ही तान कधीची..!
==============================
ध्यानी तरळती क्षण काही
ही याद कशाची..
मनी झंजावती लहरी काही
ही गाज कुणाची..
रानी पसरती भास काही
ही रात कधीची..?
तनी अंकूरती फुटवे काही
ही आस कशाची..
घनी गर्जती कल्लोळ काही
ही काच कुणाची..
पानी ओसरती आवेग काही
ही काट कधीची..?
भानी उमलती किरणे काही
ही हाक कशाची..
बनी झिळमिळती थेंब काही
ही साथ कुणाची..
कानी शहारती गीते काही
ही तान कधीची..?
ही तान कधीची..!
==============================
स्वाती फडणीस .......... २०-११-२००८
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2261
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म
मनी
In reply to ह्म by श्रावण मोडक
सहमत, पण..
In reply to मनी by स्वाती फडणीस
ह्म्म..लय
In reply to सहमत, पण.. by श्रावण मोडक
खूप छान
सहमत
In reply to खूप छान by मीनल
कविता वाचणारांचे
मस्त..
:)