नोटा
लेखनविषय (Tags)
" नोटा "
त्यातला त्यात शिकलेला ,आणि सरळ म्हणजे,भीमरावच म्हणून नोटाची थप्पी,
वाटण्यासाठी सदूभाऊनं त्याच्याकडं सोपवली. रात्रीतनं नोटा वाटायच्या होत्या ,आणि भीमरावनं
ते काम ईमान इतबारे केलं. एक पैसा पण कनवटीला लावला नाही.
थोडासा गस्त वाल्याला हात पण हात ओला,करावा लागला होता,चोरीचा मामला होता ना!
सकाळी सातालाच तो गल्लीत हजर झाला.,
रात्रीच्या नोटांचा अंमल सकाळी पण शिल्लक असला तर?त्यासाठी हल्ल्या हल्ल्या,करणं भाग होतं.
मावशी , च्या बी काय? शिलिंडर हाय का तुमच्याकडं? आक्का कप बशी खंगाळायचं नंतर,,
आबुराव यरवाळि टिव्हि कशाला लावलायसा, चला बिगि,,,बिगि
यशंवतराव रात्रीच्या नोटांचं लक्षात,आहे नं?
असं सगळ्याना बोलवत बोलावात,मतदान केंद्रावर घेउन आला.
पहिलं पांच पंचवीस मतदान याच गल्लीचं,
भीमरावनं काम ईमान इतबारे केलं होतं.५०० ची नोट कनवटीला लावायला तो आता मोकळा होता.
मावशी ,आक्का, आबुराव नीट जमलं न्हवं बटणं दाबायला!,
नं जमाय काय झालं?एवढं तुमी शिलिंडर ची आठवण दिल्याली इसरते व्हय?
भीमराव हाबकलाच. आक्का तुमी? बराबर कप बशी हुडकून काडुन दाब्लं म्या बटान!
भीमरावला सुदरना झालं,आबुरावला विचारायचं धाडसाच त्याला,होइना,
आमी बी इसारलो नाइ बरका टीव्ही ,आबुराव सोताच म्हणाला
आता तर तो धिप्पाड गडि भीमराव लटलट कापायलाच लागला.
राहता राहिला यशवंत, तो तर शिकला सवरलेला आहे,
त्यानं तर चुक केली नसणार आणि त्यानं खरंच चूक केली नव्हती, भीमरावनं
निघतानाच त्याला "नोटा" ची आठवण दिली होती. त्यानं "नोटा"(not of the above)चा
पर्याय बरोबर चूज् केला होता.
भीमराव मटकंन खालीच बसला.एकानहि उमेदवाराचं चिन्ह बटण दाबलं नव्हतं .
प्रतिक्रिया
रचलेली कथा म्हणून ठिके.
(not of the above) नव्हे None
:) अस कधी होईल का खरंच?
रन्जक नहि पन ठीक आहे !!!!!