Skip to main content

मूर्ती तुम्हीपण

लेखक भंकस बाबा यांनी रविवार, 01/11/2015 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
खरोखर आता तर वाटायला लागले आहे की अल्पसंख्यकावर खुपच अत्याचार होउ लागले आहेत. अगदी मोदी त्या आबु बाकर नामक क्रुरकरम्याचा भारतीय अवतार आहेत की काय अशी शंका आमच्या छोट्याशा भेजात घुसु लागली आहे. निमित्त आहे नारायण मुर्तिनी केलेले भाष्य. मूर्ति साहेब एकतर तुम्ही मालवणी , भेंडीबाजार, बेहरामपाड़ा, अशा वस्तीत राहात नाहीँ. सहिष्णुता ही फ़क्त हिन्दुनि दाखवायची वस्तु आहे ऎसे वाटते का तुम्हाला? किलोच्या मापाला २५ ग्राम कमी पडली की तुम्ही ग्राहक कोर्टात खेचनार का हिंदुत्ववादी संघटनाना ? साहेब या एरियात येऊन बघा एकदा . अज़ान चा टायमाला युद्धात जसे भोंगे वाजतात तसे हे बोम्बलत असतात. बकरी ईद ला नदया वहाव्यात ऐसे रक्ताचे पाट रस्त्याने वाहत असतात. झोपड़पट्टित चार माळ्याचि इमारत बांधून त्याच्या बाजूला एखाधी मशिद बांधली की पूर्ण वस्ति untouchable होते. अर्जुनाला बघायला महाभारतात जायला नको , इथेच जमिनित भोंके पाडून महापालिकेच्या पाइपातुन अवैध पाणीपुरवठा घेतला जातो. कारण मशीदित वजू साठि चोवीस तास पाणी लागते ना? आमच्या मुस्लिम बन्धुचि कुरानावर अपरम्पार श्रद्धा असते. त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार ही त्यांच्यात खाजगी बाब असते. एखाद्या स्त्रिला न्याय मिळत असेल तर कायदे बदलले जातात. लवकरच सर्व जग इस्लाम स्वीकारणार आहे हयावर मियाभाईची अतोनात श्रद्धा असते. त्यामुळे घटस्फोटासारखे मामले शरीयत नुसार सोडवण्याकडे भर असतो पण चोरीच्या मामल्यात मात्र इंडियन पीनल कोड चालतो. मूर्तिसाहेब याचं धर्मांधानि आज़ाद मैदानावर हैदोस घातला होता. तेव्हा रमझान् चा महीना असल्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई केली नव्हती. पण मावळ प्रांतात मात्र शेतकर्यावर गोळीबार करताना सरकार जराहि कचरले नव्हते ते का? तेंव्हा मात्र तुम्ही विचारवंत समाधि लावुन बसला होतात. मूर्तिसाहेब हां आक्रोश आहे हिंदुत्वाचा ! एका अखलाख साठी इतके तांडव पण हजारो काशमीरी पंडित मेले , लाखो देशोधड़ीला लागले त्यासाठी उवाच् नाही. साहेब दूसरे करतात म्हणून नको तुमच्या मनाला विचारा . मगच योग्य टिप्पणी द्या.

वाचने 21861
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

एकच पदार्थ सतत गरम केला कि सगळं सत्व जातं त्यातलं.

In reply to by याॅर्कर

पुरस्कार परत करणारे टिनपाट लेखक व् फ़िल्मी हस्ती आणी नारायण मूर्ति काही फरक आहे की नाही? असहिष्णुतेमुळे हैरान झालेल्या मुर्तिनी त्यांच्या मूर्ति फाउंडेशन चा मदतीचा ओघ मुस्लिम कल्याणाकडे वळवला तर एखाद टक्का वाढल्याचे श्रेय तुम्हीही घेऊ शकता. ब्लॉग वर चर्चा करा व् मुर्तिसारख्या झापड़ बांधलेल्या लोकांना वेळीच जागे करा.

In reply to by भंकस बाबा

आसं नाई. आसं नाई. आम्हाला कसे कळणार की विचारवंत खराय की तथाकथित. किंवा भांडेफोड खरीय की खोटी? तुम्हीच लिंका द्या बाबा.

एका अखलाख साठी इतके तांडव पण हजारो काशमीरी पंडित मेले , लाखो देशोधड़ीला लागले त्यासाठी उवाच् नाही
सहमत +१००

In reply to by मंदार कात्रे

नेमके हेच घोळतेय किती दिवस डोक्यामध्ये. पुरस्कार आणि सन्मान परत देणार्यांनी खुशाल ते परत द्यावे आणि आपल्या संधिसाधू असहिष्णुतेचा प्रसार करण्यासाठी पाकिस्तान , सिरीया अफगाणिस्तान अश्या ठिकाणी निघून जावे. त्यांचा विसा आणि इतर खर्च आम्ही देऊ. जे होतेय त्या गोष्टींचे समर्थन करण्याचा हेतू मुळीच नाहीये. पण फक्त एकतर्फी सहिष्णुता आम्हाल नको आहे. सहिष्णुता हि फक्त हिंदूंनीच दाखवण्याची गोष्ट आहे का? असले पुर्स्कात परत देणारे आणि असहिष्णू असहिष्णू असा दंगा करून प्रसिद्धी मिळवणारे लोक पहिले न .. कि साल्यांच्या पार्श्व भागावर फटके मारून त्यांना एकाच प्रश्न विचारावा वाटतो .. साल्यानो ... तुम्ही काय झक मारायला गेला होता का आत्तापर्यंत ?? आमच्यावर झालेले अत्याचार नाही दिसले का बे तुम्हाला ???

In reply to by मुक्त विहारि

खेड ला गेल्यावर एसटी स्टैंडपासून थोड्याच् अंतरावर हयांचे मूर्ति कोम्बडीचे दूकान आहे. मिपा सदस्याना ५% डिस्काउंट मधे ते कोम्बडि साफ़ करून देतात.

In reply to by भंकस बाबा

असो, आपण गहन-विचारी पंथाले दिसता, त्यामुळे ह्या विषयावर (मुर्ती कोण?) तुमच्याशी अधिक चर्चा करण्यात काही हशील नाही.

सुधा मूर्तिंना पाठवा तुमचं गाऱ्हाणं. त्यांना चांगलं मराठी येतं. शुद्धलेखन दुरुस्त करून वाचून दाखवतील त्या नारायणरावांना.

अरेवा वा वा वा वा!!!! मग मूर्तींनाही पाकिस्तानात पाठवणार का आता? =)) रच्याकने, सध्याच्या शासनाचे भक्तगण हे पाकिस्तान टूरिझमचे सर्वांत मोठे पुरस्कर्ते आहेत. कुणी काही म्हणायचा अवकाश, पाकिस्तानात पाठवून मोकळे. =))

In reply to by बॅटमॅन

सध्याचे शासनाचे विरोधीदेखिल कुठाय १५ लाख रु.? असे विचारतात असे ऐकले आहे.. खरे खोटे देव आणि स्विस बँकच जाणो..

