर केल्याचे पाहण्यात नाही. तेव्हा मनोगत हे गांधीवादाकडे झुकणारे होते/आहे हे विश्लेषण मला तरी मान्य नाही. ह्या चर्चेमध्ये मनोगताचा विषय का यावा हे समजले नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
आ
आजानुकर्ण Fri, 12/19/2008 - 20:52 नवीन

भूमिका

गांधी-फाळणी, तत्कालीन मुसलमान-हिंदू दंगली आणि ५५ कोटी यावर जितके म्हणून चघळायचे आहे तो सगळा रवंथ करुन झाला आहे. उगीच स्वतःबरोबरच दुसऱ्यांच्या आणि मनोगताच्या डेटाबेसच्याही तोंडाला फेस येऊ नये म्हणून हे नियंत्रण घातले असावे. तशा चर्चांबाबतची पाटीही काही दिवस लावली होती. त्यात काहीही वावगे नव्हते. मनोगत आणि मिसळपाव दोन्ही संकेतस्थळांचा तोंडवळा सांघिकच आहे. (येथे संचालकांचा संबंध नसून सभासदांबाबतचे निरीक्षण आहे.) त्यामानाने उपक्रम हे थोडे तटस्थ वाटते. याचे कारण बहुतेक सदस्य हे बुद्धिवादावर भर देणारे आहेत. भावनातिरेकाने होणाऱ्या चर्चांची तेथे खिल्ली उडवली जाते. किंबहुना तशी चर्चा मागे मनोगतावर झालीही होती. (त्यानेळी मिसळपाव नव्हते. आणि असा तोंडवळा असण्यात मला काहीही वावगे वाटत नाही नाही. प्रत्येकाला आपली बरीवाईट कशीही राजकीय मते असावीत. मात्र मनोगतकारांनी संघ किंवा गांधी दोघांची टवाळी होणार नाही हे जपले होते. ) मिसळपावनेही ह्याबाबत काळजी घेतली पाहिजे. सुनीलरावांनी म्हटल्याप्रमाणे पंचा फेडला की हाफप्यांट फेडली जाणारच. आपला, (मराठी संकेतस्थळांचा इतिहास या आगामी प्रबंधाचा लेखक) वि.का. आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ल
लिखाळ Fri, 12/19/2008 - 21:19 नवीन

त्यात

त्यात काहीही वावगे नव्हते. मनोगत आणि मिसळपाव दोन्ही संकेतस्थळांचा तोंडवळा सांघिकच आहे. (येथे संचालकांचा संबंध नसून सभासदांबाबतचे निरीक्षण आहे.) त्यामानाने उपक्रम हे थोडे तटस्थ वाटते. याचे कारण बहुतेक सदस्य हे बुद्धिवादावर भर देणारे आहेत. भावनातिरेकाने होणाऱ्या चर्चांची तेथे खिल्ली उडवली जाते.
संघविचाराचे बुद्धीवादावर भर असलेले आणि गांधीविचाराचे बुद्धीवादावर भर असलेले लोक असतात असे तुम्हाला वाटते का?
सुनीलरावांनी म्हटल्याप्रमाणे पंचा फेडला की हाफप्यांट फेडली जाणारच.
मी चार प्रतिसादपूर्वी जो प्रश्न विचारला होता तोच पुन्हा पडला. गांधींना विरोध केला की संघाला विरोध हा तर्क कळला नाही. या संकेतस्थळांवर वावरणार्‍या लोकांच्या मतांमुळे ही सांगड आहे की खरेच संघाच्या विचारांचा आणि गांधींच्या विचारांचा आभ्यास केल्यामुळे ही सांगड घातली गेली आहे? -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
ट
टग्या (verified= न पडताळणी केलेला) Fri, 12/19/2008 - 21:06 नवीन

एक मुद्दा कळला नाही

कारण लोकशाही हा प्रकार मराठी संकेतस्थळावर शक्य नाही
प्रतिसादाच्या बाकीच्या भागाशी बर्‍यापैकी सहमत, पण हे एक वाक्य कळले नाही. ("कळले नाही". "असहमत आहे" असे नव्हे. "सहमत आहे" असेही नव्हे.) (स्पष्टीकरण: हा उपप्रतिसाद कोलबेर यांच्या प्रतिसादाला आहे, आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाला नव्हे. चुकून इथे पडला. योग्य ठिकाणी हलवण्याचा कंटाळा करत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
व
विसोबा खेचर Sat, 12/20/2008 - 01:11 नवीन

मनोगतावर

मनोगतावर ओव्हरऑलच मुस्क्टदाबी केली जायची. सहमत आहे! असो...! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोलबेर
ध
धम्मकलाडू Sun, 12/21/2008 - 23:25 नवीन

शहानिशा कसा करायचा?

