(होणार सून, जीवशास्त्र आणि भारतीय मालीकाजगत)
सुमारे २ वर्षापूर्वी झी मराठीवर "होणार सून…" हि मालिका सुरु झाली. त्यातील वर्तमान घडामोडीं या काहीशा अचंबित करणाऱ्या वाटल्या आणि मनात घोळत राहिल्या. त्यातच भारतीय तसेच अन्य पुराणे यातील काही कथा वाचण्याचा वा हिस्ट्री अथवा दूरदर्शन वरील मालिकात पाहण्याचा योग येउन गेलेला. आणि अलीकडेच youtube वर crash course biology ची सिरीज पहिली. आणि मग विचारमंथनातून काही ठोस मुद्दे हाती लागले ते असे -
१. ४ वर्षाचे गरोदरपण अथवा pregnancy cycle अस्तित्वात असावे.
२. पुराणातील एक कथा अशा प्रकारची असल्याचे दूरदर्शन वरील कोणत्याशा मालिकेत दाखवल्याचे अंधुकसे आठवते. "जान्हवी" हि त्या कथेतील महिलेचा अंशावतार असावी .
३. प्रत्येक संस्कृतीत अनेक पुराण कथा असतात. त्यावर आधारित अनेक मालिका निघतात व निर्माता/दिग्दर्शक त्यात कायपण कथा घुसडतात.
४. मालिकेमध्ये ज्याप्रमाणे श्री-जान्हवी आणि परिवारावर एकावर एक संकटे येतात, प्रश्न निर्माण होतात, त्यावरून श्रावणातील अनेक कथांची आठवण होते.
५. मालिकेमध्ये अनेक ठिकाणी "काहीही हां श्री" असा उल्लेख येतो. हा उल्लेख 'श्री' ची अतितीव्र विनोदबुद्धी व जान्हवीचा निरागस स्वभाव याचा परिपाक असावा. या उल्लेखांमुळे दर्शकांची WA वर विनोदी संदेश पाठवण्याची ईच्छाशक्ती वाढीस लागते व अशी व्यक्ती त्या-त्या ग्रुप वर "काहीही हा (व्यक्तीचे नाव)" अशी दाद मिळण्यास पात्र होते.
६. मालिकेत जरी जान्हावीचे वडील गुडघ्यांना तेल लावतात, बऱ्याच अंशी कला पुढे मान नाईलाजाने तुकवत असतात. पिंट्या देखील बंडखोरी करण्याचा प्रयत्न करत असला तरी कलापुढे बऱ्याच अंशी त्याचे काही चालत नाही. किंबहुना कलासारख्या बेरकी स्त्री पात्रांमुळेच भारतीय मालिका जगतातील अनेक मालिका वर्षानुवर्षे चालवणे शक्य होते.
७. In short, Our daily soaps are co-source of various funny WA forwards. भारतीय दूरदर्शन-मालिकांतील अनेक मुल्ये आणि ट्यार्पीशिद्धांत यांना सिद्ध करणारी हि मालिका आहे असे माझे मत बनले.
आपणास काय वाटते ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
का बघता?
माबो
हा
ही जान्हवी कोण ?
सर, आपल्या आयडीचा उच्चार कसा करावा ते सांगा मराठीत.
तिकडचा प्रतिसाद इथे कॉपीपेस्ट
चिनार ने एक छान धागा काढला होता ह्याच विषयावर
ओ दादानू.. कशाला असल्या
ग्रिनीज बुक
लोकांना कळालेलं नाही. हा
लोकांना कळालेलं नाही. हा
खी खी खी.....
पीपीपी (permanently pregnant president)
मिपावरपण या मालिकेची चर्चा