नारायणमूर्ती हे फोर्ड फाऊंडेशनच्या ट्रस्टी मंडळींपैकी एक आहेत. आणि मोदी सरकारने फोर्ड फाऊंडेशनविरूध्द बडगा उगारला आहे त्यामुळे नारायणमूर्ती खवळणे सहज शक्य आहे. दुसरे म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका सल्लागार समितीवरून नारायणमूर्तीपुत्र रोहन मूर्ती यांची उचलबांगडी झाली अशीही बातमी काही महिन्यांपूर्वी वाचली होती. तेव्हा नारायणमूर्तींना भारतात अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत हा साक्षात्कार होण्यामागे हे पण कारण आहे का हे मला माहित नाही. तस्मात नारायणमूर्ती हे या बाबतीत तटस्थ मत देण्याच्या स्थितीत आहेत असे वाटत नाही कारण त्यांच्या स्वतःच्याच हितसंबंधांना मोदी सरकारने धक्का लावला आहे असे वरकरणी वाटते. तेव्हा नारायणमूर्तींना या बाबतीत* फारसे सिरियसली घ्यायची गरज नाही. *: नारायणमूर्तींचे आय.टी क्षेत्रातील योगदान वादातीत आहे आणि त्याबद्दल त्यांना मान दिलाच पाहिजे.पण म्हणून ते उठून इतर क्षेत्रांविषयी बोलू लागले तर त्या मतालाही तितकीच किंमत दिली जाईल अशी अपेक्षा ते ठेवत असतील तर (तशी अपेक्षा ते ठेवत आहेत की नाही हे माहित नाही) ते नक्कीच चुकीचे आहे.

In reply to by जातवेद

१. राष्ट्रपती
राष्ट्रपतींनी मतप्रदर्शन करणे हे नवीन नाही. फक्त त्यात सत्यांश किती याचा प्रत्येकाने स्वतःच शोध घेतला पाहिजे. त्यांनी मतप्रदर्शन केलेल्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच सत्यपरिस्थिती जाणून घेतलेली चांगली. २००० मध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना राज्यघटनेची समीक्षा करून त्यातून कालबाह्य झालेले कायदे काढण्याची शिफारस करणे, नवीन कायद्यांसाठी शिफारस करणे, अस्तित्वात असलेल्या काही कायद्यांसाठी सुधारणा सुचविणे इ. चांगल्या गोष्टींसाठी त्यांनी एक अत्यंत विद्वान व कायदेपंडीतांची समिती बनविली होती. त्या समितीने बराच काळ समीक्षा करून आपला अहवाल दिला होता. १९५० मध्ये लिहिलेल्या राज्यघटनेची ठराविक काळानंतर समीक्षा करणे योग्यच होते. परंतु तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांनी त्याविरूद्ध दोन वेळा जाहीर मतप्रदर्शन केले होते. राज्यघटनेला हात लावणे चुकीचे आहे, राज्यघटनेची चिरफाड करणे चुकीचे आहे, राज्यघटनेची समीक्षा करणे योग्य नाही अशा अर्थाचे मत त्यांनी २ वेळा व्यक्त केले होते. त्यांना आपले मत मांडायचा अधिकार होताच. परंतु त्यांनी राज्यघटनेच्या समीक्षेला विरोध केला म्हणजे वाजपेयी सरकार काही तरी भयंकर चूक करीत होते असा अर्थ नव्हता. सध्याच्या राष्ट्रपतींच्या मताबद्दल देखील त्यावर लगेच विश्वास न ठेवता ते म्हणतात तशी परिस्थिती खरोखरच आहे का याचा सर्वांनी स्वतःच विचार करावा.
२. गव्हर्नर
रघुराम राजन यांना कोण सत्तेत आहे यापेक्षा देशातील आर्थिक परिस्थितीची जास्त काळजी आहे. एखाद्या असित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल माध्यमातून, वर्तमानपत्रातून, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सातत्याने बोलून भीतिचा बागुलबुवा निर्माण केल्याने देशातील अतंर्गत परिस्थिती फारशी माहित नसलेल्या परकीय गुंतवणुकदारांच्या मनामध्ये भीतिचे वातावरण निर्माण होऊन त्याचा गुंतवणुकीवर परीणाम होऊ शकेल या काळजीतून त्यांनी आपले मत व्यक्त केले असावे.

In reply to by गॅरी ट्रुमन

तस्मात नारायणमूर्ती हे या बाबतीत तटस्थ मत देण्याच्या स्थितीत आहेत असे वाटत नाही कारण त्यांच्या स्वतःच्याच हितसंबंधांना मोदी सरकारने धक्का लावला आहे असे वरकरणी वाटते. तेव्हा नारायणमूर्तींना या बाबतीत* फारसे सिरियसली घ्यायची गरज नाही.
+१ ते या बाबतीत तटस्थ नाहीत. २००२ मधील गोध्रा व गुजरात दंगली प्रकरणानंतर त्यांनी इंडियन एक्स्प्रेस मध्ये मोठा लेख लिहून दंगलीवर जोरदार टीका करून सेक्युलॅरिझमचे गोडवे गायले होते. त्या लेखात अर्थातच सगळा भर गुजरात दंगलीवर होता, गोध्रा प्रकरणाचा त्यात उल्लेखही नव्हता. नंतर डिसेंबर २००५ मध्ये पाकव्याप्त काश्मिरमध्ये भूकंप झाल्यावर त्यांनी इन्फोसिसतर्फे पाकिस्तानला १ कोटी रू. ची मदत दिली होती. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली होती. एकंदरीत ते स्वतःला कायम लेफ्ट टू द सेंटर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण आहे (तसे काहीही नसताना) हे सांगण्यामागे त्यांचा हाच उद्देश आहे.

In reply to by श्रीगुरुजी

एकंदरीत ते स्वतःला कायम लेफ्ट टू द सेंटर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात
ते सुद्धा भांडवल शाहीचे फायदे पूर्णपणे उपभोगुन.

In reply to by प्रसाद१९७१

इन्फोसिसचे अजून एक हास्यास्पद वर्तन
(१) ९/११ च्या हल्ल्यानंतर इन्फोसिसच्या भारतातील कर्मचार्‍यांना अमेरिकेला आर्थिक स्वरूपात मदत देण्यासाठी स्वेच्छेने पैसे द्यावेत असे आवाहन करण्यात आले होते. अमेरिकेसारख्या अत्यंत प्रचंड अर्थव्यवस्थेला इथले कर्मचारी फार तर एखादा चिंचोका देऊ शकले असते. सुरवातीला ४-५ दिवस बहुतेक कर्मचार्‍यांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता. आपल्या योजनेला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळालेला पाहून अस्वस्थ झालेल्या मॅनेजमेंटने प्रत्येक पीएम ला प्रोजेक्ट मिटींग घेऊन मदत करण्याचे महत्त्व सांगण्याचा विनंतीवजा आदेश देण्यात आला. प्रोजेक्ट मिटींग झाल्यावर एच आर ला कळविणे बंधनकारक केले होते. त्यामुळे सर्व पीएम्स ने मिटींग घेऊन आर्थिक मदतीचे महत्त्व टीममध्ये पोहोचविले. परंतु तरीसुद्धा त्या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता. (२) अमरिकेत त्यावेळी फणीश मूर्ती (लैंगिक छळामुळे दोन वेळा न्यायालयाबाहेर तडजोड करून आरोप करणार्‍या दोन्ही मुलींना प्रत्येकी ३० लाख डॉलर्स देऊन खटला मिटविणारा हाच तो) हा इन्फोसिसचा ग्लोबल मार्केटिंग हेड होता. त्याने अमेरिकेतील सर्व कर्मचार्‍यांना एक दिवसाचा पगार द्यायला लावला. (३) ९/११ नंतर काही दिवसांनी बंगळूरच्या मुख्य कार्यालयातून आदेश आला की सर्व शहरातील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी एका विशिष्ट दिवशी २ मिनिटे उभे राहून मृतांना श्रद्धांजली वहावी. कल्पना चांगलीच होती. परंतु ९/११ च्या पूर्वी (जगात अनेक ठिकाणी झालेले भूकंप, १९९९ मधील टर्कीमधील भूकंप, २००१ मधील कच्छमधील भूकंप इ.) आणि ९/११ नंतर (उदा. २००४ मधील त्सुनामी) जगात अनेक देशात अनेक मानवनिर्मित/निसर्गनिर्मित अपघात/घटना घडून त्यात हजारोंनी प्राण गमाविले. आजतगायत ९/११ वगळता इतर कोणत्याही घटनेला इन्फोसिसने श्रद्धांजली वाहिल्याचे माझ्या स्मरणात नाही.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी व गॅरी ट्रुमन, नारायण मूर्तींची पार्श्वभूमी उलगडून सांगितल्याबद्दल तुम्हा दोघांचे आभार! :-) माझ्यातर्फे छोटीशी चीज. जेव्हा डिसेंबर २००१ मध्ये पाकड्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता तेव्हा जनमत चांगलंच प्रक्षुब्ध होतं. आपण सीमेवर ऐनिकी तुकड्या तैनात केल्या होत्या. त्यावेळी वाजपेयींनी युद्ध टाळावे म्हणून त्यांच्यावर अनेक आस्थापनांनी दबाव टाकला. त्यापैकी एक इन्फोसिस होती. अमेरिकेतून डॉलर्स मिळतात म्हणून मूर्ती जनमताच्या विरोधात गेले! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

