अध्यात्म-विज्ञान समन्वय ?
[नमस्कार ! इथले लेखन-विशेषत: प्रतिसाद-वाचून हे संस्थळ तरुणाईचे आहे हे प्रतीत होते. इथे माझ्यासारख्या ज्येष्ठ (वयाने) सदस्याने लिहिणे म्हणजे शिंगे मोडून वासरात शिरण्यासारखे आहे हेही कळते. पण एक पद्यलेख (ओवीरचना) दिला आहे. तरी क्षमध्वम् !यनावाला]
विज्ञानाची विश्वासार्हता । जाणते सामान्य जनता । विज्ञानतत्त्वांची सत्यता । वादातीत सर्वत्र ॥१॥
बहुत क्षेत्रीं विज्ञानसत्ता । लोपली अध्यात्म महत्ता । आध्यात्मिक इच्छिती आता । विज्ञानाशीं समन्वय ॥२॥
अध्यात्मीं श्रद्धा आवश्यक । तर्क मानिती वैज्ञानिक । श्रद्धा न टिके जेथे तर्क । मूलभूत भेद हा ॥३॥
असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते सत्य मानणे भावबळे । सोपी व्याख्या श्रद्धेची॥४॥
विज्ञान समाज उपयोगी । अध्यात्म ते निरुपयोगी । बुद्धिमान जन यालागी । अध्यात्मासी धि:कारिती ॥५॥
विज्ञान नियम नैसर्गिक । अध्यात्म तत्त्वे अतार्किक । अध्यात्म विद्येचे साधक । भ्रामक तत्त्वे मानिती ॥६॥
वैज्ञानिकां हवे प्रयोग । आध्यात्मिक करिती योग । प्रयोगीं ज्ञान संयोग । जे नच लाभे योगाने ॥७ ॥
प्रयोगांसी साधने नाना । अध्यात्मीं अष्टांग साधना । तियेने काहींच साधेना । भ्रांतज्ञाना व्यतिरिक्त ॥८॥
अध्यात्म मानी परलोक । विज्ञान एक इहलोक । वास्तव केवळ ऐहिक । पारलौकिक भ्रामक ॥९॥
आध्यात्मिक शोधिती ब्रह्म । विज्ञान निसर्गनियम ।ब्रह्मवेत्ता न करी काम । जे समाजा उपयोगी ॥१०॥
वैज्ञानिकांचे संशोधन । त्या आधारे तंत्रज्ञान । करी दैनंदिन जीवन । समाजाचे सुखकर ॥११॥
समाज समस्या अनेक । विज्ञानाने सुटती देख । देवी-प्लेगादि सांसर्गिक । साथी मिटल्या विज्ञानें ॥१२॥
अध्यात्मासी देणे-घेणे । कांही न समाजाकारणे । "अहं ब्रह्मास्मि" मंत्र जपणे । भ्रांत कल्पना मोक्षाची ॥१३॥
असती मंडूक कूपात ।बाह्य जग तयां न ज्ञात । अध्यात्म तैसे संकुचित । विज्ञानक्षेत्र विशाल ॥१४ ॥
कोsहं ? कोsहं ? प्रश्न वृथा । उगाच शिणविती माथा । शतकानुशतके काथा । कुटती तोच तोच तो ॥१५॥
प्रश्नाचे उत्तर सुस्पष्ट । स्वनाम असे साधी गोष्ट । सारे विचार तर्कदुष्ट । व्यर्थ स्तोम माजविती ॥१६ ॥
अमावास्या काळी रजनी । गुडुप अंधार्या सदनी । शोधणे काळी माऊमनी । अस्तित्वात नसेच जी ॥१७॥
तैसा प्रकार अध्यात्माचा । अंतिम सत्य शोधनाचा । कधी काळीं न संपायाचा । धुंडिती जे न असे ते ॥१८॥
वैज्ञानिक तत्त्वे शोधिती । सुधारणा शक्य मानिती । यास्तव होतसे प्रगती । विज्ञान क्षेत्रीं सदैव॥१९॥
आध्यात्मिक घरी बैसोन ।सुखे करो धारणा-ध्यान । तयाने समाधी लागोन ।डुल्लत राहो स्वानंदीं ॥२०॥
वा रिघोनी गिरिकुहरीं । ध्यानमग्न जाहल्यावरी । लोंबत राहो अधांतरी । ब्रह्मानंदांत डुंबत ॥२१॥
आम्हां ना सुतक-सोयर । ज्याचा त्याचा तो अधिकार । परी "संसार हा असार "। नको ऐसा उपदेश ॥२२॥
"जीवनाची इतिकर्तव्यता । केवळ मोक्ष मिळविता । जन्म-मृत्यु फेरे अन्यथा ।" बरळणे हे टाळावे ॥२३॥
आत्मानुभव व्यक्तिगत । "ब्रह्म आकळले " समजुत । भ्रम म्हणणे क्रमप्राप्त । प्रमाणाच्या अभावी ॥२४॥
अध्यात्मीं महत्त्व मोक्षाला । विज्ञानीं न मान्यता त्याला । मग समन्वय कसला । ऐशा भिन्न विषयांचा ?॥२५॥
******************************************************************************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सतीश राव, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दिर्घ प्रतिसादासाठी धन्यवाद.
काही हजार वर्षांपूर्वी किंवा
गंगाधर गाडगीळांची एक आठवण आहे
हम्म
या शतकी धाग्यासाठी य ना
मानवी मन आणि बुद्धी
हे सर्व गुंतागुंतीचं यंत्र
मांत्रिकजी,
कुठुन आल ? या प्रश्नामागे एक भुमिका असते
कुठुन आल ? या प्रश्नामागे एक भुमिका असते
या विश्वात कोणतीही गोष्ट
अशा रास्यानिक प्रक्रिया आणि
सगा लेखक युवल नोआ हरारी हे
धन्यवाद सतीशराव,
अध्यात्मासोबत वा विज्ञानासोबत
अध्यात्म काय आहे आणि काय नाही
गावडेसर, चेष्टा नका हो करू
डांगेजी चेष्टा नाही हो. ती
जीवाला कुठल्याही योनीत मोक्ष
आपण आज ज्या योनीत आहोत, ज्या
:-) हलके घ्या.
^^^^^^^^^^ वरील प्रतिसाद
आपल्या वाटीत पडणारं चमचाभर
थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा.
थोड़ा वरण भात भाजी भाकरी आणा.
धन्यवाद.
रचना आवडली; पण "मी म्हणजे
असेल कदाचित
मी म्हणजे यापेक्षा लै भारी कै तरी असावं अशा अहंकारयुक्त भ्रमातून निर्माण झालेला शोध म्हणजे अध्यात्म. इतर सगळ्या प्राण्यांसारखेच आपणही एक आपोआप निर्माण झालेले प्राणी आहोत ही कल्पना अध्यात्मवाल्यांना सहन होत नसावी बहुतेक.कदाचित एक जी. ए. चं विधान आहे मॅन इज द मेझर ऑफ एव्हरीथींग या कल्पनेवर कुत्रा का चांगला तो माणसाचा वफादार आहे. हिरवळ माणसाला नेत्रसुखद म्हणून चांगली अस काय काय गमतीदार आहे. इन शॉर्ट सर्व जगाकडे माणुस हीच एकमेव मोजपट्टी लाऊन बघणे.वरील चर्चा वाचुन माझे असे मत झाले की
प्रत्यक्ष प्रयोग करणे महत्वाचे.
हा अनुभूतीच तर कळीचा मुद्दा
.
.... मिपाचं लाडकं व्यक्तीमत्व
सूफी संतांविषयी काय मत आहे
ते एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व होते
मन आणि बुद्धी @दत्ता जोशी
विज्ञानाची महती
भारताच्या अधोगतीचे कारण
:)
हो ना !
काहीही हं मोगा
आपण परिस्थितीकडे कसे, कुठल्या
कस्सं कस्सं कस्सं...
प्रतिसाद आवडला डांगे साहेब...
+१
फार सुरेख विवेचन आहे अजुन रोचक करता येइल परंतु...
आजची स्वाक्षरी :- पाहुनी विज्ञानाच्या बलाला भ्रमीष्ट झाला झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला.
+१.
आधुनिक विज्ञानाला दुषणे देत
सर्व भावनांच्या समुच्चयाला मन