Skip to main content

या सुन्दर जगात

लेखक विवेक विद्वास यांनी मंगळवार, 15/01/2008 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
या सुंदर जीवनात कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी... पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत विचारात गुंतल्यासारख कधी कधी... अन पाहताना तिच्याकडेच विचारात गुंतायच असत कधी कधी... रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच... जागुन अशी रात्र काढावी कधी कधी... नंतर "जागली होतिस का रात्री?" म्हणून विचारावे कधी कधी... मागायचा असतो देवाकडे... हात तिचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या विषय तिचा निघाल्यावर कधी कधी... असते रागवायचे लटकेच "अस काही नाहिये" म्हणून कधी कधी... विरहात तीच्या... असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी... पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती... असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2942
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कविता कोणाची आहे ते पण लिहित जा रे. नाहीतर ती चोरी ठरते. निदान आरोपीच्या पि॑जर्‍यात तरी उभाराव॑ लागत॑. असो, मिपावर तुझे स्वागत असो.

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती... असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी... पडायच असत प्रेमात कधी कधी... क्या बात है! तात्या.

छानच लिहिले आहे. मागायचा असतो देवाकडे... हात तिचा चोरुन कधी कधी... द्यायच असत आश्वासन त्यालाही पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी... या ओळी वाचून हसु आले,:)))

कावळ्या मस्त लिहीली आहेस...

मस्त!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||