२००० ते २००३ मध्ये जगभर मंदीची लाट होती. संगणक कंपन्यांवर जास्त परीणाम झाला होता. भारतातील अनेक संगणक कंपन्यांनी लेऑफ्स केले होते (उदा. कॉग्निझंट, एमबीटी इ.). अनेक कर्मचारी बिनकामाचे बाकावर बसून होते. अशा परिस्थितीत जर भारत-पाकिस्तान युद्ध झाले असते, तर परिस्थिती अजून वाईट झाली असती. त्यामुळे जर युद्ध टाळण्यासाठी उद्योगपतींनी प्रयत्न केले असतील तर ते तत्कालीन परिस्थितीत योग्यच होते.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, जगभर मंदी असली तरी भारताला काय फरक पडंत होता? युद्ध अमेरिका खेळणार नव्हती. जी आस्थापने युद्धविरोधात होती ती सगळी अमेरिकी डॉलर्स भारतात आणत होती. त्यामुळे भारत-पाक युद्धाने फारसा फरक पडला नसता. मात्र याबाबत चूक भूल देणे घेणे. अधिक प्रकाश टाकलात तर बरे होईल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

युद्ध अमेरिका खेळणार नसली तर युद्ध सुरू झाल्याक्षणी अमेरिकन, युरोपिअन व इतर बड्या देशांनी भारताला काम देण्यात हात आखडता घेतला असता. आधीच मंदीने त्रासलेल्या भारताला अजून मोठा आर्थिक फटका बसला असता. देशांतर्गत परिस्थिती शांत असेल तरच व्यवसायवृद्धी होऊ शकते. त्यामुळेच परकीय गुंतवणुक बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम इ. राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत खूप कमी प्रमाणात होते. युद्धामुळे भारताला शस्त्रात्रे, दारूगोळा इ. वर बराच खर्च करावा लागला असता व युद्ध सुरू असताना असलेल्या अस्थिर परिस्थितीमुळे बाहेरून येणार्‍या व्यवसायावर परीणाम झाला असता. असा दुहेरी आर्थिक फटका भारताला बसला असता. संसदेवर हल्ला हे युद्धासाठी पुरेसे सबळ कारण नव्हते. त्यात हानी तुलनेने खूपच कमी झाली होती व त्यात पाकड्यांबरोबर अफझल गुरूसारख्या काश्मिरींचाही (म्हणजे भारतीयांचा) हात होता. मग युद्ध कोणाबरोबर करणार? जर युद्द अपरिहार्य झाले असते तर मात्र भारताला पूर्ण तयारी करूनच युद्धाला उतरावेच लागले असते. त्याऐवजी २६/११ चा हल्ला हे युद्धासाठी खूपच सबळ कारण होते. त्यात हानी खूप मोठी झालेली होती व त्यात १००% पाकड्यांचाच हात होता हे लगेच सिद्ध झाले होते. परंतु तेव्हा मात्र भारताने युद्धाची तयारी दाखविली नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

स्वता कडे इंफोसिस ची ४-५ % मालकी असताना, स्वताच्या मुलाला कंपनीत घेण्याचा जो लाजीरवाणा प्रत्यत्न केला ( त्यात तो पगार वगैरे घेत नाही असल्या फाल्तू गप्पा मारुन ) तेंव्हा जगाला नैतिकता शिकवणार्‍या मूर्तींचे पाय मातीचेच काय तर शेणाचे आहेत असे वाटले. नेहमी मेरीटच्या गप्पा मारता मारता स्वताची मुले अमेरीकेत मेरीट वर शिकत होती का पेमेंट सीट वर हे कधी सांगीतले नाही. त्यांचे दुसरे मित्र निलेकणी, ज्यांनी हजारो कोटी घालवून आधार ची वाट लावली. त्या बद्दल पण मूर्ती काही बोलल्याचे आठवत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

तेंव्हा जगाला नैतिकता शिकवणार्‍या मूर्तींचे पाय मातीचेच काय तर शेणाचे आहेत असे वाटले.
आपण होलिअर दॅन दाऊ आहोत असा दावा करणार्‍या बहुतांश व्यक्तींविषयी हे सत्य असते. कारण जे लोक खरोखरच होलिअर दॅन दाऊ असतात त्यांना त्याची जाहिरात करावी लागत नाही.त्यांच्या वर्तणुकीतून ते दिसूनच येते. यावरून एक गोष्ट आठवली. मी एकेकाळी इंजिनिअरींगला होतो आणि शेवटच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून माझी निवड इन्फोसिसमध्ये झाली होती.त्याकाळी वालचंदसारख्या कॉलेजातून इन्फोसिसमध्ये निवड होणे हे मानाचे लक्षण होते. (त्यानंतर माझी वाट पूर्णच वेगळी झाली ही गोष्ट वेगळी) तेव्हा कंपनीत दीड-दोन लाख लोक नव्हते तर माझी निवड झाली त्या दिवशी केवळ १०,६७३ लोक होते (प्री-प्लेसमेन्ट टॉकमध्ये एच.आर ने हा आकडा सांगितला होता). त्यावेळी स्वर्ग मला अगदी दोन बोटावर राहिला होता. मला प्लेसमेन्ट बंगलोरला मिळाली होती. कुणाकुणाच्या ओळखीतून आतल्या दोघातिघांशी संपर्क झाला. त्यांच्याकडून गेटपास वगैरे बनवून घेऊन बी.ई ची परीक्षा सुरू व्हायच्या दोनेक महिने आधी एका रविवारी मी बंगलोरला कंपनी बघायला गेलो होतो.त्यावेळी आत मी नारायणमूर्ती किती साधे आहेत याच्या कित्येक कहाण्या ऐकल्या. मूर्ती दांपत्याचा महिन्याचा खर्च ७ हजारच आहे, नारायणमूर्ती ऑफिसला येताना स्वतःच्या गाडीतून येत नाहीत तर नंदन निलेकानींच्या गाडीतून येतात वगैरे वगैरे. त्याचवेळी सुधा मूर्तींचेही एक पुस्तक वाचले होते. त्यात सुधा मूर्तींनी लिहिले होते---"मी बाहेर जाताना बरोबर भाजी आणि फळे घ्यायला लागतील तितकेच पैसे बरोबर ठेवते. बाहेर गेल्यावर काही वेगळे विकत घ्यावेसे वाटले तर तेवढ्यापुरते ड्रायव्हरकडून पैसे उसने घेते आणि घरी परत आल्यानंतर त्याचे पैसे त्याला परत देऊन टाकते". आम्ही साधे, आम्ही साधे याची जाहिरात पुस्तके लिहून का करावी लागते यांना? तुमचा साधेपणा तुमच्याकडेच ठेवा ना. ठिक आहे, साधेपणा हा गुण आहे. पण माझ्याकडे अमुकतमुक गुण आहे याची जाहिरात स्वतःच करणे हा प्रकार नक्कीच खटकला होता. आणि हो, तुम्ही खरोखरच साधे असाल तर मग भाजी आणि फळे सोडून अन्य काही घ्यावेसे वाटतेच कसे? नारायणमूर्ती आणि सुधा मूर्तींचे कर्तुत्व अगदीच निर्विवाद आहे. तरीही असे काही मुद्दे मात्र नक्कीच खटकले होते. असे ऐकले आहे की पु.लंनी त्यांना विविध बक्षिसांबरोबर मिळालेली रक्कम आणि पुस्तकांमधून मिळालेल्या उत्पन्नातील मोठा भाग विविध ठिकाणी दान म्हणून दिला होता. या गोष्टीचा पु.लंनी कधी बभ्रा केला नाही.तर ते गेल्यावर ही गोष्ट कळली.

