✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुंगी उडाली आकाशी...

स
सस्नेह यांनी
गुरुवार, 10/29/2015 - 12:09  ·  लेख
लेख
गेले आठ दिवस ऑफिसात शीतयुद्ध सुरु आहे. एच्चारने बारीकसारीक खुसपटे काढून फतवे काढून मला पिडायचे आणि मी शक्य तितक्या विणम्रतेने फतव्यांची अंमलबजावणी करायची किंवा ऑफिशियल भाषेत आदबशीर उत्तरे द्यायची. आज तर हायला, कहरच झाला ! उन्हातून धावतपळत बस पकडून खुर्चीवर येऊन बसते न बसते तोवर टेबलावर प्रेमपत्र हजर ! ‘गेल्या आठवड्यात सहापैकी तीन दिवस तुम्ही किमान वीस मिनिटे लेट आलात अशा नोंदी थंब मशीनने दर्शित केल्या आहेत. याबाबत आपणास सूचना देणेत येते की इत;पर आपण कार्यालयात निर्धारित वेळेत हजर राहावे अन्यथा....’ इ.इ. कालच एच्चारवाल्याचे पाचवे लौलेटर वाचून डोके भंजाळलेले तोवर आज आणि हे ? ऐला, संध्याकाळी टाईम संपून गेला तरी वर्क अर्जन्सी बघून न सांगता आठाठ वाजेतो मरमर काम करायचे आणि सकाळी दहा मिनिटं उशीर झाला तर लगेच लेटर ? आता मात्र माझी सटकली !! दहा मिनिटे दम खाल्ला. एक ग्लास पाणी प्याले. एसीच्या थंड हवेत डोके गार केले आणि मग विचार केला. केला !! पक्का विचार केला आणि उठले. एच्चारवाल्या मुथ्थुस्वामीच्या केबिनचा दरवाजा धाडकन उघडला आणि आत गेले. खुर्चीवर बसलेले दोघे आणि खुद्द मुथ्थुस्वामीसाहेब टाण्णकन उडाले. ‘हौ यु डेअर टू कमिण्ण विदौट्ट माय पर्मिशण्ण ??’ मुथ्थुस्वामी अँग्री ओल्ड मॅन. ‘आयम गोइंग टू डेअर मच मोर दॅन दॅट मि. मुत्तू !’ मी अँग्री यंग वूमन. ‘मुत्तू..???’ यु सेड मी मुत्तू ?’ मुथ्थुस्वामीचे गटाणे डोळे खोबणीच्या बाहेर आले. पण मी बिलकुल लक्ष दिले नाही. मेरेकू उससे भी जादा आखे निकालनेकू आता हय ! ‘व्हॉट इज धिस, मुत्तू ?’ मी लौलेटर टेबलावर आदळले. ‘हॅव यू युवरसेल्फ एव्हर कम बिफोर एलेव्हन ? देन हौ यू डेअर टु गिव्ह मी धिस लेटर ? सी, आयम नॉट हिअर टू अॅ न्सर फूलिश थिंग्ज लाईक धिस बट टु वर्क फॉर दि कंपनी अॅदट माय बेस्ट. सो आय डोंट नीड इट. यू मे टेक धिस फॉर युवरसेल्फ अँड कीप इन सेफ कस्टडी बिफोर आय कम्ल्पेन इन लेबर सेक्शन ! इज इट क्लिअर मि, मुत्तू ?’ मुत्तूला हार्ट अॅ टॅकच यायचा बाकी राहिला. मी शांतपणे त्याच्या खुर्चीजवळ गेले. त्याची मद्राशी टोपी उचलून ते लौलेटर त्याच्या टकलावर विळखा घालून बसलेल्या शेंडीवर ठेवले आणि परत त्यावर टोपी ठेवून मी एक थापटी दिली. मग मी टेबलवरची पाण्याची बाटली उचलली आणि टोपण काढून शांतपणे मुत्तूच्या डोक्यावर उलटी केली. मग मी धीरोदात्तपणे पावले टाकत केबिनच्या दारापाशी गेले आणि एका हाताने ते उघडून पुन्हा म्हणाले, ‘आय होप, यू विल नॉट ट्राय टू प्ले धिस डर्टी गेम विथ एनी ऑफ दि इन्नोसंट एम्प्लॉयीज एव्हर आफ्टर धिस !!’ ..आणि शांतपणे बाहेर पडले. इतके झाल्यावर ऐला, काम करायचा मूडच गेला ! मी धीरोदात्तपणे टेबल आवरले, पर्स खाकोटीला मारली आणि कँटीनात जाऊन एक कप कॉफी ढोसली. मग ऑफिसात परत यायच्या भानगडीत न पडता सरळ घरी गेले आणि तण्णावून दिली. दुसऱ्या दिवशी आज ऑफिसात जावे की नाही याचा मी गंभीरपणे विचार करत असतानाच बेल जोरजोरात वाजली. दर उघडले तर खुद्द कंपनीचे एमडी दारात उभे ! ‘सर, आपण आत्ता ?’ मी विनम्रपणे. ‘या ना आत !’ एमडी आत येऊन घाम पुसत खुर्चीवर टेकले. ‘मॅडम, काल जो प्रकार झाला त्याबद्दल मी पर्सनली दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही कंपनीच्या कार्यक्षम कर्मचारी आहात आणि आजपर्यंतच्या कंपनीच्या उत्कर्षात कर्मचारी या नात्याने उत्कृष्ट योगदान दिले आहे. कंपनीला तुमच्या कामाची कदर आहे, गरज आहे. कालच्यासारखा प्रकार पुन्हा होणार नाही आणि श्री मुथ्थुस्वामी यांना याबाबत समज दिली आहे. तुम्ही आज कामावर यायला हरकत नाही, प्लीज.’ ‘’इट’स माय प्लेजर सर. आपण विनंती करणे हा आपला मोठेपणा आहे, पण याची गरज नव्हती. आपल्याला जाणीव आहे, यातच आम्हा कर्मचाऱ्यांचे समाधान आहे. ‘ आणि मी एमडीच्या गाडीतून त्यांच्याबरोबर सन्मानाने ऑफिसात प्रयाण केले ! हा:हा:हा: ! कसा वाटला किस्सा ? तुम्ही नक्कीच म्हणत असाल, माझा वरचा मजला रिकामा झालाय किंवा केमिकल लोच्या झालाय. तसं काही नाही लोक्सहो ! काय्येना, की कधी कधी लंच झाल्यावर मॉनिटरसमोर बसलं, की डोळे असे अर्धवट अधोमुख होतात आणि अशी स्वर्गीय दृश्ये मन:पटलावर रेंगाळत राहतात. सो हे जे वरती लिहिलंय ना, वो तो है अपना सपना फनी फनी !!! प्रत्यक्षात येउदे नै तर नै, एक आपलं तुम्हाला थाप मारायला काय हरकत आहे, असं झालं म्हणून ? काय ? नाही, म्हणजे थोर्थोर संत मंडळीसुद्धा ढाका लावतात, ‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...’ फिर अपन क्यू पीछे रैनेका ? ......तुमचंपण असं काही स्वप्न आहे का ? सांगा की हो मग ! लावा मस्त थाप ! (अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5439 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

अगागागागा. फुल्टॉस चक्क.

अभ्या..
गुरुवार, 10/29/2015 - 12:12 नवीन
अगागागागा. फुल्टॉस चक्क. म्या जरा स्वप्नात रंग भरले की लिहितो हं. सध्या स्केचिंग चालूय.
  • Log in or register to post comments

मुंगी उडाली आकाशी...

द-बाहुबली
गुरुवार, 10/29/2015 - 12:17 नवीन
टायटलचा कथानकाशी फारच विनोदी संबंध जोडला आहे. आपल्या विनोद्बुध्दीचे विषेश कौतुक.
(अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)
खिक्क...!
  • Log in or register to post comments

(अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)

जातवेद
Fri, 10/30/2015 - 15:19 नवीन
(अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)
अच्च नाय कलायच्च
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

का हो ? स्वप्नं बघायला

सस्नेह
Fri, 10/30/2015 - 15:23 नवीन
का हो ? स्वप्नं बघायला तुम्हाला नाही का आवडत ? =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

आवडतं की

जातवेद
Fri, 10/30/2015 - 15:40 नवीन
अस्मादिकांचे दर वर्षी बॉस बदलत असल्यामुळे अशी स्वप्नं बरीच पाहिली. आणि त्यातली बरीच सत्यातपण उतरवली :) काही लोक्स स्वप्नं सत्यात उतरवल्यामुळेच बॉस दरवर्षी बदलतात असे पण म्हणतात =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

खिक्क्क्क्.

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 13:05 नवीन
खिक्क्क्क्.
  • Log in or register to post comments

हाहा

चाणक्य
गुरुवार, 10/29/2015 - 13:13 नवीन
भारी है तुम्हारा सपना.
  • Log in or register to post comments

वरडा!!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/29/2015 - 13:19 नवीन
वरडा!! लई भारी!
  • Log in or register to post comments

शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 10/29/2015 - 13:27 नवीन
तुमचे स्वप्न सत्यात उतरो एव्हढी त्या जगन्नियत्याच्या चरणी प्रार्थना.
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा

मित्रहो
गुरुवार, 10/29/2015 - 13:57 नवीन
मजा आली वाचताना मागे कुठेतरी वाचले होते. तिथे बॉसचा पुतळा बनवून बेसमेंटमधे ठेवला असतो. कर्मचाऱ्याला बॉसचा भयंकर राग आला की जायचे आणि पुतळ्याला बदडून काढायचे. सारा राग शांत होत पर्यंत तसेच करायचे. राग शांत झाला की परत काम जोमाने सुरु. मुंगी उडाली आकाशी ........
  • Log in or register to post comments

स्वस्तात सोडला =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/29/2015 - 14:29 नवीन
स्वस्तात सोडला =))
  • Log in or register to post comments

स्वप्न आहे म्हणुन चांगले आहे,

मदनबाण
गुरुवार, 10/29/2015 - 15:04 नवीन
स्वप्न आहे म्हणुन चांगले आहे, रिसेशन जवळ आले की कंपन्या अश्या पॉलिसीज अंमलात आणतात, एचपीने हल्लीच हा उध्योग केल्याचे वाचले आहे,तसेच ९० दिवसांचा बेंच पिरेडची मर्यादा देखील घातली जाते. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Truly Madly Deeply :- Savage Garden
  • Log in or register to post comments

भारी !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/29/2015 - 15:12 नवीन
भारी ! म्हणूनच म्हणतात की, "जेव्हा तुम्हाला नोकरीची गरज नसते तेव्हाच तुम्ही नोकरीची मजा घेऊ शकता !"
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

अरुण मनोहर
गुरुवार, 10/29/2015 - 15:13 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

एकजात सगळे हेच्चारवाले

तुषार काळभोर
गुरुवार, 10/29/2015 - 16:16 नवीन
असेच असतात का? मला कधीतरी एकेकाला बदडायची लहर येते. मग मी ड्रॉअरमधून माझा ५०-५० नायतर मोनॅकोचा पुडा काढतो, पॅण्ट्रीत जाऊन ग्लासभर पाणी घेतो आणि तो पुडा संपवतो. (पॅण्ट्रीचा मशिनमधला चहा भिक्कारडा असतो. त्यापेक्षा पाण्यात बिस्कीटं बुडवून खाल्लेली चांगली!)
  • Log in or register to post comments

:)

नीलमोहर
गुरुवार, 10/29/2015 - 16:36 नवीन
काय ताई, अपेक्षाभंग केलात. :( लेखाच्या शेवटपर्यंत मी म्हणत होते हे स्वप्न नसू दे, सत्य असू दे.. काश ऐसा भी कभी हो, पण नाही.. अशी हजारो स्वप्नं मनात जन्मतात आणि तिथेच मान टाकतात. मला मात्र स्वप्नात राजीनामा दिल्यानंतर होणारा आनंदच दिसतो नेहमी. आजच महिन्यातल्या ६व्या लेटमार्कचा ठप्पा पाहिला. क्लायंट कडे लाखो रूपये अडकलेले असतात ते वसूल करणार नाहीत, पण ज्यांच्या जीवावर ते लाखो रूपये कमवतात त्यांचे मात्र लेटमार्कचे पैसे कापणार तुंबडीभरू लोक ##%@*&!!@#
  • Log in or register to post comments

हाय....

दिपक.कुवेत
गुरुवार, 10/29/2015 - 18:48 नवीन
काश ये सच होता!!! माझा बॉस पण मल्लू आहे.....रीझाईन केलं की एक दिवस त्याला आणि फाईनांस मॅनेजर दोघांना घोंगडी मार द्यायचा प्लॅन आहे. पार बुकलून काढायचा आहेत दोघांना. देव करो आणि तो सुदिन लवकरच येवो.
  • Log in or register to post comments

>>> घोंगडी मार द्यायचा प्लॅन

प्यारे१
गुरुवार, 10/29/2015 - 19:36 नवीन
>>> घोंगडी मार द्यायचा प्लॅन माझ्याकडून घोंगडी स्पॉन्सर करण्यात येईल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

माझ्याकडून मार... ;-))

तर्राट जोकर
गुरुवार, 10/29/2015 - 19:47 नवीन
माझ्याकडून मार... ;-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा हा हा

रंगासेठ
Fri, 10/30/2015 - 16:56 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हा हा हा

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 10/29/2015 - 20:02 नवीन
एकच नंबर लिहिले आहे ! आमचेही मधल्या काळात आमच्या बॉसशी खरेखुरे भांडण झाले होते ... मग वाद मिटवायला दोन डायरेक्टर स्वतः पुण्याला येवुन अस्मादिकांना भेटले होते ! हे स्वप्न नाही ... अगदी खरे खुरे घडलेली घटना आहे ! ( अर्थात ह्या वर्षाचे अप्रेजल व्हायले आहे अजुन , डिसेंबरनंतर कळेल प्रमोशन होणार आहे की नवीन नोकरी शोधायची ते ;) =)) )!
  • Log in or register to post comments

बॉस होता का होती? =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/29/2015 - 20:14 नवीन
बॉस होता का होती? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ख्यॅ ख्यॅ ख्यॅ

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 10/29/2015 - 20:18 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ आमच्या डायरेक्ट हेयरार्की मधे फक्त एकच बॉसीण आहे की जी आम्हाला सीनीयर आहे - सी ई ओ एम डी =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लिखाण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत.

प्रचेतस
गुरुवार, 10/29/2015 - 21:12 नवीन
लिखाण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत.
  • Log in or register to post comments

खिक्क→→→→"मि.मुत्तू"

याॅर्कर
गुरुवार, 10/29/2015 - 21:30 नवीन
खॅ.खॅ.खॅ
  • Log in or register to post comments

:)

रातराणी
Fri, 10/30/2015 - 08:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments

ते

निनाद
Fri, 10/30/2015 - 08:37 नवीन
ते पाण्याची बाटली प्रकरण नसते तर खरे मानून चाललो असतो. सात आठ वर्षांपुर्वी 'माईंड युअर लँग्वेज अँड डोन्ट टॉक टू मी अगेन लाईक धिस अगैन एव्हर' असे मी माझ्या डोळ्यासमोर बॉसला एंप्लोयीने झापताना पाहिले आहे. मागच्या पंधरवड्यापुर्वी एकजण सोडून जाताना - 'यु अँड युअर रबिश प्रोसिजर्स हॅव क्रियेटेड धिस मेस' असे सुनावून गेला आहे. :) वाजवणारे लोक अस्तित्त्वात असतात...
  • Log in or register to post comments

:-)

एस
Fri, 10/30/2015 - 08:58 नवीन
:-)
  • Log in or register to post comments

आवदस्ड्द्ममस्तदस्ड्द्ममसवदस्ड

जव्हेरगंज
Fri, 10/30/2015 - 13:42 नवीन
आवदस्ड्द्ममस्तदस्ड्द्ममसवदस्ड्द्ममवदस्ड्द्मम माझंही असच एक स्वप्नं लिहिलं होतं. http://www.misalpav.com/node/33070
  • Log in or register to post comments

लै भारी ,विनोदी खुसखुशीत

पियुशा
Fri, 10/30/2015 - 20:25 नवीन
लै भारी ,विनोदी खुसखुशीत स्वप्न रंजन आवडले बर का
  • Log in or register to post comments

खमंग लिवलंय . आवडेश .

शिव कन्या
Sat, 10/31/2015 - 00:09 नवीन
खमंग लिवलंय . आवडेश .
  • Log in or register to post comments

+१ . मुंगेरीलाल के हसीन सपने .

सिरुसेरि
Mon, 11/09/2015 - 11:50 नवीन
+१ . मुंगेरीलाल के हसीन सपने .
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा