
असे लगडलेले झाड पाहून लोणचे करायचा मोह आवरेना!
साहित्य: कच्च्या पपईच्या फोडी चार वाट्या, पाऊण वाटी लाल मोहोरी, दोन चमचे लाल तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल, मेथी दाणे अर्धा चमचा, एक लिंबू.
सानिकाची आयडिया चोरलीय, पण माझ्याकडे तसे चमचे नाहीत म्हणून मग साध्या चमच्यांवर समाधान!

कृती: पपईचे दोन भाग करून चीक धुवून घ्या. आता त्याची साले काढून आवडीप्रमाणे फोडी करून घ्या. फोडींना मीठ, हळद लावून ठेवा. अर्धी वाटी तेल तापत ठेवा. मेथी दाणे तळून घ्या. उरलेल्या तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून गार करायला ठेवा.
लाल मोहोरी मिक्सरच्या भाड्यात बारीक करा. थोडे पाणी घालून मोहोरी छान फेसून घ्या. तयार फोडींमध्ये लाल तिखट, फेसलेली मोहोरी मिसळा. गार झालेली फोडणी मिसळा. एक लिंबू पिळा. सर्व मिश्रण चमच्याने ढवळा. दुसय्रा दिवशी लोणचे खाण्यास तयार होईल.
लोणचे खाताना मात्र जरा जपून, मोहोरी नाकात झणझणते. हे लोणचे लगेच खायचे असेल तर पपई किसून घ्यावा. दह्यात कालवून खाल्यास सौम्य होते.
काळी मोहोरी घातल्यास लोणचे कडू होते, म्हणून लाल मोहोरी...असे आईचे मत आहे. आपल्या जबाबदारीवर काळी मोहोरी वापरण्यास हरकत नाही!

प्रतिक्रिया
पपईचे लोणचे!!! मी तर हात
लोणचे छान दिसतेय.
मी हा धागा बघताना हाच विचार
In reply to लोणचे छान दिसतेय. by रेवती
हीहीही, २ कैर्यांचं का होईना
In reply to मी हा धागा बघताना हाच विचार by स्रुजा
नॉन व्हेज लोणची
In reply to लोणचे छान दिसतेय. by रेवती
छान दिसतयं. सॅलडसाठी कच्ची
रेवती, अगं कच्च्या पपईचे लोणचे आई करायची नेहमी
वाह!! वाह! छान दिसतेय लोणचे :
मला कच्च्या पपईची फरसाणसोबत
अरे वा..
धन्यवाद!
मोहरी मिक्सरमध्ये वाटली की
लोणचं आवडलं पण
फोटो मस्तं,
चार दिवस
In reply to फोटो मस्तं, by स्नेहल महेश
थंक्स
In reply to चार दिवस by अनन्न्या
मस्तं आणि हटके पाककृती. आवडली
पपईचे लोणचे! अनन्न्या
तेवढे koshambir आणि भाजीची
असेच म्हणते. :)
In reply to तेवढे koshambir आणि भाजीची by त्रिवेणी
मस्त रेसीपी
ओह्ह... सॉलिड ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राधा ना बोले ना बोले ना बोले रे... :- Azaadवा!
छान
मस्त
काकडीच्या लोणच्याची रेशिपी
काकडीचे असेच करायचे
छान दिसतंय
छान