In reply to by गॅरी ट्रुमन

नारायणमूर्ती आणि सुधा मूर्तींचे कर्तुत्व अगदीच निर्विवाद आहे.
म्हणजे नक्की काय हो? तुमचे आणि उदाहरणार्थ मिपावरच्या सर्वांचेच कर्तुत्व काय कमी आहे? आपण सर्व कष्ट करुन आपली रोजी रोटी कमावतो, टॅक्स भरतो, गुन्हे करत नाही. कोणी महिन्याला १ लाख मिळवत असेल तर कोणी १ कोटी. प्रत्येक जण स्वतासाठीच काहीतरी करते आहे. त्यात काही विषेश नाही. अति पैसे झाले तर कोणीही थोडाफार दानधर्म करतोच.

In reply to by प्रसाद१९७१

तुमचे आणि उदाहरणार्थ मिपावरच्या सर्वांचेच कर्तुत्व काय कमी आहे?
नारायणमूर्ती आणि सहकार्‍यांनी एक कंपनी स्थापन केली आणि आज त्या कंपनीमुळे दीड-दोन लाख लोकांना नोकरी मिळाली आहे ही गोष्ट लहानसहान नक्कीच नाही.माझे कर्तुत्व नक्कीच तेवढे नाही. इतरांचे माहित नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

अहो मूर्तींनी नसती कंपनी चालू केली तर कोण्या बूर्ती नी केली असती. विप्रो, टीसीस, एचसीएल वगैरे आहेतच ना. आणि नसती इंफोसिस झाली तर हे दीड दोन लाख लोकांना विप्रो, टीसीस, एचसीएल इथे नोकर्‍या मिळाल्या असत्या. जे काम इंफोसिस करते, ते दुसर्‍या कुठल्यातरी कंपनी नी केलेच असते ना. आणि त्यांनी लोकांना नोकर्‍या देण्यासाठी कंपनी काढली हे तुम्हाला कोणी सांगितले? त्यांनी त्यांच्या स्वतासाठी कंपनी काढली, त्यात दिड-दोन लाख लोक स्वतासाठी काम करतात, कंपनीला त्यातुन फायदा होतो. कोणी कुणाला फुकटचे देत नाही आणि घेत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

अहो मूर्तींनी नसती कंपनी चालू केली तर कोण्या बूर्ती नी केली असती.
सहमत आहे. गुरूत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला नसता तर इतर कोणीतरी लावलाच असता त्यामुळे त्या शोधाचे श्रेय न्यूटनला देणे चुकीचे आहे असे कोणीतरी मिपावरच म्हटले होते. त्याच न्यायाने कंपनी काढली आणि दीड-दोन लाखांना श्रेय दिले याचे श्रेय नारायणमूर्तींना देणेही चुकीचे आहे. :)
नसती इंफोसिस झाली तर हे दीड दोन लाख लोकांना विप्रो, टीसीस, एचसीएल इथे नोकर्‍या मिळाल्या असत्या. जे काम इंफोसिस करते, ते दुसर्‍या कुठल्यातरी कंपनी नी केलेच असते ना.
पण म्हणून दीड-दोन लाख घरे इन्फोसिसमुळे चालतात ते कमी महत्वाचे कसे काय? (घरी धुणीभांडी करणार्‍या बाईला सोडून इतर कोणालाही कामावर ठेऊ न शकलेला आणि त्यामुळे दीड-दोन लाख लोकांना कामावर ठेवता येईल अशा लोकांच्या कर्तुत्वावर टिप्पणी करायची आपली योग्यता नाही असे मानणारा) गॅरी ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

मुर्तींबद्दल मला काही आकस वगैरे नाही. ना अनादर आहे. मी मुद्दाम तुम्ही लिहीलेला कर्तृत्वाचा मुद्दा लावून धरला कारण मला मूर्तींनी मोठी कंपनी तयार केली म्हणुन त्यांनी मांडलेली वाट्टेल ती मते डीस्कांऊंट करुन सोडुन दिली जाऊ नयेत म्हणुन. त्यांनी कंपनी काढली आणि चालवली ती निव्वळ स्वार्थापोटी जसे तुम्ही नोकरी करता. तसे ही जवळजवळ प्रत्येक जण च स्वताच्या परिघात जमेल तसे कर्तूत्व दाखवत असतो. त्यांनी नको तिथे तोंड उघडले म्हणुन हे घडले. गप्प बसले असते तर ते त्यांच्या घरी आणि मी माझ्या घरी.
घरी धुणीभांडी करणार्‍या बाईला सोडून इतर कोणालाही कामावर ठेऊ न शकलेला आणि त्यामुळे दीड-दोन लाख लोकांना कामावर ठेवता येईल अशा लोकांच्या कर्तुत्वावर टिप्पणी करायची आपली योग्यता नाही असे मानणारा
ह्या तुमच्या मुद्द्यावर असहमती. आज राज ठाकरे ना सर्व जण हसत आहेत मिपा वर, त्यातल्या कोणी एक पक्ष काढुन १० वर्ष चालवून दाखवला आहे. पण टीका करतायत ना. लालूप्रसाद यादव इतके कर्तृत्व इथे कोणाचे आहे ( अगदी मूर्तींचे सुद्धा ) बिहार मधे स्वताचा पक्ष काढुन १०-१५ वर्ष सत्तेवर रहाणे हे इंफोसिस काढण्यापेक्षा फार अवघड आहे. पण लालूवर सर्व उठसुट टिप्पणी करतातच ना.

In reply to by प्रसाद१९७१

लालूप्रसाद यादव, राज ठाकरे आणि नारायणमूर्ती हे एका माळेचे मणी का? लालू किंवा राज ठाकरे यांनी जी गुंडगिरी, गुन्हेगारी केली आहे तशी नारायणमूर्तींनी केली आहे का? लालू किंवा राज यांचे जर का काही कर्तुत्व असले तर त्या क्षेत्रातले. अशा क्षेत्रात कोणीच कर्तुत्व दाखवू नये आणि तो मार्ग अजिबात अनुकरणीय नाही असे फार वाटत असल्यामुळे माझे त्या क्षेत्रात शून्य कर्तुत्व असले तरी लालू किंवा राज यांच्यावर मी नक्कीच टिका करतो. त्याउलट नारायणमूर्तींसारखे कर्तुत्व-- नवी कंपनी काढणे, स्वतःचा ठसा जगावर उमटवणे, हजारो-लाखोंना नोकरी देणे हा मार्ग नक्कीच अनुकरणीय आहे. त्यामुळे त्या क्षेत्रातही माझे शून्य कर्तुत्व असल्यामुळे नारायणमूर्तींच्या कर्तुत्वावर टिप्पणी करण्याइतकी माझी लायकी नाही असे मी समजतो. इतरांचे माहित नाही. हा फरक आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

माझ्या मते लालू जर बिहार मधे स्वताच्या जोरावर १५ वर्ष सत्ता मिळवू शकतो आणि २५ वर्ष बिहारचे राजकारण चालवतो तर तो फार ऊच्च दर्जाचा मॅनेजर, सीइओ असला पाहिजे. त्याचे क्षेत्र चुकीचे आहे म्हणुन, नाहीतर इंफोसीस पेक्षा मोठी कंपनी काढु आणि चालवू शकतो. राजद ही इंफोसिस पेक्षा मोठी आहेच आणि मॅनेज करायला फार अवघड आहे. क्षेत्र वेगळे आहे आणि आउटकम वेगळे आहे म्हणुन कर्तृत्व कमी होत नाही. तिच गोष्ट अमित शहांबद्दल. हा माणुस जगातला सर्वात ग्रेट मॅनेजर, लीडर असणार. कीतीही मोठी आणि तोट्यात असलेली कंपनी अमित शहा कडे चालवायला दिली तर २ वर्षात कायापालट करुन टाकेल.

In reply to by प्रसाद१९७१

+१११. याबरोबर माणूस कुठे आहे पेक्षा कुठून कुठं पोचला आहे हे पहावं. त्यानं केलेला प्रवास समजतो. शून्याचा एक करायला खूप वेळ जातो. एकाचे दहा व्हायला त्यामानानं कमी.

In reply to by प्यारे१

याबरोबर माणूस कुठे आहे पेक्षा कुठून कुठं पोचला आहे हे पहावं. त्यानं केलेला प्रवास समजतो. शून्याचा एक करायला खूप वेळ जातो. एकाचे दहा व्हायला त्यामानानं कमी. +९९९९९९९९९९९९९९९९

In reply to by प्रसाद१९७१

राजद ही इंफोसिस पेक्षा मोठी आहेच आणि मॅनेज करायला फार अवघड आहे. क्षेत्र वेगळे आहे आणि आउटकम वेगळे आहे म्हणुन कर्तृत्व कमी होत नाही. हे नक्कीच. पण, त्या कर्तृत्वाचा उदो उदो करावा की निषेध करावा हे ठरवताना ते कर्तृत्व "समाजासाठी सकारात्मक पद्धतीने उपयोगात आणले आहे" की फक्त "वैयक्तीक (यात त्या व्यक्तीचा गोतावळाही अंतर्भूत आहे) स्वार्थ साधण्यासाठी" या कसावर/शर्तीवर ठरवावे. अन्यथा, "काय फाटका माणूस होता. पण पाच वर्षांत कोट्यवधीची माया जमवली बघा. फारच भारी माणूस निघाला." असे भ्रष्ट राजकारण्यांबाबत कौतूकाचे उद्गार नेहमी ऐकू येतातच म्हणा ! त्याऐवजी, "किती भ्रष्ट माणूस आहे. मी भरलेल्या करातून चोरी करून आणि अधिकारांचा गैरव्यवहार करून त्याने हा पैसा कमावला आहे." ही सत्य परिस्थिती जाणून, ते बोलण्याची धमक असलेले किंवा कमीत कमी पुढच्या निवडणुकीत त्या परिस्थितीत बदल घडविण्यासाठी मतदान करणारे नागरिक बहुसंखेने दिसावेत अशी इच्छा आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

लालू प्रसाद ला शिव्या घालणे खूप सोप्पे आहे. पण लालू तयार होण्याला कारणीभूत भारतीय समाज आहे. कोणी सरळ्मार्गी माणुस बिहार मधुन निवडुन येऊ शकतो का? अत्यंत स्वच्छ अश्या जॉर्ज फर्नांडीस ला सुद्धा लालूची मदत घेउन बिहार मधुन निवडुन यावे लागले असते ( कारण महाराष्ट्रात ते पडले असते ). मोदींना सुद्धा पप्पू यादव ला बरोबर घ्यावे लागतय. लालू नसता आला तर पप्पू यादव मुख्यमंत्री झाला असता. ते तर अजुनच भयंकर झाले असते. लालू यादवला खरेच असे बनायचे होते का भारतीय मतदारांनी त्याला पर्यायच ठेवला नाही ( जसा मोदींना पप्पु यादवची साथ घ्यायला लागतीय ). लालू अमेरीकेत जन्माला आला असता तर कदाचित चांगला असता. गम्मत म्हणजे पप्पु यादव ला बरोबर घेतल्या बद्दल मोदींना कोणीच बोल लावत नाहीये. पण लालू मात्र शिव्या खातोय. खरे तर मोदी हॅड चॉइस. पप्पू यादव ला बरोबर घेतले नसते तर वाईटात वाईट काय झाले असते, निवडणुक हरली असती. मोदींसाठी बिहारची निवडणुक हा अस्तीत्वाचा प्रश्न नव्हताच, तरी पण ही इतकी वाईट तडजोड का? मूर्तींचे काय ते कर्तृत्व आणि लालू मात्र स्वार्थी हा बाळबोध विचार आहे. आणि सगळीच चांगली माणसे कंपन्या काढु लागली तर राजकारणात पप्पू यादवच असणार.

In reply to by प्रसाद१९७१

पप्पू यादव ने वाराणसीच्या गंगेमधे अंघोळ करून गोमुत्र शिंपडले आहे , आणि मुखामधे रामनाम आहे. पवित्रतेचा आणखी काय पुरावा हवा ? वाल्याचा वाल्मिकि झाला तसाच पप्पूचे अच्छे दिन येणार

In reply to by प्रसाद१९७१

मोदींना सुद्धा पप्पू यादव ला बरोबर घ्यावे लागतय.
कधी त्याला बरोबर घेतलंय?
लालू यादवला खरेच असे बनायचे होते का भारतीय मतदारांनी त्याला पर्यायच ठेवला नाही ( जसा मोदींना पप्पु यादवची साथ घ्यायला लागतीय ).लालू अमेरीकेत जन्माला आला असता तर कदाचित चांगला असता.
मोदींनी कधी पप्पू यादवची साथ घेतली आहे?
गम्मत म्हणजे पप्पु यादव ला बरोबर घेतल्या बद्दल मोदींना कोणीच बोल लावत नाहीये. पण लालू मात्र शिव्या खातोय. खरे तर मोदी हॅड चॉइस. पप्पू यादव ला बरोबर घेतले नसते तर वाईटात वाईट काय झाले असते, निवडणुक हरली असती.
अहो पण मोदींनी पप्पू यादवला कधी बरोबर घेतलंय? तो रालोआत कधीपासून आला? रालोआने २४३ पैकी किती जागा त्याला दिल्या आहेत? तुम्हाला बहुतेक बरीच आतली गुप्त माहिती दिसतेय. माध्यमांना सुद्धा ही गुप्त बातमी अजून समजलेली दिसत नाही. माध्यमे काहीतरी वेगळेच सांगताहेत. http://indiatoday.intoday.in/story/bihar-election-pappu-yadav-teams-up-…

In reply to by गॅरी ट्रुमन

+१,००,००० (लाखाची गोष्ट बोललात म्हणून) मूर्तींचे औद्योगिक कर्तृत्व, त्यांचा भारताला जागतिक बाजारपेठेत नाव व स्थान मिळवून देण्यातला वाटा नि:संशय वादातीत आहे आणि त्याचे पूरेपूर श्रेय देण्याबाबत कोणीही कद्रूपणा करू नये. याबाबतीत मी व्यक्तीशः त्यांचा प्रचंड मोठा पंखा आहे ! मात्र कोणतीही व्यक्ती कितीही मोठी असली तरी माणूसच असते... त्यामुळे तिचे प्रत्येक वचन (अगदी ज्या विषयात तज्ञ आहे अश्या विषयावरील वचनही) ठोकून-पारखूनच स्विकारावे हेच योग्य. या शास्त्रिय तत्वावर चाललेला वादविवाद, आपले-दुसरे व काळे-पांढरे या तत्वाचा पाठपुरावा करणार्‍यांना झेपत नाही असेच दिसते. मुर्तींचे औद्योगिक कर्तृत्व व विचार, आणि सामाजीक-राजकीय विचार यात फारकत असल्याचे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दिसते हे मात्र खरे. तेव्हा त्यांच्या सामाजीक-राजकीय विचारांवर टीका करताना त्यांच्या औद्योगिक कर्तृत्वाला कमी लेखण्याचे कारण नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

संपूर्ण प्रतिसादाशी शतशः बाडीस. खासकरुन,
मात्र कोणतीही व्यक्ती कितीही मोठी असली तरी माणूसच असते... त्यामुळे तिचे प्रत्येक वचन (अगदी ज्या विषयात तज्ञ आहे अश्या विषयावरील वचनही) ठोकून-पारखूनच स्विकारावे हेच योग्य. या शास्त्रिय तत्वावर चाललेला वादविवाद, आपले-दुसरे व काळे-पांढरे या तत्वाचा पाठपुरावा करणार्‍यांना झेपत नाही असेच दिसते.
हे भयंकर आवडलेलं विधान. :)

In reply to by गॅरी ट्रुमन

+९९९९९९९९९९९९... इन्फोसिसने लाखो नागरिकांना रोजगार दिला आहे, दरवर्षी देशाला ७-८ अब्ज डॉलर्स चे परकीय चलन मिळवून देण्यात कंपनीचे योगदान आहे. त्याचबरोबरीने इन्फोसिसने आपल्या हजारो कर्मचार्‍यांना कोट्याधीश बनवून आर्थिक दृष्ट्या संपन्न स्थितीत नेले आहे. केवळ १०००० रू. एवढ्या भांडवलावर सुरूवात करून इन्फोसिस आज जवळपास ८ अब्ज डॉलर्सची कंपनी बनलेली आहे. त्यात मुख्य वाटा मूर्ती व निलेकणींचाच आहे. कंपनीचे इतर संस्थापक या दोघांइतके डायनामिक नव्हते. इन्फोसिसच्या ऑफशोअरिंग मॉडेल व स्टॉक ऑप्शन प्लॅनचे नंतर अनेकांनी अनुकरण केले. जेव्हा २०००-२००३ व नंतर २००८ मध्ये इतर कंपन्यात मोठ्या प्रमाणात लेऑफ्स झाले, त्यावेळी इन्फोसिसमध्ये लेऑफचे प्रमाण अत्यंत कमी होते. मूर्तींचे राजकीय विचार वेगळे असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही शेवटी इन्फोसिसला जॉईन झाला होता का? मूर्ती व सुधा मूर्तींच्या साधेपणाची जाहिरात त्यांच्यापेक्षा माध्यमांनीच जास्त केली होती. १९९९-२००० या दोन वर्षात इन्फोसिसविषयी माध्यमात बातमी नाही असा क्वचितच दिवस असेल. ते दांपत्य तसे साधे आयुष्यच जगते. त्यांचे एकंदरीत कर्तृत्व पाहिले तर वरील इतर गोष्टी अत्यंत किरकोळ आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही शेवटी इन्फोसिसला जॉईन झाला होता का?
नाही. मला इन्फोसिस कधीच जॉईन करता आली नव्हती.
त्यांचे एकंदरीत कर्तृत्व पाहिले तर वरील इतर गोष्टी अत्यंत किरकोळ आहेत.
नक्कीच. त्यांचे कर्तुत्व अगदी निर्विवाद आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

इन्फोसिसमध्ये जवळपास साडेसात वर्षे काम केल्यामुळे ती कंपनी कशी आहे याची मला चांगलीच कल्पना व अनुभव आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दे संपले की व्यक्तिगत चारित्र्यावर लोक नेहमीच येतात काय? पुण्याच्या म्युनिसिपालिटीत उंदीर मारण्याच्या पात्रतेचे आम्ही 100 नाही 20 लोकांची कंपनी काढून चालवू शकत नाही. उगाच फुकाच्या गप्पा मारायला मिपा आहे म्हणून चाललंय झालं. एवढीच कलकल (एकदा ल ऐवजी ळ वाचा) असेल तर थेट काही करावं. प्रत्येक भव्य दिव्य मोठ्या गोष्टीसमोर झुकावं असं मानणारा प्यारे

In reply to by प्यारे१

प्यारेदा... आवडला प्रतिसाद.. +१००००००० काहिंना चिखलात लोळायला आवडतं, काहींना गगनात भरार्‍या घ्याव्याश्या वाटतात. चिखलात लोळणारे म्हणतात, आम्हाला पंख असते तर आम्ही गगनात भरार्‍या मारल्या असत्या. त्या गरुडांना काय कळतं, वैगेरे गप्पा समविचारींसोबत मारतात, झालं. गरुडांना फुरसत नसते, ते भरार्‍या घेतात. उंच उंच. चिखलातले फक्त चिखलात अजून रुतत जातात. जैसी जिसकी सोच.

In reply to by संदीप डांगे

गरुडांना फुरसत नसते, ते भरार्‍या घेतात. उंच उंच. चिखलातले फक्त चिखलात अजून रुतत जातात. जैसी जिसकी सोच.
सहमत आहे. नारायणमूर्ती स्टॅनफर्ड आणि व्हार्टन बिझनेस स्कूलच्या तसेच कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या बोर्डावरही होते. अशा विद्यापीठांमध्ये विद्यार्थी म्हणून शिकता येणे खूपच दूर राहिले ही विद्यापीठे नुसती बाहेरून बघता आली तरी मी स्वतःलाच कृतकृत्य समजेन. अशा विद्यापीठांनी आपल्या बोर्डावर स्थान दिलेल्या व्यक्तीला आपले कर्तुत्व सिध्द करायची गरजच नाही. भले नारायणमूर्तींची काही मते पटत नसली तरी त्यांच्या कर्तुत्वावर टिप्पणी करायची माझी तरी लायकी नाही. इतरांचे माहित नाही.

In reply to by गॅरी ट्रुमन

तुम्ही द्विरूक्ती करत आहात अर्धवटराव. केजरीवाल म्हटले की ***** वृत्ती बाय डिफॉल्ट आलीच की.
साहेब, तुमचाच हा प्रतिसाद बघावा. केजरीवाल स्वता सुद्धा प्रचंड हुशार आहे आणि स्वताच्या हिकमती वर मुख्यमंत्री आहेत. त्यांनी ठरवले असते तर मूर्तीं सारखी कंपनी काढुन चालवणे काही अवघड गेले नसते. तरी तुम्ही त्यांच्या वर खालच्या पातळीवरच्या कॉमेंट करता आहातच. मुर्तींनी कंपनी काढताना काय रिस्क घेतली होती? नसती चालली कंपनी तर अमेरिकेत नोकरी करायला गेले असते. अश्या रीस्कफ्री आणि स्वताच्या स्वार्थ साधणार्‍या गोष्टींना आपण कीती महत्व द्यायचे? हे काही अजीत डोवल नाहीत, सीमेवर लढणारे जवान नाहीत किंवा इस्त्रो, बार्क मधले शास्त्रज्ञ. ह्या लोकांना अमेरीकेत १०० पट पगार मिळत असताना ते थांबले इथे सरकारी नोकरी करत. पुण्याच्या ससून, मुंबई मधे कुपर,केइअएम, जेजे मधे कीतीतरी सर्जन सरकारी नोकरांचा पगार घेउन अत्यंत अवघड सर्जरी करत आहेत. हीच सर्जरी जर बाहेर केली तर एका सर्जरी मधे त्यांना महीन्याचा पगारा इतकी कमाई मिळेल. ही आणि अशी हजारो लोक कर्तृत्ववान आहेत. मूर्ती यशस्वी आहेत ह्यात शंकाच नाही, पण त्यामुळे आरत्या ओवाळायचे काहीच कारण नाही. उलट स्वताला डावे म्हणणारे मूर्ती प्रायव्हेट कंपनी काढतातच कसे?

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद राव, केजरीवाल नसते करु शकले असं नम्रपणे म्हणावंसं वाटतं. तो शाहिद अफरीदी आहे ना. भरपूर गुणवत्ता असून संयम नाही. मोठ्या खेल्या करायची कुवत असूनही बेजबाबदार पणा. मोठ्या खेळया करायला खेळपट्टीवर उभं राहावं लागतं. केजरीभौ असलं लॉन्ग रन वालं नाही करु शकत. बाकी मूर्तिनी आपलं काम केलं आहे. इनिंग संपली आहे. कधीतरी प्रसिद्ध व्हावं नंतर असंही वाटत असेल. टाकला एक खड़ा. चालतंय की. आणि कंपनी सुरु करण्या आधी लेफ्टिस्ट की एक्सट्रेमिस्ट वगैरे नाही विचारत बहुतेक. लेफ्टिस्ट असल्यानं कदाचित बरोबरच्या काम करणारान्ना व्यवस्थित मानधन सोयी मिळायला मदत झाली असेल.

In reply to by प्रसाद१९७१

blockquote>मुर्तींनी कंपनी काढताना काय रिस्क घेतली होती? नसती चालली कंपनी तर अमेरिकेत नोकरी करायला गेले असते. कमाल आहे. मला पामराला वाटत होते की स्वतःचा बिझनेस काढायचा म्हणजे रिस्क घ्यावी लागते. मला असेही वाटत होते की बहुतांश वेळा हिर्‍याला पैलू पडताना नक्की कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते हे जगाला समजत नाही पण तो हिरा जगापुढे आला की लोकांना वाटते--अरे हा किती लकी माणूस!! माझे असले गैरसमज दूर केल्याबद्दल आभारी आहे.
अश्या रीस्कफ्री आणि स्वताच्या स्वार्थ साधणार्‍या गोष्टींना आपण कीती महत्व द्यायचे?
लोकशाही आहे. तुम्हाला महत्व द्यायचे नसेल तर नका देऊ.
ही आणि अशी हजारो लोक कर्तृत्ववान आहेत.
आहेतच ना. कोण नाही म्हणत आहे.पण इतर लोक कर्तुत्ववान आहेत म्हणून नारायणमूर्तींच्या कर्तुत्वाविषयी ऑ वाटू नये असे थोडीच आहे?
मूर्ती यशस्वी आहेत ह्यात शंकाच नाही, पण त्यामुळे आरत्या ओवाळायचे काहीच कारण नाही.
मी जे काही लिहित आहे त्याला आरत्या ओवाळणे म्हणायचे असेल तर तसे खुशाल म्हणा.
स्वताला डावे म्हणणारे मूर्ती प्रायव्हेट कंपनी काढतातच कसे?
हा आक्षेप माझाही आहे. पण म्हणून त्यांचे कर्तुत्व खुजे कसे काय ठरते? कोणाला माहित काही लोक नारायणमूर्ती डावे असणे आणि प्रायव्हेट कंपनी काढणे याला डाव्या विचारांचा पराभव असेही समजत असतीलच. ते जे काही आहे ते आहे. नारायणमूर्तींची काही मते पटत नाहीत, ते डावे आहेत आणि डाव्यांचे नाव ऐकताच माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते वगैरे वगैरे सगळे मान्य. पण तरीही त्यांनी खूप काही केले आहे. ते मिसळपाववर टाईमपास करत राहिले नाहीत तर एक मोठी कंपनी उभारली आणि आज दीड-दोन लाख घरे त्यामुळे चालत आहेत. तुम्ही काहीही म्हणा पण मला तरी हे अफाट कर्तुत्वच वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

दीड दोन लाख घरं थेट. त्या दीड दोन लाख लोकांनी घेतलेली घरं आजूबाजूला निर्माण झालेल्या इतर सुविधा याचा विचार करता ही संख्या कोटीच्या (लोकांची संख्या घरं नव्हे) घरात जाऊ शकेल असं मला वाटतं.

In reply to by प्यारे१

अहो मालक, इंफोसिस नी नस्त्या नोकर्‍या तयार केल्या तर दुसर्‍या कंपनी ने केल्या असत्या. हे म्हणजे मारुती ने गाड्या नाही तयार केल्या तर भारतात कार चा दुष्काळच पडेल.

In reply to by प्रसाद१९७१

असे आहे प्रसादजी की जर मूर्थींनी भाजपसरकारसमर्थनार्थ वक्तव्य केले असते तर आता त्यांच्या लंगोटाला हात घालू पाहणारे त्यांच्या आरत्या ओवाळता थकले नसते. तुम्ही वर ज्या गोष्टी निगेटीवली मांडत आहात त्याच पॉझिटीवली मांडून "एवढा मोठा माणूस आहे तो बोलेल ते चुकीचं कसं असेल" हा स्टँड घेतला असता. "असहिष्णुतेचं वातावरण नाही" असा स्टँड घेणार्‍यांच्या वस्त्रहरणाला वा लायकी काढायला आता कुणालाच वेळ नाही. त्यांची वक्तव्ये कशी चापलूसीची असू शकतात हे कुणीच रंगवून रंगवून सांगणार नाही. कमल हसन पासून सगळेच आता दिग्गज आणि माननीय आहेत कारण ते सरकार समर्थनार्थ बोलतायत. आता ते कितीही साधारण असले तरी ते श्रेष्ठच असणार. जर शाहरूख सारखे कमल हसननेही वक्तव्य केले असते तर कमल हसन कसा टीनपाट अभिनेता, काँग्रेसचा चापलूस आहे ह्यावरही निबंध लिहिले गेले असते. ही एक विशिष्ट प्रवृत्ती आहे. ज्याच्यावर टिका केली जात आहे त्यां सुर्यांना अशा थुंकणार्‍यामुळे फरक पडत नाही. थुंकणार्‍यांनीच दिशा बदलणे उत्तम. बाकी जैसी जिसकी सोच.

In reply to by संदीप डांगे

अहो, मला मूर्तींबद्दल काही राग वगैरे नाही, ते यशस्वी आहेत हे ही मान्य आहे. मी त्या बद्दल काही लिहायला पण गेलो नसतो. पण उगाचच त्यांच्या कर्तृत्वाचा ऊदो ऊदो चालू झाला म्हणुन हे लिहीले. तुम्ही म्हणता तसे इथे कोणीही भाजप नी पप्पु यादवला बरोबर घेतल्या मुळे मी भाजपला मत देणार नाही असे म्हणत नाहीये. असाच विचार सुजाण मतदार करत असतील तर लालू प्रसाद ला वाईट म्हणुन हिणवण्यात काय अर्थ आहे?

In reply to by प्रसाद१९७१

कर्तुत्वाचा उदोउदो करु नये, कि मूर्तींना कर्तुत्ववान समजु नये, कि मूर्तींचं कर्तुत्व उदोउदो करण्याच्या लायकीचं समजू नये ? आणि लालूंबद्दल म्हणाल तर त्यांचही कर्तुत्व कुणी नाकारत नाहि आहे. एरव्ही "कौन जात ?" या प्रश्नानेच सुरु होणारा बिहारी समाज व्यवहार लालूंमुळे बराच सुधारला. "कौन जात" प्रश्नाने खाली जाणारी मान लालूंमुळे ताठ झाली. प्रॉब्लेम सुरु झाला जेंव्हा अग्नीबाण स्वत:ला उपग्रह समजुन सत्तेभोवती फेर्‍या मारण्याचा अट्टहास करु लागला. असो.

In reply to by गॅरी ट्रुमन

+९९९९९९९९९९९९..... इथे काही जणांनी मूर्तींची लायकी काढलेली पाहून का कोणास ठाऊक पण "पुणेकर की मुंबईकर की नागपूरकर" या पु.लं.च्या लेखातील महापालिकेतील उंदीर मारण्याच्या विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍याची आठवण आली.

In reply to by श्रीगुरुजी

एकंदरीत ते स्वतःला कायम लेफ्ट टू द सेंटर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. त्याचे मूळ या लेखात काही अंशाने तरी पहाता येईल...
... "My father was a staunch Nehruvian and I was strongly leftist," says Murthy. "At the dining table, he would talk optimistically about the progress the country was making under Nehru. The quality of politicians and bureaucrats was very high. The IITs and Institute of Medical Science were being built. We were all anti-US and pro-USSR because Russia had built a steel plant in India, while America had refused to help." ...Still, Murthy held on to his leftist ideology till fairly late in life and it played a part in the decision to return to India after his France project in 1975, though there were ample opportunities in Europe for people with his skills...

In reply to by गॅरी ट्रुमन

मूर्तींनी फक्त आपल्या क्षेत्रापुरते बोलावे. चित्रकारांनी फक्त " " " " " लेखकांनी " " " चित्रपटकारांनी " " " अभिनेत्यांनी " " " वैज्ञानिकांनी " " " राष्ट्रपतींनी " " " उद्योजकांनी " " " मूडीने " " " नेत्यांनी " " " " " " राजकारण्यांनी " " पक्षापुरते " " " " विचारवंतांनी तर बोलूच नये. सामान्य माणसांनीही तेच. विरोधी नेत्यांनीही तेच. मग आता बोलावे कोणी?

In reply to by राही

तुम्ही टाकलेल्या अवतरण चिन्हांबद्दल तुमचा निषेध. बाकी मागे आणीबाणी सॉरी अनुशासन पर्वाबद्दल एक खरड टाकली होती त्याची आठवण आली.

In reply to by प्यारे१

अवतरण चिह्नांचा निषेध का बुवा? तेच शब्द पुन्हा पुन्हा लिहायला लागू नयेत म्हणून 'डिट्टो' या अर्थाने टाकली होती ती चिह्ने. अनुशासनपर्व या शब्दावरून निषेधपर्व असा एक शब्द सुचतोय. जो तो निषेधच करतोय. मुळात निषेध, मग या निषेधाचा निषेध, आता तर चिह्नांचाही निषेध. निषेधच निषेध. बिचार्‍या चिह्नांना वेठीस धरल्याबद्दल आणखी एक निषेध.

In reply to by राही

मूर्तींनी (किंवा अन्य कोणीही) त्यांना पाहिजे असेल त्या क्षेत्रात बोलावे. पण त्यांचे क्षेत्र सोडून इतर क्षेत्रातील त्यांच्या बोलण्याला त्यांच्या क्षेत्रातील विधानाला मिळेल तितकेच महत्व मिळेल अशी अपेक्षा करू नये आणि इतर क्षेत्रांमधले त्यांचे (किंवा कोणाचेही) विधान अंतिम शब्द म्हणून गणला जाणार नाही एवढे साधे म्हणणे आहे. एकूणच काय की एवढ्या साध्या म्हणण्याचा विपर्यास करून "मूर्तींनी बोलूच नये" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढण्यामागचे प्रयोजन कळले नाही. असे करणार्‍यांना (विशेषतः तिकडे) विचारवंत वगैरे म्हटले जात असेलही. इकडे तसे काही होणार नाही अशी आशा आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

एकूणच काय की एवढ्या साध्या म्हणण्याचा विपर्यास करून "मूर्तींनी बोलूच नये" असे मला म्हणायचे आहे असा अर्थ काढण्यामागचे प्रयोजन कळले नाही.
हेच बोल्तो. मूर्तींना विरोध केला/त्यांच्या विधानांशी असहमती दर्शवली की त्यांना बोलू दिलं जात नाही हा निष्कर्ष कसा निघतो? कलाकार/उद्योजक राजकारणात आल्यावर त्यांना कलाकाराचाच मान मिळावा ही अपेक्षा अवाजवी आहे. उघड राजकीय भूमिका घेतल्यावर राजकारणाचे नियम लागू होणारच. तुमच्या लॉयल्टीची चर्चा होणारच. अवांतरः जो उठतो तो मोदींना हुकूमशहापासून हिटलर पर्यंत काहीही म्हणतो. जिथे दिसेल तिथे सरकार आणि मोदींना श्या घालतात तरी देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात अशी ओरड कशी होते देव जाणे!

In reply to by अनुप ढेरे

जो उठतो तो मोदींना हुकूमशहापासून हिटलर पर्यंत काहीही म्हणतो. जिथे दिसेल तिथे सरकार आणि मोदींना श्या घालतात तरी देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात अशी ओरड कशी होते देव जाणे!
अतिप्रचंड सहमत!!!!!!

In reply to by बॅटमॅन

प्रतिसादाच्या मर्माशी जरी सहमत असलो तरी "अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात येतेय" अशी टिका आहे, व्हेअर एज "हवे ते लिहिता न येणे" हे "अभिव्यक्तिस्वातंत्र्य नसण्याचे" उदाहरण आहे असा आक्षेप टेक्निकली घेता येईल.