Skip to main content

ही कसली उस्तुकता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 24/10/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
ही कसली उस्तुकता? काल दसरा झाला. आज सर्व पेपरना सुट्टी.लोकसत्ता तेव्हडा चालू, म्हणून मिळाला. लोकसत्ता अपवादानं हाती येतो. कागद, छपाई दर्जेेदार ,मन भरुन आलं. मनात आलं पेपर लावावा . किती पेपर लावणार ,किती वाचणार दुसरं मन. आणि पान नं. ८ अर्थसत्ता वर आलो,तिथं एका बातमीचं हेडिंग, “मूहुर्ताची सोने खरेदी---------- -----------बाबत उस्तुकता , काय?उस्तुकता? हा कोणता शब्द? आम्ही उत्सुकता ,औत्सुक्य वरून उत्सुकता शब्द ऐकला होता.लोकसत्ता तुम्ही सुघ्दा ?मनात आलं इथं शब्द छल करायचा अजिबात माझा हेतु नाही.पण अशी चूक मुद्राराक्षसाची होऊ शकत नाही,ही उपसंपादकाची डुलकी पण नव्हे हे चक्क व्याकरणाचं अज्ञान आहे. फार पूर्वी ज्यावेळी १रु. किंमत निदान आजची २५०रु. असेल त्यावेळी टाईम्स आॅफ इंडिया त्यांच्या पेपर मधल्या एका स्पेलिंग मिस्टेकला १रु. देऊ असं जाहिर करायचे,मला नाही वाटत कोणी त्यांच्याकडून पैसे मिळवू शकले असेल. लोकसत्ता तुमी जर असं चुकलासा तर बराबर कोन लिवनारवो?
लेखनविषय:

वाचने 14221
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by अभ्या..

आता तिथे सॅन्डविचेस ला रेत की चुडैल आणि गुडडे बिस्कीत ला अच्छे दिन भिस्कुट कधी लिहितील ते पाहतो. ;) पयले रेत की चुड़ैल झेपलच नै ना. पुना पुना वाचून पायल. अडानी (का आडानी?) बाबा

In reply to by बाबा योगिराज

अश्लील =)) =)) =)) बाकी मलईदांडू हा शब्द बुवांच्या तावडीतून कसा काय सुटला म्हणतो मी.

माझे आय पैड च आहे पण यावर हिंदी कि बोर्ड मुळे मराठी लिहिताना खूप मर्यादा येतात,पैड ,बैक ,मैप असे लिहावे, लागते, पूर्ण विरामासाठी खूप घोडदौड करावी लागते,स्वल्प विराम सोपा पडतो, सध्या इतर विराम चिन्हं उठत नाहीत,असो आय पैड ला स्व तगड किंवा स्वत असे म्हणावे काय,मिपा जेष्ठानी सुचवावे

माझे स्वगत मी मिपाकर एक वर्तमानपत्रातील चूक दाखवितो काय,आणि बरेच प्रतिसादक मलाच टार्गेट करतात काय,आकलनाच्या बाहेर,प्रमाण भाषेतच लिखाण व्हायला हवं असं सांगण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न कुणालाहि भावू नये ,माझ्याच लिखाणातून ,त्यात असलेल्या नसलेल्या चुका क़ाढून राहीले, मी समजा अशुद्ध लिहितो, त्यामुळं मी इतरांच्या अशुध्दतेकडं बोट दाखवू शकत नाही,हे कोणतं लॉजीक, स्वताचं मी झाकतो काय,दुसर्या चं बघतो काय,ज़रा कमी हात घाईवर येण्याचा प्रकार होता,मुद्दे संपून गुद्दयाची भाषा येवू घातली होती,मी तर खंबीर खडा होतो तर म्हणे पळ काढला, या सर्वा मागे मला डिवचण्याचा डाव असावा काय ,नक्की काय असावं.

In reply to by दिवाकर कुलकर्णी

काका, तुम्हाला ते वक्त चित्रपटातील राजकुमारचे अजरामर वाक्य आठवत नाही का? जिनके अपने घर शीशे के हों वोह दुसरोंपर पत्थर नही फेंका करते तळटीप १: वर्तमानपत्राकडून शुद्धलेखनाची अपेक्षा करणे गैर नाही. मात्र तशी अपेक्षा करताना आपण शुद्धलेखनाच्या ढिगभर चुका करुन नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करणे नक्कीच योग्य नाही. तळटीप २: माझ्या टंकनात शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात. ;)

अशी जाणवते - आपल्याला जो 'उत्सुकता' हा योग्य शब्द आहे हे माहीत आहे तो शब्द टाईप करणार्‍याला 'उस्तुकता' असाच लिहिला जातो असे वाटत असले/डोक्यात तसे बसले असले तर मुदलात तो शब्द चुकीचा लिहिला आहे हेच समजले नसणार! तुम्ही त्याला/तिला तो शब्द वाचायला सांगितलात तरी वाचताना तो शब्द 'उत्सुकता' असाच कदाचित वाचला जाऊ शकेल ही एक शक्यता ध्यानात घ्यावीत. :) आता याला मुळात कारण काय तर तो संशोधनाचा विषय होऊ शकतो. तुमचा मुद्दा पटण्यासारखा आहे की लोकसत्तासारख्या वर्तमानपत्रात अशा ढोबळ चुका असू नयेत आणि त्याही मथळ्यात. परंतु हा एकूण शैक्षणिक परिस्थिती, लोकांची एकूणच अचूक लिखाणाबाबतची उदासीनता, भावना समजल्याशी कारण बाकी कोण बघतोय अशी बेजबाबदार वृत्ती अशा अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. ('बे'शुद्ध्)रंगा

दिकु जी लोकसत्ता पत्र पाठवा,शुद्धलेखानातील चुक सांगा.त्यांनी सुधारली तर ठिक नायतर लोकसत्ता घेणे बंद करा.हाकानाका.त्यात धागा काढण्यासारखे काय आहे !

घ्या एवढी चर्चा होऊन परत रामाची सीता कोण !

धागा कां काढला धागा कोण काढतोय राव पुडीला बांदल्याला दोरा त्यो त्याला मांजा धरून पार आभाळापातूर न्हेला राव समद्यानी, हे म्हंजे म्हशी परीस रेडकू म्होट्ट झालं ,न्हवं काय

पेपर मधली भाषा ही प्रमाण भाषाच असली पाहिजे. असेच एक चुकीचे लिखाण पुण्यात सर्वत्र महानगरपालिकेने लिहिलेल्या संदेशात आढळते. "पाणी अडवा, पाणी जिरवा" ह्या ऐवजी "पाणी आडवा, पाणी जिरवा" असे बहुतेक ठिकाणी लिहिलेले आढळते.

हस्तांदोलन केल्यानं पुरुष आणि महिलेला 99 कोड्यांची शिक्षा! आता कोडे ह्या शब्दाचा एक मराठी अर्थ प्रचलित असताना असला मथळा का बरे दिला? इराणसारखा महान देश हस्तांदोलनासारख्या गंभीर गुन्ह्याला कोड्यांची खेळकर शिक्षा देईल का? फटके हा शब्द इतका अवघड, संस्कृतप्रचुर वा अप्रचलित आहे का? http://abpmajha.abplive.in/world/iranian-poets-face-lashes-for-shaking-…

In reply to by हुप्प्या

इंग्रजी>हिण्दी>मराठी असा प्रवास घड्याळाच्या सेकंदकाट्यावर, फारसा व्यासंग नसलेल्या, वाचन, शब्दसामर्थ्य नसलेल्या कॉपी-पेस्ट टंकणकांकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा व्यर्थ आहे.

९९ कोड्यांची शिक्षा वा रे वा मराठी बहुतेक मराठी शाळा बंद पडल्या आहेत, काही उरल्या सुरल्या असतील तर त्यानाही कुलपं घालून टाका, कडक लक्ष्मी सारखं आपणंच आपल्याला कोड्याची शिक्षा घ्यावी अस वाटायला लागलंय