मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अ‍ॅटलांटिस सिटी खालापूर

मोगा · · काथ्याकूट
अ‍ॅटलांटिस सिटी खालापूर. १ बी एच के बुक केला. पाच लाख. सेलेबल ६०० . कार्पेट ४००. २५०० एकरवर पसरलेला स्मार्ट सिटीचा प्लॅन. ६०० एकर निवासी इमारती. ईतर जागेवर अ‍ॅमेनिटीज. ४० मजली इमारती २०२२ नंतर पझेशन . २०२५ नंतर पूर्ण विकसित होणार. सध्या दिवाळी सणासाठी सवलत आहे. पुणे , मुंबई , पनवेल अगदी सोयीचे सेकंड होम. कुणी बुक केले आहे का ?

वाचने 6444 वाचनखूण प्रतिक्रिया 33

एक सामान्य मानव 03/11/2015 - 10:52
ह्या शहरात कोण लोक रहाणार आहेत? म्हणजे हा विकेंड होम सारखा प्रकल्प आहे कि रेग्युलर शहर? जर रेग्युलर शहर असेल तर तेथे रहाणारे काय नोकरी धंदा करणार? जवळ काही कंपन्या सध्या तरी नाहीत. जे लोक इतरत्र राहतात त्यांना गुंतवणुक केल्यास भाडेकरु मिळ्णार नाहीत. शिवाय सर्वात मुख्य प्रश्न म्हणजे पाणी. सध्या तेथील बाजुच्या गावांमधेच उन्हाळ्यात पाण्याची बोंब असते तर एवढ्या मोठ्या शहराला पाणी कोठून देणार? अर्थात बुक करण्याआधी आपण माहीती घेतली असेलच. ती शेअर करावी ही विनंती.
वाचण्यात चूक झाली नसेल तर २०२२ नंतर घराचा ताबा? २०२५ मध्ये प्रकल्प पूर्ण? तो वर काहीही होऊ शक्ते. सबब तुम्ही कुठल्या भरवशावर इतके पैसे गुंतवले? नवी मुंबई विमानतळ होणार म्हणून? पाण्याबरोबरच बाकीच्या सोयी सुविधांचे काय?

विक्रान्त कुलकर्णी 03/11/2015 - 12:02
हा धागा जाहिरात आहे ? का सल्ला आहे ? का मी किती स्मार्ट निर्णय घेतला आहे त्याचे प्रदर्शन आहे ?

आनंदराव 03/11/2015 - 15:10
अस काय करता सध्या दिवाळी सणासाठी सवलत आहे. म्हणून त्यांनी बुक केला हो. कदाचित गरज, आवश्यकता वगैरे मुद्दे ऑप्शन ला टाकले असावेत त्यांनी तरीपण शुभेच्छा !

वेल्लाभट 03/11/2015 - 15:46
पण २०२२ ची तारीख, खालापूर ही जागा, नॉट अ‍ॅज अ‍ॅट्रॅक्टिव्ह टू मी. पाच लाखात जमीन किंवा म्यु. फंड, इक्विटीमधे गुंतवणूक केली तर कदाचित जास्त फायदा मिळेल.

मोगा 03/11/2015 - 17:00
घर फर्स्ट की सेकंड हे ज्याने त्याने ठरवावे.. शनिवार रविवार रहा किंवा कायमचे रहा. तुमची मर्जी. पाच लाखात डायरेक्ट फ्लॅट नाय मिळत... पाच लाख दिले की सध्या आपल्या नावे एक गुंठा जागा मिळते. दोन तीन वर्षानी काम चालू झाले की तीच जागा बिल्डरला देणे. त्याऐवजी सहाशेचा एकुण एरिया = ४०० चा कार्पेट एरियाचा फ्लॅट मिळेल. प्ळॉट स्वतंत्रपणे विकसित करता किंवा विकता येत नाही. पाच वर्षानी दहा लाख घेऊन बाहेर पडू शकता. साधारणपणे एक लाखभर घरे हळू हळू बनतील. प्लॉट फ्लॅट ही योजना नको असेल तर नेहमीप्रमाणेच डाउनपेमेंट लोन वगैरे स्कीम लवकरच येइइल. वीज - पाणी सगळं ते बघून घेतील. अख्ख्या मुम्बैला पाणी देणारी धरणे जवळच आहेत. ... माननीय , वंदनीय , कमलोद्भव कलियुगी ब्रह्मदेव मा. मोदीजी यानी स्मार्ट सिटीची घोषाणा केलेली आहे. हे त्याचेच प्रायव्हेट रूप आहे. यातील एक महत्वाची कंपनी ( फायनान्स व कन्स्ट्रक्शन पार्टनर ) अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी उर्फ ए सी सी डायरेक्ट केंद्राशी संपर्क साधून आहे. माशा अल्ला !

इरसाल 03/11/2015 - 17:10
बिल्डर गुजराती नाही याची खात्री करुन घ्या उगाच गुजरात मधे (*) काही विशिष्ट लोकांना काही विशिष्ट जागांवर/ एरियात घर मिळत नाहीत.(भाड्याने सुद्ध्हा, विकत तर लांबची गोष्ट) ह्यात व्हाइसेव्हर्सा पण आहे हं. एकतर तुम्ही वरुन एक आणी आतुन दुसरे आहात. जर वरचा प्रॉब्लेम आलातर मग काय दाखवणार वरुन आहे ते की आतुन आहे ते ?

अजया 03/11/2015 - 17:11
आमच्या अगदीच जवळ आहे.या एरिआमध्ये विमानतळाच्या नावाने सुरु असणाऱ्या एकेक स्कॅमपैकी एखादा नसावा ही सदिच्छा !

मोगा 03/11/2015 - 17:19
http://www.google.co.in/url?sa=t&source=web&cd=1&rct=j&q=bhosle%20atlantis%20khalapur&ved=0CCIQFjAAahUKEwit_JCOlvTIAhVFoZQKHQSrC6A&url=http%3A%2F%2Fwww.theatlantis.in%2Fwp-content%2Fuploads%2F2015%2F09%2FAtlantis-Brochure.pdf&usg=AFQjCNGLWT1R8IdoZDUaNKBRQS8cDFJOig&sig2=3hxxE2rwprvfFocE27JD1Q
आजकाल वर्तमानपत्र, टी.व्ही. वर अजून एक जाहीरात जोरदारपणे चालू आहे. दहा मिनटात गेट वे ऑफ इंडीया वगैरे. संचालक मंडळावर दोन मराठी नट, नटी आहेत. आत्ता जागा घेऊन ठेवली तरी खरी डेव्हलपमेंट केंव्हा होणार कोण जाणे.

In reply to by बबन ताम्बे

त्यात मी घेतले आहे. एक वर्षापुर्वी आठ लाख गुंठा होता. आता दहा लाख झाला. १ आर के सात लाखचा आठ लाख झाला. त्यावरही धागा होता. तेंव्हाच माझे ऐकले असते तर .... http://www.misalpav.com/node/29565

In reply to by मोगा

प्रसाद१९७१ 03/11/2015 - 18:13
७ लाखाचे वर्षात ८ लाख झाले, पण रजिस्ट्रेशन फी आणि बाकी सरकारी आणि इतर खर्च वजा केले तर कीती मिळाले? १०-१२ टक्के परताव्यासाठी इतकी रिस्क योग्य आहे का? लिक्विडीटी कीती? एजंट ला २ % द्यावे लागले तर?
मोग्या,छानच रे !अशीच प्रगती करत राहा.या वयात कुठे जागा घ्या आणी परताव्याची वाट पहा..नकोच ते.असे हे म्हणतात.- मोड तोच नेहमीचा.

हरकाम्या 04/11/2015 - 13:36
ताबा मिळेपर्यन्त मला बहुतेक " भिन्तीवर " जावे लागेल असे दिसतेय,