या योगे गांधींबद्दल फारशी माहिती अजून मिळाली नसली तरी मनोगत-गांधी-मुस्कटदाबी यांवर थोडी माहिती समजली हे ही नसे थोडके.
हो ना. पण सत्यासत्यतेचा शहानिशा कसा करायचा? (गझनीचा मेहेमूद) धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
आ
आजानुकर्ण Sun, 12/21/2008 - 23:29 नवीन

शाहनिशा/शहानिशा

हा शब्द स्त्रीलिंगी आहे. (निशा मुळे का?) त्यामुळे शाहनिशा/शहानिशा करायची असे हवे. आपला (वैयाकरणी) आजानुकर्ण पाणिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धम्मकलाडू
भ
भास्कर केन्डे Sat, 12/20/2008 - 06:20 नवीन

गांधीजी ते द्वारकानाथजी

आदरणीय द्वारकानाथजी, गांधीचा स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान होते का? गांधी नसते तरी स्वातंत्र्य मिळाले असते का? भारताला हजारो वर्षांचा संतपरंपरांचा इतिहास आहे. संतांनी त्यांना ज्या ज्या पद्धतीने जमले त्या त्या प्रकारे जनजागरणाचे कार्य सतत पार पाडलेले आहे. गांधीजींनी हा मार्ग चांगलाच वापरला असे वाटते. रामायणावरील त्यांची व्याख्याने बरीच प्रसिद्ध होती व त्यांना अनेक मोठ्या संतांपैकी एक म्हणून चांगलेच ओळखले जायचे. गांधी उदयाच्या अगोदर स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी असणार्‍या भारतीयांचे प्रमाण खूपच कमी होते. गांधींनी अगदी सामान्य जनतेला सुद्धा स्वातंत्र्य चळवळीत आणले व लोकांना त्यामुळे राजकीय जागरुकता आली. स्वातंत्र्यानंतर लोकशाही यशस्वी करण्यासाठी लोकांचा सहभाग फार आवश्यक होता. स्वातंत्र्य चळवळीत झालेल्या समाज जागृतीमुळे नैसर्गिकपणे जनता लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाली. हे गांधींच्या लोकाधाराचे यश आहे असे मला वाटते. जर गांधीजी स्वातंत्र्य लढ्यात नसले असते तर हे शक्य झाले असते का? याचा तर्क बांधण्यासाठी आपल्याला गांधीपूर्व इतिहासाकडे बघावे लागेल. १८५७ पासून ते टिळक युगापर्यंत विषेशतः टिळकांच्या काळात स्वातंत्र्य चळवळीचा जनाधार प्रचंड वाढत आला होता. जर गांधी नसले असते तर बोस, जीना आदी विभूतींकडे काँग्रेसची सुत्रे गेली असती. बोसांसारख्या नेत्याने काँग्रेसविना सुद्धा प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वतःचे स्थान बनवले होते. त्यांच्या सारख्या नेत्याने काँग्रेसमध्ये राहून निश्चितच जनाधाराचा आलेख वाढता ठेवला असता असे ठामपणे मांडता येते. म्हणजेच गांधी नसले असते तरी पुढे लोकशाहीच्या मजबुतीकरणाला योग्य तो जनाधार मिळाला असताच. अर्थात त्यामुळे गांधींचे कार्याला दुजे समजायची गरज नाही. गांधींनी हरिजन, हिंदू-मुस्लिम ऐक्य, स्त्री सहभागाचा प्रयत्न केला यात काही वावगे आहे का? "हरिजन" या नव्या शब्दाची उत्पत्ती करुन चातुर्वर्ण्याला पाठिंबा देणे व मुस्लिमांच्या लांगुलचानाची (खिलाफत चळवळ) अनावश्यक सवय काँग्रेसला लावणे हे भाग सोडले तर काही वावगे वाटत नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या नावे हिंदूंना मारा खायला लावणे व फाळणीच्या वेळी पाकिस्तानात मुस्लिमांनी हिंदूंच्या कत्तली चालावलेल्या असताना सुद्धा त्यांना वाचवायचे सोडून तिथेच मरायला थांबायचा सल्ला देणे अशा बाबी सुद्धा खटकतात. यावर आपले मत जाणून घ्यायला आवडेल. गांधींचे धोरण देशाच्या विरुद्ध होते का? नक्कीच नव्हते. त्यांच्या देशप्रेमाबद्दल शंका घेणे करंटे पणाचे ठरेल. पण राजकीय मुत्सद्देगिरित ते फार कमी पडले असे वाटते. ५५ कोटीचा मुद्दा नेमका काय आहे? जनतेने निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध स्वतःच्या हेकटपणाचे दर्शन देऊन जनतेपेक्षासुद्धा आपण श्रेष्ठ व शहाणे आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न वाटतो व जनमताचा अवमान देखील. गांधींना प्रत्येक क्षेत्रात जसे अनुयायी( नेहरु, पटेल, विनोबा इत्यादी) मिळाले तसे अन्य समकालिन नेत्यांना मिळाले का? गांधीजींना अनुयायी मिळाले असतीलही. पण त्यांनी निवडणुकीद्वारे उभारी घेत असलेल्या नैसर्गिक नेतृत्वाला (बोस) दाबून स्वतःचे प्यादे (नेहरु) पुढे दामटले. अर्थात या प्याद्यांनी गांधीजींचा अनुनय करत सक्षम नेत्यांची फळी निर्माण केली/होऊ दिली नाही.उलट स्वतःच्या कुटुंबाला एक प्रकारे राजेशाही प्रदान केली. त्यामुळे पुढील पिढ्यांत काँग्रेस नेतृत्वहीन बनली. गांधी प्रामाणिक होते का? एक महान गांधीवादीच हा प्रश्न उपस्थित करतो आहे तेव्हा शंकेला वाव मिळू शकतो बॉ. ;) ह.घ्या. गांधींचे विरोधक उदा. सावरकर, भगतसिंग, जीना, सुभाषबाबु इत्यादीच्या तुलनेत गांधी कोठे कमी पडले /कोठे वरचढ ठरले. प्रत्यक्ष मैदानात उतरण्या अगोदर भरपूर तयारी व आखणी करणारे गांधी हे त्या काळातले एकमेव नेते होते असे म्हणता येईल. भारतात येण्या अगोदरच त्यांनी पत्रके, वृत्तपत्रे आदी प्रसार माध्यांचा अत्यंत प्रभावी वापर करून भरपूर हवा निर्माण केली. त्यामुळे त्यांचे काँग्रेसी वर्तुळातले आगमन हे त्या काळी त्यांच्यापेक्षा कर्तुत्वाने कित्येक मैल पुढे असणार्‍या नेत्यांच्या अस्तित्वाला हदरा देणारे ठरले. बरेच काँग्रेस नेते यामुळे दुखावले गेले तसेच काही दुरावलेही गेले. टिळकांचा खटला लढणार्‍या जीनांप्रमाणे काही जनांनी सवता सुभा उभा केला तर गांधीजींनी पद्धतशीर पणे काटा काढलेल्या सुभाषचंद्रांनी स्वतःसाठी वेगळा मार्ग निर्माण केला. प्रत्येक कृतीला प्रसिद्धी देण्याचे गांधींचे तंत्र त्या काळच्या एकाही नेत्याला वापरता आले नाही. ज्यांच्यात ते करण्याची कुवत होती व ते वापरायचा प्रयत्न केला त्यांना इंग्रजांनी पद्धतशीरपणे संपवले (उदा. सावरकर) व गांधींना स्वतःच्या फायद्यासाठी महत्व देत मोठे केले. एकंदरीत गांधींना जाब विचारू शकेल असा नेता काँग्रेसमध्ये वा काँग्रेसबाहेर कार्यरत राहू शकला नाही. पर्यायाने गांधीजी हे स्वातंत्र्य चळवळीवर राक्षसी पकड निर्माण करु शकले व पुढे तिला पाहिजे तसे वाकवू शकले. तुर्तास एवढेच. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत... आपला, (निष्पक्ष) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sat, 12/20/2008 - 09:11 नवीन

भास्करराव,

भास्करराव, आपला प्रतिसाद खुपच आवडला. एकंदरीतच आपण गांधींच्या कारकिर्दीचा, यशापशाचा, दोष आणि सद्गुणाचा चांगला आढावा घेतला आहे. यावर काही उत्तरे देणे हे सर्वावरच अन्यासकारक ठरेल. काही प्रश्नांची ( ५५ कोटी) उत्तरे अगोदरच देण्यात आली आहे त्यात मी वेगळी अशी भर ती काय टाकणार? सुभाषबाबू हे भारताच्या राजकारणासाठी एक सशक्त पर्याय ठरले असते यात काही शंका नाही. गांधींकडुन याबाबतीत थोडा अन्याय झाला असावा असे माझेही मत आहे. अर्थातच त्याकाळच्या संघटना आणि शिस्त याचा विचार करता हे क्षम्यही रहावे. आपल्या किंवा कोणाच्याच प्रश्नांना अगदीच समाधानकारक उत्तरे देणे कोणालाही हे अशक्यच असते. कृपया आपले समाधान झाले नसल्यास समजुन घ्यावे. आपला, द्वारकानाथ कलंत्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा