Skip to main content

नात्याला अर्थ पुरेसा.....

लेखक चुकलामाकला यांनी शुक्रवार, 23/10/2015 08:40 या दिवशी प्रकाशित केले.
नात्याला अर्थ पुरेसा, कशास द्यावे नाव? संपेल कधितरी रस्ता, गवसेल तिथेही गाव… … गाठावा तीर कसा हा , जणू अथांग सागर; नाते तू जिथे सोडली तेथे थांबली अजूनही नाव… जगण्याच्या सायंकाळी , मज तुझी आठवण आली दूरदेशी तू सखये ,तुज कसे कळावे भाव…. तू मूक ढाळशी अश्रू, पण चरे काळजा पडती मी वाट पहातो कुठल्या , शब्दांनी भरतिल घाव… ही खंत कशाला वेडे की उठून गेले सारे? ठाऊक तुलाही होता, हा सारिपटाचा डाव…
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2550
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सुंदर कविता! आताच एका लेखावर डोके आपटून आलेय. इथे जरा जिवाला बरं वाटलं. असल्या कविता कशाला लिहिता ओ? मोदी पप्पू, फेकू. आप्टार्ड, नाहीतर बुवा-बाया. पुणे विरुद्ध बाकी सगळे असं काहीतरी लिहा. मग काय लिहिलंय तेही न बघता ५०० प्रतिसादांची गॅरेंटी.