मुंगी उडाली आकाशी...
गेले आठ दिवस ऑफिसात शीतयुद्ध सुरु आहे. एच्चारने बारीकसारीक खुसपटे काढून फतवे काढून मला पिडायचे आणि मी शक्य तितक्या विणम्रतेने फतव्यांची अंमलबजावणी करायची किंवा ऑफिशियल भाषेत आदबशीर उत्तरे द्यायची. आज तर हायला, कहरच झाला ! उन्हातून धावतपळत बस पकडून खुर्चीवर येऊन बसते न बसते तोवर टेबलावर प्रेमपत्र हजर !
‘गेल्या आठवड्यात सहापैकी तीन दिवस तुम्ही किमान वीस मिनिटे लेट आलात अशा नोंदी थंब मशीनने दर्शित केल्या आहेत. याबाबत आपणास सूचना देणेत येते की इत;पर आपण कार्यालयात निर्धारित वेळेत हजर राहावे अन्यथा....’ इ.इ.
कालच एच्चारवाल्याचे पाचवे लौलेटर वाचून डोके भंजाळलेले तोवर आज आणि हे ? ऐला, संध्याकाळी टाईम संपून गेला तरी वर्क अर्जन्सी बघून न सांगता आठाठ वाजेतो मरमर काम करायचे आणि सकाळी दहा मिनिटं उशीर झाला तर लगेच लेटर ?
आता मात्र माझी सटकली !!
दहा मिनिटे दम खाल्ला. एक ग्लास पाणी प्याले. एसीच्या थंड हवेत डोके गार केले आणि मग विचार केला.
केला !! पक्का विचार केला आणि उठले. एच्चारवाल्या मुथ्थुस्वामीच्या केबिनचा दरवाजा धाडकन उघडला आणि आत गेले. खुर्चीवर बसलेले दोघे आणि खुद्द मुथ्थुस्वामीसाहेब टाण्णकन उडाले.
‘हौ यु डेअर टू कमिण्ण विदौट्ट माय पर्मिशण्ण ??’ मुथ्थुस्वामी अँग्री ओल्ड मॅन.
‘आयम गोइंग टू डेअर मच मोर दॅन दॅट मि. मुत्तू !’ मी अँग्री यंग वूमन.
‘मुत्तू..???’ यु सेड मी मुत्तू ?’ मुथ्थुस्वामीचे गटाणे डोळे खोबणीच्या बाहेर आले. पण मी बिलकुल लक्ष दिले नाही. मेरेकू उससे भी जादा आखे निकालनेकू आता हय !
‘व्हॉट इज धिस, मुत्तू ?’ मी लौलेटर टेबलावर आदळले.
‘हॅव यू युवरसेल्फ एव्हर कम बिफोर एलेव्हन ? देन हौ यू डेअर टु गिव्ह मी धिस लेटर ? सी, आयम नॉट हिअर टू अॅ न्सर फूलिश थिंग्ज लाईक धिस बट टु वर्क फॉर दि कंपनी अॅदट माय बेस्ट. सो आय डोंट नीड इट. यू मे टेक धिस फॉर युवरसेल्फ अँड कीप इन सेफ कस्टडी बिफोर आय कम्ल्पेन इन लेबर सेक्शन !
इज इट क्लिअर मि, मुत्तू ?’
मुत्तूला हार्ट अॅ टॅकच यायचा बाकी राहिला. मी शांतपणे त्याच्या खुर्चीजवळ गेले. त्याची मद्राशी टोपी उचलून ते लौलेटर त्याच्या टकलावर विळखा घालून बसलेल्या शेंडीवर ठेवले आणि परत त्यावर टोपी ठेवून मी एक थापटी दिली. मग मी टेबलवरची पाण्याची बाटली उचलली आणि टोपण काढून शांतपणे मुत्तूच्या डोक्यावर उलटी केली.
मग मी धीरोदात्तपणे पावले टाकत केबिनच्या दारापाशी गेले आणि एका हाताने ते उघडून पुन्हा म्हणाले,
‘आय होप, यू विल नॉट ट्राय टू प्ले धिस डर्टी गेम विथ एनी ऑफ दि इन्नोसंट एम्प्लॉयीज एव्हर आफ्टर धिस !!’
..आणि शांतपणे बाहेर पडले.
इतके झाल्यावर ऐला, काम करायचा मूडच गेला ! मी धीरोदात्तपणे टेबल आवरले, पर्स खाकोटीला मारली आणि कँटीनात जाऊन एक कप कॉफी ढोसली. मग ऑफिसात परत यायच्या भानगडीत न पडता सरळ घरी गेले आणि तण्णावून दिली.
दुसऱ्या दिवशी आज ऑफिसात जावे की नाही याचा मी गंभीरपणे विचार करत असतानाच बेल जोरजोरात वाजली.
दर उघडले तर खुद्द कंपनीचे एमडी दारात उभे !
‘सर, आपण आत्ता ?’ मी विनम्रपणे. ‘या ना आत !’
एमडी आत येऊन घाम पुसत खुर्चीवर टेकले.
‘मॅडम, काल जो प्रकार झाला त्याबद्दल मी पर्सनली दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही कंपनीच्या कार्यक्षम कर्मचारी आहात आणि आजपर्यंतच्या कंपनीच्या उत्कर्षात कर्मचारी या नात्याने उत्कृष्ट योगदान दिले आहे. कंपनीला तुमच्या कामाची कदर आहे, गरज आहे. कालच्यासारखा प्रकार पुन्हा होणार नाही आणि श्री मुथ्थुस्वामी यांना याबाबत समज दिली आहे. तुम्ही आज कामावर यायला हरकत नाही, प्लीज.’
‘’इट’स माय प्लेजर सर. आपण विनंती करणे हा आपला मोठेपणा आहे, पण याची गरज नव्हती. आपल्याला जाणीव आहे, यातच आम्हा कर्मचाऱ्यांचे समाधान आहे. ‘
आणि मी एमडीच्या गाडीतून त्यांच्याबरोबर सन्मानाने ऑफिसात प्रयाण केले !
हा:हा:हा: ! कसा वाटला किस्सा ?
तुम्ही नक्कीच म्हणत असाल, माझा वरचा मजला रिकामा झालाय किंवा केमिकल लोच्या झालाय.
तसं काही नाही लोक्सहो !
काय्येना, की कधी कधी लंच झाल्यावर मॉनिटरसमोर बसलं, की डोळे असे अर्धवट अधोमुख होतात आणि अशी स्वर्गीय दृश्ये मन:पटलावर रेंगाळत राहतात.
सो हे जे वरती लिहिलंय ना, वो तो है अपना सपना फनी फनी !!!
प्रत्यक्षात येउदे नै तर नै, एक आपलं तुम्हाला थाप मारायला काय हरकत आहे, असं झालं म्हणून ? काय ?
नाही, म्हणजे थोर्थोर संत मंडळीसुद्धा ढाका लावतात,
‘मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्यासी...’
फिर अपन क्यू पीछे रैनेका ?
......तुमचंपण असं काही स्वप्न आहे का ? सांगा की हो मग ! लावा मस्त थाप !
(अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगागागागा. फुल्टॉस चक्क.
मुंगी उडाली आकाशी...
(अनाहितामध्ये पूर्वप्रसिद्ध)
का हो ? स्वप्नं बघायला
आवडतं की
खिक्क्क्क्.
हाहा
वरडा!!
शुभेच्छा.
मस्त किस्सा
स्वस्तात सोडला =))
स्वप्न आहे म्हणुन चांगले आहे,
भारी !
कथा आवडली.
एकजात सगळे हेच्चारवाले
:)
हाय....
>>> घोंगडी मार द्यायचा प्लॅन
माझ्याकडून मार... ;-))
हा हा हा
हा हा हा
बॉस होता का होती? =))
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
लिखाण नेहमीप्रमाणेच खुसखुशीत.
खिक्क→→→→"मि.मुत्तू"
:)
ते
:-)
आवदस्ड्द्ममस्तदस्ड्द्ममसवदस्ड
लै भारी ,विनोदी खुसखुशीत
खमंग लिवलंय . आवडेश .
+१ . मुंगेरीलाल के हसीन सपने .