Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 11/01/2015 - 18:50
लेखनविषय (Tags)
मुक्तक
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
  • Log in or register to post comments
  • 57029 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 11/02/2015 - 19:54

In reply to आवर्जून लेख व प्रतिसाद वाचावेत असे आय्डी by तुषार काळभोर

Permalink

धन्यवाद.

(अत्यंत आदरणीय आयडी) छातीत सूक्ष्म कळ आली. ईसीजी, टू डी आणि स्ट्रेस टेस्ट नंतर तो हार्ट अ‍ॅटॅक नाही असे निदान झाले. पण, 'कोणाचेही अवाजवी कौतुक इतके मनावर घेऊ नका' असा सल्ला डॉक्टरसाहेबांनी दिला. असो. धन्यवाद पैलवानसाहेब.
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Mon, 11/09/2015 - 19:23

In reply to आवर्जून लेख व प्रतिसाद वाचावेत असे आय्डी by तुषार काळभोर

Permalink

शतशः धन्यवाद पैलवानदादा!

शतशः धन्यवाद पैलवानदादा!
  • Log in or register to post comments

Submitted by बाळ सप्रे on Mon, 11/02/2015 - 13:47

Permalink

तुमचा / आमचा / आपला अभ्या की

तुमचा / आमचा / आपला अभ्या की अभिषेक असे काही कंफ़्युजिंग आयडीज आहेत .. त्यातला नक्की कुठला चांगला ते आठवत नाहीये :-) बाकी मगाच्या कमेंटीत सगा उर्फ धन्या, नाना चेंगट आणि रामाताराम राह्यले त्याच्यासाठी पुरवणी .. :-)
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Mon, 11/02/2015 - 13:59

Permalink

आवडता आयडी -

आवडता आयडी - संपादक मंडळ. one and only.
  • Log in or register to post comments

Submitted by फर्स्टमॉन्क on Mon, 11/02/2015 - 14:19

Permalink

डाॅ. सुहास म्हात्रे / इस्पिकचा एक्का

हा आयडी आवडतो कारण, जग फिरावं आणि त्या त्या जागांची माहिती असावी ते ह्यांच्या सारखे … अवांतर : डाॅ. सुहास म्हात्रे आणि इस्पिकचा एक्का हे एकच ना ??
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 11/02/2015 - 14:55

Permalink

मिपावर येण्याचे प्रमुख कारण

मिपावर येण्याचे प्रमुख कारण चांगले वाचायला मिळणे हे असल्याने चांगले लेखकच आपसुक आवडते आयडी आहेत. मी आले तेच गविंच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायला. म्हणुन त्यांचा पयला नंबर! एक्काकाका, पेठकर काका, क्लिंटन, विकास, चतुरंग ह्यांचे समतोल लिखाण आवडते. राजकारणावरचे लेख आवर्जुन वाचत नाही पण त्यावर काही मंडळी समोरच्याची अक्कल न काढताही उत्तम प्रतिवाद करतात म्हणुन आवडतात. रामदास ह्यांची बातच और..! जयंत कुलकर्णी काकांच्या "नथ" सारख्या कथांनी वेड लावले होते! पंत श्रीरंग जोशी ह्यांची सिन्सियरिटी आवडते. नेहमी व्यवस्थित लिंका वगैरे देणार, त्यापण नव्या टॅब मध्ये उघडणार्‍या! अलीकडेच जव्हेरगंज ह्यांच्याही कथा आवडत आहेत. अतिवास ताईंचे लिखाण आवर्जुन वाचले जातेच. शशक खास आवडतात. आदुबाळ ह्यांचेही "अठरा पावलांचा स्टार्ट" आणि दुसर्‍या एका संस्थळावरील २६३ अशी काहिशी कथा होती, त्याही खुप आवडल्या होत्या. वल्ली ह्यांचे लिखाण अभ्यासपुर्ण असते. ते ही शक्यतो नजरेतुन सुटत नाही. सुरन्गीताईंच्या लेखमालिकेचीही खुप वाट पाहिली जाते. मोदकच्या लेखाला अर्थातच विसरु शकत नाही. अत्यंत अभ्यासपुर्ण लेखन! पाकॄ हा वेगळाच विषय आहे.. कुणीही पाकॄ देवो, धागा उघडल्या जातोच.. फोटोंसाठी!! म्हणुन सानिका, मृणालिनी, स्वातीताई, दिपक, गणपा, पेठकर काका इ अनेक जण आवडतात. काही जणी खुप जवळच्या मैत्रिणी आहेत.. त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे घरातलीच माणसे आवडतात असे सांगण्यासारखे होईल! पण पैसा ताई, रेवाक्का, स्रुजा, मधुरा, अजया अशा अनेक जणी लेखक आणि माणुस म्हणुनही खुप आवडतात. इथे पुर्वी अनेक फार्फार फेमस आयडी होते ज्यांची फार आठवण काढली जाते. पण त्यांचे नाव सतत न पाहिल्याने पटकन नाव आठवत नाही. पण असे अनेक आयडी आहेत ज्यांचे लेख आवडले होते. बाकी वरीलपैकी काहिही नसताना, केवळ बेअरिंग आणि मार्मिक बोलण्यासाठी "माईसाहेब" आयडी फार आवडतो! (अनेकांची नावे राहिली असणारेत...पण ती माझ्या स्मरणशक्तीची मर्यादा समजा न एकडाव माफी द्या!)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/02/2015 - 15:03

Permalink

माईसाहेबांचे नाव कसे विसरलो!

माईसाहेबांचे नाव कसे विसरलो! माईसाहेब या मिपाची शान आहेत. बेअरिंग एकच नंबर असतं आणि कमेंटीपण.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 11/02/2015 - 15:24

Permalink

मिपावरचा प्रत्येक आयडी या न

मिपावरचा प्रत्येक आयडी या न त्या कारणाने चांगला आहे. लिस्ट करणं कठीण होईल!! आतापर्यंत इतके कट्टे झाले, या न त्या कारणाने काही ठराविक चेहरे प्रत्येक कट्ट्याला कॉमन झाले, ओळखीचे झाले. खरं सांगायचं तर मिपाकरांमुळे पुण्यात रूळायला वेळ लागला नाही. पुण्यात आल्यानंतरचे सुरुवातीचे काही दिवस या ना त्याकारणाने कट्टे होत होते. त्यानिमित्ताने पुण्यातली वेगवेगळी ठिकाणं बघायला मिळाली, रस्ते ओळखीचे होत गेले. पुणं ओळखीचं होत गेलं. मुंबईत इतकी वर्ष राहून अजिबात शक्य न झालेले ट्रेक करता आले. इथल्या लोकांनी मला अगदी बाईक शिकवण्यापासून ते बाईक मुंबईहून पुण्यात आणेपर्यंत सगळं केलेलं आहे. अगदी आताचं सांगायचं तर घर घेताना पण सल्लामसलत करायला इथल्या लोकांची डोकी मी खाल्ली आहेत आणि लोकांनी न कंटाळता आपापले अनुभव शेअर केले आहेत. लिहायला गेलं तर बरंच आहे. असा अमुक एक आयडी सांगता येणार नाही. प्रत्येक आयडीवर वेगळा लेख मात्र होऊ शकेल. असो, आणखी भावूक व्हायच्या आत इति अलम्!!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/02/2015 - 15:41

Permalink

काल मला एका स्त्री आयडीने

काल मला एका स्त्री आयडीने आयडीने "मज्याशी मयतरी कर्नार क?" असा व्यनी पाठवलाय....त्यामुळे तो आयडी सध्ध्या माझा सग्ग्ळ्यात आवडता आयडी आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/02/2015 - 15:50

In reply to काल मला एका स्त्री आयडीने by टवाळ कार्टा

Permalink

त्या ताईला म्हणावं, "मज्याशीच

त्या ताईला म्हणावं, "मज्याशीच जर मय्तरि करयचि तर व्यनि मज्याला पाठव की. मला कायले पाठवू राह्यली?" =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/02/2015 - 16:00

In reply to त्या ताईला म्हणावं, "मज्याशीच by बॅटमॅन

Permalink

गप रे....वशाड मेलो

गप रे....वशाड मेलो
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/02/2015 - 16:06

In reply to गप रे....वशाड मेलो by टवाळ कार्टा

Permalink

वशाड मेलो नाय रे, वशाड जगलो.

वशाड मेलो नाय रे, वशाड जगलो. =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/02/2015 - 16:42

In reply to वशाड मेलो नाय रे, वशाड जगलो. by बॅटमॅन

Permalink

जगल्याक कित्या हाक मारतंस मरे

जगल्याक कित्या हाक मारतंस मरे =))
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Wed, 11/11/2015 - 22:21

In reply to काल मला एका स्त्री आयडीने by टवाळ कार्टा

Permalink

तिला तुम्ही माझा डू आयडी

तिला तुम्ही माझा डू आयडी वाटला असणार
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 11/11/2015 - 22:40

In reply to तिला तुम्ही माझा डू आयडी by सागरकदम

Permalink

विचारतो हं

विचारतो हं
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/02/2015 - 15:43

Permalink

अवघे एक महिना वय असूनसुद्धा

अवघे एक महिना वय असूनसुद्धा जाणतेपणी सर्व आयडींची वैशिष्ट्ये सांगणारा सालस हा एका ताईंचा डुआयडी माझा सर्वांत आवडता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by काकासाहेब केंजळे on Mon, 11/02/2015 - 15:46

Permalink

ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे ,

ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , फुलथ्रॉटल जिनियस, हितेश, दादा दरेकर यांचा वावर अतिशय मुद्देसुद आणि नेमका होता, जागोमोहनप्यारे यांचे टायमिंग तर अफलातून असायचे ,कुठे गेली हि सर्व मंडळी????? मिपावर सध्या माइसाहेबांचे प्रतिसाद उत्तम असतात,त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या आहेत,त्यांचे पती माझे चांगले मित्र आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 11/02/2015 - 15:48

In reply to ग्रेटथिंकर ,नानासाहेब नेफळे , by काकासाहेब केंजळे

Permalink

अच्चा म्हणजे तुम्हीच का

अच्चा म्हणजे तुम्हीच का माईसाहेबांचा नवा अवतार? =)) रच्याकने, जागोमोहनप्यारे = हितेश = दादादरेकर = मोगा (फॉर द टाईम बीइंग).
  • Log in or register to post comments
Profile picture for user प्रसाद प्रसाद

Submitted by प्रसाद प्रसाद on Mon, 11/02/2015 - 16:24

Permalink

चिगो

माझ्या आवडत्या आयडीचे नाव आहे चिगो ह्याच आयडीचे लिखाण मी सुरुवातीला मिपावर वाचले, अत्यंत ओघवती आणि प्रांजळ निवेदन शैली आहे त्यांची. त्यानंतर बिका यांचे खोबार वाचले आणि खूप आवडले. नंतर ही इतर आयडीजचे बरेच लेखन आवडले. पण सुरुवात चिगो ह्यांच्या लेखवाचनामुळेच झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by shree pavan on Mon, 11/02/2015 - 17:28

Permalink

जे पी. मोर्गन . भन्नात उपमा.

जे पी. मोर्गन . भन्नात उपमा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 11/02/2015 - 17:37

Permalink

सर्वच आवडतात.

उत्तम लेखक, माहितीपूर्ण लेखन करणारे (टेक्निकल), पाकसिद्धी असणारे, संयमित प्रतिसाद देणारे, ग्रामिण बाजाचे, शेतकर्‍यांची कणव असणारे, जातीभेद न मानणारे, आगलावे प्रतिसाद न देणारे, नकारात्मकता न पसरविणारे सर्वच आयडी मला आवडतात. अशा सर्व आयडींनी माझे जीवन समृद्ध केले आहे. पूर्वी मी इथे नविन असताना अनेक आयडींना अडखळलो आहे पण आता अनुभवातून आणि निवडक वाचनातून न अडखळता चालू शकतो आहे. त्यामुळे आता नावडता असा आयडी उरला नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 11/02/2015 - 18:21

Permalink

बरोब्बर बोललात पेठकर काका

बरोब्बर बोललात पेठकर काका
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 11/02/2015 - 18:53

Permalink

माझ्या आवडत्या आयडी...

माझ्या आवडत्या आयडी... १. ज्या माहितीपूर्ण, मुद्देसूद आणि परखड लिहितात... मग विषय कोणताही असो. २. ज्यांचे लेखन वाचून "वाह!" असे म्हणावेसे वाटते... मग विषय कोणताही असो. ३. ज्या लेखात अथवा प्रतिसादात काही विनोदी लिहून नकळत पटकन विकेट काढतात... ज्यात व्यक्तीगत टीकेपेक्षा जास्त लेखनातली विसंगती दाखविण्याचा प्रयत्न किंवा केवळ मजाही असून शकते... मग त्यामागे थोडासा टारगटपणा असला तरी हरकत नाही. (इतर अनेक कारणे असतील पण या "सौम्य गुदगुल्या करणार्‍या ते खदखदा हसवणार्‍या" एकमेव मिपागुणविशेषामुळे मी मिपावर स्थिरावलो असे म्हणायला हरकत नाही!) ४. ज्या पूर्वग्रहदुषित असलेले व एकांगी लेख अथवा प्रतिसाद लिहित नाहीत... मुद्दे मला बरोबर वाटणारे अथवा पटणारे असलेच पाहिजे अशी अट अजिबात नाही. पण, मुद्दा भरकटवायचा हेतुपुर्रसर प्रयत्न नसावा हे नक्की. आणि बरेच काही... पण वरची कारणे महत्वाची... वरचे एक किंवा अनेक गुण असलेल्या अनेक आयडीज मिपावर वावरत आहेत आणि दिवसेंदिवस माझे मिपाशी नाते घट्ट करत आहेत... इतकी नावे आहेत की नक्कीच काही विसरली जातील... काहींची नावे लिहावी तर इतरांना विसरल्याचा दोष लागण्याची भिती आहे. शिवाय, मानवी स्वभावाप्रमाणे बरेच जण आज या तर उद्या त्या कारणाखाली बसणारे लेखन करतात... पण कोणी का लिहीना, जेव्हा-केव्हा ते वरच्या कारणांत बसते तेव्हा-तेव्हा ती ती आयडी आवडतेच आवडते!
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/02/2015 - 20:11

In reply to माझ्या आवडत्या आयडी... by डॉ सुहास म्हात्रे

Permalink

या प्रतिसादासाठी एक्काकाकांना

या प्रतिसादासाठी एक्काकाकांना मिपाचे मिपाचे पॉवरकाका असा किताब द्यावा असा मी इथे प्रस्ताव मांडतो ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दिवाकर कुलकर्णी on Mon, 11/02/2015 - 18:59

Permalink

कमीजास्त फरकान सर्व

कमीजास्त फरकान सर्व कारण म्हणाल तर बस लुभाते है,
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 11/02/2015 - 19:45

Permalink

सर्वच मिपा आयडी आवडतात.

सर्वच मिपा आयडी आवडतात. बऱ्याच जणांकधून काही गोष्टी शिकाव्याशा वाटतात. त्यातले आत्ता आठवतायत ते १ मुवि -दिलखुलासपणा २ पैताई- स्पष्टवक्तेपणा ३ जयंतराव- अभ्यासपूर्ण लिखाण ४ हितेश/ दादा दरेकर- चिकाटी(मान लिया उस्ताद!) ५ मारवा- कुठेही आक्रामक न होता, वा पातळी न सोडता आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडणे ६माई- तर्कसंगत ७ नाखु- अत्यंत सकारात्मक दृष्टिकोण 8अतिवास , मार्गी, अभ्या, पेठकर काका-वेगळा मार्ग चोखाळायचे धैर्य ९ तात्या, रामदास- लिहावे कसे याचे उत्तम उदाहरण १० बुवा, टक्या - समोरच्याचा अपमान न होऊ देता चेष्टामस्करी करणे ११ मांत्रिक, बिंगाण्णा - भाबडेपणा बाकी ज्यांचे लेखन आवडते असे अनेक जण.
  • Log in or register to post comments

Submitted by याॅर्कर on Mon, 11/02/2015 - 20:09

Permalink

सर्व आयडी आवडतात

विशेष म्हणजे 'अत्रुप्त' यांच्या विनोदी स्मायलीज . . . मी तसा नवा सदस्य आहे त्यामुळे मला ज्या आयडी लक्षात येतील तसे खाली टंकतो आहे . . . नीलकांत,डाॅ बिरूटे,पैसा,डाॅ म्हात्रे,सुबोध खरे, मुवि,मृत्युंजय,बॅटमॅन,प्रचेतस,कॅप्टन जॅक स्पॅरो, तर्राट जोकर,वेल्लाभट,चित्रगुप्त,नाद खुळा,प्रगो, दत्ता जोशी,तुडतुडी,दादादरेकर,फुलथ्राॅटल जिनिअस, श्रीगुरूजी,टवाळ कार्टा,अन्या दातार,पिलियन रायडर, स्नेहांकिता,अजया,माईसाहेब,आणि इतर बरेच. . . .आणि आणि स्वतः मी
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नज on Mon, 11/02/2015 - 21:09

Permalink

ज्याक ड्यानियल्स...

ज्याक ड्यानियल्स या आयडीमागचा माणूस गळ्यात दोन चार धामण, डोक्यावर एक नाग, कमरेला एक घोणस अशा अवतारातच डोळ्यासमोर येतो...
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Mon, 11/02/2015 - 21:23

In reply to ज्याक ड्यानियल्स... by स्वप्नज

Permalink

अगागागा मेलो रे देवा!!!

अगागागा मेलो रे देवा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Tue, 11/03/2015 - 06:50

In reply to ज्याक ड्यानियल्स... by स्वप्नज

Permalink

धन्यवाद ! लवकरच लिहायला आणि

धन्यवाद ! लवकरच लिहायला आणि सापांवर संशोधनाला परत सुरवात करायची आहे , ती केली की तुम्ही म्हणता तो अवतारच धारण करीन . खरे म्हणजे ,मी कधी गळ्यात साप घालून फोटोच काढला नाही, त्यात काही शौर्य आहे असे वाटले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 11/03/2015 - 08:34

In reply to धन्यवाद ! लवकरच लिहायला आणि by जॅक डनियल्स

Permalink

जॅकोबा

"साप गळ्यात घालून फोटो ज काढायला तू काही मिलींदांचा सोमण सोमण थोडीच आहेस तू तर त्यांचा मित्र-मदतनीस आहेस, तू नको लक्ष्य देऊ या पोरांकडे!,पुण्यात आलास की येताना तेव्ह्ढे घोरपडीचे तेल आण यांच्यासाठी (घुडगे दुखतात ना फार), मामो ऑफ....
  • Log in or register to post comments

Submitted by मांत्रिक on Tue, 11/03/2015 - 08:51

In reply to जॅकोबा by नाखु

Permalink

अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा

अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा संदर्भ माहीत नव्हता. मला मिलिंद सोमण सारखाच प्रकार वाटला होता. आता कळले की हा मिपा आयडी आहे. त्यांचे धागेही पाहिले. कृपया गैरसमज नकोत.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Tue, 11/03/2015 - 13:47

In reply to अरेच्चा मला जॅक डॅनियल कोण हा by मांत्रिक

Permalink

भौ जॅक डॅनियल्स हा मिपावरचा

भौ जॅक डॅनियल्स हा मिपावरचा अत्यंत मस्त आयडी आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by जॅक डनियल्स on Wed, 11/04/2015 - 05:34

In reply to जॅकोबा by नाखु

Permalink

मिलिंद सोमण ने गळ्यात किंग

मिलिंद सोमण ने गळ्यात किंग कोब्रा घातला असता तरी लोकांनी लक्ष दिले नसते …त्या बाईपाई ती स्टोरी फ़ेमॉस झाली. घोरपड काय मिपाकरांसाठी कमोडो सरड्याचे पण तेल आणून घरपोच पोहचवले जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Mon, 11/02/2015 - 22:51

Permalink

बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं

बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं. :) आता धागा उघडला की कभी खुशी कभी ग़मचं हैप्पीवाला म्यूजिक वाजल अशी सोय करा संपादक दादा ताई लोकहो :)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 11/02/2015 - 22:55

In reply to बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं by रातराणी

Permalink

अतापासुन रारा आयडीपण आमच्या

अतापासुन रारा आयडीपण आमच्या लाडक्या आयड्यांमधे सामिल करण्यात आलेला आहे =)) तसा मी तुमचा फॅन ऐलवणी विचारपुस धाग्यापासुनचं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Mon, 11/02/2015 - 23:04

In reply to अतापासुन रारा आयडीपण आमच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

ती मी नव्हेच कॅप्टन!

ती मी नव्हेच कॅप्टन! आतापर्यंत दोन आयडी म्हणले रारा आयडी आवडतो म्हणून. आता मेरे दो अनमोल रतन वाजवा! :)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Tue, 11/03/2015 - 01:11

In reply to ती मी नव्हेच कॅप्टन! by रातराणी

Permalink

अश्लिल अश्लिल =))

अश्लिल अश्लिल =))
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 11/03/2015 - 02:14

In reply to अश्लिल अश्लिल =)) by टवाळ कार्टा

Permalink

अच्र्त कुठला. चांगला धागा आहे

अच्र्त कुठला. चांगला धागा आहे हा. स्वच्छ मनाने वाच रे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/03/2015 - 02:24

In reply to अच्र्त कुठला. चांगला धागा आहे by रातराणी

Permalink

मनास स्वच्छ करण्यासाठी ......

मनास स्वच्छ करण्यासाठी ...... निरमा निरमा वॉशिंग पावडर निरमा.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 11/03/2015 - 02:41

In reply to मनास स्वच्छ करण्यासाठी ...... by प्यारे१

Permalink

कराचे का २००?

कराचे का २००?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/03/2015 - 02:53

In reply to कराचे का २००? by रातराणी

Permalink

होणारेत आपसुक.

होणारेत आपसुक. कल्जि क्रू न्ये.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 11/03/2015 - 03:02

In reply to होणारेत आपसुक. by प्यारे१

Permalink

ब्रोबरं आहे तुमचं.

ब्रोबरं आहे तुमचं.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 11/03/2015 - 07:11

In reply to ती मी नव्हेच कॅप्टन! by रातराणी

Permalink

अरारारारारारारा!! त्या

अरारारारारारारा!! त्या स्वप्नांच्या राणी नै का? बरं जौंदे तुम्हाला डिफेव्हरेट करुन टाकतो लगेचं =))
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 11/04/2015 - 05:53

In reply to अरारारारारारारा!! त्या by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

दुत्त दुत्त :/

दुत्त दुत्त :/
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 11/02/2015 - 23:55

In reply to बाब्बौ लय प्रेम उतू चाललय इथं by रातराणी

Permalink

का हो मडमवा? कोनो तकलीफ है का

का हो मडमवा? कोनो तकलीफ है का?
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 11/03/2015 - 00:05

In reply to का हो मडमवा? कोनो तकलीफ है का by प्यारे१

Permalink

ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही.

ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही. वो राणी अलग ये राणी अलग! जो हम नही वो है केहनेकी गलती ना होगी हमसे :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/03/2015 - 00:14

In reply to ना प्यारेजी कौनो तकलीफ नाही. by रातराणी

Permalink

हम वो बारे में नहीं पूछे.

हम वो बारे में नहीं पूछे. किसी का मुँह खोलकर कोई तारीफ़ करे तो कुछ दिक्कत हो जायगा का? गाना बजाना का सुझाव दिए आप?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 11/03/2015 - 00:19

In reply to हम वो बारे में नहीं पूछे. by प्यारे१

Permalink

हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला

हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला तर. म्हैते आम्हाला तुला अवधी, भोजपुरी, व्रज, हरयानवी, पंजाबी, खडी, बिहारी सगळ्या हिंद्या येतेत म्हणून. बास अता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 11/03/2015 - 00:23

In reply to हाणतो बघ आता लै हिंदी फाडायला by अभ्या..

Permalink

ऱ्हायलं.

ऱ्हायलं. त्या सोन्याबापुला आन हिकडं त्यानं सवय लावल्या मला.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com