पुरस्कार परत करण्याचा आनंद मिळाला नाही ही खंत!
सायंकालची वेळ. दरवाजा उघडून बाईंनी बाबारावांना आत घेतले. हुप्प चेहरा पाहून काहीतरी बिनसले आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. नातवंडाला घेऊन त्याचा डॅड परतला. एका हातात चॉकलेट अन दुसऱ्या हाताने मोबाईलवरील कार्टून पाहात त्याने शूज उतरवले. ‘चार्वाकवादावरचा लेख पेपरात आल्याने सकाळी उसाही दिसणारे बाबाराव आत्ता रुसलेले का?’ असा मुलाने हात करून आईला प्रश्न केला. ‘काय की’ म्हणून त्यांनी तोंड फिरवले. ‘काय रे, ते शूज रॅकवर कोण ठेवणार? तुझा बाप?’ बाबारावांचा नातवावर राग निघाला. ‘काय झाले?’ म्हणत सुनबाईने रागरंग ताडला. पुर्वी मोठा एक पुरस्कार थोडक्यात हुकला म्हणून नातवावर असाच रागराग केलेला तिला आठवत होता. ‘मी इतरांप्रमाणे तेंव्हा लॉबीइंग केले नाही म्हणून माझे नाव बारगळले आणि आयुष्यातील एक मोठी संधी गमवायची वेळ आली. आता इतकी झकास आमची लॉबी तयार असताना मला पुरस्कार परत करायची संधी गमावायला लागतेय याचे वैषम्य वाटते.’ चहाचा कप हाती आल्यावर पत्नीसमोर मन मोकळे करत बाबाराव म्हणाले. ‘काय चर्चा रंगतायत पेपरात अन टीव्हीवर! असा ताव कित्येक वर्षात आम्हाला आला नव्हता!’ मला ही असेच ते पुरस्कार परत करून वर आम्हा बुद्धिवादी साहित्यिकांवरील होणाऱ्या कुचंबणेला वाचा फोडताना प्रत्येक चॅनेलवर बोलावणे आले असते. ही गळचेपी कदापिही सहन केली जाणार नाही असे मला ठासून सांगता सांगता पुरेवाट झाली असती.’ पत्नीसमोर जागतिक किर्तीच्या विचारकांनी उसासा टाकला! टीव्हीवरील चॅनेल लागेपर्यंत चाळा म्हणून मुलाने लोकसत्ता पेपर उघडला मात्र... ...‘फेकून दे तो पेपर आजचा. ज्यांच्या खांद्यावर आम्ही अभिमानाने मान ठेवली, ते आता आम्हालाच नावे ठेवत अग्रलेख लिहितायत काय? आम्ही वावदुक काय? हो, आम्हाला सध्याचे सरकार स्वबळावर सत्तेवर आल्याचे दुःख आहे. आणीबाणीपेक्षा परिस्थिती गंभीर आहे असे म्हणणारे आम्ही बोलघेवडे, दांभिक काय?' बाबारावांनी आवाज चढवला. बाहेर बागेतील जमलेल्यांमधून ‘नमस्ते सदा वत्सले'... चालू झालेले वाटताच, चिरंजिवांनी खिडकीचे शटर पुर्ण बंद करून घेतले. तरीही बारीक आवाजात गीत चालूच होते... !!!
वाचने
6063
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म.. बर्याच अंशी खरे आहे
छानच .
पुरस्काराबरोबर मिळालेली रक्कम
In reply to छानच . by चित्रगुप्त
कीप द चेंज.
In reply to पुरस्काराबरोबर मिळालेली रक्कम by उगा काहितरीच
पानसरे वा दाभोलकर यांची आंदोलने व्यवस्थेच्या कडेकडेनेच चालली...
In reply to छानच . by चित्रगुप्त
:)
.
अगोदर पुरस्कार तर मिळू दे मग
नवीन बातमी...
देशातील असहिष्णू वातावरणामुळे
झोंबी !
वरच्या प्रतिसादात तुम्ही कॉम्पीटीशन से डर लगता है असे वाचावे
दोन्ही योग्यच
In reply to वरच्या प्रतिसादात तुम्ही कॉम्पीटीशन से डर लगता है असे वाचावे by मारवा
पुरस्कार
न मिळालेल्यांना ताप कशाला?
In reply to पुरस्कार by चिरोटा
माझ्या धाग्यांची उजळणी...
नंदा खरेंनी पुरस्कार नाकारला..