✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रक्त पिपासू

अ — अरुण मनोहर, Tue, 10/27/2015 - 13:39
१९६० - ६५ मधले नाशिक आठवले. आता तिथेच काय, पण इतर शहरात देखील बहुदा, ढेकूण औषधाला देखील सापडत नसावेत. चांगलेच आहे म्हणा! पण साधारण दोन वर्षापूर्वी अमेरिकेत देखील ढेकणाचा (गावाचे नाव आठवत नाही) सुळसुळाट झाल्याची बातमी वाचली होती. म्हणजे काय, हे चिवट प्राणी कुठेना कुठे दबून रहात आपले रक्त शोषण करीत असतात. त्यां बोचऱ्या आठवणीसाठी शांता शेळके ह्यांची क्षमा मागून, एका गोड गीताचे विडंबन देत आहे. ही वाट दूर जाते ....... ही खाट खूप खाजे, झोपेमधील जीवा क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा ही खाट खूप खाजे, झोपेमधील जीवा येथे पिळापिळात, ढेकूण साचलेले शोषुनी रक्तभारे, ते टंच जाहलेले एक नख लावताची, त्यांचा फुगा फुटावा क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा ही खाट खूप खाजे, रंध्रात बैसलेले, मत्कूण ते पहावे एकेक करुनी त्यांना, सारेच चीरडावे निद्रातळ खोल, तो शांतसा मिळावा क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा ही खाट खूप खाजे, झोपेमधील जीवा क्षण एक झोपवेना, करतो अखंड धावा

प्रतिक्रिया द्या
1810 वाचन

💬 प्रतिसाद (4)

बापरे!

पैसा
Wed, 10/28/2015 - 10:33 नवीन
हा कोणता रस म्हणावा?
  • Log in or register to post comments

आपलं ढे़कूणप्रेम बघुन

द-बाहुबली
Wed, 10/28/2015 - 14:39 नवीन
स्लमडॉग्गमिलेनीअर मधेल रिंग रिंग रिंगा अवश्य चाळावे असे सुचवतो.
  • Log in or register to post comments

:-)

अमृत
Wed, 10/28/2015 - 14:54 नवीन
ही ही.... अहो पण ढेकूण चिरडायचे नसतात. त्यांना पाण्यात बुडवून मारावे लागते.
  • Log in or register to post comments

एक्च लंबर!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/29/2015 - 06:59 नवीन
मस्त झालेय विडंबन!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा